সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

वामनराव चटप

 अ‍ॅड. वामनराव  सदाशिव चटप 
Address: Rajura, 
Tahsil Rajura,
District Chandrapur,
Graduate Professional
Law College Nagpur 1977

१५ वर्षे आमदार, शेतकरी संघटना समर्थित स्वतंत्र भारत पक्षाचे प्रश्नंताध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप यांची कारकीर्द उल्लेखनीय आहे. तीन वेळा निवडून येऊन मोठय़ा प्रमाणात विकासकामे केली. गेल्या १५ व्या लोकसभा निवडणुकीत  ते स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार होते. त्यात त्यांना तिस-या क्रमाकाची मते मिळविली होती.  वामनराव चटप यांनी आपली राजकीय गाडी आता दिल्लीच्या वाटेने वळविली आहे. यंदा त्यांना आम आदमी पक्षाने तिकीट दिली असून हाती झाडू घेऊन ते सज्ज झाले आहेत. 
‘शेतकऱ्यांना घामाचे दाम मिळावे’ पासून ‘त्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळावे’ यासाठी ३५ वर्षापासून शेतकरी संघटनेचे काम करताना स्वतंत्र भारत पक्षाचे राज्याध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप हे खासदार शरद जोशी यांचे खंदे समर्थक आहेत. 
८ नोव्हें, २०१३ ला चंद्रपूर येथे झालेल्या शेतकरी संघटनेचे 12वे संयुक्त अधिवेशनात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. कट्टर विदर्भवादी चटप यांनी ६ डिसें, २०१३ रोजी प्रतिविधान सभेच्या मुख्यमंत्रिपदावर बसविण्यात आले होते.
आंध्र सीमेवरील या मतदारसंघाची स्थिती पूर्वी अत्यंत दयनीय होती. रस्ते, पूल, विद्युतीकरण, शासकीय व शैक्षणिक कार्यासाठी इमारती, सिंचन, वैयक्तिक लाभाच्या योजना यांचा मोठा अनुशेष होता. अ‍ॅड. वामनराव चटप १९८९ मध्ये निवडून आले आणि मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून गेला. राजुरा मतदारसंघात आमदार चटप यांच्या कार्यकाळात २७६ पूल मंजूर झाले आहेत. ४७५ गावांसाठी त्यांच्यामुळे रस्ते झाले आहेत.
मोठय़ा प्रश्नदेशिक पाणीपुरवठा योजनात जोडण्यात यश आले. शासनाच्या दहा टक्के लोकवर्गणीच्या अटीमुळे रद्द झालेल्या प्रश्नदेशिक योजनांतील गावांसाठी खनिज विकास निधी, भारत निर्माण योजना, ग्रामीण पाणीपुरवठा योजना इत्यादीमधून योजना मंजूर करवण्यात आमदार चटप यशस्वी झाले.
राजुरा शहरासाठी १५ कोटी २१ लाखांची नळयोजना पूर्ण होऊन सध्या राजुरा नगरवासीयांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरू आहे. इतर गावात अतिदुर्गम भागात कूपनलिका, विंधन विहिरी याद्वारे पाणीटंचाई दूर करण्यात आमदार चटप यशस्वी ठरले. नक्षलवादग्रस्त भागातील लोकांना शासकीय योजनांचा चांगला लाभ मिळावा यासाठी सुसज्ज इमारती असाव्या, वसतिगृह व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पक्क्या इमारती असाव्या, यासाठी आमदार चटप यांनी कटाक्षाने प्रयत्न केला. अनेक इमारती बांधून पूर्ण, तर काहींची कामे सुरू आहेत.
गोंडपिपरी व राजुरा येथे न्यायालयासाठी इमारत, जिवती व कोरपना येथे तहसील कार्यालय व प्रशासकीय भवन, कोरपना व गडचांदूर येथे ग्रामीण रुग्णालयाची इमारत, कोरपना येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत, राजुरा येथे दोन आदिवासी वसतिगृह, हत्तीरोग नियंत्रण कार्यालय, वनविभाग कार्यालय यांच्या इमारती तसेच तिन्ही तालुक्यात भूमी अभिलेख कार्यालय बांधून पूर्ण झाले. समाजमंदिर, वाचनालय, सभागृह, अंगणवाडी व शाळा बांधकाम, बसथांबा निवारा, आरोग्य उपकेंद्र इत्यादी तीनशेपेक्षा जास्त कामे पूर्ण झाली आहेत.
वर्धा, अंधारी नदीवर एकूण आठ पुलांना मंजुरी मिळाली. त्यापैकी ५ बांधून पूर्ण झाले, इतर तीन पुलांची कामे प्रगतिपथावर आहेत. वनोजा येथील उंच पूल वेगाने आलेल्या महापुरात कोसळला होता. या पुलाचे बांधकाम १५ जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे. गाव लहान असो की मोठे तेथील नागरिकांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे, याबाबत आमदार चटप दक्ष आहेत. म्हणूनच गोंडपिपरी तालुक्यातील नदीच्या संगमावर असलेल्या ‘कुलथा’ या बेटसदृश्य गावाने आमदार चटप यांचा पुनर्वसनाचा प्रस्ताव नाकारल्यावर केवळ २०० लोकवस्ती असलेल्या या गावासाठी २.६६ कोटीचा पूल, २७ लाखांचा रस्ता व ४२ लाखांचे विद्युतीकरण असा ३ कोटी ३५ लाखांचा निधी मिळवून दिला आणि सर्व नागरी सुविधा मिळवून दिल्या.
पकडीगुड्डम व डोंगरगाव हे सिंचन प्रकल्प बांधून पूर्ण झाले. किरमीरी दरूर व सोनापूर-टोमटा उपसा जलसिंचन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जिवती तालुक्यातील १२ गावे राज्य शासनाने आंध्रप्रदेशला देण्याच्या निर्णयाविरोधात आमदार चटप यांनी विधानसभेत आवाज उठवला व लोकांची चळवळ उभारली.
मार्गी लागलेली कामे
 ५ वर्षात १३७ कोटी ५४ लाखांचे पूल, रस्ते, इमारती, 
डांबरीकरण, विद्युतीकरण इत्यादी विकासकामांना मंजुरी व अनेक कामे पूर्ण.
 पाणी टंचाईग्रस्त गावांच्या समस्या सोडवण्यात यश.
 नक्षलवादग्रस्त भागात मजबूत इमारती व विकासकामे
 १२ गावांसाठी यशस्वी लढा.
अपूर्ण राहिलेली कामे
 बिबी, टेकामांडवा, भंगाराम तळोदी व विरूर (स्टे) येथील प्रस्तावित प्रश्नथमिक स्वास्थ्य केंद्र
 जबरानज्योत शेतकऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे वाटप
 उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव
मतदारसंघातील प्रमुख प्रश्न
 जबरानज्योत शेतकरी व झोपडपट्टीवासीयांना पट्टे वाटप.
 प्रदूषणाचा प्रश्न.
 कामगारांचे विविध प्रश्न व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध समस्या.
 कुपोषणाचा व बालमृत्यूचा प्रश्न.

राजुरा मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात औद्योगिकरण सुरू आहे. त्यामुळे वाढते प्रदूषण व कंत्राटी कामगारांच्या समस्या याबाबत आमदार चटप फारसे गंभीर राहिल्याचे दिसत नाही. राजुरा शहरात वनउद्यान वगळता सुशोभिकरणासाठी मोठा निधी दिला नाही. वर्धा नदीवरून सिंचनाचे छोटे प्रकल्प होण्याच्या शक्यतेबद्दल आमदार चटप यांच्याकडून फारसे प्रयत्न नाहीत. आरोग्याच्या सर्व सुविधा व निधी असतानाही माणिकगड पहाडावर कुपोषण सुरूच आहे. (माहिती संदर्भ लोकसत्ता )