সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, December 13, 2010

ताडोबातील गाइड संपावर जाणार

सकाळ वृत्तसेवा
Monday, December 13, 2010 AT 12:30 AM (IST)
Tags: vidarha, tadoba sanctury, guide



मासिक वेतन आणि विमा देण्याची मागणी
चंद्रपूर- प्रतिवाहन दोनशे रुपये किंवा वनखात्याने वेतन सुरू करावे, या मागणीसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सुमारे 90 गाइडनी संप पुकारला आहे. उद्या (ता. 13) नागपूर येथे ते विधानभवनावर मोर्चा काढणार आहेत.
वाघासाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना वन्यजीव आणि वनांची माहिती देण्याचे काम गाइड करीत असतात. येथे दररोज सहाशेच्या आसपास पर्यटकांची वर्दळ असते. त्यामुळे प्रतिदिवस 60 वाहने आत जाण्याची सुविधा आहे. या प्रत्येक वाहनांवर एक गाइड जात असतो. त्याला प्रतिवाहन 100 रुपये मानधन पर्यटकांकडून दिले जाते. मात्र, महागाई वाढत असल्याने 100 रुपये प्रतिदिवसाच्या कमाईवर कुटुंब चालविणे गाइडला शक्‍य होत नाही. शिवाय हे सर्व गाइड स्थानिक आदिवासी कुटुंबातील आहेत. गाइडच्या कामाशिवाय अन्य कोणतेही उपजीविकेचे साधन नसल्याने येथील कुटुंब ताडोबाच्या भरवशावर अवलंबून आहेत. आता महागाईमुळे 100 रुपये प्रतिवाहनाऐवजी 200 रुपये करण्यात यावे किंवा वनखात्याने मासिक वेतन सुरू करावे, विमा योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी सर्व गाइडनी केली आहे. या मागणीला घेऊन सोमवारी संप पुकारण्यात आला आहे. विदर्भातील सर्व पर्यटनस्थळांचे सुमारे 200 गाइड नागपूर विधानभवनावर मोर्चा काढून शासनाकडे मागण्या मांडणार असल्याची माहिती आहे.



आता पर्यटक फिरणार फ्री झोन

ताडोबात जाण्यासाठी मागील काही महिन्यांपासून सहा गेट सुरू करण्यात आले होते. त्यामुळे पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली होती. शिवाय ताडोबा, मोहुर्ली आणि कोळसा या तीन झोनपैकी कोणत्याही एकाच ठिकाणी पर्यटकांना फिरता येत होते. पर्यटकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी आता 21 डिसेंबरपासून केवळ मोहुर्ली, कोलारा आणि पांगडी हे तीनच गेट सुरू ठेवण्यात येणार आहेत. उर्वरित सुरू असलेले खुटवंटा, अडेगाव, नवेगाव हे गेट बंद करण्यात येणार असून, प्रत्येक गेटमधून 20 वाहने अशी 60 वाहने ताडोबात जातील.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.