काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, September 09, 2012

सामान्य रुग्णालयात शंभर खाटांवर दीडशेवर बाळंतीण

सामान्य रुग्णालयात शंभर खाटांवर दीडशेवर बाळंतीण


देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर, ता. ८ : तीनशे खाटांची व्यवस्था असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात १००  खाटा ‘हिला प्रसूती
कक्षासाठी असून, सध्या दीडशेवर महिला रुग्ण भरती झाल्याने गैरसोय होत आहे. शिवाय केवळ दोन
डॉक्टर आणि अल्पशा परिचारिकांच्या भरवशावर प्रसूती प्रक्रिया पार पाडली जात आहे.
चंद्रपूर शहरात २०१२ या वर्षात जानेवारी ते ऑगस्टमध्ये सात हजार ६४१ बाळांचा जन्म  झाला. यात तीन
हजार ९९१ मुले, तर तीन हजार ६५० मुली जन्मला आल्या. यावरून प्रत्येक महिन्यात ५०० प्रसूती संख्या असून, यातील ५० टक्के प्रसूती ही रुग्णालयात होत आहे. शिवाय शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून प्रसूतीसाठी  येतात. शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये नैसर्गिक प्रसूती होत असतानादेखील अधिक
पैसे कम विण्याच्या हव्यासापोटी सिझेरियनचा उपाय सुचविण्यात येतो. सिझेरियनसाठी एका रुग्णाला किमान २५ हजारांपर्यंत खर्च करावा लागत आहे. ही रक्कम  परवडण्यासारखी नाही. त्यातच जिल्हा सामान्य रुग्णालयात ७० टक्के प्रसूती ही नैसर्गिकरीत्या केली जात असून, दररोज २० हून अधिक बाळांचा जन्म  होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी चार कक्ष आहेत. प्रत्येक कक्षात २५ खाटांची व्यवस्था आहे. प्रसूतिपूर्व भरती महिला कक्ष, नैसर्गिक प्रसूती कक्ष, सिझेरियन कक्ष आणि प्रसूतीनंतर राहण्यासाठी एका कक्षाची व्यवस्था आहे. एकूण १०० खाटा असलेल्या रुग्णालयात दीडशेहून अधिक महिला प्रसूतीसाठी नोंदणी करीत आहेत.  डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असल्याने केवळ दोन डॉक्टरांना प्रसूतीची प्रक्रिया पार पाडावी लागत आहे.

शववाहिकेचा अभाव, रुग्णवाहिकांची चांदी
जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत रुग्णांना पोहोचविण्यासाठी शववाहिकाच नसल्याने ‘ोठी गैरसोय होत आहे. दुसरीकडे चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली रुग्णवाहिकांकडून रुग्णांच्या नातेवाइकांची ‘ोठी लूट होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना खासगी शववाहिनीचा खर्चदेखील परवडत नाही. रुग्णालयाच्या आवारात अनेक सेवाभावी संस्थांच्या रुग्णवाहिका उभ्या आहेत. रुग्णांना पोहोचविल्यानंतर त्या परत जाण्याऐवजी आवारातच ठाण मां डून बसतात. त्यामुळे पार्किंगमध्ये मोठी गर्दी होत असते. गेल्या काही महिन्यांपूर्वी या खासगी रुग्णवाहिका बाहेर काढण्यासाठी वाहतूक विभागाची ‘दत घेण्यात आली होती. मात्र, एका दिवसाच्या कारवाईने कोणताही परिणाम  झालेला नाही. शववाहिनी उपलब्ध नसल्याने इथल्या रहिवाशांची रुग्णालयामधून मृतदेह नेताना गैरसोय होत आहे

Saturday, September 08, 2012

जिल्हा शिक्षण

जिल्हा शिक्षण

चंद्रपूर
चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या नागपूर विभागामध्ये पूर्वेकडील टोकामध्ये स्थित आहे आणि विदर्भ प्रदेशाचा पूर्वेकडील भाग बनलेला आहे. 
    चंद्रपूर जे पूर्वी चांदा म्हणून ओळखले जात असे ते शहर मध्य भारतात महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेच्या ठिकाणी आहे. शहराजवळ वर्धा नदी वाहते.
    चंद्रपूर ही 12 व्या पासून ते 15 व्या शतकापर्यंत गौड राजवंशाची राजधानी होती आणि त्यानंतर ती नागपूरच्या मराठा भोसलेव्दारा जिंकण्यात आली. 1854 पासून ते 1947 मधील भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत तो ब्रिटीश मध्यवर्ती प्रांताचा भाग बनलेला होता. शहरामध्ये गौड राजांची थडगी आणि कित्येक देवळे आहेत. परंपरेनुसार चंद्रपूर जिल्हा या अगोदर ‘चांदा’ म्हणून ओळखला जात असे आणि दंतकथेत त्या जागेचे नाव ‘ लोकपूरा ’ होते जे प्रथम
‘इंदपूर ’ म्हणून आणि पुढे चंद्रपूर म्हणून बदलले गेले.
    चंद्रपूर शहरामध्ये भगवान शंकराची रूपे असलेली महाकाली देवी आणि अचलेश्र्वर यांची प्राचीन देवालये आहेत. चंद्रपूर हे चांदा म्हणून देखील ओळखले जाते. हा प्रदेश कच्चे लोखंड, चूनखडी आणि कोळसा अशा खनिज संपत्तीने अत्यंत संपन्न आहे. सिमेंटचे अनेक कारखाने या प्रदेशाच्या ठिकाणी आहेत. शहरा सभोवती मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कोळशांच्या खाणींमुळे हे शहर काळ्या सोन्याचे शहर असेही ओळखले जाते.
    चंद्रपूर जिल्ह्यात 15 तालुके समाविष्ट आहेत ते असे : चंद्रपूर, बल्लारपूर, राजूरा, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागभीडल (हे रेल्वेचे जंक्शन सुध्दा आहे), ब्रम्हपूरी, सिंदेवाही, मूल, सावली, गोंडपिपरी, कोरपाना, पांभुरणा आणि जिवती.
    रेल्वेमार्गाव्दारे तो भोपाळ, ग्वालियर, इंदोर, नागपूर, झाँसी, आग्रा, नवी दिल्ली, जम्मू तावी, वारंगळ, विजयवाडा, चेन्नई, कन्याकुमारी, वडोदरा, बंगलोर, सिंकदराबाद, हैदराबाद, पुरी, अहमदाबाद, जयपूर, मुंबई-बंगलोर, म्हैसूर, लखनऊ, अलाहाबाद, कानपूर, झाँसी, वाराणसी, गोरखपूर, पटना, गया यांना जोडलेले आहे.
    चंद्रपूर हे जिल्ह्यातील अभियांत्रिकी/ तंत्रानिकेतन/ वैद्यकीय/ कायदा विद्यालये अशा शैक्षणिक सुविधांसाठी ख्यातनाम आहे.
    चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेच्या बाजूने वहाणारी वैनगंगा नदी ही जिल्ह्याची मुख्य नदी आहे. जिल्ह्यामध्ये वर्धा ही एकमेव बारमाही नदी आहे, जिचा प्रवाह मार्ग इतर दोन मुख्य नद्यांशी तुलना केली असता सर्वांत लांब आहे.
    हे शहर ‘इराई’ नदीच्या तरावर वसले आहे, शहरातून वाहणारी ‘झारपथ’ ही दुसरी नदी आहे. प्रदेशविषयक नकाशानुसार शहराचा उत्तरेकडील भाग उंच आणि दक्षिणेकडील खोलगट म्हणजे 56 मी. आहे. जुने शहर हे अत्यंत मोठ्या अशा 4 भीतींद्वारे वेढलेले आहे. सीटीपीएस ची उच्चभूमी गावठीदेव नाल्याचे उगमस्थान बनले आहे. रेंजर महाविद्द्यालयाची उच्चभूमी मुच्ची नाल्याचे उगमस्थान बनली आहे. हे नाले शहराचे हृद्यस्थानी असलेला  तलाव “रामलू तलाव” यामध्ये विलिन  झाले आहेत. इराई नदीला पुराचा मोठा इतिहास आहे, पुराच्या खुणा शहराच्या गडाच्या भिंतींवर म्हणजे पठाणपुरा प्रवेशव्दारावर दिसत आहेत. चंद्रपूर शहराची उत्तर-दक्षिण लांबी सुमारे 10 किमी. आणि पूर्व-पश्चिम ही 7 किमी आहे. शहराच्या उत्तरेमध्ये इराई नदीवर धरण बनविले असून क्षमता 207 मिलीयन क्युबीक मीटरची आहे

क्षेत्र (चौ.किमी.)11443
तालुक्यांची संख्या (उप जिल्हे)15
नगरांची संख्यासांविधिक नगरे7
प्रगणित नगरे16
महसुली गावांची संख्या1792
लोकसंख्याएकूण2194262
पुरूष1120316
स्त्री1073946
दशकातील वाढीची टक्केवारी (2001-2011)5.95
लोकसंख्येची घनता (व्यक्ती प्रति चौ.किमी.)192
लैगिंकतेचे प्रमाण959
बालकांचे लैगिंकतेचे प्रमाण(0-6 वर्षे)945
एकूण लोकसंख्येशी लोकसंख्येची टक्केवारीअजा14.3
अज18.1
ग्रामीण35.08
साक्षरतेचा दर (7 वर्षे आणि त्यावरील)व्यक्ती81.35
पुरूष88.73
स्त्री73.65

शैक्षणिक आकडेवारी :
व्यवस्थापन आणि प्रवर्गनिहाय शाळा
व्यवस्थापन निहाय शाळाप्राथमिकप्राथमिक उच्च प्राथमिकसहप्राथ उच्च प्राथसह आणि माध्य/उच्च माध्यउच्च प्राथमिकउच्च प्राथ आणि माध्य/उच्च माध्य.सहमाध्य/उच्च माध्य.सहएकूण
शासकीय शाळा081602026
स्थानिक संस्थांच्या शाळा1,062585002501,672
खाजगी अनुदानित11012954031124628
खाजगी विनाअनुदानित11104041672
इतर160000016
विना मान्यताप्राप्त6010007
एकूण1,205732750379302,421

नावनोंदणी :
व्यवस्थापन निहाय शाळांतील नावनोंदणी
शाळा व्यवस्थापनप्राथमिकप्राथमिक उच्च प्राथमिकसहप्राथ उच्च प्राथसह आणि माध्य/उच्च माध्यउच्च प्राथमिकउच्च प्राथ आणि माध्य/उच्च माध्यसहमाध्य/उच्च माध्य.सहएकूण
शासकीय शाळा06113,769038004,760
स्थानिक संस्थांच्या शाळा45,32987,135003,5990136,063
खाजगी अनुदानित14,34730,63629,776077,6941,833154,286
खाजगी विनाअनुदानित7721,30842501,8152374,557
इतर49100000491
विना मान्यताप्राप्त558066000624
एकूण61,497119,69034,036083,4882,070300,781

Friday, September 07, 2012

आदिवासींची 'अंधारवाट' येणार चित्रपटात

आदिवासींची 'अंधारवाट' येणार चित्रपटात

देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी स्वातंत्र्याच्या 50 वर्षांनंतरही मूळ प्रवाहात येऊ शकला नाही. उलट तो माओवादी आणि पोलिसांच्या बंदुकीचा शिकार बनला. या आदिवासींच्या समस्या आणि शासकीय योजनांचा बट्ट्याबोळ यावर प्रकाश टाकणाऱ्या "अंधारवाट' या कथेवर लवकरच चित्रपटनिर्मिती होत आहे. 
झाडीपट्टीतील कलावंत अनिरुद्ध वनकर यांनी ही कथा लिहिली. मुंबईच्या सार्थक मोशन पिक्‍चर प्रा. लिमिटेड यांनी चित्रपट तयार करण्याची घोषणा कोहिनूर हॉल, दादर येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात केली. सार्थक मोशनने यापूर्वी मराठीतील पहिला थ्रीडी असलेल्या "आई मला मारू नको' या चित्रपटाची निर्मिती केली. त्या चित्रपटाच्या 50 व्या दिनानिमित्त सोहळा पार पडला. त्या वेळी अनिरुद्ध वनकर यांनी लिहिलेल्या कथेवर चित्रपट निर्मितीची घोषणा निर्माता अविनाश जाधव, सुनील झोडे यांनी केली. या वेळी "शक्तिमान'फेम मुकेश खन्ना, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी निदेशक पद्‌मश्री रामगोपाल बजाज, अभिनेते विजू खोटे, ललित कला अकादमीचे डॉ. प्रकाश खांडके उपस्थित होते. 
"अंधारवाट' या चित्रपटात गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. शासनाकडून आदिवासींच्या विकासासाठी अनेक योजना येतात; मात्र प्रशासकीय यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांमुळे या योजना मूळ आदिवासींपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे दररोज एक माओवादी जन्माला येतो. 
या चित्रपटात उपेंद्र लिमये, चिन्मय मंडलेकर, किशोर कदम आदी मराठीतील प्रसिद्ध कलावंत भूमिका वठविणार असून, विदर्भातील नवोदित कलावंतांनाही संधी देण्यात येणार आहे. चित्रीकरण वाडा (जि. ठाणे), गोरेगाव (मुंबई) येथे होणार आहे.
हळद पिकाच्या व्यवस्थापनातून नफा

हळद पिकाच्या व्यवस्थापनातून नफा

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील प्रगतीशील शेतकरी सुधीर सातपुते यांनी हळद पिकाच्या शास्त्रशुद्ध व्यवस्थापनातून भरघोस नफा मिळवला आहे. त्यांनी शेतीत हळदीच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत अनेक प्रयोग करून साडे चार एकर शेतीतून ५ लाखाचा नफा मिळवला आहे व या वर्षी साडे आठ एकरातून त्यांना किमान अकरा लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे. सातपुते यांच्या या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना एक नवीन दिशा मिळाली आहे.
व्ही.ओ.१
हळदीचे पिक हे मसालावर्गीय पिकांमधील अतिशय लाभदायक पिक मानल्या जाते. मात्र या पिकाच्या शेतीवर मोठ्या प्रमाणात खर्च करावालागत असल्यामुळे व अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यास शेतकरी या पिकापासून दूर जातात. चंद्रपूर जिल्हातील सुधीर सातपुते मात्र याला अपवाद ठरले आहे. गेल्या १४ वर्षांपासून ते हळदीची यशस्वी शेती करीत आहे व त्यांचा अनुभव हा शेतकऱ्यांसाठी हळदीच्या पिकासाठी मार्गदर्शक ठरलय. विशेष म्हणजे काही वर्षांआधी त्यांची हळदी पिकाची शेतीही डबघाईला आली होती. मात्र हळदी पिकाच्या शास्त्रशुद्ध व्यवस्थापनातून त्यांनी फक्त लाखोंच्या नफाच मिळवला नाही तर शेतीवर होणार्या खर्चावरही मोठी बचत केली आहे. साडे आठ एकर क्षेत्रात लावण्यात आलेल्या हळदी पिकासाठी त्यांनी साडे चार एकरात वायगाव या स्थानिक वाणाची निवड केली आहे तर चार एकरात सेलम वाणाच्या हळदीची लागवड करण्यात आली आहे. वायगाव हळदीला स्थानीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे त्यामुळे दलालांच्या मदतीशिवाय ते या हळदीची बाजारात थेट विक्री करतात. हळद लागवडीसाठी त्यांनी पारंपारिक पद्धतीने लागवड करण्यापेक्षा सरी-वरंभे पद्धतीचा वापर केला. त्यामुळे जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होवून पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. गादी वाफे तयार करण्यासाठी सातपुते यांनी मजुरांची मदत घेण्याऐवजी ट्रक्टरच्या सहाय्याने गादी वाफे तयार केले, त्यामुळे सरी-वरंभे तयार करण्याचा प्रती एकरी येणारा १५ ते १६ हजाराचा खर्च ३.५ ते ४ हजारावर आला. या गादी वाफ्यांवर त्यांनी एक पुढे आणि दोन मागे या प्रमाणे ३ हळदीच्या बेन्यांची लागवड केली. लागवडी साठी त्यांनी त्यांच्या शेतातून मागच्या वर्षी तयार झालेले बेने वापरले त्यामुळे त्यांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत झाली.
हळदीच्या पिकाला पारंपारिक पद्धतीने पाणी देण्यापेक्षा त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला. पारंपारिक पद्धतीने पाणी दिल्यामुळे पाण्याचा आणि विजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय व्हायचा, तर तुषार ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यामुळे हळदीची पाने खराब व्हायची व याचा हळदीच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम पडत होता. सातपुते यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यामुळे ते आता पाण्याची बचत करू शकले व शिल्लक राहिलेल्या पाण्यावर आता ते साडे बारा एकर शेतीत कापसाचे पिक घेत आहेत. ठिबक सिंचनामुळे साडे आठ एकर हळदीच्या पिकाला पाणी देण्यासाठी त्यांना फक्त एक ते दिढ तास पंप सुरु ठेवाव लागतो. ठिबक सिंचनामुळे रासायनिक खतांच्या मात्रेतही मोठी बचत झाली आहे. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून त्यांना हळद पिकाच्या प्रत्येक अवस्थेत खताचे व्यवस्थापन करणे सोपे झाले आहे. पिकांना युरिया, पोटाश व इतर खते एकाच वेळी दिल्याने त्याचा फायदा होत नाही. पिकांना वाढीच्या प्रत्येक अवस्थेत खतानची वेगळी आवश्यकता असते. त्यामुळे सातपुते यांनी पिकाच्या अवस्थेप्रमाणे ठिबक सिंचनातून ठराविक खते देण्यास सुरुवात केली. सध्या ते पिकांना एक दिवसाआड २ किलो युरिया, एक किलो स्पुरद व आठवड्यातून एकदा १२:६१:०० देतात. पिकांना खतांची किती मात्र देण्यात आली आहे याचा त्यांनी काटेकोर हिशोब ठेवला आहे. खतांच्या या व्यवस्थापनातून खर्चात तर बचत झालीच पण जमिनीत खतांचा अतिरिक्त निचरा न झाल्यामुळे जमिनीची सुपिकताही टिकून राहिली.
खतांवर त्यांना प्रती एकरी ४ हजार याप्रमाणे जवळ जवळ ३५ हजार खर्च झाला तर मजुरी वर २ लाख, बुरशी नाशकावर १६ हजार, ठिबक सिंचनावर सरासरी ५० हजार व इतर खर्च ४५ हजार येणार आहे. असा सर्व खर्च विचारात घेसल्यास त्यांना ४ लाखाचा खर्च अपेक्षित आहे. या हळदीच्या पिका पासून त्यांना मागच्या वर्षी जवळ जवळ ८ लाखाचे उत्पन्न मिळाले व यावर्षी किमान ११ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. यावर्षी त्यांना १५०-१६० क्विनटल वाळलेली सेलम हळद व १०० क्विनटल वाळलेली वायगाव हळद होण्याची अपेक्षा आहे. वायगाव हळदीला किमान ८ हजार रुपये व सेलम ला ६ हजार क्विनटल भाव मिळाला तरी त्यांना १६ लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे. सर्व खर्च वजा केल्यास त्यांना प्रती एकरातून दिढ लाख नफा मिळू शकतो. विशेष म्हणजे सुधीर सातपुते यांनी कच्च्या हळदीवर प्रक्रिया करून त्यातून येणारी तुट कमी करण्यासाठी पण यशस्वी प्रयत्न केलाय. पाण्यात हळद उकळल्याने एक क्विनटल हळदीचा उतारा १४ ते १५ किलो यायचा व त्याचा रंग बिगडल्यास किंमतही कमी मिळायची. सुधीर सातपुते यांनी हळद उकळण्या ऐवजी वाफवण्याचा प्रयोग केला व त्यामुळे हळदीचा उतारा प्रती क्वीनटल २० किलो पर्यंत मिळाला व संपूर्ण हळकुंडाला एक सारखा रंग आल्यामुळे किंमतही चांगली मिळाली. हळदीच्या पिकात त्यांनी धण्याचे अंतरपिक घेवून एक लाखाचा कोथिंबीर बाजारात विकला आहे. विशेष म्हणजे कोथिंबीर लागवडीसाठी त्यांना बियाणे व मजुरी याव्यतिरिक्त कुठलाही खर्च करावा लागला नाही त्यामुळे हळदीच्या शेतीत धण्याचे आंतरपीक खूप फायद्याचे ठरते असा त्यांचा निष्कर्ष आहे. पारंपारिक पिकांना फाटा देवून नवीन पिकांकडे वळताना मोठा धोका पत्करल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये असते व या मध्ये नुकसान आल्यास ते लवकर निराश होतात. मात्र नगदी पिकांचे व्यवस्थापन कश्या प्रकारे करावे हे जर नीटपणे समजून घेतले तर ही पिकं नक्कीच भरघोस नफा मिळवून देणारी ठरू शकतात.
सीमाभागात सुरू होणार मराठी प्राथमिक शा

सीमाभागात सुरू होणार मराठी प्राथमिक शा


देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - भाषिक वादामुळे मातृभाषेच्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून शिक्षण देण्यासाठी विदर्भाच्या सीमावर्ती भागातील पाच तालुक्‍यांत 13 नव्या प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मान्यता दिली आहे. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकारांतर्गत या शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फतीने सुरू करण्यात येतील. 

राज्याला आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात आदी राज्यांच्या सीमा लागून आहेत. अशा सीमावर्ती भागात भाषिक समस्या निर्माण होत असते. त्यामुळे मराठी विद्यार्थ्यांना मातृभाषेच्या शिक्षणापासून वंचित राहावे लागते. राज्यातील 11 जिल्ह्यांना परराज्याची सीमा लाभलेली असून, त्या भागातील गावांमध्ये मराठी भाषिक लोकसंख्या आणि विद्यार्थी आहेत. मात्र, गोंदिया, गडचिरोली, नागपूर जिल्ह्याच्या काही तालुक्‍यांत मराठी माध्यमातून शिक्षण देण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे येथील विद्यार्थी मातृभाषेच्या शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. अशा सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांना मराठीतून शिक्षण देण्यासाठी प्राथमिक शाळा सुरू करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. त्यानुसार येथे स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय 20 जुलै 2012 रोजी शासनाने घेतला. त्याचा अध्यादेश एक सप्टेंबर 2012 रोजी काढण्यात आला असून, संबंधित जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. यानुसार राज्यातील चार जिल्ह्यांत 101 नवीन शाळा सुरू होतील. त्यात सर्वाधिक सांगली जिल्ह्यात 88 शाळांचा समावेश आहे. विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्‍यात दोन, नरखेड तालुक्‍यात एक, गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्‍यात सहा, तर गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्‍यात एक, तर एटापल्ली तालुक्‍यात तीन नवीन शाळा सुरू होतील. या शाळा तातडीने सुरू करण्याच्या सूचना शासनाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिल्या आहेत.
चंद्रपूरचा अनिरुद्ध "साम टीव्ही' मालिके

चंद्रपूरचा अनिरुद्ध "साम टीव्ही' मालिके


देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - गावातील नाटकाच्या रंगमंचावर अभिनय साकारणाऱ्या कलावंताला चंदेरी दुनियेत झळकण्याचे स्वप्न असते; मात्र अनेकांना ते पूर्ण करण्यासाठी मुंबईवारी करूनही पदरी निराशाच येते. तथापि, गुणी कलावंत खचत नाहीत. असाच एक कलावंत आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटांतून प्रेक्षकांपुढे आल्यानंतर आता घराघरांत पोहोचलेल्या "साम टीव्ही' या मराठी वाहिनीवरील "रंग माझा वेगळा' या मालिकेत येतो आहे. अनिरुद्ध वनकर असे या झाडीपट्टीतील कलावंताचे नाव असून, तो सीआयडी पोलिस निरीक्षकाची भूमिका साकारतो आहे. 
महाविद्यालयाच्या स्टेजवर भीमगीते सादर करून आपल्या गोड गळ्याचा सूर ऐकविणारा अनिरुद्ध 16 वर्षांपूर्वी नाटकांत आला. झाडीपट्टीतील प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर त्याने कलेतून छाप पाडली. झाडीपट्टीच्या रंगभूमीत नाट्यकलावंत, दिग्दर्शक, निर्माता आणि गायक अशी पंचरंगी ओळख निर्माण करणारा अनिरुद्ध वनकर गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीत झळकू लागला आहे. "सह्याद्री'वरील "तिसरा डोळा' या मालिकेत त्याला काही भागांत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर "कुलस्वामिनी', "अग्निपरीक्षा' मालिकेत अनिरुद्धने खलनायकाची भूमिका साकारली. गतवर्षी त्याला झाडीपट्टीतच निर्मित "ज्ञानेश्‍वरी एक्‍स्प्रेस', "31 डिसेंबर', "रेला रे' या तीन चित्रपटांत संधी मिळाली. यापूर्वी त्याने "तिचं चुकलं तरी काय?' या चित्रपटात विशेष भूमिका साकारली होती. 
मागील काही दिवसांपासून "साम टीव्ही' या मराठी वाहिनीवर "रंग माझा वेगळा' ही मालिका सुरू आहे. या मालिकेने महिलावर्गाला आपलेसे केले असून, संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. कुटुंबातील एक तरुणी ऑटोचा व्यवसाय यशस्वीरीत्या कशी करू शकते, हे तिच्या धाडसातून दाखविले आहे. याच मालिकेतील पुढच्या काही भागांत चंद्रपूरचा अनिरुद्ध वनकर सीआयडी पोलिस निरीक्षकाच्या भूमिकेत येत आहे. मनीष सामंत असे त्याच्या पात्राचे नाव आहे. एका प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीआयडी पोलिस निरीक्षक "पत्रकार' बनून माहिती गोळा करतो, असे कथानक आहे. ही मालिका रात्री आठला सोमवार ते शुक्रवारी प्रसारित होत असते.

Sunday, July 08, 2012

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प

वनसंसाधन संपत्तीचा अमूल्य ठेवा चंद्रपूर जिल्ह्याला लाभलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १० हजार ६८० चौ. कि.मी. असून त्यापैकी ४ हजार ४१५ चौ. कि.मी. क्षेत्रफळ विस्तार वनविभागाच्या ताब्यात आहे. महाराष्ट्रातील वनसंपदेचे वरदान लाभलेल्या मोजक्या जिल्ह्यांपैकी चंद्रपूर हा एक जिल्हा आहे. त्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हाही एक महत्त्वाचा मौलिक ठेवा आहे.

ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचे नाव हे स्थानिक आदिवासींच्या नावावरून पडल्याचे म्हटले जाते. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या ताडोबातील सौंदर्य इंग्रजांनीही ओळखले. या जंगलातील वेगळेपणा त्यांना भावला आणि १९३५ मध्ये ताडोबा जंगलाची स्थापना झाली. १९५५ मध्ये याची राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषणा झाली. १९८६ मध्ये अंधारी हा वन्यप्राणी उद्यानाचा भाग यात समाविष्ट करण्यात आला. ६२५.७४ चौ. कि.मी. चा परिसर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणून १९९५ मध्ये राज्य शासनाने जाहीर केला. त्याला विदर्भाचे रत्नदेखील म्हणतात.

शक्ती आणि सौंदर्याचे प्रतिक असलेल्या व्याघ्र या विलक्षण प्राण्याचा येथे संचार असल्याने या प्रकल्पास राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. या प्रकल्पामध्ये वाघाशिवाय बिबट , गवा , सांबर , चितळ , रानडुक्कर हे प्राणी प्रामुख्याने आढळतात. याबरोबरच येथे ४१ सस्तन प्राण्यांच्या प्रजाती , १९५ पक्षांच्या प्रजाती , ७४ प्रकारांची फुलपाखरे , २६ प्रकारची कोळीवर्गीय कीटक ३० प्रकारचे सरपटणारे प्राणी ५ प्रकारचे उभयचर प्राणी व २३ प्रकारचे मासे आढळतात. स्वर्गनर्तक , नवरंगी , खंड्या , कोतवाल , सातभाई , सुतार , सर्पगरुड , वेढा , राघ तीत , मोर , निलपंख व इतर अनेक स्थानीय व स्थलांतरित पक्षी येथे पहावयास मिळतात.

वाघ दिसण्याची हमी देणाऱ्या या व्याघ्र प्रकल्पातून बारमाही ताडोबा व कोळसा हे दोन तलाव तसेच अंधारी ही नदी प्रकल्पाचे मुख्य जलस्त्रोत आहेत. पर्यटकांसाठी येथे येण्याचा उत्तम काळ म्हणजे फेब्रुवारी ते मे पर्यंतचा मानला जातो. या काळात पर्यटक येथे मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवितात. हा प्रकल्प दर मंगळवारी बंद राहत असून पावसाळ्यात अलिकडे तो अंशतः सुरू राहतो. पर्यटकांना येथे येण्यापूर्वीच प्रकल्पात प्रवेशासाठी बुकींग करून ठेवणे गरजेचे आहे. चंद्रपुरातील ताडोबा व्यवस्थापनाच्या कार्यालयात याचे बुकिंग केले जाते. या प्रकल्पाला मोहुर्ली , पांगडी व कोलारा हे प्रवेशद्वार आहेत तेथून गाईडला घेऊन प्रकल्पात वाहनाने प्रवेश मिळतो. सकाळी ६ ते ११ तर दुपारी ३ ते ७ या वेळेत वाघ व अन्य वन्यजीव पर्यटकांना मुक्तदर्शन देत असतात. जंगल सफारी सोबतच इथे असणाऱ्या हत्तीवरून आपल्याला जंगलात सफारी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

कसे जायचे

नागपूरपासून १४० कि.मी. अंतरावर ताडोबा असून उमरेड , भीसी व चिमूर मार्गाने येथे जाता येते. रेल्वेच्या दिल्ली-मद्रास मुख्य मार्गावरील चंद्रपूर रेल्वे स्टेशन असून चंद्रपूरपासून ४५ कि.मी. अंतरावर ताडोबा आहे. चंद्रपूरातून सहजतेने खाजगी , गाडी वा जिप्सी हायर करूनदेखील प्रकल्पात जाता येते.

कुठे राहाल ?

चंद्रपूरजवळील मोहर्ली मुख्यद्वारापाशी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवासस्थान असून आणखी ५ खाजगी निवासस्थाने आहेत. गर्दीमुळे येथील बुकींग आधीच करावे लागते. याव्यतिरिक्त खुंटवडा व कोलाराजवळ देखील पर्यंटकांना राहण्यासाठी निवासव्यववस्था होऊ शकते.

पर्यटकांना मार्गदर्शक सूचना

आपल्या व वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहन हळू चालवा. त्यामुळे वन्यप्राणी दिसण्याची शक्यता जास्त राहील.
वन्यप्राण्यांच्या व पक्षांच्या सूचक आवाजाकडे लक्ष द्या व टेपरेकॉर्डर घरीच ठेवा.
प्रकल्पात कचरा टाकू नका.
भ्रमण करताना मार्गदर्शक सोबत ठेवणे आवश्यक आहे.

बाबांचे आनंदवन

चंद्रपूरपासून सुमारे ४२ कि.मी. अंतरावर असणारे समाजसेवक बाबा आमटे यांचे आनंदवन पर्यटकांसाठी सामाजिक सेवेचा अनमोल ठेवा ठरावा. येथे बसने सहज जाता येते. २१ जून १९५१ रोजी आनंदवनाचे उद्घाटन आचार्य विनोबा भावे यांच्या हस्ते झाले. कुष्ठरुग्णांसाठी काम करण्यापेक्षा कुष्ठरुग्णांसोबत काम करण्याचे बाबांनी ठरविले. त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी १९८४मध्ये बाबांनी वनशेती संशोधनाचा प्रकल्प सुरू केला. मुक्तांगण सदनात कापड , सतरंजी , नॅपकीन अशा एका पेक्षा एक सरस वस्तूंचे तसेच १९७२ पासून टेलरिंग , प्रिंटींग , वेल्डिंग असे ६२ व्यवसाय सुरू आहेत. अनेक जण येथे हे सामाजिक काम पाहून मंत्रमुग्ध होतात. येथे युवक महारोग्यांपासून प्रेणा घेतील.

दत्तपूरच्या कुष्ठधामातून कुष्ठविमुक्त झालेले सहा कुष्ठबांधव , एक लंगडी गाय , साधनाताई , विकास , प्रकाश यांना सोबत घेऊन बाबांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली आणि ५० एकर जागेत मोठे समाजकार्य करून जगाचे लक्ष वेधले. थोर साहित्यिक पु.ल. यांनी १९६४ मध्ये प्रथमच आनंदवनात पाऊल ठेवल्यानंतर पु.ल.च्या निधनापर्यंत ३६ वर्षे आनंदवनाशी त्यांचे ऋणानुबंध होते. आनंदवनाचे ते एक अविभाज्य घटक होते. भाई आनंदवनात आले आणि अनेकांना आनंदवनाची माहिती मिळू लागली. महाराष्ट्रातील ज्येष्ठ , श्रेष्ठ साहित्यकार व कलावंत आनंदवनाकडे वळू लागले.

आणखी काय बघाल

भ्रदावती - चंद्रपूरपासून ४५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या भद्रावती येथे भद्रनात मंदिर व पार्श्वनाथ मंदिर आहे. जवळच विशासन टेकडीवर बुद्ध लेणी आहे.
सोमनाथ - येथेही बाबा आमटेंचा एक प्रकल्प व दाट जंगलांनी वेढलेला धबधबा आहे

Tuesday, May 08, 2012

चंद्रपूर जिल्ह्या

चंद्रपूर जिल्ह्या

चंद्रपूर जिल्ह्यात एकुण 15 तालुके असुन माहे ऑक्टोंबर 2004 मध्ये कोरपना राजुरा विकास खंडामध्ये विभाजन होऊन जिवती या विकास खंडाची निर्मिती झाली याप्रमाणे जिल्ह्यात एकुण 15 पंचायत समित्या आहेत. जिल्ह्यात एकुण 847 ग्राम पंचायती आहेत. या जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा असून पुर्वी येथे गोंडराजे अनेक वर्षे राज्य करीत होते. पांडव वंशियांच्या इतिहासाची सुरुवात ही कोततामिलल नावाच्या गोंडवशीयापासून झाली असून गोंडवंशियांचा प्रथम  अधिपती भिम लालभिंग पासून होवून शेवटी निळकंठशहापर्यंत गोंडवंशिय राजवट होती. याच राजवटीत बल्लारशाह यांनी चंद्रपूर शहर भोवती मजबूत असा दगडी परकोट (भिंत) संरक्षणासाठी बांधली ती चंद्रपूर शहराची वैशिष्टे म्हणून आज अस्तित्वात आहे. याशिवाय भद्गावती, बल्लारपूर माणिकगड येथे सुध्दा मोठे किल्ले आहेत. येथे अंचलेश्वर महाकाली मातेची इतिहास प्रसिध्द मंदिरे गोंड राजांनी बांधली. येथे दरवर्षी चैत्र पोर्णिमेला महाकाली यात्रा भरते. या यात्रेसाठी परभणी, नांदेड, भागातून हजारो भाविक मोठ्या प्रमाणात येतात.
           
जिल्ह्यात पूर्व सिमेवर उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी वैनगंगा आणि पश्चिम सिमेवर वाहणा-या वर्धा नदीने जिल्ह्याचे दोन नैसगिक सिमा आखल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात.
           
जिल्ह्यात विविध प्रकारची विपुल खनिज संपत्ती आहे. दगडी कोळसा, कच्चे लोखंड, चुनखडी यांचे फार मोठे साठे आहेत. तसेच उत्कृष्ठ विपुल नैसर्गिक संपत्ती हे ह्या जिल्ह्याचे वैशिष्ठे आहेत. जंगलात मौल्यवान सागवान लाकूड मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. याशिवाय जळावू लाकूड, तेंदूपत्ता, बांबू, डिंक, इत्यादी वनउपजही मोठ्या प्रमाणत मिळतात.

जिल्ह्यातील ८० टक्के लोक शेतीवरच आपली उपजिविका करतात. जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात भात हे प्रमुख पिक आहे. इतर भागात सोयाबीन, ज्वारी, कापूस तूर ही पिके प्रमुख आहेत. वर्धा, इरई, अंधारी, वैनगंगा, पैनगंगा, बारमाही वाहणा-या नद्या आहेत.

जिल्ह्यात एकुण चार सिमेंट कारखाने आहेत. तसेच प्रत्येक एक याप्रमाणे कागद, पोलाद, मॅगनिज, रेफ्रिजरेटर निर्माण करण्याचे कारखाने आहेत.
जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र :-  १०,७९३.०९ चौ.कि.मी.
चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण व पूर्वभागात १८.४ ते२०.५ याउत्तर अंषावर व ७८.५ ते ८०.६ टक्केया पूर्णरेखांष या भौगोलिक पट्टयात बसला आहे.

जिल्हयाची लोकसंख्य :- जिल्हयाची २००१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या २०,७१,१०१ याैकी ग्रामीण लोकसंख्या १५,१३,४०२ आहे.

प्राकृतिक रचना :-
टेकडयाचा भाग, नद्याचेसखोल मैदान व डोंगराळ भाग.

भूगर्भरचना :-
प्रस्तर लाव्हांचा समावेच्च आहे.  कार्बन, ऍमाच्चिस्ट कुळसाईट, ऍसे, जैस्पर यासारखी खनिजे, खडक साधारण काळा पांढ-या चुनखडी व वाळू. जमिन काळी असून ऍल्युमिनियम, कॉबोर्नेटमॅग्नेच्चियम व काही प्रमाणात पोटॅच्चियम नग व स्फुरद यांचा समावेच्च आहे.

नद्या :- वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, अंधारी या नद्यामुळेशेतजमीन सुपीक बनली आहे.

तलाव :- जिल्हयात एकुण १६७८ माजी मालगुजारी तलाव असून मध्यम तलाव ७ आहेत.  नलेश्‍वर, चारगांव, आसोलामेंडा, लभानसराड, अमलनाला, चंदईनाला, घोडाझरी या तलावामुळे मत्स्यव्यवसाय मोठयाप्रमाणात होतो. ० ते१०० हेक्टर चे८० लघुपाटबंधारे तलाव आहेत.

वन :- जिल्हयात सर्वच तालुक्यात वनक्षेत्र विखुरलेल्या स्वरूपात आहेत.  जिल्हयातील ३,५०,२०० हेक्‍टर क्षेत्र वनाखालील असनू त्याचा जिल्हयाच्या एकुण भूक्षेत्राची ३२.०६ इतकी टक्केवारी आहे.

हवामान व पर्जन्य  :- चंद्रपूर जिल्हयाचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. पावसाळयात दमट असते. उन्हाळयात तापमान जास्त असते. जिल्हयात पावसाचे प्रमाण जास्त असुन सिंदेवाही, ब्रम्हपुरी, नागभीड, मूल, पोंभुर्णा, सावली इत्यादी तालुक्यात पाऊस जास्त पडतो.  जिल्हयाचे सर्वसाधारण  पर्जन्यमान १३०९.५० मि.मि. आहे.
 
जलसिंचन :- कोल्हापूरी बंधारे ५५१ सिंचन क्षमता १९३०० हेक्टर, जवाहर विहिरी ६५३४, इतर विहिरी १९३५,तेलपंप ४७७६, विजपंप १२८७१०.
 
ग्रामीण व नागरी लोकसंखेचेप्रमाण :- जिल्हयाच्या एकुण लोकसंख्यापैकी ७३.०७ टक्के लोक ग्रामीण भागात तर २६.९३ टक्के शहरात राहतात.

अनुसुचित जाती जमाती :- २००१ च्या जनगणनेनुसार जिल्हयातील एकुण लोकसंख्येत अनुसुचित जाती प्रमाण १४.३ टक्केअसून अनुसुचित जमातीचेप्रमाण १८.१ टक्के आहे.

कामगार :- २००१ चे जनगणेनुसार जिल्हयातील एकुण कामगारांची संख्या ९,३०,७९१ आहे. काम करणा-यापैकी २५.७ शेतकरी, ३९.३ शेतमजूर , २.२ घरगुती उद्योग व ३२.९ टक्‍के इतर सेवेत.

भूधारक  :- १९९०.९१ च्या कृषि गणनेच्या माहितीनुसार जिल्हयात  एकुण २,०१,५०० भूधारक  असून एकुण शेतजमीन ५२००८१ हेक्टर आहे.

पिकपध्दती :- जिल्हयातील २००४-२००५  मधील एकूण पिकाखाली असणा-या ५,३९,८०० हेक्टर क्षेत्रापैकी खरीप हंगामात तृणधान्य पिकाखाली क्षेत्र १२९७७९ हेक्टर, कडधान्य पिकाखाली २४४५५ गळीत धान्यपिकाखाली १४८३१५ हेक्टर क्षेत्र आले आहे.

महत्वाचे उद्योग :- जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, कोळसा खाणी, महाराष्ट्र राज्य थर्मल विद्युतनिर्मिती व सिमेंट (अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड व ए.सी.सी) हे महत्वाचे उद्योग स्थित आहेत. बाबा आमटेंचे आनंदवन आश्रम याच जिल्ह्यात आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्प हे जिल्ह्याचे अजून एक वैशिष्ट्य.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे :- रामाला व जुनोना टॅंक, श्री महाकाली माता मंदीर (चंद्रपूर), घोडाझारी प्रकल्प, सातबाहिनी