काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, December 02, 2017

जश्ने ईद दिनी रूग्णाना फळ व खजुर वाटप

जश्ने ईद दिनी रूग्णाना फळ व खजुर वाटप

गडचांदूर/प्रतिनिधी :
 इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित महमंद पैगंबराच्या जन्मदिन जगभर मुस्लीम बांधव साजरा करतात कोरपना ग्रामीण रूग्णालय येथे के ' जि ' एन कमेटीने रूग्णालयातील कुपोषित बालक भरती असलेल्या रूग्णाना फळ व खजुर वाटप करूण प्रेषिताचा जन्म उत्साह नात शरीफ सरकार की आमद मर हब्बा चे घोषणा देत गावात रॅली काढून आनंद साजरा केला बालगोपाल व सर्वानी यामध्ये सहभाग घेतला रूग्णालयात जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबीद अली जुबेर शरीफ नगरसेवक सुहेल अली  शब्बीरशेख रसुलभाई सोनु शेख फहीम नुर शेख फारूख यांचे सह डॉ गायकवाड व रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते गावात रॅली घोषणा देत जामा मस्जिद येथे फातेहा खानी करूण प्रसाद वाटप करण्यात आला पोलीस बरोबस्तं श्री परघने पोलीस निरिक्षक याच्या मार्गदर्शनात चोख पद्धतीने पार पडला मस्जीद व अनेक घरे विज लाईट पत्ताके तोरण लाऊन सजविण्यात आले होते
 चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमेटी मार्फत ईद साजरी

चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमेटी मार्फत ईद साजरी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
अल्ला हू अकबर‘, पैगंबर झिंदाबाद‘च्या घोषणा देत आणि पारंपरिक पद्धतीचा पोशाख, अशा उत्साही वातावरणात मिरवणूक काढून शनीवारी महंमद पैगंबर यांची जयंती चंद्रपूर शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. 
मोहम्मद पैगाम्बर यांच्या जन्म दिन निमित्य जशने ईद – ए – मिलादुन्नबी ची मिरवणूक दादमहल वार्ड, जटपुरा गेट, प्रियदर्शनी चौक, जटपुरा गेट फुटका किला ते पाताळेश्वर मंदिर येताच  चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमेटी व अल्प संख्याक विभागा मार्फत ईमाम मौलाना चे स्वागत करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे विधासनसभा उपगटनेत आ. विजय वडेट्टीवार, चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, फारूक सिद्धकी, हाजी हारूक , यांनी रॅली चे स्वागत केले. या प्रसंगी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून सर्व ईमाम मौलाना ना हाजी रुमाल व पुष्पहार देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व रॅलीमध्ये सहभागी जनतेला गोडधोड व पाणी पाऊचचे  वितरण करण्यात आले. 
या प्रसंगी काँग्रेस माजी प्रदेश महासचिव सौ.सुनिता लोढीया,प्रदेश महासचिव डॉ. आसावरी देवतळे,  इंटक नेते,  के.के. सिंगअल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष अँड. मलक शाकीर, लोकसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष शिवा राव, असंघटित कामगार विभाग शहर अध्यक्ष अनिल सुरपाम, संतोष लहामगे, अमजद अली, नगरसेवक, हरिदास लांडे, राजेश अडूर, सुरेश आत्राम, युसुफ भाई, सुनीता अग्रवाल, शालिनी भगत, वंदना भागवत, गौतम चिकाटे, प्रमोद कावळे, राजेंद्र आत्राम, श्याम राजूरकर, सुलेमान अली, निखिल धनवलकर, दीपक कटकोजवार, राजा काझी, सुरेश दुर्शेलवार, वकार काझी, आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.




  
पोंभुर्णा नगरपंचायतकडून अंगणवाडी साहित्याचे साहित्य वाटप

पोंभुर्णा नगरपंचायतकडून अंगणवाडी साहित्याचे साहित्य वाटप

पोंभुर्णा/प्रतिनिधी:
पोंभुर्णा नगरपंचायत च्या महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून पोंभुर्णा शहरातील सर्व अंगणवाडील चिमुकल्या मुलांना खेळता बागळता यावं या मुख्य हेतूने महिला व बालकल्याण सभापती यांच्या प्रयत्नातून विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात येत आहे. या साहित्य वाटप कार्यक्रमात उपस्थित नगरपंचायत चे अध्यक्ष गजानन गोरंटीवार उपाध्यक्ष ईश्र्वर नैताम पंचायत समितीचे प्रकल्प अधिकारी अमोल मेरकळ नगरपंचायत महिला व बालकल्याण सभापती सुनीता म्याकलवार उपसभापती बुरांडे ताई व नगरपंचायत चे आरोग्य सभापती मोहन चलाख व उपस्थित सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या या कार्यक्रमात महिला व बालकल्याण सभापती सुनीता म्याकलवार बोलताना सांगितले की अंगणवाडी सेविकानी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असे मेहनत करून त्यांचा शिक्षण सुरवातीचा पाया भक्कम करण्यासाठी काम करावे असा मोलाचा संदेश दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन येमुलवार यांनी केले .
अल्ट्राटेक वेलफेअर फाऊंडेशन रक्तदान शिबिरात  260 रक्तदात्यांनी केले रक्तदान

अल्ट्राटेक वेलफेअर फाऊंडेशन रक्तदान शिबिरात 260 रक्तदात्यांनी केले रक्तदान

आवारपूर/प्रतिनिधी  :- 
 आपल्या द्वारे करण्यात आलेले रक्तदान हे इतरांचे प्राण वाचवू शकतो याची जाणीव आपल्याला तेव्हा होते जेव्हा आपला कोणी प्रिय व्यक्ती रक्ताच्या गरजेसाठी जीवन मृत्यशी संघर्ष करीत असतो. अपघात किंवा आजार हा कोणलाही होवू शकते. म्हनूनच रक्तदान सारख्या पून्यकार्या मध्ये सर्वांचे सहयोग मिळावे याच उदांतहेतूने स्थानिक अल्ट्राटेक वेलफेअर फाऊंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते..

शिबिराचेे उदघाटन अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपूरचे युनीट हेड जी.बालसुब्रमण्यम, व सहाय्यक गटविकास अधिकारी कोरपना धनंजय साळवे यांनी रक्तदान करून उदघाटन केले. यावेळी अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर चे फंक्शनल  हेड आनंद लोहिया, अनिल पिल्लई, बी.पी. सग्गू, गजेंद्र सिंग, उपमहाव्यस्थापक कर्नल दिपक डे, साईनाथ बुच्चे सचिव कामगार संघ ए. सी.डब्ल्यू आवारपूर, यांच्या सहमान्यवर उपस्तिथ होते.

प्रसंगी अधिकारी व कामगार वर्ग यांनी उपस्थिती दर्शवून शिबीरास पुरेपूर सहकार्य करून रक्तदान केले. तसेच आवारपूर, नांदा, बिबी, बाखर्डी, भोयगाव, येथील युवकांनी रक्तदान केले. या शिबिराचा माध्यमातून 260 नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी चंद्रपूर डॉ.मोहम्मद सैय्यद यांचा चमू नी सहकार्य केले..

शिबिराचा यशस्वीतेसाठी संजय पेठकर, सोनाली गवारगुर, नितेश मालेकर, डॉ. राजेश ठाकरे, संजय ठाकरे, देविदास मांदाडे, यांनी अथक परिश्रम घेतले.
विदर्भ प्रहार आंदोलन

विदर्भ प्रहार आंदोलन

...  विदर्भ प्रहार आंदोलन...    


कामगारांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी चंद्रपूर येथील  जटपुरा गेट येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ  विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या अध्यक्षा हर्षल चिपळूणकर यांच्या नेतृत्वात गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकळों पीडित कामगारांनी तोंडावर  काळी फित लावून आंदोलन केले  
तारुण्याच्या उंबरठ्यावर बुलेट रोमिओंचा सैराट झालं जी....

तारुण्याच्या उंबरठ्यावर बुलेट रोमिओंचा सैराट झालं जी....

 कन्हान क्षेत्रात बायकर्सच्या बुलेट मुळे नागरिक त्रस्त ; सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर 
पारशिवणी / प्रतिनिधी:
Image result for bullet stuntतालुक्यातिल शहर ते ग्रामीण भागात बुलेट धारक बायकर्सच्या कर्कश आवाज,सायलेन्सरने फुटणार्या फटाक्यांन सोबत स्टंटबाजीमुळे क्षेत्रातिल नागरिक त्रस्त झाले असून,या बुलेट्स धरकांन मुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुनःश्च ऐरणीवर आलेला आहे.महत्वाचं म्हणजे विद्यालये,महाविद्यालय सुरू होणे व सुटण्याच्या सुमारास तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेले बुलेटधारी रोडरोमिओ जाणूनबुजून विद्यालय,महाविद्यालयान समोर चलबिचल करतात ज्यामुळे विद्यार्थिनींना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र क्षेत्रात दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कन्हान पोलिसांनी विद्यालयाच्या वेळेत परिसरात गस्त घालण्याचे नितांत गरज असल्याचे गांभीर्य  लक्ष्यात घेणे महत्वाचे आहे.

नागपूर-जबलपूर हा महामार्ग अत्यंत वर्दळीचा आहे.कन्हान शहरात बाजार,दुकाने,फळांची दुकाने ही जागे अभावी महामार्गाच्या कडेला लागतात ज्यामुळे शहरात नेहमीच गर्दी असते अश्यात शहरातून शालेय विद्यार्थी,जड वाहतूक,ट्रक,बस यांची आवाजाही पायदळ व दुचाकीने चालणाऱ्यांच्या मधात बुलेट गाड्या सैराट होऊन विचित्र पद्धतीने चालविण्याचे प्रकार शहरात घडत आहेत.युवा वर्गाने दुचाकींना वेगळ्या आणि विचित्र प्रकारचे सायलेन्सर बसविलेले आहेत.त्यामुळे बुलेट मधून विचित्र आणि कर्कश आवाज निघतात. ज्याने क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक,शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थि या प्रकाराने जाम वैतागल्या आहेत.राष्ट्रीय महामार्गाने बाईक स्टंट करणाऱ्यां च्या सँख्येत देखील वाढ झाली असून सुसाट सुटणाऱ्या बुलेट्स ने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील राष्ट्रीय महामार्ग ४४ चे रुंदीकरनाचे कार्य कांद्री टेकाडी सीमेअंतर्गत प्रगती पथावर आहे.तर कन्हान ते कन्हान रेल्वे क्रॉसिंग मधील काम सुरू होण्याच्या मार्गावर आहे.अश्यात महामार्गाच्या रुंदीकरण कार्य सुरू असताना रस्त्याने बुलेट चालक जर वाहतूक नियम धाब्यावर ठेवून बुलेटचा वापर करत असेल तर साधारण माणसांच्या जीवाला धोका असल्याचे संकेत नाकारता येणार नाही.

 महाविद्यालयांसमोर बुलेट दुचाकीचा सर्रास वापर करीत चकरा देणारे रोडरोमिओ,बुलेटच्या  हॉर्नचा कर्कश आवाज,सायलेन्सरमधून फटाक्याच्या आवाजाचा बार उडवणे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास होऊ लागला आहे.अश्या रोडरोमिओंच्या कोणीही बळी पडू नये या उद्देशाने कन्हान पोलिसांनी या विषयाकडे लक्ष देत अश्या सैराट बाईकर्स वर कार्यवाहीचा बडगा उगारने अत्यंत महत्वाचे झाल्याचे स्वर क्षेत्रातील नागरिकांनी काढायला सुरवात केली आहे. 
Related image

२ डिसेंबर दिनविशेष

२ डिसेंबर दिनविशेष

  • मनोहर जोशी - जन्म/वाढदिवस  (डिसेंबर २, इ.स. १९३७) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. १४ मार्च, इ.स. १९९५ ते ३१ जानेवारी, इ.स. १९९९ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

  • जागतिक दिवस

        राष्ट्र दिन : संयुक्त अरब अमीराती, ब्रिटनपासून स्वातंत्र्य.
        राष्ट्र दिन : लाओस.

    ठळक घटना/घडामोडी

        १४०२ : लीपझीग विद्यापीठ सुरू झाले.
        १८०४ : नोत्र देम कॅथेड्रलमध्ये नेपोलियन बोनापार्टचा फ्रांसच्या सम्राटपदी राज्याभिषेक.
        १८०५ : ऑस्टर्लित्झची लढाई - नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्त्वाखाली फ्रांसच्या लश्कराचा रशिया व ऑस्ट्रियाच्या संयुक्त दलावर विजय.
        १८४५ : मॅनिफेस्ट डेस्टिनी - पश्चिमेचे प्रदेश काबीज करावयाची अमेरिकन काँग्रेसला उद्देशून अमेरिकन अध्यक्ष जेम्स पोकची घोषणा.
        १८४८ : फ्रांझ जोसेफ पहिला ऑस्ट्रियाच्या सम्राटपदी.
        १८५२ : नेपोलियन तिसरा फ्रांसच्या सम्राटपदी.
        १९३९ : न्यू यॉर्क शहरातील ला ग्वार्डिया विमानतळाचे उद्घाटन.
        १९७१ : संयुक्त अरब अमीरातीची स्थापना. अबु धाबी, अजमान, फुजैरा, शारजा, दुबई व उम-अल-कुवैन सदस्य.
        १९८८ : बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी.
        १९८९ : भारताच्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपथविधी.
        २००१ : एन्रॉनने दिवाळे काढल्याचे जाहीर केले.

    जन्म/वाढदिवस

        १८९८ : ईंद्र लाल रॉय, भारतीय वैमानिक.
        १८२५ : पेद्रो दुसरा, ब्राझिलचा सम्राट.
        १८६० : चार्ल्स स्टड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
        १९०६ : एरिक डाल्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
        १९१० : बॉब न्यूसन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
        १९१२ : जॉर्ज एमेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
        १९४९ : फ्रांसिस ऍलन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
        १९३३ : के. वीरमणी, द्रविड मुनेत्र कळघम नेता.
        १९३७ : मनोहर जोशी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष.
        १९४४ : इब्राहीम रुगोवा, कोसोव्होचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
        १९४५ : ऍलन थोमसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
        १९४७ : धीरज परसाणा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
        १९६६ : क्लाइव्ह एकस्टीन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
        १९७२ : सुजित सोमसुंदर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
        १९७९ : अब्दुल रझाक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
        १९८१ : स्टीवन स्वानपोल, नामिबियाचा क्रिकेट खेळाडू.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

        १३४८ : हानाझोनो, जपानी सम्राट.
        १५४७ : हर्नान कोर्तेझ, स्पॅनिश काँकिस्तादोर.
        १९०५ : अनंत काणेकर, मराठी कवी, लेखक, पत्रकार.
        १९८० : चौधरी मुहम्मद अली, पाकिस्तानचा पंतप्रधान.
        १९९३ : पाब्लो एस्कोबार, कोलंबियाचा मादकद्रव्य व्यापारी.
बॉम्बे फ्लाईंग क्लबचे विमान कोसळले

बॉम्बे फ्लाईंग क्लबचे विमान कोसळले

धुळे -  सुरतहून धुळ्याकडे येणारे बॉम्बे फ्लाइंग क्‍लबचे चार्टर्ड विमान आज रात्री आठ वाजेच्या सुमारास दातर्ती (ता. साक्री) गावानजीक कोसळले. त्यात कॅप्टनसह पाच ट्रेनी पायलट किरकोळ जखमी झाले असून, विमानाचेही मोठे नुकसान झाले.

गावाजवळ विमान कोसळल्याने झालेला मोठा आवाज व वीजपुरवठा खंडित झाल्याने दातर्तीचे ग्रामस्थ चांगलेच भयभीत झाले. विमान कोसळल्याचे कळाल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. बघ्यांची प्रचंड गर्दी झाल्याने मदतकार्यात मोठे अडथळे येत होते.

बॉम्बे फ्लाइंग क्‍लबचे "व्हीटी बीसीए' हे चार्टर्ड विमान कॅप्टन जे. पी. शर्मा व प्रशिक्षणार्थी पायलट प्रीतमसिंग हे चालवत सुरत येथून गोंदूर (ता. धुळे) येथील विमानतळाकडे येत होते. आज रात्री आठ वाजेच्या सुमारास विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे विमान जवळच कोठे तरी उतरविणे गरजेचे झाल्याने कॅप्टन शर्मा यांनी दातर्ती गावानजीक मोकळी जागेचा अंदाज घेऊन इमर्जन्सी क्रॅश लॅंडिंग केले..मात्र, विमान वीजतारांवर आल्याने त्याचा वेग कमी झाला. त्यामुळे ते खाली कोसळले. यात कॅप्टन शर्मा (वय 43), प्रशिक्षणार्थी पायलट प्रीतमसिंग (वय 30), प्रणवसिंग (वय 28), तेजस रवी (वय 30) अखिला ठाकलापती (वय 26) व अश्‍ना मोहंमद (वय 27) हे सहा जण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने विमान गावाबाहेर कोसळले व जवळ कोणीही नसल्यामुळे मोठी हानी टळली. अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले आहे.*

⭕⭕ *आवाजाने ग्रामस्थ भयभीत

*विमानाचे क्रॅश लॅंडिंग झाल्यानंतर व ते वीजतारांवर पडल्याने मोठा आवाज झाला. यावेळी गावातील वीजप्रवाहही खंडित झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले. यानंतर गावाजवळच विमान कोसळल्याचे कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती.*

*विमान कोसळल्यानंतर पोलिस, महसूल व वीज वितरण कंपनीला माहिती देण्यात आली. मात्र, तरीही पोलिसांसह महसूलचे अधिकारी, रुग्णवाहिका घटना घडल्यानंतरही तब्बल एक तास उशिराने घटनास्थळी आले. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व नाराजी व्यक्‍त करण्यात आली. एक तासानंतर तहसीलदार संदीप भोसले, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश सोनवणे व पोलिस कर्मचारी दाखल झाले. मात्र, प्रचंड गर्दी झाल्याने मदतकार्याला अडथळे येत होते. वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही उशिरापर्यंत थांगपत्ता नव्हता.*

💥💥 मदतीएवजी मोबाईल वर फोटो घेण्यातच धन्यता

*घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. मात्र, अनेकांनी यावेळी मदतीऐवजी मोबाईल बाहेर काढत विमानाचे फोटो घेताना दिसून आले. काही अंधारातही विमानासोबत सेल्फी घेत होते, तर काही विमानावर चढलेले दिसून आले.*

*कॅप्टन शर्मा व पायलट प्रीतमसिंग या दोघांना जास्त मार लागला आहे. त्यांना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते...

शेतकऱयाला तलाठ्या कडुन पैश्याची मागणी

शेतकऱयाला तलाठ्या कडुन पैश्याची मागणी

गडचांदूर :- 
 वडिलोपार्जीत शेतीचे दस्ताऐवजात वाटणीपत्राची फेरफार न करता ऑनलाईन ऐवजी हस्तलिखीत ७/१२, देण्यासाठी एका शेतकयाला तलाठ्या कडुन पैश्याची मागणी करण्यात  या प्रकारावरून सदर शेतकयाने थेट पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच वित्त मंत्र्याला पत्र पाठवून, साहेब आमचं काही चुकलं का ? अशी याचना केली असुन शिघ्र ऑनलाईन ७/१२, न मिळाल्यास आगामी हिवाळी अधिवेशनात संपुर्ण कुटूंबासह जिवन संपविण्याची परवानगी मिळावी अशी विनंती पत्रा द्वारे केल्याने प्रशासन वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे.. 

     कोरपना तालुक्यातील बाखर्डी येथील अंबादास उध्दव टिपले, बबन उध्दव टिपले तसेच अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील रहिवासी मारोती उध्दव टिपले, यांनी तहसिलदार कोरपना यांच्या आदेश क्रमांक रा.मा.क्र./९५ /आरि. टि.एस. ६४/२०१५/१६, दि. २४ मे २०१६, अन्वय महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५ नुसार त्यांच्या वडिलोपार्जीत शेतीचे वाटणीपत्र करून दिलेले पत्र गोवर्धन नामक तलाठी सा.जा. बाखर्डी (लखमापुर) यांना आवश्यक ती नोंद घेण्यासाठी ३ जुन २०१६, रोजी दिली होती. 

     मात्र आजतागायत दस्ताऐवजात सदर वाटणीपत्राची फेरफार नोंद न घेतल्याने ऑनलाईन ७/१२ मिळाला नाही. यामुळे अंबादास या शेतकयाला शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळत नाही तसेच मुलांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत आहे ७/१२ मिळावा यासाठी अनेक वेळा तलाठ्या पुढे जि - हुजुरी करण्यात आली. उलट एक महिन्या पुर्वी तलाठी गोवर्धन यांनी त्याच्याकडे काम करणाया एका मुलाला घरी पाठवुन हाताने लिहीलेला " ७/१२, तयार आहे, तुम्ही पैसे तयार ठेवा आणून देतो " असे म्हणुन पैशाची मागणी केली आहे. मात्र याची मागणी पुर्ण करण्यास असमर्थ ठरत असल्याची खंत शेतकरी अंबादास यांनी व्यक्त केली. तलाठी गोवर्धन ऑनलाईन सुधारीत ७/१२ न देता, तलाठी गोवर्धन हस्त लिखीत ७/१२, देणार आहे. मात्र सध्या सर्वत्र ऑनलाईन व्यवहार सुरू असल्याने हस्त लिखीत कागद कुचकामी ठरत आहे.

     ऑनलाईन सुधारीत ७/१२ मिळावा, मुलांच्या शिक्षणाचे नुकसान करणाया व पैशाची मागणी करित असल्याबद्दल गोवर्धन तलाठ्याची खातेनिहाय व संपत्तीची चौकशी करावी, वाटणीपत्राचे फेरफार घेण्याचे आदेश द्यावे, अन्यथा आगामी हिवाळी अधिवेशन दरम्यान कुटूंबासह जिवन संपविण्याची परवानगी द्यावी अशी विनंती पंतप्रधान नरेन्द्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, वन,वित्त व पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांना निवेदना द्वारे केली आहे. निवेदनाची प्रत संबंधित विभाग अधिकायांसह केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, महसूल मंत्री, विरोधी पक्षनेते व सर्व आमदारांना दिली आहे.

Friday, December 01, 2017

 वाघोबाची फोटोग्राफी पडली महागात

वाघोबाची फोटोग्राफी पडली महागात

जंगल सफारी करीत असताना पर्यटकांना वाहनाच्या बाहेर निघता येत नाही. आपल्या शरीराचा कोणताही भाग बाहेर काढण्यास सक्त मनाई आहे. वनकर्मचारी असो अथवा वनविभागाचे बडे अधिकारी असोत, अशाप्रकारे वाहनाच्या छतावर बसून फोटोग्राफी करता येत नाही. असे असताना वाहनाच्या छतावरून फोटोग्राफीचा हा प्रकार उमरेड-पवनी- कऱ्हांडला अभयारण्य आता आणखी एका फोटोशुटमुळे सोशल मिडियाच्या माध्यमातून चर्चेत आले आहे. वनविभागाच्या वाहनाच्याच छतावर बसून वाघोबाची फोटोग्राफी करण्याचा हा अक्षम्य प्रकार फेसबूक व व्हॉट्सअ‍ॅपर व्हायरल झाल्याने हे अभयारण्या पुन्हा चर्चेत आले असून, या प्रकाबाबत सर्वत्र टीकेची झोड उठत आहे.


नागपूर/प्रतिनिधी : 
उमरेड अभयारण्यात वाघाचं चित्रकरण करणारी व्यक्ती अभयारण्यातील हंगामी कर्मचारी असल्याचं समोर आलं आहे. विपीन तलमले असं त्याचं नाव असून माध्यमांच्या बातमीनंतर कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. 
विपीन तलमले वाघ बघण्यासाठी थेट जीपच्या टपावर चढला होता. यावेळी वाघ त्याच्या समोर येऊन उभा ठाकला. विशेष म्हणजे वाघ जीपच्या मागच्या बाजूला होता. त्यामुळे ड्रायव्हरला त्याचा अंदाजही नव्हता. 
यानंतर ड्रायव्हरनं पार्किंग लाईट्स लावल्यामुळे वाघाचं लक्ष थोडं विचलित झालं. मात्र कर्मचाऱ्याचं नशीब बलवत्तर म्हणून वाघ तिथून शांतपणे निघून गेला. अन्यथा हे धाडस कर्मचाऱ्याच्या जीवावरही बेतू शकलं असतं.
 धार्मिक स्थळे व अतिक्रमणांवर हातोडा

धार्मिक स्थळे व अतिक्रमणांवर हातोडा


नागपूर : अतिक्रमण करून उभारण्यात आलेली धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले होते़ अशाच स्वरुपाचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार अवैध धार्मिक स्थळ हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. लक्ष्मीनगर झोनच्या पथकाने कारवाईला सुरुवात केली. व्हीएनआयटी प्रवेशद्वाराजवळील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविले. दुसऱ्या दिवशी धरमपेठ झोनने बोले पेट्रोल पंपाजवळील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविले. सोमवारपासून शहराच्या विविध भागात अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या धाार्मिक स्थळांवर पोलीस बंदोबस्तात हातोडा चालविला जाणार आहे. सोबतच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील अतिक्रमणाचा सफाया केला जात आहे.
गेल्यावर्षी न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने कारवाईला सुरुवात केली होती. शहरातील काही अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली. मंदिर, चबुतरे, ओटे, फलक आदी हटविण्यात आले होते. मिठानीम दर्गासमोरील रस्ता दुभाजकावरील भाग मोकळा करण्यात आला होता़. वाहतुकीला अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे हटविणार असल्याचे प्रतिज्ञापत्र महापालिकेने न्यायालयात सादर केले होते़ न्यायालयाच्या आदेशानंतर अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा चालविला़ मात्र कारवाईला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता़ यामुळे मोहीम थांबविण्यात आली होती.
अवैध रेती वाहतुकीने घेतला शेतकऱ्याचा बळी

अवैध रेती वाहतुकीने घेतला शेतकऱ्याचा बळी

नागपूर : अवैध रेतीवाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने सायकलस्वार शेतकऱ्यास जोरदार धडक दिली. त्यात ‘त्या’ शेतकऱ्या चा घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकच्या काचा फोडून रोडवर टायर पेटविले होते. मात्र, पोलीस व महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी वेळीच घटनास्थळ गाठून नागरिकांना शांत केले. ही घटना खापा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेगाव येथे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
दामोदर साधू बेंदरे (५५, रा. बडेगाव, ता. सावनेर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दामोदर बेंदरे हे सायकलने शेतातून घरी परत येत होते. दरम्यान, गावाजवळ रेती घेऊन जात असलेल्या एमएच-४०/वाय-३९०० क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या सायकलला मागून धडक दिली. ट्रकचे समोरचे चाक त्यांच्या अंगावरून गेले तर सायकल काही दूरवर फरफटत गेली. अपघाताच्या आवाजाचे गावातील चौकात बसलेल्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत ट्रकचालकाने ट्रक सोडून पळ काढला. नागरिकांनी बेंदरे यांनी लगेच नजीकच्या रुग्णालयात हलविले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
रेतीवाहतुकीला आधीच विरोध असल्यामुळे या अपघाताने नागरिक संतप्त झाले. काहींनी ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला तर काहींनी ट्रकच्या काचा फोडून संताप व्यक्त केला. त्यातच काहींनी रोडवर टायर पेटविले होते. या प्रकारामुळे बडेगाव येथे तणाव निर्माण झाला होता. माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून नागरिकांना शांत केले. या अपघातामुळे बडेगाव - टेंभूरडोह मार्ग दुपारी ३ वाजेपर्यंत बंद होता. या प्रकरणी खापा पोलिसांनी भादंवि ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून ट्रकचालक सावन राजू वासनिक (२८, रा. कोराडी, ता. कामठी) यास नंतर अटक केली.
 हसनबाग तिहेरी खुनातील सर्व सातही आरोपी निर्दोष

हसनबाग तिहेरी खुनातील सर्व सातही आरोपी निर्दोष

नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत हसनबाग भागात स्कॉर्पिओ वारंवार अंगावर घालून तिघांचे खून केल्याचा आरोप असलेल्या सात आरोपींची मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्यांच्या अभावी संशयाचा लाभ देत निर्दोष सुटका केली.
जगदीश विठ्ठल कोसूरकर, दिलीप विठ्ठल कोसूरकर दोन्ही रा. छापरूनगर, रॉबीन राहुल बोरकर, गणेश ऊर्फ गोल्डी जन्मोजय कुटे, दीपक ऊर्फ मुन्ना बालकदास गिले, रवी सदानंद खोब्रागडे आणि तुषार ऊर्फ दद्दू छोटुजी लोणारे, अशी आरोपींची नावे आहेत. रशीदखान जसीमखान, अब्दुल बेग आणि रोहित नारनवरे, अशी मृताची नावे होती.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, हिवरीनगर येथील कुख्यात गुन्हेगार राहुल चेपट्या हा २० जून २०१४ रोजी आपल्या साथीदारांना सोबत घेऊन सक्करदरा तलावाजवळील हॉटेल बॉलिवूड सेंटर पॉर्इंट येथे कुख्यात गज्जू वंजारी याच्या लग्न संमारंभात गेला होता. या ठिकाणी चेपट्यासोबत जगदीश कोसूरकर आणि त्याच्या साथीदारांनी भांडण केले होते. आरोपींनी चपट्यावर तलवार, चाकू आणि सुरी उगारून दगडफेक केली होती. चेपट्यासोबत असलेले जुना बगडगंज भागातील प्रदीप भारत घोडे, रशीदखान, अब्दुल बेग आणि रोहित नारनवरे, असे चौघे जण फ्रिडम मोटरसायकलने पळून जात असता आरोपींनी त्यांचा स्कॉर्पिओने पाठलाग सुरू केला होता. हसनबाग भागात आरोपींनी स्कॉर्पिओ राँगसाईड घेत मोटरसायकलवर धडकवली होती. मोटरसायकल चालवीत असलेला प्रदीप घोडे हा पळून गेला होता. तर उर्वरित तिघे स्कॉर्पिओच्या धडकेने ठार झाले होते.
प्रदीप घोडे याच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी प्रारंभी भादंविच्या ३०२, ३०७, १२० (ब), २०१, १४१, १४३, १४४, १४८, १४९, ५०६(ब), शस्त्र कायद्याच्या ४/२५, मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पुढे या आरोपींविरुद्ध महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली होती. केवळ सात आरोपी पोलिसांच्या हाती लागले होते. उर्वरित अखेरपर्यंत फरार राहिले. सहाय्यक पोलीस आयुक्त टी. डी. गौंड यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात साक्षीपुराव्यादरम्यान महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाले होते. न्यायालयात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. आर. के. तिवारी, अ‍ॅड. प्रफुल्ल मोहगावकर, अ‍ॅड. चेतन ठाकूर यांनी काम पाहिले.