সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, December 13, 2009

वर्षभरात वाघांनी घेतले 40 बळी

चंद्रपूर - दरवर्षी वाघांच्या हल्ल्यात जिल्ह्यात 40 जण मृत्युमुखी पडतात, अशी माहिती खुद्द वनाधिकाऱ्यांनीच वनमंत्री पतंगराव कदम यांना दिली. त्यामुळे या प्रश्‍नाचे गांभीर्य या जिल्ह्यात किती आहे, हे कदम यांना समजले. मात्र, त्यांनी यावर भाष्य करणे टाळले.

वनमंत्री डॉ. पतंगराव कदम आज (ता. 12) जिल्ह्यात आले होते. त्यांनी येथील वनराजिक महाविद्यालयाच्या सभागृहात वनाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी वनविभागाचा आढावा घेतला. या बैठकीला विधानपरिषद सदस्य जैनुद्दीन जव्हेरी, राजुराचे आमदार सुभाष धोटे, प्रधान मुख्य वनसंरक्षक जोशी उपस्थित होते. डॉ. पतंगराव कदम म्हणाले की, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक शस्त्रे देण्यात येत आहेत. तसेच त्यांना शस्त्र चालविण्यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

वनविभागाचे बी. डी. एम. रद्द करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. स्पेशल ड्युटीपोस्टची पदेसुद्धा भरण्यात येत आहेत. रेंज पातळीवर वाहनेही लवकरच देण्यात येत आहेत. लाकडाची चोरी थांबविण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यावेळी वनसंरक्षक आर. एस. यादव यांनी चंद्रपूर उत्तर व दक्षिण विभागाच्या कामांची माहिती सादर केली. या विभागात साग, बीजा हे अतिमहत्त्वाचे लाकूड असून, यापासून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. ताडोबा अभयारण्यात 198 वाघ व बिबट्या आहेत. या वाघांच्या हल्ल्यांमुळे दरवर्षी 40 लोक मृत्युमुखी पडतात. मृतांच्या नातेवाइकांना दोन लक्ष रुपये देण्यात येतात, असे सांगितले. वनविकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक एस. एच. पाटील यांनी वनविकास महामंडळाच्या विविध कामांची माहिती सादर केली. वनविकास महामंडळाला 10 कोटी रुपयांचा प्रकल्प मिळाला आहे. या विभागाला 24 कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत 12.89 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे. या चर्चासत्राला मुख्य वनसंरक्षण वन्यजीव नंदकिशोर, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक एस. पी. ठाकरे, विभागीय वनाधिकारी अनिल मोहन, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप मनकवडे, वनविभागातील इतर अधिकारी रेंज फॉरेस्टर्स व इतर अधिकारी उपस्थित होते

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.