संत्रा उत्पादकांवर पावसाचे संकट
जिल्ह्यात 25 हजार 259 हेक्टरमध्ये संत्रा बागा
नागपूर, ता. 27 : महिनाभरानंतर उशिरा आलेल्या पावसाचा परिणाम संत्रा पिकावर झाला असून, उत्पादक शेतकऱ्यांवर संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जूनच्या मृग नक्षत्रात पहिला पाऊस झाल्याननंतर संत्रा बागेत बहर येतो. यंदा जुलैमध्ये पावसाने हजेरी लावली. उशिरा का होईना आलेल्या पावसामुळे संत्रा पिक फुलण्याची आशा होती. मात्र, चार दिवस सतत पाऊस राहिल्याने संत्रा झाडांचे नुकसान झाले. जिल्ह्यात एकूण 25 हजार 259 हेक्टरमध्ये संत्रा बागा आहेत. गेल्यावर्षी एक लाख 20 हजार 660 मेट्रीक टन संत्रा उत्पादन झाले होते. गेल्या काही वर्षांपासून मोसंबी पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. आजघडीला मोसंबीचे क्षेत्र 4 हजार 457 हेक्टरवर आहे. यातील तीन हजार 388 हेक्टरमध्ये उत्पन्न होऊ शकते. गेल्यावर्षी 26 हजार 732 मेट्रिक टन मोसंबीचे उत्पादन झाले होते. मात्र, यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार
यंदाच्या पावसाच्या लपंडावामुळे बहर गळला. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाली होती. यंदा उशिरा झालेल्या संततधार पावसामुळे संत्र्याचा अंबिया बहार नष्ट झाला. आपतकालिन स्थितीत कृषी विभागाने उपाययोजना आखणे सुरू केले आहे. तालुकास्तरावरील कृषी अधिकारी गावागावात जावून पिकाची पाहणी करीत आहेत.
----------------------------------------------------------
केदारपुरात दोन शिक्षकांचा "एकच प्याला'!
शुक्रवार, 11 जुलै 2014 -
दुपारी बारापर्यंत विद्यार्थी ताटकळत; स्वयंघोषित सुटी जाहीर
नागपूर- बुधवार वेळ सकाळी दहाची.. सर्व विद्यार्थी शाळेच्या मैदानात गोळा झाले.. साडेदहा.. अकरा...साडेअकरा...बारा वाजले... तरीही गुरुजींचा पत्ता नाही. अखेर साडेबाराला दोन्ही गुरुजी अवतरले ते तर्र होऊनच..! क्षणभर थांबले अन् सुटी जाहीर करून मदतनीस महिलेला शाळा बंद करण्यास सांगितले. लगेच दुचाकी सुरू करून दोघेही मद्याचा "अनुशेष‘ पूर्ण करण्यासाठी क्षणात नजरेआड झाले...
हा कोणत्या विनोदी नाटकातील प्रसंग नाही तर काटोल पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या केदारपूर येथील जि. प. शाळेत बुधवारी घडलेला प्रकार आहे. जंगलपरिसरात अवघी तीनशे लोकसंख्या असलेले केदारपूर हे आदिवासीबहुल गाव आहे. गावातील बहुतांश कुटुंबे मोलमजुरी व मोळ्या विकून उदरनिर्वाह करतात. येथील मुलांसाठी शिक्षण आणि शिक्षक दीपस्तंभ ठरू शकतात. मात्र, चार वर्ग असलेल्या येथील शाळेत दिलीप चरडे व श्री. मानकर या शिक्षकांची मनमानी सुरू असते. शाळेत शिक्षक वेळीअवेळी येणे नित्याचेच झाले आहे. बहुतांश पालक अशिक्षित असल्याने शिक्षकांना जाब विचारायला कुणीही नसल्यामुळे ते निर्ढावले आहेत.
बुधवारी शिक्षकांनी अचानक सुटी जाहीर केल्याने याबाबत गटसमन्वयक प्रमोद वानखेडे यांना विचारणा केली असता, त्यांनी आपल्याला रीतसर सुटीचा अर्ज मिळाला नसल्याचे सांगितले. तर, शिक्षकांच्या कारनाम्याची माहिती होताच गटशिक्षणाधिकारी श्री. ताम्हण व केंद्रप्रमुख दिनेश आगरकर शाळेत धडकले. मात्र, त्यांना शाळेला कुलूप लावलेले दिसले. यावेळी पालकांनी एकत्र येत रोष व्यक्त केला. यासंदर्भात जि. प. उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. अशा बेजबाबदार शिक्षकांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, त्यांना निलंबित करण्याची मागणी पालकांनी केली.
देखरेखीसाठी तपासणी पथक हवे दुर्गभ भागातील जि. प. शाळांतील शिक्षणाच्या दुरवस्थेचे केदारपूर हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. अनेक गावांत हीच परिस्थिती आहे. जंगलव्याप्त गावांतील मुलांची शिक्षणाची समस्या असताना अशा व्यसनाधीन शिक्षकांमुळे त्यांचे नुकसान होत आहे. शासनाने शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला असला तरी तळागाळातील घटकांपर्यंत अजूनही शैक्षणिक सुविधा पोहोचलेल्या नाहीत. याकरिता शिक्षणाचा पाया मजबूत करणाऱ्या प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवण्यासाठी शिक्षण विभागातर्फे तपासणी पथकाची निर्मिती करण्याची मागणी होत आहे.

कळमेश्वर - तालुक्यातील तेलकामठीचे मंडळ अधिकारी शेषराव हेडाऊ (वय 52) यांना चार हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. शेतीचा फेरफार करून देण्यासाठी
गुरुवार, 10 जुलै 2014
| ||
उमरेड - उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू होऊनही पाऊस न झाल्याने तालुक्यातील निम्मी जलाशये कोरडे पडले आहेत. मृग आणि आद्रा हे दोन्ही नक्षत्रे कोरडी गेल्याने शेतकरी चिंतित आहे
गुरुवार, 10 जुलै 2014
| ||
| |||
मौदा -पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यावर फावड्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना बुधवारी (ता. नऊ) दुपारी साडेबाराच्या सुमारास तारसा-बाबदेव मार्गावरील शेतात घडली
|