- श्रमिक एल्गारच्या प्रयत्नाला यश
सावली - युवक मागील 2—3 महीण्यापासुन तेलंगाना येथील कंपनीत कामावर गेले असता त्यांची मजुरी न देता परत येऊ देत नसल्याची तक्रार श्रमिक एल्गारच्या माध्यमातुन मजुरांच्या पालकांनी पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचेकडे केली होती.त्यानंतर चंद्रपूर पोलीसांनी तेलंगाना पोलीसांशी संपर्क साधुन सर्व मजुरांची मजुरीसहीत सुटका होऊन घरी परतले
सावली तालुक्यातील चारगांव येथील चंद्रशेखर गजानन गावतुरे, समिर शामकुमार मडावी, जयपाल अरूण गेडाम, नागेश कपिल कुमरे, राकेश शांताराम गुरगुले, मोसम पत्रू आत्राम, शरद वेटे, रामा भैयाजी मोहुर्ले हे युवक 7 फरवरी 2016 पासून तेलंगानातील येमुलवाडा येथिल श्रीराम कोरी या दगडाच्या खदानीत काम करीत होते. 2 महीण्याचा कलावधी लोटल्यानंतरही मात्र मजुरांना गावाकडे परत येण्यासाठी मनाई केल्या जात होते, मजुरांचा छळ केल्या जात होते व मजुरीही दिल्या जात नसल्याने याबाबत पालकांनी श्रमिक एल्गारकडे तक्रार केली होती. नेहमीप्रमाणे मजुरांची अडचण लक्षात घेता ठेकेदाराचे तावडीतुन मजुरीसह सुटका करण्याचे निवेदन श्रमिक एल्गारचे माध्यमातून पालकांनी चंद्रपूरचे पोलीस उपअधिक्षक राजपूत यांचेकडे सादर केले. या प्रकरणाची दखल घेत राजपूत यांनी युवकांना सोडविण्यासाठी प्रयत्न करुन येमुलवाडा पोलीसांकडे संपर्क साधला यामुळे 8 मजूरांची सूटका होऊन 90 हजार रुपये मजुरीसह गावाकडे परत आले. यामुळे मजूर व पालकांनी श्रमिक एल्गार व चंद्रपूर पोलीसांचे आभार मानले आहे