সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, December 28, 2014

आंबेडकरी साहित्य संमेलन घुग्‍घुस येथे

आंबेडकरी साहित्य संमेलन घुग्‍घुस येथे

घुग्‍घुस - अ.भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे बारावे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन चंद्रपूर ‌जिल्ह्यातील घुग्‍घुस येथे १६ ते १८ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. प्रसिद्ध आंबेडकरी नाटककार आणि लेखक प्रा. अविनाश डोळस हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्‍थानी राहणार आहेत. हिंदीचे प्रसिद्ध आंबेडकरी लेखक मोहनदास नैमिशराय हे या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते नरेन गेडाम यांची उपस्थिती राहणार आहे. संमेलनादरम्यान तीन परिसंवाद, एक विधान चर्चा, अनुभव कथन, कविसंमेलन, पथनाट्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार अहेत.

Tuesday, December 23, 2014

बेरोजगारीला कंटाळून तरुणीची आत्महत्या

बेरोजगारीला कंटाळून तरुणीची आत्महत्या

 नागपूर : सुशिक्षित असूनही रोजगार मिळत नसल्याच्या कारणाने तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. ज्योती विजय गायकवाड (वय 25) असे मृत तरुणीचे नाव आहे.
दत्तवाडी येथील गजानन मंदिराजवळील समर्थ गजानन सोसायटीत राहणारी ज्योतीने एम.कॉमचे शिक्षण घेतले होते. ती पहिल्या माळ्यावरील खोलीत नेहमीप्रमाणे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायची. मंगळवारी (ता. 23) दुपारी जेवण करून नेहमीप्रमाणे अभ्यासाला गेली. आत्महत्येपूर्वी तिने एका कागदावर "आई, बाबा, ताई मला माफ करा. मी शिकूनही अजून मला चांगला जॉब मिळाला नाही. त्यामुळे मी स्वत: आत्महत्या करीत आहे. यासाठी कुणीही जबाबदार नाही.' असे लिहून ठेवले होते. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पंचनामा करण्यात आला.

Saturday, December 20, 2014

बंदीस्त बिबटयांना मोठया पिंजज-यात ठेवा

बंदीस्त बिबटयांना मोठया पिंजज-यात ठेवा

इको-प्रोची मागणी-
चंद्रपूरः जिल्हयातील वनक्षेत्रालगतच्या गावात बिबट-मानव संघर्षा दरम्यान पकडण्यात आलेल्या बिबटयांना छोटया ‘ट्रॅप केज’ मधुन मोठया पिंज-यात ठेवण्याची मागणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी वनविभागाकडे केली आहे.
चंद्रपुरात आज तुकडोजी महाराज साहित्य संम्मेलन

चंद्रपुरात आज तुकडोजी महाराज साहित्य संम्मेलन

 चंद्रपुर- श्री गुरूदेव सेवा मंडळ आणि भारतीय विचार मंच, विदर्भ प्रांताच्या संयुक्त विद्यमाने येत्या २१ डिसेंबरला चिमूर तालुक्यातील नेरी येथे  श्रीतुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या विदर्भस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी गुरूकुंज मोझरी येथील अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी रुपराव वाघ असणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन रविवार (२१ डिसेंबर)ला सकाळी १० वाजता राष्टÑसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अ.भा. श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, सरचिटणीस जनार्दनपंत बोथे उपस्थित राहतील. दु. ४ वाजता होणाºया समारोप समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष तथा साहित्यीक डॉ. राजन जयस्वाल, भारतीय विचार मंच, विदर्भ प्रांताचे संयोजक प्रा. डॉ. सुभाष लोहे उपस्थित राहणार आहेत. २१ डिसेंबरला सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत प्रतिनिधी नोंदणी, ९ वाजता राष्टÑसंत छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ‘राष्टÑसंतांचे अध्यात्मचिंतन व आध्यात्मिक कार्य’ या विषयावर पहिला परिसंवाद होईल. या परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून अमरावती येथील प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख असणार आहे. तर नागपूरचे प्रा. डॉ. कृष्णा साकुळकर, डॉ. संजय येल्लुरे, चंद्रपूरच्या प्रा. डॉ. पद्मरेखा धनकर व नेरीचे प्रा. राम राऊत हे वक्ते असतील. संचालन प्रा. प्रफुल्ल बन्सोड करतील. दु. १२.१५ वाजता दुसरा परिसंवाद ‘राष्टÑसंतांचे ग्रामचिंतन आणि समाजकार्य’ या विषयावर होईल.

Friday, December 19, 2014

दवलामेटीतील खून प्रकरणी दोघांना अटक

दवलामेटीतील खून प्रकरणी दोघांना अटक

नागपूर - वाडी -दवलामेटी येथे जिवानीशी ठार मारणा-या आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून संतोष दिलीप परतेकी वय 27 वर्ष, दीपक तुकडूदास भैसारे 26 वर्ष यांना अटक करण्यात आली.
दि. 18 डिसेंबर रोजी प्रशांत परतेकी , संतोष दिलीप परतेकी वय 27 वर्ष, दीपक तुकडूदास भैसारे 26 वर्ष सर्व रा. रामजी आंबेडकर नगर, आठवा मैल, नागपूर यांनी संगनमत करुन उमेश व्यंकट इंगळे वय 27 वर्ष रा. रामजी आंबेडकर नगर, तक्षशीला बौध्द विहारासमोर, आठवा मैल, वाडी, नागपूर यास पोस्टे वाडी हद्यीत वार्ड नं. 4, सुभाष गडेकर यांचे घरासमोर, रामजी आंबेडकर नगर येथे अज्ञात कारणावरुन त्याच्या डोक्यावर, हातावर प्राण घातक शस्त्राने वार करुन जिवानीशी ठार केले. याप्रकरणी फिर्यादी व्यंकट चिंतामण इंगळे वय 55 वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोस्टे वाडी येथे सपोनि शिंदे यांनी आरोपीविरुध्द कलम 302,34 भादंवि अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी २ आरोपींना अटक केली आहे.
चंद्रपुरात विदेशी पक्ष्यांचे आगमन

चंद्रपुरात विदेशी पक्ष्यांचे आगमन


फेसेस संस्थेने केले पक्षी निरीक्षण व अभ्यास 

हिवाळा  प्रारंभ होताच युरोप,बुल्चीस्थान,सायबेरिया,मंगोलिया,अश्या विविध देशातून भारतात येणाऱ्या विविधरंगी स्थलांतर पक्ष्यांचे आगमन चंद्रपूर जिह्यात झाले आहे.फेसेस या संस्थेच्या वतीने जिह्यातील विविध तलावांवर तसेच पान्स्थालाना भेटी देत तेथील स्थ्लान्तारीय पक्ष्यांचे निरीक्षण व अभ्यास केला.
                 हिवाळ्यात पृथ्वीवर उत्तर गोलार्धात मोठ्या प्रमाणात बर्फ पडते.त्याळेस तेथील पक्षी खाद्य व निवाऱ्याच्या शोधात उष्ण भागाकडे प्रयाण करतात.या काळात भारतासारख्या देशात थंडी असली तरी ,फार तीव्र नसते,त्यामुळे भारतात मोठ्या संख्येने स्थलांतर पक्षी येतात,संथेने केलेल्या पाहणीत,बर हेडेड गुज हा जगातला सर्वात उंचावरून उडणारा पक्षी आहे,तो माउंट एवरेस्ट ८८४८ मीटर{२९०२९ फुट}याच्या वरून उडतांना आढळलेला आहे, सररुची{पिन टेल डक},लालसरी{पोचार्ड},चक्रवाक{भ्राम्हनी डक},गडवाल,भुवई{गार्गेणी},थापट्या{शावेलर},दलदल ससाणा{मार्श ह्यारिअर},स्पोट बिल डक,तसेच देशांतर्गत स्थलांतर करणारे शेकटे{ब्लेक विंग स्तील्त},चमचा बाज{स्पून बिल},रंगीत करकोचा{पेंटेड स्टोर्क},सुंदर बटवा{कॉमन टील},आदी दुर्मिळ स्थलांतरीत पक्षी आढळले,सध्या जिह्यातील विविध तलावांवर दुर्मिळ स्थलांतरित पक्षी आले असून त्यांच्या संरक्षणाची गरज असल्याचे मत संस्थेने व्यक्त केले.या संस्थेच्या उपक्रमात पक्षी अभ्यासक शैलेश उपरे,दिनेश खाटे,जितेंद्र नोमुलवार,विकी पेटकर,निखिल मडावी,जुबी शेख,प्रसाद चट्टे,जतिन स्वान,आदींचा समावेश होता. 

Thursday, December 18, 2014

सावनेरचे एसडीओ, तहसीलदार निलंबित

सावनेरचे एसडीओ, तहसीलदार निलंबित

सावनेर,: रामाडोंगरी परिसरातून बेकायदेशीररित्या वाळू उपशासाठी परवानगी दिल्याप्रकरणी सावनेरचे उपविभागीय अधिकारी विनोद हरकंडे, तहसीलदार श्री. माने यांना महसूल मंत्र्यांच्या आदेशावरून निलंबिल करण्यात आले. 
मित्रांनी केली हत्या

मित्रांनी केली हत्या

नागपूर  : वाडी परिसर रामजी आंबेडकर नगरातील वॉर्ड क्रमांक पाच येथे चाकूने भोसकून तरुणाची हत्या झाली. उमेश व्यंकट इंगळे (वय 27) असे मृताचे नाव आहे. आरोपी घटनेनंतर पसार झाले. 
अंबाझरी आयुध निर्माणीत ठेकेदारी करणारा उमेश व्यंकट इंगळे हा टाटा एस हे वाहन चालवितो. गुरुवारी तो वाहन पासिंग करण्यासाठी आरटीओ कार्यालयात गेला होता. त्यानंतर मित्र दीपक समुद्रे, प्रशांत परतेकी यांच्यासोबत दारू पिण्यासाठी गेला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तिघेही रामजी आंबेडकर नगरात आले. दीपक समुद्रे याच्या घराजवळ आल्यानंतर इंगळे याचे प्रशांत आणि दीपकसोबत भांडण झाले. त्या दोघांनी इंगळेच्या पोटात चाकू भोसकला. डोक्‍यावर जबर मारहाण केली. त्यामुळे तो गंभीररीत्या जखमी झाला. घटनेनंतर दोघेही पसार झाले. नागरिकांना इंगळे याला दत्तवाडी येथील आशा हॉस्पिटलमध्ये भरती केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.

Friday, December 12, 2014

राज्यपाल शनिवारी जिल्ह्यात

राज्यपाल शनिवारी जिल्ह्यात

चंद्रपूर, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव हे येत्या 13 डिसेंबरला दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून प्रशासनातील अधिकारी कामाला लागले आहेत. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे सकाळी साडेदहा वाजता चंद्रपूर औष्णिक वीजकेंद्रात आगमन होईल. त्यानंतर साडेदहा वाजता वाहतूक शाखेत आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांच्या बैठकीस उपस्थित राहील. साडेअकरा वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित कार्यक्रमास ते हजेरी लावतील. दुपारी 1 ते 2.50 वाजेपर्यंतची वेळ राखीव राहील. त्यानंतर दुपारी 3 ते 4.15 वाजता राजुरा तालुक्‍यात येत असलेल्या लक्कडकोट येथील सम्राट अशोक हायस्कूल येथे आयोजित सुवर्णजयंती राजस्व अभियान कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर ते चंद्रपुरात परत येतील. रविवारी सोईनुसार राज्यपाल नागपूरकडे रवाना होतील.
आमची माती, आमची माणसं

आमची माती, आमची माणसं

सध्याच्या बोचऱ्या थंडीत  शेतकऱ्यांची धान काढण्याची लगबग सुरू झालीय. 
तांबड फुटताना बळीराजा शेतात हजर होतोय. हुडहुडी भरवणारी थंडी बाजूला सारत 
धान कापणी करताना मोत्याची रास आता घरी येणार, याचा आनंद आहे . 
                                                                                      फोटो देवानंद साखरकर चंद्रपूर

 

                                                                                                                         
 
                                                                                                                                        
                                                                                                                                        
                                                                                                                         

Thursday, December 11, 2014

केंद्राचे दुष्काळी पथक रविवार पासून राज्याच्या दौऱ्यावर

केंद्राचे दुष्काळी पथक रविवार पासून राज्याच्या दौऱ्यावर


राज्यातील खरीप पिकांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी केंद्र सरकारच्या दहा विविध मंत्रालयाच्या जेष्ठ अधिकाऱ्यांचे पथक दिनांक १४ ते १७ डिसेंबर दरम्यान राज्यातील विविध दुष्काळी स्थितीचा मराठ वाडा आणि विदर्भ परी सरा चा प्रातिनिधिक स्वरुपात पाहणी दौरा करणार आहे. या भेटीत मराठवाडा ते विदर्भ दरम्यान दहा अधिकाऱ्यांची दोन पथके दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करुन आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करतील.

Wednesday, December 10, 2014

शेतकरयांच्या आत्महत्या- उपाय योजना एक चिंतन

शेतकरयांच्या आत्महत्या- उपाय योजना एक चिंतन

१९७२ पेक्षाही जास्त तीव्रता असणारी दुष्काळी परिस्थितीचे वादळ सध्या मराठवाडा परीसरात घोंगावत आहे. फेब्रुवारी-मार्च नंतर परिस्थीती आणखी बिकट होणार आहे. न उगवलेले पीक, पाण्याची टंचाई, डोक्यावरील कर्ज, परीवाराचे ओझे यासर्व कारणांमुळे शेतकरी बांधव आत्महत्या करत आहे. या आत्महत्या थांबविण्यासाठी कायम स्वरुपी काय उपाय योजना करता येतील यासाठी माझ्या अल्प बुद्धीला सुचलेले काही उपाय.
१) नौकरी - खेडयातील अल्प भुधारक शेतकरयांच्या प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी. पोलीस भरती, सैन्य भरती, नगर पालिका, महानगरपालिका, जिल्हा परीषद अशा ठिकाणि कित्यक जागा शिल्ल्क आहेत त्या जागा दुष्काळ ग्रस्त भागातून भराव्यात.
२) रोजगार निर्मिती - दुष्काळी परिस्थिती मध्ये शेत बंधारे खोदणे, शेत तळे खोदणे, शेताभोवती चरे खोदणे, तलावातील गाळ काढणे, तलावाची खोली वाढविणे, नवीन तलावांची निर्मीती, नद्यांचे पुनर्जीवन, रस्तांची कामे, वनीकरणाची कामे अशा स्वरुपाच्या भ्रष्टाचार मुक्त कामाचे नियोजन करुन प्रत्येक कुटुंबाला काम मिळेल अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे. याचे दोन फायदे होतात एक कामकरयांच्या हातात पैसे येतो व जलसंधारणाची कामे झाल्यामुळे पाऊस पडल्यावर जमीनीमध्ये पाणी मुरुन भविष्यातील पाण्याची पातळि वाढेल.
३) शेतकरयांवर असलेले कर्ज माफ करावे किंवा कर्जाच्या परतफेडीची मुदत वाढवावी, शेतकरयावर असलेले कर्ज बिनव्याजी करावे.
४) जनावरांसाठी लवकरात लवकर भ्रष्टाचार मुक्त चारा छावण्या उघडाव्यात.
५) सरकारी दवाखान्यात योग्य आरोग्य सेवा पुरवावी.
६) अन्न सुरक्षा कायद्याद्वारे मोफत किंवा अल्पदरातील अन्नाचा सुरळीत पुरवठा होईल याकडे लक्ष द्यावे.
७) आरोग्यविषयक समुपदेशन करावे किंवा मानसरोग तद्यांची मदत घेऊन वैफल्य ग्रस्त, व्यसनी व्यक्तींची तपासणी करुन त्यांना समुपदेशाची व्यवस्था करावी
८) सर्वात महत्वाचे दुष्काळ ग्रस्त भाग संपुर्ण पणे व्यसन मुक्त करावा. सर्व दारु दुकाने, पानटपरया वरील विडी-सिगारेट-तंबाखु विक्री बंद करावी.
डॉ. पवन लड्डा
लातूर
०२३८२ २२१३६४
मो. ०९३२६५११६८१
मित्रांनो आपल्याही काही सुचना असतील तर शेअर कराव्यात.

Sunday, December 07, 2014

भद्रावतीत दोन गटात तलवारने वार

भद्रावतीत दोन गटात तलवारने वार

तलावाच्या वादातून भोई समाजात हाणामारी 
चंद्रपूर, : न्यायालयीन प्रक्रियेतील तलावाच्या वादाचा निर्णय विरुद्ध गटाच्या बाजूने लागल्याने संतापलेल्या भोई समाजाच्या दुसऱ्या गटाने डोळ्यात तिखट फेकून मारहाण केली. त्यानंतर दोन्ही गटातील महिला-पुरुषांमध्ये चाकू, तलवार आणि कुऱ्हाडीने हाणामारी चालली. यात दोन्ही गटातील 11 जण जखमी असून, त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. ही घटना भद्रावती तालुक्‍यातील विजासन येथे घडली. रात्री अकराच्या सुमारास सर्व जखमींना चंद्रपूरात हलविण्यात आले होते.जखमीत माणिक पचारे (वय 52), गिरीजा सुनील मांढरे (वय 52), आनंद मांढरे (वय 49, वसंता मांढरे (वय 70), महेश मांढरे (वय 25), सुनील मांढरे (वय 42) यांच्यासह आणखी पाच जणांचा समावेश आहे. रात्रीउशिरापर्यंत पोलिस कारवाई सुरू होती. 

Friday, December 05, 2014

रामाळा तलावात इकाॅर्नीया

रामाळा तलावात इकाॅर्नीया

   रामाला तलावास पुन्हा इकाॅर्निया चे ग्रहण 
रामाला तलाव स्वच्छता अभियानाची गरज

चंद्रपूरः शहरातील ऐतीहासीक रामाळा तलावात पुन्हा ‘इकाॅर्नीया’ वनस्पतीने थैमान घातले आहे. या वनस्पतीने पुन्हा संपुर्ण तलावाचा भाग व्यापलेला आहे. वर्ष 2009 प्रमाणे तलावाचे दुषीत पाणी सोडुन इकाॅर्नीया वनस्पतीपासुन तलाव मुक्त करण्याची मागणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी जिल्हाधिकारी दिपक म्हैसेकर यांचेकडे एका निवेदनातुन केली आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या

शेतकऱ्यांच्या आत्महत्या

राज्यातील आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी
सिंचन योजनावर रु.२,१७७ कोटी, तर कर्जमाफीसाठी रु.७३८ कोटी खर्च


मुंबई दि.५ डिसेंबर : राज्यातील आपद्ग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नयेत म्हणुन पंतप्रधान पॅकेजमधुन २१७७ कोटी रुपये सिंचन योजनावर खर्च केले. तर, ८३७ कोटी रुपये कर्ज माफीसाठी देण्यात आले आहेत. याखेरीज, राज्य शासनाच्या पॅकेजमधून बैलजोडी, पंपसेट इत्यादी खरेदी करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यास रु.२५ हजार याप्रमाणे ६० हजार शेतकऱ्यांना १३० कोटी रुपये आणि शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी एकूण ३० कोटी रुपये आतापर्यंत वितरीत करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे महसूल आणि मदत व पूनर्वसन मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली.
केंद्राचे पथक दोन दिवसांत येणार

केंद्राचे पथक दोन दिवसांत येणार

महाराष्ट्रातील दुष्काळाची पहाणी 

नवी दिल्ली, : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्‍यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पथक येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात येणार आहे, असे आज राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज नवी दिल्ली येथे सांगितले.