সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, September 16, 2015

पोलिस ठाण्यांना ऑनलाइन न्यायालयांशी जोडणार

मुख्यमंत्री फडणवीस ः राज्यपालांच्या हस्ते सीसीटीएनएस प्रकल्पाचे लोकार्पण

नागपूर-  राज्यातील पोलिस ठाण्यांसह न्यायालये आणि कारागृहांना सीसीटीएनएस प्रकल्पांशी जोडण्यात येणार असून, यामुळे गैरप्रकाराला आळा बसेल, गुन्हेगारांवर वॉच ठेवणे सोपे जाईल, झटपट निकाल लागेल तसेच नागरिकांना ऑनलाइन तक्रार नोंदवता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्यातील सर्वच पोलिस ठाण्यांना ऑनलाइन करणाऱ्या सीसीटीएनएस प्रकल्पाचे लोकार्पण मंगळवारी राज्यपाल सी. विद्यासागर यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्सिस्टंट सभागृहात झाले. यामुळे आजपासून राज्यातील प्रत्येक ठाणे एकमेकांशी जोडले जाणार आहेत. लोकार्पण कार्यक्रमास खासदार अजय संचेती, खासदार अविनाश पांडे, महापौर प्रवीण दटके, पोलिस महासंचालक संजीव दयाळ, विभागीय आयुक्‍त अनुप कुमार, प्र. पोलिस आयुक्‍त श्री. राज वर्धन उपस्थित होते.
सीआयडीच्या मार्गदर्शनात खासगी आयटी कंपन्यांच्या सहकार्याने सीसीटीएनएस प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. सीसीटीएनएस प्रकल्प कार्यान्वित करून महाराष्ट्राने संपूर्ण देशात प्रथम स्थान पटकावले, तर राज्यात नागपूर शहर पहिले ठरले आहे. पुणे शहरात सीसीटीव्ही लावण्यात आले. त्याचप्रमाणे येत्या तीन महिन्यांत मुंबई आणि वर्षभरात नागपूर शहरात सीसीटीव्ही लावले जातील. त्यासाठी 1100 सायबर पोलिस कर्मचाऱ्यांची टीम अहोरात्र मेहनत घेत आहे. पासपोर्ट, वाहन चोरी, हत्यार परवाना, प्रथम खबरी अहवाल (एफआयआर), विविध प्रकारची परवानगी आता घरी बसून ऑनलाइन करता येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यपाल राव म्हणाले, पोलिस विभागात झपाट्याने केले जात आहेत. त्याला अत्याधुनिक केले जात आहे. यामुळे तक्रारकर्त्यांना सुविधा मिळेल आणि गुन्ह्यांचा तपास झटपट लागण्यात मदत मिळणार आहे. महाराष्ट्र पोलिसांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असून आजपासून पोलिसांच्या आधुनिक पर्वाला सुरुवात झाली आहे. राज्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी या प्रकल्पाद्वारे प्रयत्न करणार आहेत. या प्रकल्पाद्वारे संपूर्ण महाराष्ट्र ऑनलाइन झाला असून, प्रत्येक जिल्ह्यात सायबर लॅब उघडण्यात येणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्र. आयुक्‍त श्री. राजवर्धन यांनी मानले. या प्रकल्पात सिंहाचा वाटा उचलणारे सीआयडी पुण्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रजेश सिंह व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.