मुंबई दि.1 मार्च : राज्यात 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2016 पर्यंत झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मंत्रालयात पत्रकारांना पुढीलप्रमाणे दिली.
- नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना दोन हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टरी कोरडवाहू शेतीसाठी 6,800 रुपये, फळपिकासाठी प्रतिहेक्टरी 13,500 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रतिहेक्टरी 18 हजार रुपये याप्रमाणे शासनातर्फे मदत देण्यात येणार आहे.
- · नैसर्गिक आपत्तीमुळे पशुधनाचे नुकसान झाल्यास, मृत्यु झाल्यास प्रती गाय किंवा प्रती म्हैस रुपये 30 हजार, प्रती बैल 25 हजार रुपये, प्रती गाढव रुपये 15000, प्रती शेळी/मेंढी/डुक्कर रु.3,000 याप्रमाणे प्रती कुटुंब पाच जनावरांच्या मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. व्यक्तीचा मृत्यु झाल्यास मृताच्या वारसांना प्रतीव्यक्ती चार लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. नुकसानभरपाईसाठी असलेली पूर्वीची वयाची अट काढून टाकण्यात आली आहे.
- · पाणी टंचाई लक्षात घेता नदी, नाले इत्यादी स्त्रोतांपासून विद्युत मोटारीद्वारे अवैध पाण्याचा उपसा होत असल्यास अशा मोटारी जप्त करण्याचे तसेच इलेक्ट्रीक कनेक्शन काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रती व्यक्ती 40 लिटर या हिशेबाप्रमाणे उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात येणार असून येत्या 4 मार्च पासून मी स्वत: मराठवाड्याच्या दौऱ्यावर चाऱ्याची, पाण्याची व पिकाची स्थिती यांचा अंदाज घेण्यासाठी जाणार आहे, असे मंत्री खडसे यांनी पत्रकारांना सांगितले.
- · औरंगाबाद विभाग या विभागात नांदेड जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यु झाला. तर याच जिल्ह्यात 9 लहान आणि 3 मोठी जनावरे मिळून 12 जनावरे मृत पावली. बीड जिल्ह्यात 2 मोठी, लातूर जिल्ह्यात 1 मोठे उस्मानाबाद जिल्ह्यात 1 लहान व 6 मोठी मिळून 7 जनावरे मृत्युमुखी पडली. मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची एकूण संख्या 22. घरे अथवा मालमत्तेचे कोणतेही नुकसान नाही.
- · औरंगाबाद विभागात एकूण आठ जिल्ह्यांमध्ये वरील काळात पडलेला पाऊस असा. औरंगाबाद 0.04, जालना 0.46, परभणी 6.86, हिंगोली 10.36, नांदेड 9.07, बीड 8.11, लातूर 19.13, उस्मानाबाद 12.15 .
- · नाशिक विभागामध्ये मालेगांव शहरात आंगावर झाड पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यु तर ग्रामीण भागात एका बैलाचा वीज पडल्यामुळे मृत्यु, धुळे तालुक्यात एका बैलाचा मृत्यु, अहमदनगर जिल्ह्यात अकोला तालुक्यात वीज पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यु. धुळे व गारबरडी येथे वीज पडल्यामुळे दोन व्यक्तींचा मृत्यु झाला.
- · नाशिक जिल्ह्यात पडलेला पाऊस मालेगांव-2, नांदगांव-5, धुळे-6, यावल-4.3, मुक्ताईनगर-0.7, नगर अकोले-35, राहूरी -8.4, अहमदनगर-2, पाथर्डी-21, जामखेड-2.3
- · नागपूर विभागात अवकाळी पाऊस व गापीटीमुळे वर्धा जिल्ह्यात सात घरांचे तर गोंदिया जिल्ह्यात 21 घरांचे अंशत: नुकसान. भंडारा जिल्ह्यात वीज पडल्यामुळे म्हशीचे रेडकू व 22 शेळ्या मृत. · अमरावती विभागात वरील काळात एकूण 14 मी.मी. पाऊस पडला. वादळी पाऊस व गारपीटीमुळे अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यात रब्बी पिकांचे व फळ पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. 17 गावे बाधीत झाली आहेत. वाशिम जिल्ह्यात 5 गावांमध्ये नुकसान झाले आहे. अमरावती विभागात 61, यवतमाळ जिल्ह्यात 59 व वाशिम जिल्ह्यात 13 गावांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात 1 गाय व 1 वासरु वीज पडल्यामुळे मृत्युमुखी पडले.
- नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान
- शासनातर्फे नुकसान भरपाई
- मुंबई दि.1 मार्च : राज्यात 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2016 पर्यंत झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मंत्रालयात पत्रकारांना पुढीलप्रमाणे दिली.
- · नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना दोन हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टरी कोरडवाहू शेतीसाठी 6,800 रुपये, फळपिकासाठी प्रतिहेक्टरी 13,500 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रतिहेक्टरी 18 हजार रुपये याप्रमाणे शासनातर्फे मदत देण्यात येणार आहे.
- · नैसर्गिक आपत्तीमुळे पशुधनाचे नुकसान झाल्यास, मृत्यु झाल्यास प्रती गाय किंवा प्रती म्हैस रुपये 30 हजार, प्रती बैल 25 हजार रुपये, प्रती गाढव रुपये 15000, प्रती शेळी/मेंढी/डुक्कर रु.3,000 याप्रमाणे प्रती कुटुंब पाच जनावरांच्या मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. व्यक्तीचा मृत्यु झाल्यास मृताच्या वारसांना प्रतीव्यक्ती चार लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. नुकसानभरपाईसाठी असलेली पूर्वीची वयाची अट काढून टाकण्यात आली आहे.
- · पाणी टंचाई लक्षात घेता नदी, नाले इत्यादी स्त्रोतांपासून विद्युत मोटारीद्वारे अवैध पाण्याचा उपसा होत असल्यास अशा मोटारी जप्त करण्याचे तसेच इलेक्ट्रीक कनेक्शन काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रती व्यक्ती 40 लिटर या हिशेबाप्रमाणे उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात येणार असून येत्या 4 मार्च पासून मी स्वत: मराठवाड्याच्या दौऱ्यावर चाऱ्याची, पाण्याची व पिकाची स्थिती यांचा अंदाज घेण्यासाठी जाणार आहे, असे मंत्री खडसे यांनी पत्रकारांना सांगितले.
- · औरंगाबाद विभाग या विभागात नांदेड जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यु झाला. तर याच जिल्ह्यात 9 लहान आणि 3 मोठी जनावरे मिळून 12 जनावरे मृत पावली. बीड जिल्ह्यात 2 मोठी, लातूर जिल्ह्यात 1 मोठे उस्मानाबाद जिल्ह्यात 1 लहान व 6 मोठी मिळून 7 जनावरे मृत्युमुखी पडली. मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची एकूण संख्या 22. घरे अथवा मालमत्तेचे कोणतेही नुकसान नाही.
- · औरंगाबाद विभागात एकूण आठ जिल्ह्यांमध्ये वरील काळात पडलेला पाऊस असा. औरंगाबाद 0.04, जालना 0.46, परभणी 6.86, हिंगोली 10.36, नांदेड 9.07, बीड 8.11, लातूर 19.13, उस्मानाबाद 12.15 .
- · नाशिक विभागामध्ये मालेगांव शहरात आंगावर झाड पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यु तर ग्रामीण भागात एका बैलाचा वीज पडल्यामुळे मृत्यु, धुळे तालुक्यात एका बैलाचा मृत्यु, अहमदनगर जिल्ह्यात अकोला तालुक्यात वीज पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यु. धुळे व गारबरडी येथे वीज पडल्यामुळे दोन व्यक्तींचा मृत्यु झाला.
- नाशिक जिल्ह्यात पडलेला पाऊस मालेगांव-2, नांदगांव-5, धुळे-6, यावल-4.3, मुक्ताईनगर-0.7, नगर अकोले-35, राहूरी -8.4, अहमदनगर-2, पाथर्डी-21, जामखेड-2.3
- नागपूर विभागात अवकाळी पाऊस व गापीटीमुळे वर्धा जिल्ह्यात सात घरांचे तर गोंदिया जिल्ह्यात 21 घरांचे अंशत: नुकसान. भंडारा जिल्ह्यात वीज पडल्यामुळे म्हशीचे रेडकू व 22 शेळ्या मृत.
- अमरावती विभागात वरील काळात एकूण 14 मी.मी. पाऊस पडला. वादळी पाऊस व गारपीटीमुळे अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यात रब्बी पिकांचे व फळ पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. 17 गावे बाधीत झाली आहेत. वाशिम जिल्ह्यात 5 गावांमध्ये नुकसान झाले आहे. अमरावती विभागात 61, यवतमाळ जिल्ह्यात 59 व वाशिम जिल्ह्यात 13 गावांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात 1 गाय व 1 वासरु वीज पडल्यामुळे मृत्युमुखी पडले.