काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, May 10, 2018

ग्रामस्वराज्य अभियानः सौभाग्य योजना

ग्रामस्वराज्य अभियानः सौभाग्य योजना

 कुठे, मावळली अंधाराची भिती अन् मिळाळे प्रगतीच्या 
प्रकाषकिरणांनी भरारी घेण्यास बळ 
  कुठे उगवली ..आयुश्याच्या संध्याकाळी सोनेरी पहाट 
सौभाग्य योजना महावितरण साठी इमेज परिणाम  चंद्रपूर/ विशेष प्रतिनिधी:
    केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिन ग्राम स्वराज्य अभियानाच्या माध्यमातून सौभाग्य योजनेतून चंद्रपूर परिमंडळातील 15 गावात एकंदरीत   100 टक्के विद्युतीकरण करण्यात आले. या अभियानांतर्गत  चंद्रपूर व गडचिरोली मंडलातील एकंदरीत 1903 कुटूुंबाना चंद्र, सुर्य, कंदील, दिवाबत्तीच्या प्रकाशानंतर आता महावितरणच्या वीजेचा प्रकाष अनुभवायला मिळाला आहे. 
     एकीकडे शहरातील जीवन, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरतांना, विज्ञान तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत असतांना, अनेक सेायीसुविधांचा लाभ घेत असतांना वीजेसारख्या प्राथमिक गरजेशिवाय हि कुटूंबे अनेक वर्षे धारात जीवन जगत होती.  14 एप्रिल 2018 ते 30 एप्रिल 2018 या  दोन आठवडयात महावितरणने चंद्रपूर परिमंडळाने या 1903 कुटंूंबाना प्रकाश देत त्यांची थी प्राथमिक गरज पूर्ण केली व त्यांना प्रकाशाची वाट उपलब्ध करून दिली.  
     गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्हयातील मुलचेरा तालुक्यातील- अडपल्ली येथे 70 अहेरी तालुक्यातील महागाव येथे 83, छल्लेवाडा येथे 264, चेरपल्ली येथे 71, गोविंदगाव येथे 76, सिरोंचा तालुक्यातील नाडीगुडा 257 जाफराबाद येथे 164 व गुमलकोंडा येथे 174   अशा 8गावातील 1156 कुटूंबात तर,  चंद्रपूर जिल्हयातील - जिवती तालुक्यातील येल्लापूर 142, गुडसेल्ला येथे 155 व कुंभेझरी 337, चिमूर तालुक्यातील वडसी 52,  ब्रम्हपुरी तालुक्यातील कहाली येथे 17, चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथे  34 व गेांडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथे 7 अशा 7 गावातील 744 कुटूुंबाना चंद्र, सुर्य, कंदील, दिवाबत्तीच्या प्रकाशानंतर महावितरणच्या वीजेच्या प्रकाशाने स्वयंपूर्ण झाली आहेत.
    गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव मध्ये राहणारे गजानन फुलझेले व त्यांची पत्नी अंधारात जीवन जगात असतांना त्यांच्या जीवनातील काळोख संपुष्टात आला, तर, जिवती तालुक्यातील विष्वनाथ भालेराव या जिवती तालुक्यातील वयोवृध्द कुटंबाच्या जीवनात प्रकाष पोहोचला. आयुष्याच्या संध्याकाळी या दाम्पत्याच्या जीवनात  प्रकाशाची पहाट उगवली ,चिमूर तालुक्यातील वडसी येथिल केमा जांभुळे यांच्या जीवनात ग्रामस्वाराज्य अभियानान प्रकाशाचा सुर्य आणला. विस्तारी कंटीवार, व त्यांची पत्नी हे मोलमजुरी करून जगणारे चेरपिल्लीतील कुटूंब आता वीज आल्याने प्रफुल्लीत झाले आहे. 
 जिवती तालुक्यातील कुम्भेझरी  येथिल गणपती हरगिले यांच्याही जीवनात आलेल्या प्रकाषाने महत्वाची भुमिका बजावली आहे घरी वीज नसतांना घरातील दिव्यांग बालकांस अंधारात वावरने कठीण होते. प्रकाशामुळे आता त्यांच्या जीवनात उमेदीची नवी किरणे डोकावली आहे.
 गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथिल साजन तुलशिमानकर व त्यांची पत्नी मोलमजूरी करून जगतांना वीजेची गरज पूर्ण झाल्याने समाधानी आहेत तर जिवती तालुक्यातील येल्लापूर बालाजी बन्सोड आता मुलाच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्याने समाधानी आहेत.
   सरला राजन्ना अंगूरवार व त्यांच्या दोन लहानग्या- शिवानी ६ वर्षे  व अंजली;5 वर्ष  व लहानगा कार्तिकसाठी;3वर्ष आता वीज आल्याने अंधाराची भिती मावळली असून प्रगतीची प्रकाशकिरणे उंच भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंख्याना बळ देत आहे.    महावितरणने ग्रामस्वाराज्य अभियानाच्या माध्यमातून कुठे नवीन पंखांना बळ मिळत आहे, तर कुठे जीवनातील अंधार संपूर्ण  जीवनचित्रात नवे उमेदीचे, स्वप्नांचे रंग  फुलत आहेत. या योजनेमुळे, गजानन फुलझेले, विष्वनाथ भालेराव, केमा जांभुळे,या सारख्या वयोवृध्द नागरीकांनी संपूर्ण जीवन वीजेषिवाय जगल्यांनतर आता त्यंाच्या जीवनाच्या सायंकाळी प्रकाषाची नवी पहाट उगवली आहे. 
सौभाग्य' योजनेत महावितरणचे काम जोमाने

सौभाग्य' योजनेत महावितरणचे काम जोमाने

सौभाग्य योजना महावितरण साठी इमेज परिणामनागपूर/प्रतिनिधी:
राज्यातील सर्वच ४१ हजार ९२८ गावांचे, ९८ हजार ३५६ वाड्यापाड्यांचे तसेच ग्रामीण भागातील सुमारे १ कोटी ३७ लाख ९२ हजार घरांचे विद्युतीकरण झाले असून उर्वरित वाड्यापाड्यात व घरांना सौभाग्य योजना तसेच दिनदयाल उपायध्याय योजनेतून डिसेंबर २०१८ पर्यन्त वीज देण्याचे काम वेगात सुरू आहे. 
राज्यात ग्रामीण भागातील घरांची संख्या सुमारे १ कोटी ४० लाख २६ हजार ३५३ आहे. त्यापैकी १ कोटी ३७ लाख ९२ हजार १२५ घरात यापूर्वीच वीज पोहोचली आहे. हे प्रमाण ९८.३३ टक्के एवढे आहे. उर्वरित २ लाख ३४ हजार २२८ घरांत सौभाग्य व दिनदयाल योजनेंतर्गत वीजजोडणी देण्यात येणार असून याबाबतची कामे मोठ्या प्रमाणात सूरू आहेत. 
मार्च २०१८ अखेर राज्यातील गावांची संख्या ४१ हजार ९२८ असून महावितरणने या सर्व गावांत वीज पोहोचविली आहे. यात २०१८ मध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या १११ गावांचाही समावेश आहे. 
सद्यस्थितीत राज्यातील वाड्यापाड्यांची संख्या सुमारे १ लाख ६ हजार ९३९ एवढी आहे. त्यापैकी ९८ हजार ३५६ वाड्यापाड्यात यापूर्वीच वीजजोडणी देण्यात आली असून उर्वरित १ हजार ७०४ वाड्यापाड्यांना सौभाग्य योजनेतून, २३२ वाड्यापाड्यांना दिनदयाल योजनेतून व ३४७ वाड्यापाड्यांना स्थानिक विकास निधीतून डिसेंबर २०१८ पर्यन्त वीजजोडणी देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी वीजजोडणीसाठी पायाभूत सुविधांची गरज आहे, अशा ठिकाणी विविध योजनेंतून निधी मिळवून तसेच दुर्गम भागात महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास प्राधिकारण (मेडा) द्वारे वीजजोडणी देण्यात येणार आहे.
राज्यात वीजपुरवठा नसलेल्या नागरिकांनी सौभाग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या नजिकच्या कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा किंवा 1912, 1800-102-3435 / 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
वाघाच्या हल्ल्यात ईसम ठार

वाघाच्या हल्ल्यात ईसम ठार

वाघ हल्ला साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
सिंदेवाही वनपरिक्षेत्रांर्गत येत असलेल्या मूरपार जंगलात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने एका 30 वर्षीय इसमावर हल्ला चढवून त्याला जागीच ठार केल्याची घटना गुरवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. गुरुवारी सकाळी सिंदेवाही जंगल हद्दीतील मुरपार ते घोट जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला मुरपार जंगल परिसरात हि घटना उघडकीस आली.या घटनेची माहिती मिळताच  पोलीस व वनविभागाने तत्काळ घटनास्थळ गाठले. व चौकशी केली. चौकशी दरम्यान हल्ल्यात ठार झालेला इसम हा वेडसर असल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेचा पंचनामा वनविभाग करित आहे. मृतकाची ओळख अजूनही पटलेली नाही.

जाहिरातीसाठी राखीव....
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध) 



Wednesday, May 09, 2018

लाच घेतांना वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्याला रंगेहात अटक

लाच घेतांना वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्याला रंगेहात अटक

acb police साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतीनिधी:
लाकडे वाहून नेण्यासाठी लागणारा बदली वाहतूक परवाना देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली आहे रमेश तलांडे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे तर रामदास गोटेफोडे असे वनकर्मचारी चे नाव आहे.
तक्रारदार लाखनी येथील रहिवासी असून 1990पासून शेतातील लाकडे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात त्यांनी नागभीड तालुक्यातील कांपा  येथील शेतातील सागवानाची ६  झाडे विकत घेऊन कापणी केली सदर झाडे नागपूर येथे वाहून नेण्यासाठी लागणारा बदली वाहतूक परवाना मिळविण्यासाठी ७  मे रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश तलांडे यांच्याकडे अर्ज केला येथील लिपिक रामदास गोटेफोडे याने  बदली वाहतूक परवाना देण्यासाठी  स्वतःकरता १ हजार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी तलांडे यांच्यासाठी १  हजार असे  दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली रोजी केलेल्या पडतात आरोपी रमेश तलांडे  आणि रामदास गोटेफोडे यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारली यावेळी त्यांना चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली सदरची कारवाई पोलिस उपायुक्त पोलीस अधीक्षक आर पाटील अप्पर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक डी एम घुमे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे,कर्मचारी मनोहर एकोणकर,महेश मांढरे,अजय बागेसर,संतोष येलपूलवार,चालक दिनेश गरमडे यांनी केली.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जाहिरातीसाठी राखीव...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध) 

Tuesday, May 08, 2018

शांतिकुंज आणि पृथ्वी कंपनीला आग:लाखोचे नुकसान

शांतिकुंज आणि पृथ्वी कंपनीला आग:लाखोचे नुकसान

चंद्रपूर/प्रतिनिधी:
मुल येथून जवळच असेलेल्या औद्योगिक परिसरात शांतिकुंज सलवंट लिमिटेड आणि  असलेल्या पृथ्वी फेरो अलॉय प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपनीला आज मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.या आगीत दोन्ही कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले,५ तासांच्या अथक परिश्रमानंतर हि आग आटोक्यात आणल्या गेली. विशेष म्हणजे या दोन्ही कंपनीमध्ये मरेगांव हे गाव आहे. हि लागलेली भीषण आग वेळीच आटोक्यात आल्याने  गाव वाचले त्यामुळे जीवितहानी टळली या दोन्ही कंपन्या  सध्यस्थिती बंद अवस्थेत आहेत पण दोन्ही कंपन्यांमध्ये रसायन असल्यामुळे आगीने उग्र रूप धारण केले होते. सध्या शेतात  खरीप हंगामाच्या तयारीसाठी मशागतीचे कामे सुरूआहे.अश्यातच शेतातील काडीकचरा हा शेतकरी तणीस टाकून नष्ट करत असतो.त्यासाठी जवळच्या परिसरात आग  होती व वाऱ्याच्या झोतात हि आग कंपनी परियंत आली आणि या दोन्ही कंपनीला आगीने वेढा घातला असे बोलल्या जात आहे.हि लागलेली आग भीषण असल्याने जवळील गावाला देखील खाली करण्याचे सांगण्यात आले होते.
हि आग विजवण्यासाठी चंद्रपूर-बल्लारपूर गडचिरोली आणि मूल येथील अग्निशमन  दलाला बोलाविण्यात 
आले अशी माहिती आहे.  पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. हिरे उपविभागीय अधिकारी खेडकर, राज्य विद्युत विभागाचे अभियंता होणाडे,पोलीस निरीक्षण चव्हाण, घटनास्थळी जातीने हजर होते. 
जाहिरातीसाठी राखीव....
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध) 


वादळाने केला कहर;८० घरांचे उडाले छप्पर

वादळाने केला कहर;८० घरांचे उडाले छप्पर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
गेल्या ३ दिवसापासून चंद्रपुर जिल्ह्यातील काही भागात वादळ वाऱ्याने चांगलाच कहर केला आहे.याचाच फटका चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील मांडवा गावाला बसला, सोमवारी संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जवळपास कोरपना तालुक्या तील मांडवा गावातील जवळपास ८० घरांचे  छप्परे उडाल्याने नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आलेल्या या वादळ वाऱ्यामुळे सुदैवाने  कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र या वादळ वाऱ्याने विद्युत पुरवठा बराच वेळ खंडीत झाला होता.
मांडवात आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. विठ्ठल राऊत, शत्रुघ्न सिडाम,गोसाई न्याहारे,  महादू डावरे, श्यामराव मरस्कोल्हे घनश्याम कोराम, बंडू मरसकोल्हे, दिलीप टेकाम, या ८ जणांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  घटनेची माहिती मिळताच कोरपनाचे तहसीलदार हरीश गाडे यांनी घटनास्थळाची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या मदतीबद्दल सूचना केल्या. 
 यावेळी मंडळ अधिकारी चव्हाण, तलाठी कमलवार, सरपंच, पोलीस पाटील उपस्थित होते. संबंधित नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा तलाठी यांच्यामार्फत करण्यात आला.

जाहिरातीसाठी राखीव 
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध) 

विना परमिट धावणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सवर चंद्रपूर RTO ची कारवाई

विना परमिट धावणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सवर चंद्रपूर RTO ची कारवाई

चंद्रपूर/रोषण दुर्योधन: 
चंद्रपूर नागपूर मार्गावर विना परमिट धावणाऱ्या ट्रॅव्हल्स वर आज आरटीओ आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 10 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत तर 17 गाड्यांना मेमो देण्यात आला आहे.
चंद्रपूर नागपूर मार्गावर मोठ्या प्रमाणावर खाजगी ट्रॅव्हल्स चालतात मात्र हे ट्रॅव्हल्स विना परवानगी ने चालत असल्याची माहिती आरटीओ आणि वाहतुक शाखेला मिळाली त्यानुसार आज डी.एन.आर, पर्पल, रॉयल,महालक्ष्मी, रामायण अश्या विविध खासगी बसेसवर RTO विभागामार्फत कारवाई करण्यात आली असून तब्बल 10 गाड्या जमा करण्यात आल्या  तसेच 17 गाड्यांना मेमो दिल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वमभर शिंदे यांनी दिली आहे. 
वीना परवाणा चालणाऱ्या या ट्रॅव्हल गाड्या सामान्य प्रवाशांसाठी धोकादायक असून या बाबत RTO विभागाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.सोबतच सध्या सुट्यांचा सीजन सुरु तसेच उन देखील जास्त असल्याने या वातानुकुलीत खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये बसण्यासाठी प्रवासी चांगलीच गर्दी करत आहे व काही खाजगी ट्रॅव्हल्स क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवत असल्याची देखील तक्रार परिवहन विभागली होती.या तक्रारींच्या आधारावरच ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
---------------------------------------------------------------------------------
जाहिरातीसाठी राखीव 
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध) 


रेल्वेच्या धडकेत ३५ शेळ्यांचा जागीच मृत्यू

रेल्वेच्या धडकेत ३५ शेळ्यांचा जागीच मृत्यू

चंद्रपूर/प्रतिनिधी:
रेल्वेच्या धडकेत ३५ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यात घडली आहे. राजुरा तालुक्यातील विरूर रेल्वे स्टेशन परिसरात मंगळवारी ११ वाजताच्या दरम्यान ही घटना झाली असून या मध्ये ३५ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला तर १७ शेळ्यांचे लचके तुटत गंभीर जखमी झाल्या आहे. मंगळवारी  
दुपारच्या दरम्यान शेळ्यांचा कळप रेल्वे ट्रॅक ओलांडत असतांना ही दुर्घटना झाली. बल्लारपूर रेल्वे स्थानकावरून चेन्नई च्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रेन ने हा अपघात झाला आहे. दुर्दैवी म्हणजे रेल्वे ट्रॅक च्या दोन्ही बाजूला जाळी लावण्यात असल्यामुळे या शेळ्यांच्या या कळपाला पळून जाता आले नाही आणि त्याचं कारणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या घटनेमुळे शेळी मालकाचे लाखोचे नुकसान झाले आहे. 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जाहिरातीसाठी राखीव 
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध) 


Saturday, May 05, 2018

पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी केली रहिवास्याची हत्या

पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी केली रहिवास्याची हत्या

गडचिरोली/प्रतिनिधी: 
माओवाद्यांकडून एकाची हत्या करण्यात आलीये. माओवाद्यांकडून गोळ्या झाडून ही करण्यात आली आहे. धानोरा तालुक्यातील होरेकसा येथील रहिवासी असलेल्या पांडुरंग पदा यांची हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीये. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचं कळतंय. गेल्या काही दिवसांपासून गडचिरोलीत नक्षलवादविरोधी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होत्या. दरम्यान आता नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेल्या या हत्येमुळे पुन्हा एकदा तणावाचं वातावरण गडचिरोलीत निर्माण झालंय.
शुक्रवारी  रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ३० ते ४० सशस्त्र नक्षलवादी पांडुरंगच्या घरी गेले. त्यांनी पांडुरंगला झोपेतून उठवून दोनशे मीटर अंतरावर असलेल्या त्याच्या शेतात नेले आणि चेहऱ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. 
घटनास्थळी नक्षल्यांनी पत्रक टाकल्याचे आढळून आले आहे. ८ मे २०१६ रोजी जहाल नक्षलवादी व चातगाव एरिया कमिटीची सचिव रजिता उर्फ रामको ऋषी उसेंडी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाली होती. तिची माहिती पांडुरंग पदा यानेच दिली, असा आरोप पत्रकात करण्यात आला आहे.
नागपुरात धारधार हत्याराने युवकाची हत्या

नागपुरात धारधार हत्याराने युवकाची हत्या

नागपूर:/प्रतिनिधी:
 गोंडखैरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात एका १९ व धारधार श र्षीय तरुणाची  धारधार शस्त्राच्या सहाय्याने हल्ला करून हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी उजेळातआली.  नंदकिशोर दिनेश भोसले वय १९ वर्षे असे या मृतकाचे नावअसून रोजी शुक्रवारी रात्री १२ ते १ च्या दरम्यान हि घटना घडली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहिती नुसार ४ ते ५ आरोपींनी पूर्ववैमन्यसातून नंदकिशोरची हत्या करण्यात आल्याचा संशय वर्तविला जात आहे.या संबंधी संपूर्ण चौकशी पोलीस करीत असून पोलीस आरोपीच्या मागावर आहेत. सध्या नागपूर दररोज होणाऱ्या खुनाच्या घटनेनी हादरून गेले असून आठवडाभरात ५ खून झाल्याने शांतता व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होऊ लागले आहे,   

नागपूरच्या हवाला कांडचे चंद्रपूर कनेक्शन

नागपूरच्या हवाला कांडचे चंद्रपूर कनेक्शन

चंद्रपूर  जिल्ह्यातील भिसी गावात सापडली रक्कम  
nagpur havala साठी इमेज परिणामनागपूर/विशेष प्रतिनिधी:
नागपूर : हवाला व्यावसायिकांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या आणि राज्य पोलीस दलाला जबर हादरा देणाऱ्या नागपूरच्या हवालाकांडात गुन्हेगार आणि पोलिसांनी संगनमत करून लुटलेल्या २ कोटी, ५५ लाखांपैकी अडीच कोटींची रोकड जप्त करण्यात आली. नंदनवन पोलिसांच्या पथकाने चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी गावात जाऊन शुक्रवारी पहाटे ही रोकड जप्त केली. एवढेच नव्हे तर चार गुन्हेगारांच्या मदतीने हा दरोडा घालणारा नंदनवन ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सुनील सोनवणे (वय ४६, रा. सिव्हील लाईन ), त्याचा रायटर विलास भाऊराव वाडेकर (वय ३९, रा. सुरेंद्रगड) आणि वाहनचालक पोलीस शिपाई सचिन शिवकरण भजबुजे (वय ३५, रा. महाविष्णूनगर, नरसाळा) या तिघांनाही गुरुवारी अटक करण्यात आली. त्यामुळे या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता सात झाली आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
रविवारी पहाटे २.३० च्या सुमारास हवालाची रोकड घेऊन जाणारी एमएच ३१/ एफए ४६११ क्रमांकाची डस्टर कार प्रजापती चौकाजवळ नंदनवन पोलिसांनी अडवली होती. या कारमधून ३ कोटी, १८ लाखांची रोकड जप्त केल्याचा दावा नंदनवन पोलिसांनी रविवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना केला होता. रायपूर (छत्तीसगड) मधील मॅपल ज्वेलर्सचे संचालक खजान ठक्कर यांनी ही रोकड नागपुरातील हवाला व्यावसायिक प्रशांत केसानी याच्याकडे पोहचवण्यासाठी पाठवली होती, अशी माहिती कारचालक राजेश वामनराव मेंढे (वय ४०, रा. मिनिमातानगर, कळमना) आणि नवनीत गुलाबचंद जैन (वय २९ रा. शांतिनगर, तुलसीनगर जैन मंदिराजवळ) या दोघांनी दिल्याचेही पोलीस सांगत होते. या कारवाईमुळे पोलिसांचे कौतूक होत असतानाच कारमध्ये ५ कोटी, ७३ लाख रुपये होते आणि त्यातील २ कोटी, ५५ लाखांची रोकड लंपास झाल्याचा आरोप मनीष खंडेलवाल या तरुणाने रविवारी दुपारी केला. त्यानंतर अली हुसेन जीवानी यांनीही तशीच तक्रार नोंदवली. त्यामुळे या प्रकरणाला भलतेच वळण लागले. सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेतली.
‘बाजीरावची कडक सलामी’
nagpur havala साठी इमेज परिणाम
खबऱ्यांनी पोलिसांना गंडवलं, 5 कोटी ऐवजी 3 कोटी सांगितले, 2 कोटी पळवले! पोलीस अधिकाऱ्यांनी लुटलेली रोकड जप्त करण्यासाठी आरोपींना बोलते केले. प्रत्येक आरोपी विसंगत माहिती देत होता. त्यामुळे उपरोक्त गुन्हेगारांसह पोलिसांच्या घरी आणि नातेवाईकांकडेही पोलिसांनी रोकड शोधण्याचे प्रयत्न केले. कोणताही आरोप होऊ नये म्हणून पोलीस प्रत्येक ठिकाणी इन कॅमेरा चौकशी करीत होते. मात्र, कुठेच काही मिळाले नाही. आरोपी दिशाभूल करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना ‘बाजीरावची कडक सलामी’ देण्यात आली. पुन्हा एकदा या गुन्ह्याचे प्रात्यक्षिक पोलिसांनी करवून घेतले. त्यानंतर रात्री १० च्या सुमारास गजानन मुंगणे याने ही रोकड आपल्या भिसीतील नातेवाईकांकडे ठेवल्याचे सांगितले.
आरोपी मुंगणे हा मूळचा भिसी येथील रहिवासी आहे. तो नागपुरात वाहनचालक म्हणून काम करतो. आमच्या मालकाच्या घरी इंकम टॅक्सची धाड पडली. त्यामुळे ही रोकड घेऊन आलो, असे आरोपींनी मुंगणेंच्या वृद्ध वडिलांना सांगितले होते.
विशेष म्हणजे, भोलेनाथ मुंगणे नावाप्रमाणेच भोळे आहे. ते शेतकरी आहेत. मुलगा ज्याच्याकडे काम करतो, त्या मालकाकडे इंकम टॅक्सची धाड पडल्याने ही रोकड सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे, असे माणून पहाटेच्या वेळी भोलेनाथ मुंगणे यांनी नोटांनी भरलेले पोते उचलून घरापासून दूर शेतात नेले. तेथे खड्डा खोदला अन् त्यात आधी ताडपत्री टाकली. त्यावरनोटाचे पोते ठेवून पुन्हा ताडपत्रीने झाकले (पाणी आला तर ओले होऊ नये म्हणून) नंतर त्यावर माती टाकली. त्यातील एक नोटही मुंगळे यांनी बाजुला काढून ठेवली नाही. पोलिसांना मुंगळे यांच्याकडून ती रोकड ताब्यात घेतली. ती नंदनवन ठाण्यात मोजून घेण्यात आली. त्याचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले. त्यानंतर या दरोड्याचा मास्टरमार्इंड एपीआय सोनवणे आणि भजबुजे तसेच वाडेकर या दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तर, त्या दिवशी रात्रपाळीत असलेले पीएसआय सोनुळे यांची विभागीय चौकशी सुरू असून, चौकशीत त्यांचा दोष आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे एका प्रश्नाच्या उत्तरात उपायुक्त भरणे म्हणाले. 
Including police officer three people were arrested in Hawala case of Nagpur | नागपुरातील  हवालाकांडात पोलीस अधिकाऱ्यांसह तिघांना अटक

असा होता घटनाक्रम ...
-नागपुरात हवालाच्या पैशाची मोठी खेप येत असल्याची माहिती रवी व सचिन यांनी पोलिसांना दिली.
-एपीआय सोनवणेंनी पारडी मार्गावर एमएच-३१-एफए-४६११ क्रमांकाची डस्टर कार अडवली. कारमध्ये राजेश वामनराव मेंढे (रा. मिनीमातानगर) आणि नवनीत गुलाबचंद जैन (रा. शांतीनगर) हे होते.
-या कारच्या सीटखालील भागात काही लॉकर्स आढळून आले.
-पोलिसांनी राजेश आणि नवनीत यांना आपल्या गाडीत बसवले व त्यांची डस्टर गाडी रवी आणि गजाननकडे दिली. दोघांनी गाडीमधील लॉकर्स पान्याच्या सहाय्याने उघडून त्यातील २ कोटी ५४ लाख ९२ हजार ८०० रुपये लंपास केले. त्यानंतर ही गाडी नंदनवन पोलिस ठाण्यात पोहोचविली.
-पुढे रवी आणि गजानन हे त्यांच्या इतर साथीदारांना घेऊन अर्टिगा कारमध्ये गेले.
-इकडे पोलिसांनी लॉकर उघडले असता त्यात ३ कोटी १८ लाख ७ हजार २०० रुपये सापडले.
-याप्रकरणी बेहिशेबी संपत्तीचा गुन्हा दाखल करून हे प्रकरण आयकर विभाग व सक्तवसुली संचालनालयाकडे वर्ग करण्यात आले.
-दरम्यान, मनीष खंडेलवार (रा. व्हीआयपी रोड) पोलिस ठाण्यात हजर झाला. हा पैसा आणि गाडी आपला मित्र अली हुसेन जिवानी (रा. मुंबई) याची असल्याचे त्याने सांगितले. परंतु, या गाडीत अली यांच्या मॅपल ज्वेलरी प्रा. लि. कंपनीचे ५ कोटी ३७ लाख रुपये होते, अशीही माहिती त्यांनी दिली. तसेच तब्बल अडीच कोटींहून अधिक पैसे पळविण्यात आल्याची तक्रार दाखल केली.

Friday, May 04, 2018

चंद्रपुरात मृत अर्भक सापडल्याने उडाली खळबळ

चंद्रपुरात मृत अर्भक सापडल्याने उडाली खळबळ

चंद्रपूर/विशेष प्रतिनिधी:
घुग्गुसच्या शास्त्रीनगर मार्गावर नाल्याच्या शेजारी शुक्रवारी सकाळी १० वाजता एका ५ ते ६ महिन्याच्या अविकसित मुलीचे अर्भक मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली . मिळालेल्या माहितीवरून या नवजात मृत मुलीचे शरीर पूर्णता अविकसित होण्याच्या पाहिलेच तिला संपविण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे.एका प्लास्टिकच्या पिशवीत टाकून तिला नाल्याच्या शेजारी फेकून देण्यात आले होते ,या घटनेची माहिती नागरिकांना मिळताच परिसरात चांगलीच गर्दी जमली होती,लिंग परीक्षणा दरम्यान व तिचे अंग विकसित होण्या आधीच या नवजात अर्भकाला  डॉक्टरांच्या माध्यमातून संपविण्यात आल्याचे बोलल्या जात आहे. या मृत अर्भकाच्या अंगावर निळ्या शाईचा डाग देखील होता,अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात अर्भकामुळे समाजात आपली बदनामी होऊ नये, या उद्देशाने एखाद्या महिलेने हे अर्भक टाकले असण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच घुग्गुसचे ठाणेदार आमले व त्याचे कर्मचारी घटनास्थळावर पोहचून पुढील तपास करीत आहे,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रस्ताव आमंत्रित

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रस्ताव आमंत्रित

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्हयातील अनुसूचित जाती –जमाती,भटक्या व विमुक्त जातीचे कल्याण तसेच शारीरिक व मानसिकदृष्टया मनोदुर्बल,अपंग,कुष्ठरोगी इत्यादींच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवी व्यक्ती व संस्थांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार योजना सन 2018-19 शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून 24 मे 2018 पर्यत शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
अनुसूचित जाती-जमाती,भटक्या व विमुक्त जातीचे कल्याण तसेच शारीरिक व मानसिकदृष्टया मनोदुर्बल,अंपग,कुष्ठरोगी इत्यादीच्या विकासासाठी शिक्षण,आरोग्य,अन्याय निर्मूलन,अंधश्रध्दा रुढी निर्मूलन व जनजागरण इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना हा पुरस्कार दिला जातो.या योजनेनुसार व जनजागरण इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना हा पुरस्कार दिला जातेा.
या योजनेनुसार अनुसूचित जाती-जमाती, भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण तसेच शारीरिक व मानसिकदृष्टया मनोदुर्बल,अपंग,कुष्ठरोगी इत्यादींच्या विकासासाठी कार्य करणारे नामवंत समाजसेवक असावेत व त्यांनी सामाजिक क्षेत्रात कमीम कमी 10 वर्षे काम केलेले असावे.प्रस्ताव सादर करतांना अशा सामाजिक कार्यकर्ऱ्याचे वय 24 मे 2018 रोजी 50 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त व स्त्रियांसाठी 40 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे.अपवादात्मक परिस्थितीत वय शिथील करण्याचे अधिकार शासनाने यासाठी नियुक्ती केलेल्या समितीकडे राहतील.जिल्हा पोलीस अधीक्षकांचा चारित्र्यविषयक दाखला,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,फोटो व केलेल्या कार्याविषयी माहिती प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.
प्रस्ताव तीन प्रतीत सादर करावा.यापूर्वी राज्य शासनाच्या कोणत्याही पुरस्काराने सन्मानित झालेल्या व्यक्ती या पुरस्कारासाठी पात्र ठरणार नाहीत.सदर प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही,असे सहायक आयुक्त,समाजकल्याण, विभाग चंद्रपूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. पुरस्कारासंबधी अधिक माहिती व अजाचा नमुना सहायक आयुक्त, समाज कल्याण,विभाग चंद्रपूर यांचे कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे.