সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, December 19, 2012

वैद्यकीय महाविद्यालयाला राज्य सरकारकडून हिरवी झेंडी


 चंद्रपूर, : तब्बल दोन दशकांपासून सुरू असलेल्या येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीला राज्य शासनाने अखेर हिरवी झेंडी दिली आहे. २८ सप्टेंबर रोजी या स्वरूपाचा अधिकृत प्रस्ताव अखिल भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. विधानसभेत आरोग्यमंत्री विजय गावित यांनी यासंबंधित अधिकृत माहिती दिल्याने सर्वसामान्यांतून आनंद व्यक्त केला जात आहे.
चंद्रपूर हा जिल्हा आदिवासी क्षेत्रात मोडतो. येथे सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. या रुग्णालयात जिल्ह्यासह गडचिरोली, आंध्रप्रदेशातील काही गावांतील रुग्णांवर इलाज केला जातो. अलीकडच्या काळात जिल्ह्याचे झपाट्याने औद्योगिकीकरण झाले. त्यामुळे प्रदूषणात झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यात कर्करोग, ङ्कुफ्ङ्कुसाचे आजार, अस्थिरोगाचे प्रमाण अधिक आहे. जिल्हा आदिवासीबहुल असल्याने येथे सिकलसेलचे प्रमाण अधिक आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी केली जात होती. तथापि, राज्य शासनावर राजकीय दबाव टाकण्यात येथील मंडळी कमी पडल्याने मागणी पूर्ण होण्यात अडथळे येत गेले. मात्र, यावर्षीच्या प्रारंभीपासून राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, आयएमए ही मागणी सातत्याने रेटण्यात आली. त्यामुळे अखेर राज्य शासनाने या मागणीला अनुकूलता दर्शविली आहे. या आशयाची माहिती आज(ता. १८) विधानसभेच्या एका प्रश्नाच्या उत्तरात आरोग्यमंत्री विजयकुमार गावित यांनी दिली. या मागणीचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.
आरोग्य सुदृढ राखायचे असेल तर समाज निरोगी ठेवून चालणार नाही, केवळ वैद्यकीयच नव्हे तर इतर अनेक व्यवसायांचा हाच पायाभूत सिद्धांत झाला आहे. वास्तविक वैद्यकीय, शिक्षकी अशा क्षेत्रांकडे सेवाभावी वृत्तीचा पेशा म्हणून बघितल्या जाते. पैसा कमाविण्याला या व्यवसायात दुय्यम स्थान दिले जाते. परंतु ज्या काळात हे व्यवसाय सेवाभावी वृत्तीचे होते, ज्या काळात पैशापेक्षा सेवा महत्वाची मानली जायची तो काळ केव्हाच इतिहासजमा झालेला आहे. बाजारु व्यावसायिक वृत्तीने या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. सरकारी मेडिकल कॉलेजऐवजी खाजगी मेडिकल कॉलेजेस राजकारण्यांनी सुरु केल्यामुळे सर्व गणितच बिघडले आहे. व्यवसायाचा qकवा पेशाचा धंदा झाला की नीतिमत्तेची सगळी गणिते कोलमडून पडतात. या वैद्यकीय महाविद्याजयामुळे गरिबांना ङ्कायदा होईल.
-------------
जिल्ह्यातील एका सर्वेक्षणात हत्तीरोगाचे २५ हजार रुग्ण आढळले. चंद्रपूर जिल्ह्यात या आजारावर नियंत्रणासाठी उपाययोजना मंजूर करण्यात आली आहे. मात्र त्या उपयोजनेसाठी असलेल्या पथक पदांपैकी ११५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उपाययोजना पथके पंगू झाली आहे. या आजारावर योग्य ते उपाय योजणारी प्रभावी यंत्रणा नाही.
----------
२०११ ते ऑक्टोबर २०१२पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात एक हजार ३४४ एचआयव्ही बाधित रुग्ण असल्याची माहिती समोर आली. मागील पाच वर्षात ८११ जणांचा एड्सने मृत्यूही झाला. संपूर्ण जिल्ह्यात चंद्रपूर शहर, qसदेवाही व बल्लारपूर तालुक्यात सर्वाधिक एचआयव्ही बाधीत रुग्ण आहेत. जिल्ह्यात २००७ पासून एचआयव्ही बाधितांवर औषधोपचार मोहीम सुरू आहे. बल्लारपुरात, बिल्टतङ्र्के एआरटी केंद्र स्थापन करण्यात आले. जिल्ह्यतील एचआयव्ही बाधीतांची संख्या लक्षात घेत २००८ ला जिल्हा सामान्य रुग्णालयातच एआरटी केंद्र सुरू करण्यात आले. चार हजार ७७१ एचआयव्ही बाधीत रुग्णांवर सध्या औषधोपचार सुरू आहेत.
--------------
जिल्हा सामान्य रुग्णालय
खाटांची संख्या-३००
चंद्रपुर
प्राथमिक आरोग्य केंद्रे....५८
ग्रामीण रुग्णालय........१३
जिल्हा रुग्णालय.....१
स्त्री रुग्णालय.....१ नियोजित
वैद्यकीय महाविद्यालये- नियोजित
इलेक्ट्रोङ्कोरेसीस चाचणी केंद्र...४

वैद्यकीय महाविद्यालय का?
प्रदूषण : मागील दशकभरात चंद्रपुरात अनेक मोठे उद्योग आलेत. विशेषकरून कोळसा खाणी, सिमेंट उद्योग, कच्चे लोखंड, मॅगनीज, वीजनिर्मिती करणारे उद्योग येथे आलेत. त्यामुळे प्रदूषणात झपाट्याने वाढ झाली. सर्वाधिक प्रदूषित शहरात चंद्रपूरचा देशात चौथा क्रमांक आहे. प्रदूषणामुळे येथे आजारांचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात या आजारांवर उपचार करणारी यंत्रणा नाही. मोठा आजार असल्यास येथील रुग्णांना नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाची आवश्यकता होती.

आदिवासीबहुल क्षेत्र
येथील नागरिकांचा उत्पन्नगट कमी आहे. त्यामुळे मोठ्या शहरात जाऊन औषधोपचार करणे परवडत नाही. जिल्ह्यातील सध्याची शासकीय आरोग्यव्यवस्था मोठ्या आजारांवर उपचार करण्यास पुरेशी नाही. आदिवासीबहुल क्षेत्र असल्याने या भागात कुपोषण, सिकलसेलचे प्रमाण अधिक आहे. गडचिरोली जिल्ह्यात हे प्रमाण चंद्रपूरपेक्षा अधिक आहे. हत्तीरोग, श्वसन आजाराचेही प्रमाण अधिक आहे.

कामगारांचे प्रमाण अधिक
मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाल्याने येथे कामगारांची संख्या अधिक आहे. येथे आंध्रप्रदेशातूनही मोठ्या प्रमाणात कामगार येत आहेत. बहुतेक कामगारा दैनिक मजुरीच्या स्वरूपात काम करतात. कोळसा खाण, सिमेंट उद्योग, एमआयडीसीमधील उद्योग येथे हे कामगार काम करीत आहेत. या कामगारांत आजारांचे प्रमाण अधिक आहे. एचआयव्ही, कर्करोग यासारखे दुर्धर आजाराचे रुग्णही अधिक आहेत. या गटाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांना मोठ्या शहरात जाऊन उपचार घेणे शक्य नसते. या वर्गासाठी वैद्यकीय महाविद्यालय ङ्कायद्याचे ठरणार आहे.

अपघात
औद्योगिकीकरणामुळे एकीकडे प्रदूषण वाढले, तर दुसरीकडे वाहतुकीचा पसारा वाढल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले. अपघातग्रस्तांवर चांगल्या दर्जाचे उपचार करणारी यंत्रणा स्थानिकस्तरावर उपलब्ध नाही. औद्योगिक अपघाताचेही प्रमाण अधिक आहे. अनेकदा नागपूरला हलविताना रुग्णांचा मृत्यू होता. वैद्यकीय महाविद्यालयामुळे तातडीने आणि चांगल्या दर्जाचे उपचार होण्याची सोय होणार आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.