সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, August 08, 2010

चंद्रपुरात सरासरी 116.5 मि.मी. पाऊस!

Sunday, August 08, 2010 AT 12:00 AM (IST)
चंद्रपूर - गेल्या 24 तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील वैनगंगा, वर्धा आणि इरई नदी दुथडी भरून वाहत आहे. शुक्रवारी (ता. 6) ब्रह्मपुरी तालुक्‍यातील नांदगाव (जानी) येथे भिंत कोसळून मुकरू बांगरे हा तरुण ठार झाला. या पावसात चंद्रपूर, कुनाडा, राजुरा, ब्रह्मपुरी, कोठारी येथील घरांची पडझड झाली.
जिल्ह्यात मागील 48 तासांत सरासरी 116.5 मि.मी. पावसाची नोंद झाली. यात सावली, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, जिवती, सिंदेवाही, कोरपना, मूल आणि ब्रह्मपुरी तालुक्‍यांत मुसळधार पाऊस झाला. इरई धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने संभाव्य धोका लक्षात घेता सहा दरवाजे उघडण्यात आले. 207 दश. घ.मी. क्षमता असलेल्या इरई धरणात 206.4 दश. घ.मी. जलसाठा भरला आहे. एकूण सात दरवाजे असलेल्या धरणातील साठा वाढल्याने सुरवातीला दोन दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर दुपारी तीन आणि सायंकाळी सहा दरवाजे उघडण्यात आले. सर्व दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले असून, इरई नदी दुथडी भरून वाहत आहे. चंद्रपूर ते दाताळा जाणारा मार्ग इरई नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद झाला होता. या पावसामुळे शुक्रवारी सायंकाळपर्यंत लाठी-कोठारी, वणी-माजरी आणि घुग्घुस-वणी या प्रमुख मार्गांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे परिवहन महामंडळाने अनेक बसफेऱ्याही रद्द केल्या होत्या. जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्ना जोशी आणि दिवाणी न्यायाधीश खांडडहाले यांच्या शासकीय निवासस्थानावरही झाड कोसळल्याने बरीच हानी झाली. याशिवाय पोलिस मुख्यालय चौकातील मोठे झाड उन्मळून पडल्याने नागपूर-मूल मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली.
चंद्रपूर जिल्हा :
सावली : 161, गोंडपिंपरी : 154.2, पोंभुर्णा : 153, चंद्रपूर : 140, राजुरा : 136.2, बल्लारपूर : 128.4, जिवती : 127, सिंदेवाही : 123, कोरपना : 113, मूल : 106.2, ब्रह्मपुरी : 103.2, नागभीड : 97.6, भद्रावती : 93,90 मि.मी.पेक्षा कमी पावसाचे तालुके ः वरोरा- 62.4, चिमूर- 49.5


^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
तुमची प्रतिक्रिया लिहा

* नाव:
* ई-मेल:
* प्रतिक्रिया:

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.