काव्यशिल्प Digital Media: शिरा

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label शिरा. Show all posts
Showing posts with label शिरा. Show all posts

Tuesday, February 13, 2018

महाशिवरात्री निमित्य शिवसेने तर्फे शिरा वाटप;भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

महाशिवरात्री निमित्य शिवसेने तर्फे शिरा वाटप;भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

चंद्रपूर/प्रतिनिधी:
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा महाशिवरात्री निमित्य शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शिवसेना चंद्रपूर विधानसभेच्या वतीने शहरातील प्रसिद्ध असलेले प्राचीन अंचलेश्वर मंदिर येथे महादेवाच्या दर्शनाकरिता येणा-या हजारो भाविकांसाठी आज शिरा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 या महाप्रसादाला हजारो भक्तांनी शिरा प्रसाद म्हणून ग्रहण केला. यावेळी शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष राजेश नायडू, नगरसेवक विशाल निंबाळकर, उपजिल्हा प्रमुख माया पटले, संतोषी  चव्हाण, वंदना हातगांवकर, दुर्गा वैरागडे, किशोर बोल्लमवार, दिलीप बेंडले, विनोद अनंतवार, विनोद गोल्लजवार, लक्ष्मण टोकला, रुपेश पांडे, गौरव जोरगेवार, मोहित मोदी अक्षय कोटावार यांची उपस्थिती होती.
             महाशिवरात्रीला हजारो भाविक आजच्या दिवशी उपवास पाळतात उपाश्या पोटी महादेवाचे दर्शनाकरिता शहरातील अनेक मंदिरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतात. हि बाब लक्षात घेता आज शिवसेना चंद्रपूर विधानसभेच्या वतीने शहरातील प्राचीन प्रसिद्ध असलेले अंचलेश्वर गेट येथील शिवमंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या  भाविकांनी या शिरा महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी कार्यकर्ता, शिवसैनिक यांची  मोठ्या संख्येने उपस्थिती होती.