Tuesday, December 26, 2017

क्रीडा प्रज्ञाशोध परीक्षा व सांस्कृतिक स्नेहमिलन

क्रीडा प्रज्ञाशोध परीक्षा व सांस्कृतिक स्नेहमिलन

चिमूर/तालुका प्रतिनिधी
श्री स्वामी नारायण बहुद्देशिय संस्था, गडचिरोली शाखा-भिसी द्वारा संचालीत श्री साई क्लासेस अकॅडमी, भिसी मध्ये क्रिडा, प्रज्ञाशोध व सांस्कृतिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. या कार्यक्रमाचे उदघाटन मा.सतिषभाऊ वारजूकर गट नेते जि.प.चंद्रपूर यांचे हस्ते पार पडले यावेळी डॉ.रमेशजी गजभे, (माजी राज्यमंत्री) रोशन ढोक, (गट नेते पं.स.चिमूर), सुरेशजी टिकले, (अध्यक्ष स्वा.ना.ब.सं. गडचिरोली), योगीता गोहणे (सरपंच भिसी), लिलाधरजी बन्सोड (उपसरपंच ग्रा.पं. भिसी), अरविंदजी रेवतकर (माजी सरपंच भिसी), पंकज मिश्रा (पत्रकार लोकमत समाचार), मनोज डोंगरे, (पत्रकार देशोन्नती), रवींद्र गोगले (पत्रकार महासागर), मा. माळवे सर,  मा.दिपक क्षिरसागर, मा. निमजे सर तसेच विध्यार्थी व पालक मोठ्या संख्येत या कार्यक्रमात उपस्थित होते. या प्रसंगी साई क्लासेस मधून निघालेल्या गुणवंत विध्यार्थीनी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
     तसेच तिन दिवसीय क्रिडा, प्रज्ञाशोध परिक्षा व सांस्कृतिक स्नेहसम्मेलन कार्यक्रमात विद्यार्थी, विद्यार्थीनींनी खो- खो, कबड्डी, क्रिकेट, वादविवाद स्पर्धा, प्रश्न मंजुशा, सामान्य ज्ञान आदी स्पर्धांमध्ये भाग घेतला. सायंकाळी विद्यार्थांनी नृत्य, समुह नृत्य, एकपात्री नाटक, बातमींचे वार्तापत्र सादर करून उपस्थितांचे मन जिंकली.
     या सम्मेलनाचा समारोप तिसऱ्या दिवशी झाला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरपुर येथील पर्यावरण मित्र युवराज मुरस्कर होते. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणुन सरपंच योगीता गोहने, माजी सरपंच अरविंद रेवतकर, प्रा.राजेश सोनकुसरे, जगदीश पेंदाम, पत्रकार शंकरपुर, महेश राखडे,उपस्थित होते. तसेच यावेळी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये प्रथम, व्दितिय व तृतिय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थांना शिल्ड, पदक व प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन मोनाली ठाकरे, प्रास्ताविक गनेश गभने तसेच आशिष गभने यांनी उपस्थितांचे आभार मानले. साई क्लासेस अकॅडमीच्या या स्नेहसम्मेलनासाठी निखील पिसे नेरी, श्रध्दा डोईजड, धिरज सर, सरला खोब्रागडे मॅडम, सुधा कुमले, प्रगती चामाटे, ट्वींकल मॅडम, पल्लवी चामाटे, भोयर मॅडम आदिंनी सहकार्य केले.
नागरिकांनी मनपाचे स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करा

नागरिकांनी मनपाचे स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करा

  • नगरसेवकांनी सहकार्य करावे, पालकमंत्र्यांचे आवाहन
  • कचर्‍याची तक्रार 12 तासात सोडवली जाणार
नागपूर- महापालिकेचे स्वच्छता अ‍ॅप नागरिकांनी डाऊनलोड करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकांनी 100 घरांशी संपर्क करून एका घरातून किमान दोघांनी हे अ‍ॅ्रप डाऊनलोड करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मनपाच्या नगरसेवकांना केले.
स्वच्छता अभियानांतर्गत आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज आढावा बैठक मनपाच्या टाऊन हॉल सभागृहात घेतली. या बैठकीला महापौर नंदा जिचकार, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव, विरोधीपक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अश्विन मुद्गल आदी उपस्थित होते.
स्वच्छता अ‍ॅप हे नवीन तंत्रज्ञान असून शहर स्वच्छ ठेवणे आणि नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने परिणामकारक ठरणार आहे आणि आमूलाग्र परिवर्तनही घडविणार आहे. कोणत्याही व्यक्तीने कचरा पडला असल्याचा फोटो काढून या अ‍ॅपवर लोड केला, तर त्यात 12 तासात कारवाई करणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने हे अ‍ॅप डाऊनलोड केले पाहिजे, यासाठी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील नागरिकांशी घरोघरी जाऊन संपर्क करणे व अ‍ॅप डाऊनलोड करण्यास त्यांना प्रवृत्त करायचे आहे. यामुळे महापालिकेला अधिक गुण मिळणार आहेत. बारा तासात तक्रार सोडविण्यात आली तर 150 गुण मिळणार आहेत. या अ‍ॅपवर आतापर्यंत 1500 तक्रारी प्राप्त झाल्या त्यापैकी 86 टक्के सेाडविण्यात ÷आल्या, अशी माहिती आयुक्त मुद्गल यांनी यावेळी दिली.
स्वच्छता अभियानात सर्वेक्षणानंतर देशातील क्वालिटी कंट्रोलची एक चमू येऊन तपासणी करणार आहे. ही चमू झोपडपट्टी, विविध ठिकाणच्या कॉलनी, बाजारपेठा, धार्मिक स्थळे, 100 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होणारी ठिकाणे, बसस्टँड, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक शौचालये या ठिकाणी भेट देणार आहेत. या संदर्भात नागरिकांच्या प्रतिक्रियाही ही चमू जाणून घेणार आहे. कोणत्याही नागरिकाला फोन करून 6 प्रश्न विचारले जातील. त्याची योग्य उत्तरे या चमूला मिळाली तर त्याचेही गुण महापालिकेला मिळतील. यासाठी नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करावे यासाठी नगरसेवकांनी संपर्क अभियान राबविले पाहिजे, असेही पालकमंत्री बावनकुळे यांनी बैठकीत सांगितले.
येत्या 3 जानेवारीला देशात स्वच्छता अभियानाचे हे सर्वेक्षण सुरु होणार आहे. स्वच्छतेच्या बाबतीत देशातील पहिल्या 20 शहरात नागपूरचा 16 क्रमांक आहे. पण पहिल्या 10 शहरांमध्ये नागपूरचा समावेश व्हावा यासाठी नगरसेवक आणि नागपुरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असेही पालकमंत्री म्हणाले.
डीपीसीच्या निधीतून ग्रामपंचायतींमधील कामे

डीपीसीच्या निधीतून ग्रामपंचायतींमधील कामे

  • बांधकाम विभागाच्या दक्षता पथकातर्फे चौकशी : पालकमंत्री

नागपूर- पाच हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना गेल्या 3 वर्षात डीपीसीतून देण्यात आलेल्या 50 लाख रुपये निधीच्या कामांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता पथकामार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामपंचातीच्या सरपंच सचिवांच्या आढावा बैठकीत दिली.
या आढावा बैठकीला जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे, सभापती पुष्पा वाघाडे, श्रीमती गायकवाड व अन्य अधिकारी उपस्थित होते.

तिबेटमध्ये सुरू असलेल्या संघर्षावरून आणि तिबेट राष्ट्राला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा देण्यात यावा याकरीता भारतातील लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्था यांचे समर्थन प्राप्त करण्यासाठी तिबेटीयन शिष्टमंडळानी नागपूर महानगरपालिकेला भेट दिली. महापौर नंदा जिचकार यांनी त्यांचे स्वागत केले.
31 डिसेंबरपासून व्हॉट्सअॅप होणार बंद

31 डिसेंबरपासून व्हॉट्सअॅप होणार बंद

दैनंदिन आयुष्यात जर तुम्ही व्हॉट्स अॅपचा वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण 31 डिसेंबर 2017पासून कित्येक मोबाइल फोनमध्ये व्हॉट्स अॅप (WhatsApp) काम करणं बंद करणार आहे. व्हॉट्स अॅप काही ऑपरेटिंग सिस्टमसाठी आपला सपोर्ट बंद करत असल्याची माहिती समोर आली आहे. यूकेमधील वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्स अॅप (WhatsApp) या ओएससाठी सपोर्ट बंद करणार आहे. 


  •     ब्लॅकबेरी ओएस
  •     ब्लॅकबेरी 10,
  •     विडोंज 8.0
  •     विंडोज फोन 7
  •     आयफोन 3जीएस/आयओएस 6
  •     नोकिया एस40 (31 डिसेंबर 2018 पर्यंत)
  •     अँड्रॉइड 2.1 आणि अँड्रॉइड 2.2 (1 फेब्रुवारी 2020 पर्यंत)

या मोबाइल फोनमध्ये व्हॉट्सअॅपचे काही फीचर्स कधीही काम करणं बंद करू शकतात. जर तुमच्या फोनमध्ये हे ऑपरेटिंग सिस्टम आहे तरी वेळीच फोन बदला कारण या फोनमध्ये व्हॉट्स अॅप काम करणार नाही.


काय आहे उपाय?
जर तुम्ही या ओएसचा वापर करत आहात तर तुमच्या मोबाइलमध्ये ओएस 4.0, आयओएस 7 आणि विंडोज 8.1 चे ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करावी. यानंतर तुम्ही व्हॉट्स अॅपचा वापर  करू शकता.
------------------

WhatsApp will stop working on BlackBerry OS, Windows Phone 8.0 after Dec 31

 

  • WhatsApp will end its support for several smartphone platforms by the end of this year. The Facebook-owned company has confirmed this via its official blog post. The messaging service will pull the plug on mobile platforms like BlackBerry OS, BlackBerry 10, Windows Phone 8.0 and older on December 31, 2017. This means that users using mobile phones running any one of these platforms will not be able to use WhatsApp after this year.
  • WhatsApp first announced about these outdated mobile platforms in year 2016. It said that it will end support for these mobile platforms. However, it later updated its blog stating that it extended its deadline to June 30, 2017. This deadline was further updated to December 31, 2017.
    " This was a tough decision for us to make, but the right one in order to give people better ways to keep in touch with friends, family, and loved ones using WhatsApp. If you use one of these affected mobile devices, we recommend upgrading to a newer Android, iPhone, or Windows Phone before the end of 2016 to continue using WhatsApp," WhatsApp states on its blog.
    These are the mobile OS that would stop supporting WhatsApp by the end of this year:

    • -- Nokia Symbian S60 after June 30, 2017
      -- BlackBerry OS and BlackBerry 10 after December 31, 2017
      -- Windows Phone 8.0 and older after December 31, 2017
      -- Nokia S40 after December 31, 2018
      -- Android versions 2.3.7 and older after February 1, 2020

अहीरांचे काय चुकले?

अहीरांचे काय चुकले?







लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्या डॉक्‍टरांनी नक्षली संघटनेत सामील व्हावं, आम्ही त्यांना गोळ्या घालू, असं वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत आलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे खरोखरच चुकले का, हा प्रश्‍न आहे. हंसराज अहिर यांनी सोमवारी चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात बनविण्यात आलेल्या अत्याधुनिक मेडिकल स्टोअरचे उद्‌घाटन केले. पण सुट्टया असल्यामुळे अनेक डॉक्‍टरांनी कार्यक्रमाला दांडी मारली. हॉस्पीटलमधील अनेक डॉक्‍टर हे ख्रिसमसच्या सुट्टीवर गेले असल्याचे सांगण्यात आल्यावर हंसराज अहिर चांगलेच संतापले. देशाचे गृह राज्यमंत्री स्वत: उपस्थित असताना डॉक्‍टरांची दांडी, हा गंभीर विषय आहे. यावरून लक्षात घ्या की, हे डॉक्‍टर खरोखरच सुटीच्या दिवशी रुग्णसेवा देत असतील काय? नाराजी व्यक्त करताना अहीरांची जीभ घसरली खरी. पण, जनतेने निवडून दिलेला खासदार, केंद्रीय राज्यमंत्रीपदावर असलेला नेता कार्यक्रमाला असतानाही डॉक्‍टर रजेवर कसे जाऊ शकतात? हा प्रश्‍नच आहे.





त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालू, असे ते बोलले आणि हा वाद पुढे आला. सामान्य रूग्णालय परिसरातील सदर उद्घाटन कार्यक्रम असताना प्रमुख शासकीय वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित राहतात, हा प्रकार दुर्दैवी वाटल्याने त्यांच्या बाबतीतच विधान केले, अन्य डॉक्‍टरांबाबतीत ते नव्हते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अनुपस्थित असल्याचे कळले. त्यामुळे त्यांनाही उद्देशुन हे वक्तव्य नव्हते. ज्या कार्यक्रमास स्थानिक खासदार तथा केंद्रीय मंत्री, आमदार, महानगराच्या महापौर, उपमहापौर, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्‍टर मंडळी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असताना, त्यांच्याच रूग्णालय परिसरात कार्यक्रम होत असताना मात्र जिल्हा शल्य चिकित्सकांसारखे प्रमुख जबाबदार शासकीय अधिकारी याप्रसंगी अनुपस्थित राहून मार्गदर्शन करणे टाळतात. प्रधानमंत्र्यांच्या गोरगरीबांसाठी असलेल्या अशा महत्वाकांक्षी योजनेकडे पाठ फिरवितात याचे शल्य वाटल्याने लोकशाहीवर विश्वास नसलेल्या अशा जबाबदार शासकीय वैद्यकीय अधिका-याबाबत असे वक्तव्य करणे भाग पडल्याचे स्पष्टीकरण त्यांनी आता दिले आहे.
डॉक्‍टरांचा सदैव सन्मान करणारा मी व्यक्ती आहे. माझे वडीलही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते. लोकसभा क्षेत्रामध्ये एम्स, आयएमए व स्थानिक डॉक्‍टरांच्या सहकार्यातुन अनेक स्वास्थ्य विषयक कार्यक्रम घेतले आहेत. अनेक शिबिरांचे आयोजन डॉक्‍टरांच्या सहकार्यातूनच यशस्वी केले आहे. अशा रूग्णसेवेतील समर्पित डॉक्‍टरांबाबत अनुदार वक्तव्य कधीही केले नाही त्यांचा सदैव आदरच केला, असेही अहिरांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
जनता महाविद्यालयाचे विशेष  रासेयो शिबीर कोठारी येथे

जनता महाविद्यालयाचे विशेष रासेयो शिबीर कोठारी येथे

कोठारीः येथील जनता विद्यालय तथा कनिश्ठ महाविद्यालयात गोंडवाना विघापीठ गडचिरोली अंतर्गत जनता महाविद्यालय चंद्रपूर द्वारा आयोजीत राश्ट्रीय सेवा योजना पथकाचे विषेश षिबीराचे उद्घाटन जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एम सुभाश यांच्या हस्ते झाले. हे विषेश षिबीर ‘ स्वच्छ गांव,स्वच्छ भारत आणी सुदृढ आरोग्य ’  या मुख्य कल्पणेवर आयोजीत करण्यात आले आहे. या सात दिवषीय षिबीरात षिबीरार्थी विद्याथ्र्यांच्या वतिने गावस्वच्छता, स्वच्छतेबाबत गावात जनजागरण केले जाणार आहे. कोठारी परिसरात मानव वाघ संघर्श मोठया प्रमाणात असल्याने हे कसे थांबवता येईल यासाठी चंद्रपूरातील पर्यावरणीय कार्यकर्ते, जिल्हा वन्यजिव संरक्षक बंडू धोत्रे, विभागीय वनअधिकारी गजेंद्र हिरे, डाॅ. योगेष दुधपचारे यांच्या व्याख्यानांचे आयोजन केले गेले आहे. भुमिगत पाणी वर उंचावन्यासाठी व विविध उपाययोजना म्हणून गाववासीयांना चंद्रपूर येथील जलबीरादरी संस्थेचे अध्यक्ष श्री संजय वैघ यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. दररोज मनोरंजन, सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवानी,  सुद्धा गांववासीयांना मिळणार आहे. 

उद्घाटनीय कार्यक्रमाची सुरवात चांदा षिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. श्री श्रीहरी जिवतोडे गुरूजी तथा श्रीमती लिलाताई जिवतोडे यांच्या प्रतिमेसमोर दिपप्रज्वलन आणी माल्यार्पनाणे झाली, याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जनता कनिश्ठ महिविद्यालय कोठारीचे प्राचार्य डाॅ. विजय मसराम पंचायत समीती सदस्य मा. मोरेष्वर पद्मगीरवार, सौ. स्नेहल टिंबडीया, उपसरपंच ग्रामपंचायत कोठारी, श्रीमती सायत्रा मोहूर्ले, डाॅ. योगेष दुधपचारे, डाॅ. सुनिल नरांजे, डाॅ. ज्योती पायघन, कु. संजना साखरकर, कु. प्रांजली पिसे, योगेष पाचभाई, कुनाल जोरगेवार उपस्त्थित होते. प्रास्ताविकीय मनोगत कार्यक्रम राश्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डाॅ. मिलींद जांभुळकर यांनी तर सुत्रसंचालन कु. कल्यानी पवार आणी अंबादास तिरानकर यांनी तर आभार प्रदर्षन प्रा. अमर बलकी यांनी केले. या प्रसंगी जनता विद्यालय तथा कनिश्ठ महाविद्यालय कोठारी येथील कर्मचारी वृंद आणी बहुसंख्य विद्यार्थी तसेच विद्यार्थीनी उपस्थित होत्या.


Monday, December 25, 2017

'त्या' डॉक्टरांना गोळ्या घालू

'त्या' डॉक्टरांना गोळ्या घालू

 हंसराज अहिर यांची जीभ घसरली



चंद्रपूर: ज्यांना लोकशाही नको. त्या डॉक्टरांनी नक्षली संघटनेत सामील व्हावं, आम्ही त्यांना गोळ्या घालू ’ असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सोमवारी चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक मेडिकल स्टोअरचे उद्घाटनप्रसंगी केले.

 




भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूरमधील सरकारी रुग्णालयातील मेडिकल स्टोअरच्या उद्घाटनाला सुट्टया असल्यामुळे अनेक डॉक्टरांनी कार्यक्रमाला दांडी मारली. हॉस्पीटलमधील अनेक डॉक्टर हे ख्रिसमसच्या सुट्टीवर गेले असल्याचे सांगण्यात आल्यावर हंसराज अहिर चांगलेच संतापले.   उद्घाटन सोहळ्यानंतर  अहिर यांनी दांडी मारणाऱ्या डॉक्टरांवर नाराजी व्यक्त केली. मात्र नाराजी व्यक्त करताना त्यांची जीभ घसरली आणि नवा वाद निर्माण केला. ‘मी जनतेने निवडून दिलेला खासदार असून मी केंद्रीय राज्यमंत्रीपदावर आहे. मी इथे येणार हे माहित असूनही डॉक्टर रजेवर कसे जाऊ शकतात?, त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालू’, असं बेताल वक्तव्य त्यांनी केलं.

Sunday, December 24, 2017

ग्रामसेवक संघटनेचे निवेदन

ग्रामसेवक संघटनेचे निवेदन

रामटेक (तालूका प्रतिनिधी ):
दिनांक २२/१२/२०१७ रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ,राज्य कार्यकारिणी शिष्टमंडळाची मा ग्रामविकास मंत्री मा ना पंकजाताई मुंडे सो,ग्रामविकास राज्यमंत्री मा ना श्री दादासो भुसे यांचे समवेत ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्याबाबत चर्चा केली                                  १) ३ वर्ष कंत्राटी कालावधी सलग सेवेत समाविष्ट करणे २) ग्रामसेवक संवर्गावर इतर कोणत्याही विभागाचे काम लादण्यात येवु नये याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल ३) जुनी पेंशन योजना लागु करणे ४) डी सी पी एस मासीक कपात विवरण नियमित मिळावे ५) १५ औगष्ट,२६ जानेवारी,१ मे या सणाचे व सुट्टीचे दिवशी ग्रामसभा घेवु नयेत किंवा तारखेत बदल करावे  व इतर प्रलंबित मागण्याबाबत चर्चा करण्यात आली व महाराष्ट्र राज्य ग्राम सेवक संघ राज्य कार्यकारिणी सोबत स्वतंत्र बैठक आयोजीत करण्याचे आश्वासन दिले ,,,पंतप्रधान हर घर सहज बीजली योजना कामावर ग्रामसेवक संघाने टाकलेला बहिष्कार मागे घ्यावा अशी विनंती मा मंत्री महोदयांनी केल्यामुळे सदर योजनेचे काम करण्यास  राज्यातील ग्रामसेवक संवर्गाने सहकार्य करावे असे ठरले , यावेळी *महाराष्ट्र ग्राम सेवक संघाचे नागपुर विभागिय अध्यक्ष श्री विलासजी मुंढे नागपुर जिल्हाध्यक्ष भारत मेश्राम, सचिव पुनमताई पांडे, रविभाऊ रेपाडे, हरीदास जी  रानडे तसेच भंडारा जिहाध्यक्ष माकाडे साहेब सचिव सुधाकर चिंदलोरे यांनी माननीय विधानसभा मतदारसंघ तुमसरचे आमदार श्री चरणभाऊ वाघमारे  उपस्थित होते.
ज्ञानगंगा विद्यालय येथे अपूर्व विज्ञान मेळावा

ज्ञानगंगा विद्यालय येथे अपूर्व विज्ञान मेळावा

ब्रम्हपुरी/प्रतिनिधी:

ब्रम्हपुरी तालुक्यातील दक्षिण परिसराअंतर्गत येणाऱ्या हळदा (मुडझा )येथील ज्ञानगंगा विद्यालयात विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिकादृष्टिकोण निर्माण व्हावा यासाठी अपूर्व विज्ञान मेळाव्याच आयोजन करून हा विज्ञान सोहळा मुख्याध्यापक जे.के.ठाकरे, यांच्या मार्गदर्शनात आयोजित करून संपन्न करण्यात आला.
आजच्या युगामध्ये विज्ञानाला खूप महत्व दिल्या जातो.ही कला सर्व विद्यार्थ्यामध्ये अवगत व्हावी या करीता विज्ञानप्रदर्शन विविध प्रतिकृतीतून विद्यार्थ्यानी सादर करावा यासाठी अपूर्व विज्ञान मेळाव्याच आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात आचल देशमुख, स्वाती डोंबळे, कोवेश्वरी राऊत, शिवानी गरमळे, कृष्णा मस्के, दुर्गेश मांडे, आनंद भोयर , गौरव भोयर, निलेश लोणारे, मनिष चिमूरकर, रोशन कोरडे, प्रणय चट्टे, समीर नखाते, विशाल मुलकर, किरण राऊत, रोशन लोणारे, श्रीधर चिमूरकर, चंद्रशेखर मांडे, दिलीप कोरडे, प्रमोद कोवे, हेमराज राऊत, दिलीप राऊत, प्राची नरूले, मेघा भोयर, ज्ञानेश्वरी धारणे, योगीता बावणे.कांचन आवारी , भारती भोयर, इत्यादि विद्यार्थी निनी स्वताच्या कलागुणानी विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण केले.
मुख्याध्यापक जे.के.ठाकरे यानी मार्गदर्शन केले असून देशातील विविध शास्त्रज्ञानाचे दाखले देवून विद्यार्थीनी़ना मार्गदर्शन करून लगेच विविध प्रतिकृती चे मूल्यांकन एस.के.दडमल, ओ.जी.उईके, आर.बी.घोडिचोर आदि शिक्षकानी केले.मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विघ्नेश्वर तुपटें, यशवंत कुँभरे , आर. डी.नखाते, आदि शिक्षकोत्तर यानी परिश्रम घेतले.तर या मेळाव्याला गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित अपूर्व विज्ञान मेळावा संपन्न झाला.

Saturday, December 23, 2017

पोलिसांना मालकी हक्काची घरे देणार

पोलिसांना मालकी हक्काची घरे देणार


  • - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

नागपूर : चोवीस तास कायदा व सुव्यवस्था राखणारे पोलीस आपले कर्तव्य चोख बजावजात. पोलिसांना सेवानिवृत्तीनंतर मालकी हक्काची घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

पूर्व नागपुरातील लकडगंज पोलीस स्टेशनच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या स्मार्ट पोलीस स्टेशन व पोलीस गृहबांधणी प्रकल्पाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी महापौर श्रीमती नंदा जिचकार, खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार सर्वश्री प्रा.जोगेंद्र कवाडे, प्रा.अनिल सोले, गिरीष व्यास, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ.मिलिंद माने, सुधाकर देशमुख, उपमहापौर जयदीप पार्डीकर, पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम्, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

स्मार्ट पोलीस स्टेशन व पोलीस गृहनिर्माणचा हा प्रकल्प 144 कोटी 96 लक्ष रुपयांचा आहे. हा प्रकल्प 24 महिण्यात बांधून पूर्ण होणार आहे. 19 हजार 365 चौरस मिटरच्या जागेत 28 हजार 600 चौरस मीटर बांधकाम करण्यात येणार आहे. या जागेत आधुनिक स्मार्ट पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त यांचे कार्यालय, पोलीस शिपायांच्या निवासासाठी तिनशे सदनिका व पोलीस निरीक्षकांसाठी 34 सदनिकांची बहुमजली इमारत, व्यावसायिक संकुल, पाचशे लोकांकरिता सभागृह, क्लब हाऊस, जिम्नॅशियम, स्वतंत्र मलजल प्रक्रिया केंद्र, सौर ऊर्जेपासून 65 कि.वॅट विजनिर्मिती प्रकल्प व अद्ययावत अग्निशमन यंत्रणा आदी बाबी उभारल्या जाणार आहे.
मेयोला 50 कोटीचा निधी

मेयोला 50 कोटीचा निधी

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची दरी दूर करणार 



नागपूर : ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची दरी दूर करण्यासाठी तसेच गोरगरीबांना वैद्यकीय सेवा देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवी संपादन केल्यानंतर किमान दोन ते पाच वर्ष ग्रामीण भागात सेवा द्यावी. ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा दिल्यास जीवनातील सर्वोच्च आनंद आणि समाधान मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यंत्रसामुग्री आणि अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
लैंगिक छळाचा आरोप, वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची आत्महत्या

लैंगिक छळाचा आरोप, वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची आत्महत्या

चंद्रपूर : महिला वनरक्षकाचा लैंगिक व मानसिक छळ केल्याचा आरोप असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी डी. एन. केंद्रे यांनी महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या ब्रह्मपुरी विभागीय कार्यालयात सहाय्यक व्यवस्थापकाच्या समक्ष कीटकनाशक प्राशन केले. त्यांना तातडीने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र शनिवारी त्यांचे निधन झाले. या घटनेने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.