সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, July 20, 2014

कर्मवीर पुरस्कार घोषित

प्रकाश शर्मा, किसनराव बोंडे यांना कर्मवीर पुरस्कार घोषित
चंद्रपूर - चंद्रपूर -गडचिरोली श्रमिक पत्रकार संघातर्फे दरवर्षी दिल्या जाणाèया कर्मवीर पुरस्काराची घोषणा करण्यात आली अशुन यावर्षी जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश शर्मा आणि गडचिरोली जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार किसनराव बोंडे गुरूजी या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ सेवा दिलेल्या चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ पत्रकारांना श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने प्रतिष्ठेचा समजला जाणारा कर्मवीर पुरस्कार दरवर्षी सन्मानपुर्वक दिला जातो. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि सन्मान राशी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार १ ऑगस्ट रोजी श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित समारंंंंंंंंंभात दिला जाणार आहे.
कर्मवीर पुरस्काराचे यंदाचे मानकरी प्रकाश शर्मा यांनी दैनिक नवभारत या वृत्तपत्रात सलग ३० वर्षे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. पत्रकारितेत त्यांनी विविध विषयांवर लिखाण केले असुन समस्याप्रधान, आशय प्रधान, विकास तथा शोध पत्रकारितेवर त्यांनी भर दिला आहे. १९८७ मध्ये त्यांना मा. गो. वैद्य पुरस्कार प्राप्त झाला होता.
अरqवदबाबू देशमुख स्मृतिपत्रकारिता शोधवार्ता पुरस्कार २०००-०१ आणि २००४-०५ या वर्षी मिळाला आहे. विदर्भ हिन्दी साहित्य संमेलन नागपूरच्या वतीने देण्यात येणारा रामगोपाल माहेश्वरी स्मृति साहित्य पत्रकारिता पुरस्कारही त्यांनी पटकवला आहे. ते श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि सलग दहा वर्ष कोषाध्यक्ष राहिले आहे. या पुरस्काराचे दुसरे मानकरी किसनराव बोंडे हे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील रहिवासी आहेत. आला पल्लीच्या धर्मराव शाळेतून शारीरिक शिक्षक म्हणून ते २००५ मध्ये सेवानिवृत्त झाले. परंतु मागील ३४ वर्षापासुन ते पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यत आहेत. सध्या ते दैनिक पुण्यनगरी आणि हितवाद या दैनिकांचे प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. यापुर्वी त्यांनी दैनिक लोकमत, लोकसत्ता येथे काम केले आहे. अहेरी तालुका पत्रकार संघाचे ते तीन वेळा अध्यक्ष राहिले आहेत.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.