সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, December 06, 2009

Devnath Gandate

आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यावर गावकऱ्यांचा बहिष्कार!
Tuesday, June 16th, 2009 AT 12:06 AM Tags: vidarbha, chandrapur, bycott, rural, social Close... चंद्रपूर - सर्पदंशाने पतीचे निधन झाले. मुलांसह ती एकटीच होती. काळ गेला. जुन्या स्मृती धूसर झाल्या. एकाकी जीवनात कुणी एक आधार देणारा भेटला. दोघांनी लग्न केले, सुखाने संसार करण्यासाठी. पण, गावकऱ्यांच्या मनात वेगळेच होते. पहिल्याच दिवसापासून त्यांच्यावर बहिष्कार सुरू झाला, तो आजतागायत कायम आहे. तिचा आणि त्याचा दोष काय? तर जाती-धर्माच्या भिंती तोंडून ते एकमेकांना आधार देण्यासाठी एकत्र आले, विवाह केला एवढाच!गावात रस्ता नाही, मात्र कानाला मोबाईल आहे. आधुनिकतेशी नाळ जोडताना पिढ्यान्?पिढ्या जोपासलेली जाती-धर्माची जळमटे फेकून द्यायला कुणीच तयार नाही. 35 उंबरठ्याच्या नानकपठार या गावावजा तांड्यात तर परिस्थिती अत्यंत भयावह आहे. त्याच गावातील गुजाबाईची ही व्यथा...पहिल्या पतीच्या निधनानंतर दुसऱ्याशी आंतरजातीय विवाह केल्यामुळे गुजाबाई आणि तिचे कुटुंबीय 15 वर्षांपासून अस्पृश्?यतेचे जिणे जगत आहे. माणिकगड पहाडावरील नानकपठार या गावात बऱ्यापैकी प्रस्थ असलेल्या काही लोकांनी या कुटुंबीयांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणली आहे.1971 मध्ये आलेल्या दुष्काळामुळे नांदेड जिल्ह्यातील बंजारा समाज जिल्ह्यातील माणिकगड पहाडावर स्थलांतरित झाला. शासनाने त्यांना उपजीविकेसाठी शेतजमिनी दिल्या. तेव्हापासून पहाडावरील छोट्या-छोट्या गावात बंजारा समाज वास्तव्य करीत आहे. हिरामण आडे यांचे कुटुंब 1971-72 मध्ये नानकपठार येथे आले. त्यांची मुलगी गुजाबाई हिचा विवाह 1980 मध्ये आंध्रातील नारायण जाधव यांच्याशी झाला. या संसारात त्यांना दोन मुले झाली. काही वर्षांतच नारायण जाधव यांचे सर्पदंशाने निधन झाले. त्यामुळे ती वडील हिरामण आडे यांच्याकडे परत आली. त्यानंतर तिने बल्लारपूर येथील गोकुलनगरातील रहिवासी ब्रिजलाल शर्मा यांच्याशी आंतरजातीय विवाह केला. गावात प्रस्थ असलेल्या तीन कुटुंबांनी विरोध करीत त्यांना अमानुष वागणूक देणे सुरू केले. मागील 15 वर्षांपासून हे दोघेही नानकपठार येथे प्लास्टिक घातलेल्या कुडाच्या घरात राहून शेती करतात. त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे. गुजाबाई ही पहिल्या पतीची दोन्ही मुले सोबत घेऊन दुसऱ्या पतीसोबत जीवन जगत आहे. दरम्यान, गत 15 वर्षांपासून या कुटुंबाला अस्पृश्?यतेची वागणूक दिली जात आहे. नळ आणि विहिरीवर पिण्याचे पाणी भरू दिले जात नाही. त्यामुळे गुजाबाई दोन किलोमीटर अंतरावरील गावातून पिण्याचे पाणी आणते. कुटुंबीयांची मतदान यादीत नावे नसून, रेशनकार्डपासून वंचित ठेवण्यात आले आहे. शेतीतही बळजबरी करून पीक घेण्यापासून मज्जाव करीत आहेत. शेतात नांगरणी केल्यास बैलांना हाकलून लावण्यात येते. मोठा मुलगा राजेश (वय 25) याचा विवाह झाला. सत्यपाल (वय 22) याच्या विवाहासाठी मुलगी बघणे सुरू आहे. दोनदा जुळलेले लग्न गावावर वर्चस्व असलेल्या कुटुंबांनी धमकी देऊन मोडले. गावात राहायचे असेल, तर नवऱ्याला सोड, अशी धमकी देत असल्याचेही गुजाबाईने सांगितले. भीतीपोटी या प्रकाराची गुजाबाईने कुठे तक्रार केली नाही. ती व तिचे कुटुंबीय 15 वर्षांपासूनचा हा जातीभेदाचा अन्याय निमूटपणे सहन करीत आहे. dev


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.