সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, September 01, 2015

औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यास नाथाभाऊचा पाठिंबा

मुंबई दि.१ सप्टेंबर :- सन १९९५ ते १९९९ या कालखंडात भाजपा-शिवसेना युतीचे शासन महाराष्ट्रात सत्तेवर असतांना औरंगाबाद या शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. याबाबतीत औरंगाबाद येथे उच्च न्यायालयाच्या खंडपीठात खटला दाखल करण्यात आला होता. नंतर राज्यात काँग्रेस पक्षाचे शासन सत्तेवर आले असतांना त्यांनी हा खटला मागे घेतला. त्यामुळे युती शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. औरंगजेब हा अत्यंत जुलमी, अन्यायी आणि अत्याचार करणारा मोगल होता. अशा जुलमी राजाचा आदर्श राज्यातील जनतेपुढे नसावा म्हणुन औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्याला माझा पूर्ण पाठींबा आहे, असे स्पष्ट मत राज्याचे महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज मंत्रालयात प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केले.

एका प्रश्नाला उत्तर देतांना खडसे पुढे म्हणाले की, सर्वांना विचारात घेऊन एखाद्या शहराचे नाव बदलण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. त्यासाठी केंद्राच्या परवानगीची आवश्यकता नाही. मात्र, अद्याप संभाजीनगर असे नाव बदलण्याची प्रक्रिया सुरु झालेली नाही. ही प्रक्रिया सुरु करावी व यासंबंधीचा ठराव मंत्रिमंडळासमोर आणावा, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे. तसे झाल्यास हा प्रस्ताव जनतेला खुला होईल व त्‍यामुळे या प्रश्नासंदर्भात जनतेच्या अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही प्रतिक्रिया आजमावता येतील, असे खडसे यांनी शेवटी सांगितले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.