সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, December 07, 2009

चंद्रपूरचा पारा 10 अंशाखाली

चंद्रपूरचा पारा 10 अंशाखाली
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, December 02, 2009 AT 11:30 PM (IST)
Tags: vidarbha, winter, cold

चंद्रपूर - उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कोसळत असताना अतिउष्ण चंद्रपूर शहराचाही पारा 10 अंशाखाली गेला आहे. पहाटेच्या वेळी कमाल तापमान 13, तर किमान 10 अंशावर आहे. पहाटेच्या वेळी धुके पडत असून, नागरिक गारठू लागले आहेत.

उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भातील जिल्ह्यांत पारा घसरू लागला आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला असून, पहाटेच्या वेळी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. यावर्षी ऑक्‍टोबर महिन्यात उष्णतेचा तडाखा बसला. ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या टप्प्यात तापमानात चांगलीच वाढ झाली होती. यावर्षी कमाल तापमानाचा उच्चांक याच महिन्यात गाठल्याने नागरिक हैराण झाले होते. ऑक्‍टोबर महिन्याचा प्रारंभ गरमा-गरम गेल्यानंतर दिवाळीचा जल्लोष जात नाही तोच गारव्याला सुरवात झाली आहे. मात्र, यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात तापमान सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशाने जास्त होते. त्यामुळे पाहिजे तशी थंडी जाणवली नाही. गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात घट होऊ लागली आहे. सध्या उत्तर भारतात किमान तापमानाचा पारा 12 ते 13 अंशाच्या आसपास घसरला आहे. उत्तर भारताकडून राज्याकडे येणारे वारे थंड असल्याने जिल्ह्यातील तापमान घटले आहे. या थंड वाऱ्याचे प्रमाण काही दिवसांत वाढण्याची शक्‍यता असल्याने थंडीचा कडाका वाढण्याची शक्‍यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात घट होण्यास सुरवात झाल्याने दिवसाही थंडी पडू लागली आहे. हवामान खात्याच्या संकेतस्थळानुसार चंद्रपूर शहरातील सरासरी तापमान कमाल तापमान 28 अंश, तर कमीत कमी 10 अंश आहे. पहाटे दोन ते सकाळी आठ वाजेपर्यंत थंडी कायम असते. सूर्य उगवल्यानंतर सकाळी नऊ वाजतापासून थंडीचा जोर कमी व्हायला लागतो. रात्री आठ ते मध्यरात्रीपर्यंत तापमान 15 ते 17 अंशापर्यंत असते. त्यामुळे सूर्य अस्ताला गेला की, रात्रीच्यावेळी कपाटात ठेवलेले शाल, स्वेटर्स बाहेर निघू लागले आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात जोरदार थंडी पडेल. साधारणत: जानेवारीपर्यंत थंडी राहील, असा अंदाज आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.