সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, December 12, 2010

भविष्य सांगणाऱ्यांचे वर्तमान अंधारात!

भाग 1
Sunday, December 12, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: astrology, chandrapur, vidarbha
प्रमोद काकडे - सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर - स्वातंत्र्याच्या सहा दशकांनंतरही सरोदी समाजातील प्रथा-परंपरेच्या शृंखला सैल होण्याऐवजी आणखी घट्ट झाल्या आहेत. शहरातील नेहरूनगरात या समाजाची वस्ती आहे. या वस्तीतील जवळपास वीस कुटुंबांवर जातपंचायतीने बहिष्कार घातल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचे कारण समाजातील महिलांच्या जाती किंवा जातीबाहेर केलेला पुनर्विवाह एवढेच आहे. येथील ही घटना प्रातिनिधिक आहे. ज्या शहरात, गावात या समाजाची वस्ती आहे; तेथील महिला सामाजिक बहिष्काराच्या यातना रोजच सहन करीत असून, भविष्य सांगण्याचा पिढीजात व्यवसाय असणाऱ्या सरोदी समाजाचे वर्तमान मात्र अंधारातच चाचपडत आहे.

सरोदी समाजातील माणसं भविष्यकथन करीत असल्याने त्यांना पश्‍चिम महाराष्ट्रात "जोशी' या नावानेही ओळखले जाते. राज्य शासनाच्या यादीत ही जात विमुक्त भटक्‍या या प्रवर्गात मोडते. जवळपास 95 टक्के निरक्षर असलेला हा समाज आता शहरी भागात दुग्धव्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. कोणताही निर्णय जातपंचायतीच्या माध्यमातूनच घेतला जातो. जातीतील माणसांनी साधे "पोलिस' असे नावही उच्चारले तरी त्यांच्यावर दंड आकारण्यात येत असल्याने जातपंचायतीच्या निर्णयाला आव्हान देण्याचा प्रयत्न ते करू शकत नाहीत. विशेषत: महिलांच्या बाबतीत या समाजात प्रचंड जाचक प्रथा आहे. पुरुषांना कितीही लग्न करण्याची परवानगी आहे. मात्र, महिलेला पुरुषाने घराबाहेर काढले, काडीमोड घेतला; तरीही तिला जातीत किंवा जातीबाहेर पुनर्विवाह करता येत नाही. प्रसंगी त्या महिलेने धाडस करून लग्न केले तर जातपंचायत तिच्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकते. अशा कुटुंबीयांना कोणत्याही धार्मिक विधी, लग्न समारंभ, अंत्यविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नाही. मात्र, या जातपंचायतीच्या निर्णयाविरोधात आता शहरी भागातील काही कुटुंबांमध्ये रोष आहे.
चंद्रपुरातील नेहरूनगर, मातानगर आणि भिवापूर वॉर्डात या समाजाची वस्ती आहे. सुमारे वीस कुटुंबांतील मुलींनी पुनर्विवाह केला आहे. यातील काही गावातच आहेत, तर काही बाहेर गेल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांवर जातपंचायतीने बहिष्कार टाकला आहे. या प्रत्येकाची व्यथा आपण एकविसाव्या शतकात आहोत काय? याचा विचार करायला लावणारी आहे. येथील रवा पिसाराम भंगाळे व शंकर पिसाराम भंगाळे यांच्या मुलींचे लग्न होते. त्यांनी पत्रिकेत त्यांचे भाऊ जनार्दन भंगाळे व तुळशीराम भंगाळे यांची नावे टाकली आहेत. या दोघांच्याही पत्नी पुनर्विवाहित आहेत. त्यांच्यावर जातपंचायतीने बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे त्यांचे नाव पत्रिकेत टाकणे पंचायतीच्या निर्णयाला आव्हान देणारेच होते. त्यांचे पत्रिकेतून नाव काढायला सांगितले. जातपंचायतीने रवा व शंकरवर दंड बसविला. बहिष्काराच्या भीतीने लग्नाच्या पत्रिका पुन्हा छापाव्या लागल्या. दोघाही भावांना लग्नात बोलाविले नाही. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील त्यांचा चुलत भाऊ बापूराव चेंडबा भंगाळे यांच्यावरही याच कारणामुळे जातपंचायतीने 90 रुपयांचा दंड बसविला. जातीच्या बाहेर काढण्याची धमकी देण्यासोबतच मुलाला लग्नमंडपात पोचू देणार नाही, अशीही धमकी दिली होती. शेवटी त्यांनाही लग्नपत्रिका बदलावी लागली. पाटणबोरी येथील लग्नात जनार्दनला पत्नीसह मारहाण करण्यात आली. त्यांना लग्नात येऊ दिले नाही. ही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. या समाजातील शेकडो कुटुंबीय रोजच बहिष्काराच्या यातना सहन करीत आहेत. (क्रमश: )

यांना अधिकार कुणी दिला?
जनार्दन भंगाळेची पत्नी सोनूबाईने पहिल्या पतीला सोडून त्याच्याशी विवाह केला. त्यांना ज्योती नावाची मुलगी आहे. ती दहाव्या वर्गात आहे. 95 टक्के समाज निरक्षर असताना ज्योती शिकली. आतापर्यंत सुरळीत सुरू होते. मात्र, अचानक तीन महिन्यांपूर्वी जातपंचायतीने त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. ज्योतीचा अलीकडेच साक्षगंध झाला. त्यावेळी समाजातील कुणीच आले नाही. कायद्याची थोडी समज असणाऱ्या ज्योतीला हा अन्याय वाटतो. आमच्यावर बहिष्कार टाकण्याचा अधिकार यांना कुणी दिला, असा प्रश्‍न तिने "सकाळ'शी बोलताना उपस्थित केला. संबंधित बातम्या


प्रतिक्रिया

On 12/12/2010 08:41 AM BORSE MANOJ KADU( SHIRSONDI) MALEGAON NASHIK said:

आज हमारा देश इतना आगे जा रहा है और हमारा महाराष्ट्र मेरा महाराष्ट्र कहा पीछे रह रहा है . TALUKA POLICE SHOULD INTERFARE HERE,TAKE NECESSARY ACTION . POLICE AUTHORITY OF DISTRICT,AS WELL AS LOCAL POLITICAL LEADERS SHOULD SOLVE THE PROBLEM.LITERATE PEOPLE OF THIS VILLAGE,IMPROVE SCHOOL AND EDUCATION LEVEL.

On 12-12-2010 05:06 AM Vasant Galatage said:

अशा प्रथा बंद करण्यासाठी लोक्प्रतीनिधीनी पुढाकार घेतला पाहिजे. फक्त निवडणुकीपुरते समाजसेवेचा दिखावा नको.स्वातंत्र्याचा ६० वर्षा नंतर देखील हीच स्थिती असताना आम्ही महासत्ता बनायला चाललो आहोत, याच्यावर चिंतन करणे गरजेचे आहे.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
भाग २
बहिष्काराच्या भीतीने सोडले गाव
परित्यक्ता महिलांच्या आयुष्याची राखरांगोळी; माजी नगरसेवकाच्या कुटुंबीयांवरही टाकला बहिष्कार
चंद्रपूर- सरोदी समाजातील जातपंचायतीला कंटाळून येथील जवळपास 50 कुटुंबांनी आजवर स्थलांतर केले आहे. कुटुंबावरील बहिष्काराच्या भीतीमुळे शेकडो परित्यक्ता महिलांनी दुसरा विवाह केला नाही. आपल्या आईवडिलांच्या आश्रयाला राहून मोलमजुरी करून आपला आणि आपल्या मुलांचा त्या सांभाळ करीत आहेत. काहींनी दुसरी लग्नगाठ बांधली. त्यांनाही कायमस्वरूपी बहिष्कृत करण्यात आले. ही जातपंचायत समाजातील चार-पाच लोकांची मक्तेदारी असून, त्यांच्याविरोधात समाजातील वृद्ध, तरुणांचा सूर आहे. परंतु, उघडपणे बोलण्याचे धाडस मात्र त्यांच्यात अद्याप आलेले नाही.

सरोदी समाजातील जातपंचायतीमध्ये निर्णय घेणारे लोक चार-पाच असतात. विशेषतः समाजातील धनिकांकडे स्वतःहून आलेली ही मक्तेदारी असते. एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले की, त्यांची पंचायत भरते. त्याचवेळी कुणी काय केले, समाजात काय सुरू आहे. यावर निर्णय घेतला जातो. दंड बसविला की, रक्कम आपसांत वाटून दिली जाते किंवा त्या रकमेतून जेवणावळी होते. अनेक पिढ्यांपासून सुरू असलेली जातपंचायत मध्यंतरी जवळपास बंदच झाली होती. मात्र, गत दोन वर्षांपासून तिला पुन्हा संजीवनी देण्याचे काम समाजातील काही लोकांनी सुरू केले आहे. यामुळे आता तरुणांमध्ये याविरुद्ध रोष आहे. मात्र, निरक्षर समाज आपल्या पाठीशी राहणार नाही, याची खात्री असल्याने ते उघडपणे बोलायला तयार नाहीत. समाजातील सामान्य घटकांनाच याची झळ पोचली आहे, असे नाही. तर समाजातील एका माजी नगरसेवकाच्या कुटुंबीयांनाही बहिष्कारास सामोरे जावे लागले आहे. नेहरूनगर येथील शंकर मानाजी सुडोत यांच्या वडिलांनी 60 वर्षांपूर्वी एका विवाहित महिलेशी पुनर्विवाह केला होता. याच कारणावरून जातपंचायतीने त्यांच्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकला. 22 नोव्हेंबर 2010 ला सुडोत यांच्या मुलाचे साक्षगंध होते. तेव्हा समाजातील एकानेही या समारंभाला जाऊ नये, अन्यथा नऊ हजार रुपयांचा दंडाची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे साक्षगंधाच्या कार्यक़्रमाला कुणीच आले नाही. शेकडो लोकांचे भोजन अक्षरशः फेकून द्यावे लागले. सुडोत भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांचा याला विरोध आहे. मात्र, समाजातील माणसं त्यांच्या पाठीशी नसल्याने तेही हतबल आहेत. याच झळाला कंटाळून नेहरूनगरातील जवळपास 50 एक कुटुंब नागपूरला स्थलांतरित झाले आहेत. हीच परिस्थिती सगळीकडे आहे, असे त्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. स्वतः सुडोत घर विकून दुसरीकडे जाण्याच्या तयारीत आहेत.

परित्यक्ता, विधवांच्या मरणयातनाजातपंचायतीचा सर्वाधिक त्रास निराधार, विधवा आणि परित्यक्‍त्या महिलांना सहन करावा लागत आहे. एकट्या चंद्रपुरातील नेहरूनगर आणि मातानगर येथे पतीने वाऱ्यावर सोडलेल्या चौदा मुली मोलमजुरी करून जीवन जगत आहेत. यापैकी काहींना मुले आहेत. कुटुंबावरील बहिष्काराच्या भीतीने त्यांनी दुसरे लग्न करण्याचे धाडस केलेले नाही. त्यातील एकीने दुसऱ्या जातीतील व्यक्तीशी लग्न करण्याची हिंमत केली. तिला आणि तिच्या कुटुंबीयांना बहिष्कृत करण्यात आले आहे. तिच्या आधीच्या पतीने मात्र दुसरे लग्न केले आहे. समाजात ते प्रतिष्ठित म्हणून वावरत आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.