সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, February 29, 2012

वाघोबांनी अडविली प्रधान वनसचिवांची वाट

वाघोबांनी अडविली प्रधान वनसचिवांची वाट

देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - सध्या वाघांच्या अस्तित्वाचा मोठा प्रश्‍न उभा ठाकला आहे. आपली ही समस्या सांगायची तरी कुणाला आणि कशी, असा प्रश्‍न कदाचित वाघांनाही पडला असावा. मात्र, ताडोबातील वाघांनी यावर उपाय शोधला आणि चक्क प्रधान वनसचिवांचा ताफा अर्धा तास अडविला. वनसचिवांकडे जणू ते आपली कैफियतच मांडत आहेत, असे ते दृश्‍य होते. या अनोख्या भेटीने कदाचित सचिव महोदय भारावले असावे. वाघांनी तर आपले काम केले. आता वाघांच्या प्रश्‍नावर उपाययोजना करायची की नाही, याचा निर्णय सचिवांनी घ्यायचा आहे.

पुनर्वसित कुटुंबांना आर्थिक मदतीचे धनादेश देऊन परत येणाऱ्या वाहनांचा ताफा अडवून ताडोबाच्या राजाने अधिकाऱ्यांची "थेटभेट'च घेतली. अर्धा तास वाट अडवून दोन बछड्यांनी जणू रस्त्यावर ठिय्याच मांडला होता. वाघांची घटती संख्या आणि नागरी वस्तीचे अतिक्रमण, याचीच चिंता जणू हे बछडे मांडत असावेत. ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या जामनी या गावाचे पुनर्वसन होत असल्याने या गावातील लाभार्थ्यांना रविवारी (ता. 26) आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. त्यासाठी वनविभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, अनिलकुमार सक्‍सेना, जिल्हाधिकारी विजय वाघमारे, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अरुण शिंदे, ताडोबा-अंधारी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विनयकुमार सिन्हा, उपजिल्हाधिकारी ठाकरे, उपवनसंरक्षक संजय ठवरे आदी अधिकारी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वाहनांचा ताफा ताडोबाच्या दिशेने निघाला. सायंकाळी चारच्या सुमारास ताफा पांढरपौनीजवळ आल्यानंतर रस्त्याच्या मधोमध वाघाचे दोन बछडे रस्त्यावर बसले होते. लालमातीच्या या वाटेवर ते बागडत होते. अधिकाऱ्यांचा ताफा जवळ येताच ते क्रोधित झाले. शेकडो जणांच्या उपस्थितीत ते जराही मागे सरकले नाहीत. सध्या ताडोबात रिसॉर्ट आणि मानवी वस्तीचा प्रश्‍न "आ' वासून उभा आहे. मानवी वस्ती दूर करण्यासाठी पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे; मात्र रिसॉर्टला परवानगी दिली जात असल्याने वाघांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. याच पार्श्‍वभूमीवर या बछड्यांनी वनविभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांची भेटच जणू घेतली असावी. सुमारे अर्धा तास त्यांनी वाट अडवली. हा क्षण टिपण्यासाठी अधिकाऱ्यांचा मोह अनावर झाला होता. अधिकाऱ्यांनी मोबाईलमधील कॅमेरातून वाघाच्या छबी टिपल्या.

सचिवांना मुंबईला जायचे असल्याने ते घाईत होते. मात्र, त्यांच्या घाईशी वाघोबांना काही करायचे नव्हते. आधी आमचे ऐका, नंतरच पुढे जा, अशा आविर्भावात जणू वाघांनी रस्त्यावर ठाण मांडले होते. तोपर्यंत ताडोबात सफारीला आलेल्या पर्यटकांनी दोन्ही बाजूंनी गर्दी केली. सचिव प्रवीण परदेशी यांची जिप्सी अगदी वाघांच्या समोर होती. त्यांनीही वाघांची छायाचित्रे काढली. वाघांचा हा स्वयंघोषित रास्तारोको संपल्यानंतरच परदेशींना पुढच्या प्रवासाला जाता आले.

प्रतिक्रिया
On 29/02/2012 08:57 AM Adv. khyati shah said:
ह्या व्यतिरिक्त त्यांच्या जवळ कुठला अजून पर्याय होता का? ह्यावरून तरी प्रधान वन सचिवांना कळायला हवं, त्यांनी काय करायला पाहिजे ते.
On 28/02/2012 11:11 AM Gaurishankar Patane said:
गारहाणे मांडण्या साठी रस्ता रोको हा एकच पर्याय आहे आहे कामगार संगठनाने, राजकीय पुढार्याने त्यांना शिकवले कि काय ?

Thursday, February 09, 2012

बाबा आमटेंच्या स्मृतिदिनी आजपासून भारत जोडो अभियान

बाबा आमटेंच्या स्मृतिदिनी आजपासून भारत जोडो अभियान

चंद्रपूर - राष्ट्रीय एकात्मता, देशाची अखंडता व पर्यावरण जनजागृतीसाठी देशातील तरुणाईंसमवेत संवाद साधण्यासाठी बाबा आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या "भारत जोडो अभियाना'ला यावर्षी 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कन्याकुमारी ते काश्‍मीर व अरुणाचल ते गुजरात या दोन्ही "भारत जोडो अभियाना'त सहभागी झालेले सर्व युवक-युवती व संयोजकांचे बाबांच्या स्मृतिदिनी आनंदवनात गुरुवार (ता. नऊ) आणि शुक्रवारी (ता. दहा) 25 वर्षांनंतर सहकुटुंब स्नेहमिलनाचा राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या स्नेहमिलन कार्यक्रमासाठी देशातील सर्व प्रांतांचे अभियानातील प्रतिनिधी सहभागी होत आहेत. अभियानातील महाराष्ट्रातील सर्वात जास्त युवक-युवती सहभागी होते, या सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. अशोक बेलखोडे, अतुल शर्मा, महाराष्ट्राचे समन्वयक नफिसा, दगडू लोमटे, माधव बावगे यांनी केले आहे. तरुणाईला आव्हान देत व देशातील तरुणाईला जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत यातील भेद दूर सारून सशक्त अखंड, एकात्म भारत निर्माणसाठी आवाहन करत बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली देशातील तरुणाईचे हात रचनात्मक व अहिंसात्मक कार्याकडे वळविण्यासाठी "हाथ लगे निर्माण में, नही मारने नही मॉंगने' "जोडो भारत जोडो भारत' घोषणा घेऊन ता. 24 डिसेंबर 1985 ते नऊ एप्रिल 1986 या दरम्यान कन्याकुमारी ते काश्‍मीर या 13 प्रांतातून 108 दिवसांत पाच हजार 42 किलोमीटर अंतर पहिल्या टप्प्यात पार केले. दुसऱ्या टप्प्यात ता. एक नोव्हेंबर 1988 ते 26 मार्च 1989 या दरम्यान अरुणाचल ते ओखा (गुजरात) या 15 राज्यांतून 122 युवक-युवतींनी सात हजार 546 किलोमीटर अंतर 148 दिवसांत पार केले.
या दोन्ही अभियानात सहभागी झालेले युवक-युवती देशभर आपापल्या भागात परत जाऊन राष्ट्र निर्माणाच्या सामाजिक कामात गुंतलेले आहेत. भारत जोडो अभियानाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हे सर्व अभियानार्थी बाबांच्या स्मृतिदिनी सहकुटुंब एकत्र येऊन ओळखी दृढ करून आपापल्या कार्याचा आढावा घेऊन नवीन उपक्रमाबाबत चर्चा करून पुढील कार्याची वाटचाल निश्‍चित करणार आहेत.

Monday, February 06, 2012

नगरपालिका ते मनपा

नगरपालिका ते मनपा

नगरपालिका ते मनपा

चंद्रपूर नगरीने कृत-त्रेता-द्वापार व काली अशी चारही युगे पाहिली आहेत. त्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या या नगरीचे वैभव आणि संपन्नता सहज लक्षात येते. प्रारंभी आर्यवंशीय राजा कृतध्वजाने ङङ्गलोकपूर' म्हणून हे शहर वसवले. पुढे कृत-त्रेता युगानंतर द्वापार युगाअंती चंद्रहास्य नावाच्या राजाने लोकपूरवर स्वारी करून ही नगरी पादाक्रांत केली. या नगरीतील झरपट आणि इरई नदीचा रणीय परिसर पाहून तो या नगरीच्या मोहात पडला आणि हीच राजधानी करण्याचे त्याने ठरवले. मात्र, राजधानी करतानाच त्याने लोकपूर' हे नाव बदलून, आपले नाव त्याला जोडले आणि चंद्रपूर' असे नाकरण केले. तेव्हापासून आजतागायत या नगरीचे चंद्रपूर हेच नाव काय आहे. १२ व्या शतकातील नागवंशीय राजसत्तेच्या विनाशानंतर पुढे गोंड राजवटीचा उदय झाला. तो इतिहास सर्वज्ञात आहेच. नगरपालिका ते महानगरपालिका ब्रिटिशांनी भारतावर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर १८४२ मध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाविषयक कायदा केला. देशात सर्व प्रमुख शहरांत या संस्था स्थापण करण्याचे ब्रिटिशांनी जाहीर केले. मात्र, या कायातील तरतुदी लोकविरोधी होत्या. लोकांकडून थेट कर वसुलीची तरतूद त्यात होती. त्यामुळे हा कायदा अलात न आणता जाणकार ब्रिटिशांनी तो गुंडाळला. पुढे त्यात सुधारणा करून नव्याने हा कायदा आणला गेला. या कायानुसार महाराष्ट्रात पहिली नगरपालिका सांगोला येथे स्थापण्यात आली. आणि नंतर अहदनगर, सोलापूर, पंढरपूर, कल्याण, पुणे, नागपूर, अरावती, वर्धा इत्यादी ठिकाणी झाली. मात्र, त्यातून चंद्रपूर सुटले. १८५५ ध्ये चंद्रपूर क्षेत्रातील भोसल्यांची सत्ता खालसा झाल्यानंतर ब्रिटिशांची सत्ता स्थिरावली. त्यानंतरच चंद्रपूरला प्रशासकीय पातळीवर हत्त्व आले. ब्रिटिशांनी चंद्रपूर या नावाचा इंग्रजी उधार चांदा' असा केला. त्यामुळे चंद्रपूरला आजही अनेक जण बोलीचालीत 'चांदा' असेच संबोधतात. ब्रिटिशांनी चांदा जिल्हा केला. चांदा जिल्हा अस्तित्वात आला, तरी त्याची तहसील मूल होती आणि तिथेच तहसील कार्यालय अस्तित्वात होते. ते नंतर चंद्रपूरला आणले गेले आणि चंद्रपूर हे शहर तहसील व जिल्ह्याचे ठिकाण झाले. १८६७ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी (त्यावेळी डेप्युटी कश्निर म्हणायचे) कॅप्टन एच. एम वॅडिन्टन यांनी चंद्रपूर शहरातील प्रतिष्ठितांची एक बैठक बोलावली. आणि त्यांच्यासोर नगरपालिकेचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा ब्रिटिशांना विरोध करणे शक्य नव्हते. त्यांनी सांगावे आणि आपण ऐकावे, अशीच परिस्थिती होती. या बैठकीतही तेच झाले. जिल्हाधिकार्‍यांनी प्रस्ताव ठेवताच त्याला सर्वांनी अपेक्षेप्राणे होकार दिला. आणि १७ मे १८६७ रोजी कॅप्टन वॅडिन्टन यांनी चंद्रपूर नगरपालिकेची अधिकृत घोषणा केली. यावेळी चंद्रपूरची लोकसंख्या केवळ १६ हजार एवढी होती. या लोकसंख्येनुसार १६ सदस्यांचे एक मंडळ स्थापन करण्यात आले. प्रति एक हजार व्यक्तिंमागे एक सदस्य, अशी संकल्पना त्यामागे होती. हे सारे सदस्य जिल्हाधिकार्‍यांनीच निवडले. त्यावेळी निवडणूक घेण्याची प्रथा नव्हती किंवा कुणाला सत्तेची लालसाही नव्हती. त्यामुळे जी नावे जिल्हाधिकारी ठरवतील, त्यावर एकत व्हायचे. याच १६ सदस्यांना नगराध्यक्षांची निवड करायची होती. अपेक्षेनुसार ही निवड करण्यात आली. त्यानुसार चंद्रपूरचे पहिले नगराध्यक्ष कॅप्टन. एल. बी. लुसीस्थि झाले. १८६७ ते १८८६ या १९ वर्षांच्या कालखंडात २५ पदसिद्ध डेप्युटी कश्निर नगराध्यक्ष झाले. नगराध्यक्षांचा कार्यकाळ किती कालावधीचा राहील, हे तेव्हा ठरले नव्हते. त्यामुळेच १९ वर्षांत २५ नगराध्यक्ष झाले. या १९ वर्षांच्या काळात ब्रिटिशांचा सत्ताकारभार स्थानिक सदस्यांनी चांगलाच अनुभवला होता. प्रशासकीय यंत्रणा काय असते, ती कशी हाताळायची, याचा अनुभव स्थानिकांना आला होता. हा अनुभव स्थानिकांना आल्याचे लक्षात आल्यावर तत्कालीन जिल्हाधिकारी एच. जे. मकजॉर्ज यांनी नवी निवडणूक १८८६ मध्ये जाहीर केली. त्यावेळी निर्वाचित आणि नानियुक्त सदस्यसुद्धा नियुक्तच केले जात होते. आताची निवडणूक पद्धती नव्हती. १८८६ मध्ये झालेल्या या निवडीत पुन्हा १६ सदस्य निवडण्यात आले आणि नगराध्यक्ष म्हणून एका प्रतिष्ठित व संपन्न नागरिकाची निवड करायची, असे ठरले. जिल्हाधिकार्‍यांनी चौकशीअंती एक नाव निश्चित केले, ते होते रावसाहेब चंदीप्रसाद दीक्षित यांचे. रावसाहेब त्यावेळी प्रतिष्ठित आणि श्रींत नागरिक म्हणून ओळखले जायचे. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि चंद्रपूर नगरपालिकेचे पहिले भारतीय नगराध्यक्ष म्हणून ते पदावर विराजान झाले. चंद्रपूर नगरपालिकेच्या स्थापनेचा हा इतिहास आहे. पुढे १९६५ ध्ये म्हणजे हाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र नगरपालिका कायदा-१९६५' अस्तित्वात आला. त्यानुसार चंद्रपूर नगरपालिकेला अ' दर्जा मीडाला. विकास चंद्रपूर नगरीचा किंवा जिल्ह्याचा आधुनिक विकास जो काही दिसतो, त्याची मुहूर्ते ही ब्रिटिशांनीच रोवली. ब्रिटिश राज्यकर्ते हे धोरणी व विकासवादी होते. ब्रिटिशांनी जेव्हापासून चंद्रपूर नगरीत पाय ठेवला, तेव्हापासून मुलभूत विकासाला मोठा वेग आला. रेल्वे, टपाल, रस्ते, सार्वजनिक शिक्षण, आरोग्यसेवा या सर्व सोयीसुविधा ब्रिटिशांनी दिल्या. ब्रिटिशांच्या या कार्यपद्धतीचा अवलंब नंतर अनेक भारतीय नगराध्यक्षांनी केला. आझाद बाग, सार्वजनिक वाचनालय, विविध चौकांची र्निमीती , नळयोजना, शाळा अशी हत्त्वाची विकासको त्यावेळी करण्यात आली. खुशालचंद खजांची यांनी १९२९ ते १९३४ या पाच वर्षांच्या कार्यकाळात मुलां-मुलींसाठी प्राथकि शिक्षण सक्तीचे केले. शिक्षणाप्रतीची ही आस्था आणि हत्त्व त्यांनी त्यावेळी ओळखले होते. अशा अनेक सुधारणा नंतर होत राहिल्या. अलीकडच्या २० वर्षातील नगरपालिकेचा कारभार हा परंपरेला शोभणार नसला, तरी काही मुलभूत गोष्टी निश्चित होत आहेत. गती भूमिगत गटार योजना असो, बाजार गाळे असो की दिवाबत्तीची सोय असो. आपापल्यापरीने म्हणा किंवा अपरिहार्यतेपोटी म्हणा थोडीफार को होऊ लागली. शहराची लोकसंख्या चार लाखांच्या घरात पोचली. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला नगरपालिका तोंड देऊ शकत नाही, हे खरे असले, तरी अनेकदा सोयीसुविधा पुरवण्यात पालिका प्रशासन वेळकाढूपणा आणि अनास्था दाखवित आली आहे. या पार्श्वभूमीवर आता हानगरपालिकेची स्थापना झाल्याने नागरिकांना पुन्हा एकदा चांगल्या प्रशासनाची प्रतीक्षा लागली आहे. महानगरपालिका व अपेक्षा चंद्रपूर नगरपालिकेची जेव्हा स्थापना झाली, तेव्हा या नगराची लोकसंख्या केवळ १६ हजार होती. आता ती अफट वाढली आहे. चार लाखांच्यावर ही लोकसंख्या गेली आहे. या शहराची ही वाढती लोकसंख्या आणि आकारान बघता शासनाने चंद्रपूर शहर महानगरपालिके'ची घोषणा केली. वर्गाच्या या महापालिकेची एक नोव्हेंबर २०११ रोजी अधिसूचना निघाली. चंद्रपूरकरांच्या दृष्टीने ही आनंददायी बाब आहे. एकीकडे या शहराची पंचशताब्दी साजरी होत असतानाच, त्यात अखिल भारतीय राठी साहित्य सेंलनाचे यजानपद शहराला आणि वरून पुन्हा महानगरपालिका हा खरे तर दुग्धशर्करा योगापेक्षाही मोठा योग म्हटला पाहिजे. १४४ वर्षांनंतर या शहराला महानगराचा दर्जा. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा शिगेला पोचल्या आहेत. अलीकडच्या काळात नगरपालिकेच्या कारभाराचा आलेख बघितला, तर तो सतत खाली घसरतानाच दिसतो. विकासकाच्या संदर्भातही ङ्खार काही उजेड पडलेला नाही. ठिकठिकाणी अतिक्रण, भूमाफियाचा धुमाकूळ, कंत्राटदारांची मुजोरी, राजकारण्यांच्या हातातले प्रशासन, विकासदृष्टीचा अभाव असलेले नगराध्यक्ष, असा सावळागोंधळ नागरिकांनी अनुभवल्या मुळे हापालिकेकडून फार अपेक्षा ठेवल्या जात आहेत. येत्या काही दिवसांत हापालिकेसाठी निवडणूक होईल. कुणाची तरी सत्ता बसेल. नगराध्यक्ष कालबाह्य ठरून महापौर विराजान होतील. मुख्याधिकार्‍यांच्या जागी आयुक्त येतील. हे सारे बदल होत असताना नागरिकांनाही बदल हवे आहेत. पाचविला पूजलेल्या समस्या कायच्या जरी सुटू शकल्या नाही, तरी त्या की करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. रस्ते मोठे व्हावे, वाहनतळासाठी जागा उपलब्ध व्हावी, पाणी नियमित रस्त्यावर खड्डे नसावे, पथदिवे सर्वत्र लागावे, पादचार्‍यांसाठी पदपाथ मोकळे व्हावे, अतिक्रणाचा विळखा दूर करावा, या अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांच्या आहेत. कोणत्याही शहराची ओळख ही सांस्कृतिक आणि शैक्षणिक वैभवामुळे होत असते. या शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. घनदाट अरण्याने वेढलेला हा परिसर आहे. पाणी, खनिजांनी सृद्ध आहे. पण तरीही मागासपणाचा शिक्का अजूनही काय आहे. औद्यागिक शहर म्हणून देशाच्या नकाशावर हे शहर चकत असताना सांस्कृतिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा काळोख आप टिकु शकलेला नाही. आजही आदिवासीबहुल भाग म्हणूनच आपण या जिल्ह्याचा उल्लेख करीत असतो. ही भूषणावह बाब नाही. तो दुबळेपणा आहे. आपल्या नगटातील ताकद न दाखवता दुबळेपण घेऊन आपण सदैव याचका'च्या भूमीकेत असतो. खेचून आणण्याची ताकद आपल्यात नाही, असे नाही. मात्र, त्याचा उपयोगही कधी केल्याचे दिसत नाही. ही ताकद करायची असेल, नवी ओळख प्रस्थापित करायची असेल, तर सांस्कृतिक-शैक्षणिक विकासासोबतच राजकीय दृष्टीकोनही बदलणे गरजेचे आहे, हे मुद्दा सांगावेसे वाटते. -
 
 संजय तुमराम, सरचिटणीस, चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघ, चंद्रपूर. ९९२२९०३२९२
वैभवी 'चांद्या'ची आनंददायी सफर

वैभवी 'चांद्या'ची आनंददायी सफर


वैभवी 'चांद्या'ची आनंददायी सफर
पंधराव्या शतकात चंद्रपूर येथे गोंड राजांचे साम्राज्य होते. त्यामुळे या शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथे प्राचीन आणि गोंडकालीन वास्तू आजही आहेत. महाकाली मंदिर, अंचलेश्‍वर मंदिर, एकवीरा मंदिर आहे. परकोटाला चार द्वार असून, जटपुरा, पठाणपुरा, बिनबा आणि अंचलेश्‍वर अशी त्यांची नावे आहेत. शहरात गोंडकालीन वास्तूंमध्ये राजा वीरशहा आणि राणी हिराईची समाधी प्रसिद्ध आहे. वाकाटककालीन वास्तूही येथे आहेत. महाकाली मंदिरामुळे चंद्रपूरची ख्याती सर्वदूर असून, स्थानिक भाविकांसह आंध्र प्रदेश, मराठवाड्यातील लोक श्रद्धेपोटी येथे येत असतात. प्राचीन काळी चांदा नावाने ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहराची पंचशताब्दी साजरी होते आहे. या परिसरातील भटकंती आनंददायी ठरू शकते.







ताडोबा

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प 625 चौरस किलोमीटरच्या विशाल क्षेत्रात पसरले आहे. मोहुर्ली, कोळसा आणि ताडोबा हे त्याचे तीन विभाग. या प्रकल्पात 35 ते 40 पट्टेदार वाघ असल्याचे सांगितले जाते. बिबटे 55 च्या घरात आहेत. याशिवाय अस्वल, चितळ, गवे, रानकुत्री, रानडुकरे, मोर, भेकर, मगर यांच्यासह अनेक प्रजातींचे प्राणी येथे बघायला मिळतात. पर्यटनाच्या दृष्टीने किंवा व्याघ्रदर्शनासाठी महाराष्ट्रात आदर्श असा ताडोबा प्रकल्प आहे. इथले जंगल बांबूचे आहे आणि भूभाग समतल आहे. यामुळे व्याघ्रदर्शन आणि जंगलातील सफारी सहजपणे करता येते. या प्रकल्पांतर्गत रस्ते तयार करण्यात आले असून, ते थेट व्याघ्रस्थळापर्यंत पर्यटकांना नेऊन सोडतात. घनदाट अरण्य आणि समृद्ध प्राणी विश्‍व कोणत्याही पर्यटकांना अत्युच्च आनंद देणारे असेच आहेत.



जायचे कसे?

ताडोबाच्या तीनही विभागांत स्वतंत्रपणे जावे लागते. ताडोबा क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी चिमूरपासून दहा किलोमीटर अंतरावर खातोडा द्वार आहे आणि दुसरे मोहुर्ली येथे प्रवेशद्वार आहे. नागपूरहून येणाऱ्या पर्यटकांना चिमूरमार्गे जायचे असल्यास आधी चिमूर आणि नंतर खातोडा, असा प्रवास करावा लागेल. नागपूरवरून हे अंतर जवळपास 130 किलोमीटर आहे, तर मोहुर्लीला जाण्यासाठी चंद्रपूरहून जावे लागते. हे अंतर सुमारे 170 किलोमीटरचे आहे. चंद्रपूरवरून मोहुर्ली 22 किलोमीटर आहे, तर कोळसा क्षेत्रात जाण्यासाठी चंद्रपूरवरूनच चिचपल्लीमार्गे झरी येथे जावे लागते. हे अंतर जवळपास नागपूरवरून 185 किलोमीटर आहे. चंद्रपूरवरून हे 40 किलोमीटर आहे.



जाण्याच्या वेळा

या प्रकल्पात जाण्यासाठी ठराविक वेळा निश्‍चित केल्या आहेत. सकाळी सहा ते 11 आणि दुपारी दोन ते सहा, अशा या वेळा आहेत. या वेळेपूर्वी किमान अर्धा तास प्रवेशद्वाराजवळ पोचल्यास पर्यटकांना उर्वरित सोपस्कार करता येतात. अलीकडे प्रवेशासाठी आरक्षणाची व्यवस्था पद्धत सुरू करण्यात आली आहे. पर्यटकांनी निराशा टाळण्यासाठी हे आरक्षण करणे गरजेचे आहे. पर्यटकांची वाढती संख्या बघितल्यास आता वेळेवर प्रवेश करणे कठीण झाले आहे.



त्यामुळे ताडोबा क्षेत्र संचालकांच्या चंद्रपुरातील मूल मार्गावरील कार्यालयातून हे आरक्षण केल्यास सोपे जाते. ताडोबा फिरण्यासाठी वैयक्तिक वाहने किंवा भाड्याच्या जिप्सी आवश्‍यक आहेत. ज्या पर्यटकांकडे स्वत:ची चारचाकी वाहने आहेत, अशांना जिप्सी करण्याची गरज नाही; मात्र ज्यांना उघड्या जिप्सीतून सफारीचा आनंद घ्यायचा आहे, असे पर्यटक प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या जिप्सी भाड्याने घेऊ शकतात.



बाबांचे आनंदवन

थोर समाजसेवक दिवंगत बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांच्या श्रमातून फुललेले आनंदवन हे पर्यटनस्थळ नसले, तरी प्रेरणास्थळ मात्र नक्की आहे. कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी बाबा आणि ताईंनी जे श्रम घेतले, आयुष्य झिजविले, त्याचे सार्थक म्हणजे आनंदवन होय. आनंदवन हे नागपूर -चंद्रपूर मार्गावर वरोरापासून एक किलोमीटर अंतरावर वसले आहे. नागपूरपासून हे अंतर सुमारे 110 किलोमीटर आहे. महारोगी सेवा समितीच्या वतीने येथे कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न सुरू आहे. रोगमुक्त झालेल्या रुग्णांकडून विविध प्रकारच्या वस्तूंची निर्मिती येथे केली जाते. येथे अंध, अपंग, मूकबधिर यांनाही आसरा देऊन शिक्षण आणि रोजगाराचे धडे दिले जात आहेत. हा प्रकल्प नागपूर मार्गावर असल्याने वाहतुकीची सुविधा आहे. शालेय सहली, कार्यशाळेसाठी स्थानिक नागरिक येथे भेट देतात. येथे विदेशी पर्यटकांची संख्या मोठी आहे. येणाऱ्या मान्यवरांची राहण्याची व्यवस्था येथे करण्यात येते. चंद्रपूरपासून आनंदवनचे अंतर 45 किलोमीटर आहे.



भांदकनगरी अर्थात भद्रावती

नागपूर-चंद्रपूर मार्गावर भद्रावती शहर आहे. पूर्वीची भांदकनगरी प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंनी प्रसिद्ध आहे. गवराळा येथे गणेश मंदिर, प्राचीन नागवंशाचे भद्रनाग मंदिर, जैनधर्मीयांचे पार्श्‍वनाथ मंदिर, विजासन लेणी येथे आहेत. हिंदू, जैन आणि बौद्ध धर्माचे हे आध्यात्मिक अधिष्ठान असल्याने पर्यटकांची संख्या मोठी असते. रेल्वे आणि बसगाड्यांची सोय असल्याने बाहेरील पर्यटकही येथे भेटी देतात. नागपूर येथून हे अंतर 128 आहे. चंद्रपूरपासून भद्रावती 25 किलोमीटरवर आहे.



रामदेगी

आनंदवन प्रकल्पाच्या समोरून चिमूरकडे जाणाऱ्या मार्गावर ताडोबा अभयारण्याच्या कुशीत रामदेगी हे निसर्गरम्य आणि धार्मिक स्थळ आहे. या परिसरात डोंगराळ पहाडाच्या पायथ्याशी शिवमंदिर आहे. या ठिकाणी पौराणिक काळात प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासकाळात विसावा घेतल्याची आख्यायिका आहे. हा परिसर संपूर्ण निसर्गाने नटला असून, प्राण्यांची वर्दळ असते. दरवर्षी मार्गशीर्ष, पौष महिन्यात रविवार, सोमवार आणि महाशिवरात्रीला यात्रा भरते. या वेळी येथे भाविक मोठ्या संख्येने येतात. येथे जाण्यासाठी प्रवासाची विशेष सुविधा नाही. शिवाय निवास आणि भोजनालयाचीही सुविधा नसल्याने दूरच्या पर्यटकांना ये-जा करण्यासाठी गैरसोय होते.चंद्रपूरवरून हे अंतर 80 किलोमीटर आहे.



अड्याळ टेकडी

नागभीड-ब्रह्मपुरी मार्गावर अड्याळ टेकडी आहे. येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ज्येष्ठ शिष्य तुकारामदादा गीताचार्य यांचा आश्रम आहे. येथे ग्रामसुधारणा, ग्रामस्वच्छता आणि गावाचे नैतिक अधिकार, यावर समाजप्रबोधन केले जाते. अड्याळ टेकडी चंद्रपूरपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी ब्रह्मपुरी किंवा नागभीड येथूनही बसगाड्या आहेत.



सोमनाथ प्रकल्प

बाबा आमटे यांनी आनंदवनानंतर उभारलेला प्रकल्प म्हणजे सोमनाथ. येथे जाण्यासाठी मूल-मारोडा येथून जावे लागते. बसगाड्यांची विशेष सुविधा नाही. परिसरातील स्थानिक नागरिक खासगी वाहनांनी ये-जा करतात. येथे नैसर्गिक झरा असून, सदैव पाणी खळखळत असते. शेजारी शिवमंदिर असून, भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी असते. सोमनाथ प्रकल्पात विविध प्रकारचे कृषी उत्पादन प्रायोगिक तत्त्वावर घेतले जाते. येथे बाहेरच्या पर्यटकांची ये-जा असते. पूर्वी येथे प्राणिसंग्रहालय होते. वाघ, बिबट, मगर, अस्वल पाहण्यासाठी खासकरून जिल्ह्यातील नागरिक जायचे. आता येथे प्राणी नाहीत. चंद्रपूरवरून सोमनाथचे अंतर 55 किलोमीटर आहे.



घोडाझरी, सात बहिणींचा डोंगर

नागभीडपासून पाच किलोमीटर अंतरावर चंद्रपूर मार्गावर घोडाझरी प्रकल्प आहे. इंग्रजकालीन या तलाव परिसरात पर्यटकांसाठी बगीचा, पाण्याचे कारंजे, बोटिंग, बेटावर प्रकाशझोताचे मनोरे उभारण्यात आले आहेत. सुटीच्या दिवसांत येथे पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. लहान मुलांसाठी चिल्ड्रेन पार्क, जलक्रीडा, निवासाची सुविधा, उपाहारगृह असल्याने उन्हाळ्यातही नागरिक येतात. याच प्रकल्पापासून जवळच सात बहिणींचा डोंगर आहे. डोंगरावर जाण्यासाठी तीन किलोमीटर चढून जावे लागते. डोंगराच्या चहूबाजूंनी निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. चंद्रपूरवरून 90 किलोमीटर आहे.



माणिकगड

गडचांदूरपासून दीड-दोन किलोमीटर अंतरावर माणिकगड पहाड आहे. येथे गोंडकालीन किल्ला असून, पायथ्याशी पुरातन विष्णू मंदिर आहे. माणिकगड पहाडावर कोलाम जमातीचे अस्तित्व आढळून येते. या पहाडावर गुंफा आणि अंमलनाला आहे. घनदाट वनराईने नटलेला हिरवा निसर्ग येथे सदैव खेळत असतो. येथे जाण्यासाठी कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे पर्यटकांना येथे जाणे गैरसोयीचे ठरते. राजुरामार्गे चंद्रपूरवरून जाण्यासाठी 85 किलोमीटरचे अंतर कापावे लागते.

लेखकांचा स्वभाव रंगातून

लेखकांचा स्वभाव रंगातून

चंद्रपूर, ता. ४ : व्यक्तीस्वभाव हा मानसाच्या जीवनातील एक अंग आहे. एखाद्याचा स्वभाव ओळखायचा असेल तर त्या व्यक्तीचा सहवास लाभणे अपेक्षित असते. मात्र, विजयराज बोधनकर यांनी कुणाच्याही प्रत्यक्ष सहवासात न जाता त्यांच्या साहित्यात रममान होऊन हाती कुंचला घेतला आणि मराठी साहित्यातील ज्येष्ठ लेखकांचा स्वभाव रंगातून माडला आहे. या चित्रांचे प्रदर्शन ङ्कराठी साहित्य संम्म्मेलनात लावण्यात आले असून, जुन्या साहित्यिक विचारवंतांचे नवे विचार तरुण पिढीला ङ्कोहित करीत आहेत.
ठाणे येथील विजयराज बोधनकर यांनी गेल्या सहा वर्षांपासून चित्रांच्या दुनियेत रममान झाले असून, त्यांनी ठिकठिकाणी प्रदर्शन भरविले आहे. ५० हून अधिक नामवंत समाजसुधारक, साहित्यिकांचे स्वभाव विनोदी ढंगातून ङ्कांडलेले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हातात एक झोपडी आहे. तिच्याकडे  निरक्षर करीत ते गावाची रचना साहित्यातून मानडताना दिसतात. बहिणाबाई चौधरी घरात चुलीजवळ बसून तव्यावर पोळी शेकत आहेत. त्याचवेळी त्यांचा दुसरा हात काव्यरचनेत व्यस्त आहे. या चित्रातून ग्रामीण भागातील एक निरक्षर महिलाही साहित्यात किती प्राबल्य आहे, हे दिसून येते. पू.ल. देशपांडे यांचे चित्र बघून हसूच येते. डोक्यावर पुस्तक. त्यात एका पानावर फुलाचे चित्र, 'देश' हा शब्द, दुसर्‍या पानावर एक पान आणि इंग्रजीत 'डे' अशी संकल्पना पुलंचा विनोदीस्वभाव सांगितलेला आहे.  माधव गडकरी यांच्या हातात एक लेखनीरुपी पिचकारी असून, त्यातून फवारा निघत आहे. महात्मा फुले यांचे चित्र परिवर्तनवादी विचार सांगून जाते. फुलेच्या हातात लेखणी असून, तिच्या टोकावर ब्राह्मणवादी विचारांचा पगडा असलेला व्यक्ती दूर द्गेकताना दिसतो. या चित्रात ब्राह्मणवादी साहित्यांची द्गेकद्गाक झालेली आहे. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या हाती दुःखी आणि सुखी अशी दोन मुखवटे आहेत. यातून रसिकांच्या भावना समजून घेणारा साहित्यिक दृष्टीस पडतो. चि. वि. जोशींच्या हातात एक विदूषक आहे. त्याचा हात चि. विं. च्या गालावर गुदगुल्या करीत आहे. लिखाणाची जादू गालावर हसू आणते, असा बोध होतो. आचार्य अत्रेंच्या हाती काटेरी पेन आहे. यावरून अत्रे रोखठोक विचारांचे होते, हे सांगायचे आहे. साने गुरुजींच्या डोळ्यातून अश्रू पडत आहेत. मात्र, ते पुस्तकावर पडताच द्गूले झाल्याचे दिसतात. परागकणातून हळवं मन असलेला हा साहित्यिक होतो, हेच या चित्रकाराला सांगायचे आहे.


घरात टीव्ही नाही. पण, साडेचार लाखांची पुस्तके आहेत. ते सर्व वाचले. साहित्यिकांच्या स्वभावाचा अनुभव शेअर करण्यासाठी व्यंगचित्रांची ही कल्पना आहे.  सहा वर्षांपासून चांगला प्रतिसाद असून, जुन्या साहित्यिकांचे नवे विचार सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
- विजयराज बोधनकर, चित्रकार.

Saturday, February 04, 2012

३२ वर्षांपूर्वीचे साहित्य संमेलन

३२ वर्षांपूर्वीचे साहित्य संमेलन

चंदपूर नगरीत तब्बल ३२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे.  ४ मे १९७९ मध्ये चंदपूरातील ज्युबिली शाळेच्या प्रांगणात ५३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. माजी केंदीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे स्वागताध्यक्ष्य होते.  या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक वामन  चोरघडे होते. तीन दिवस चाललेल्या या साहित्य संमेलनाला दिग्गज साहित्यिकांनी हजेरी लावली होती. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विं.दा.करंदीकर, नारायण सुवेर्, या साहित्य संमेलनाला उपस्थित होते. तेव्हा शहरात हॉटेल ची सोय नव्हती. त्यामुळे पाहुणे जुबली शाळेतच थांबले. काही जन कुणाच्या घरी थांबून होते.  ५३ व्या साहित्य संमेलनात नामांतरवाद्यांचा मुद्दा  गाजला होता. संमेलनाच्या पहिल्याच दिवशी नामांतर समर्थकांनी गोंधळ घालत संमेलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठांनी मध्यस्ती करून आंदोलकांना आवरले आणि आग तात्पुरती शांत झाली. संमेलनकाळात नारायण सुवेर्, डॉ. श्रीपाद भालंचंद जोशी यांच्यासारखे अनेक कवी चंदपूरच्या रस्त्यावरून स्थानिक गांधी चौकापर्यंत कविता वाचत गेले होते तर विठ्ठल वाघ मोठ्याने कविता गाऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. या अभिनव प्रकारामुळे लाकोंनी संमेलनाचा मुख्य मंडप सोडून या अनोख्या कार्यक्रमाकडे धाव घेतली होती.
३२ वर्षांपूवीर्च्या या आठवणी रसिकांच्या मनात अजूनही ताज्या आहेत. त्या संमेलनात सहभागी झालेल्या जुन्या पिढीच्या जोडीने आता इथली नवी पिढी ८५ व्या साहित्य संमेलनासाठी सज्ज झाली आहे.