সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, February 13, 2011

देहविक्री महिलांची प्रथमच पत्रपरिषद

सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 13, 2011 AT 12:30 AM (IST)
Tags: police, crime, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - बेकायदेशीर व्यवसाय करीत असल्याच्या कारणावरून आंध्र पोलिसांनी छापा टाकला. लाथाबुक्‍क्‍या मारून ओढत गाडीत कोंबले. घरादारांची तोडफोड केली. घरात ठेवलेले पैसे आणि दागिनेही जप्त केले. पोलिसांनी छापासत्र राबवताना 12 लाख रुपये आणि 25 तोळे सोनेही लंपास केले, असा खळबळजनक आरोप देहविक्री करणाऱ्या महिलांनी प्रथमच पत्रपरिषद घेऊन केला. 15 सप्टेंबर 2006 रोजी आंध्र पोलिसांनी 55 महिलांना अटक केली होती. ही कारवाई निजामबाद आणि चंद्रपूर पोलिसांनी केली. त्यानंतर 20 फेब्रुवारी 2007 रोजी 15 दलालांसह 35 तरुणींना अटक करण्यात आली. यंदाही नोव्हेंबर-डिझेंबरमध्ये छापा टाकण्यात आला. एका संस्थेच्या तक्रारीवरून ही कारवाई होते. या निराधारगृहात दरवर्षी ठराविक निराधार महिलांची शासकीय अनुदानासाठी उपस्थिती आवश्‍यक असते. त्यामुळे आंध्र पोलिसांना हाताशी धरून ही संस्था येथे आलेल्या मुलांना आपल्या निराधारगृहात घेऊन जाते. त्यांच्या नावावर अनुदान लाटते. तीन वर्षांनंतर त्यांना वाऱ्यावर सोडले जाते. त्यानंतर किंवा त्याआधीच या निराधारगृहातील मुली पळून जाऊन पुन्हा देहविक्री करण्यासाठी येतात, असे त्यांनी सांगितले.

पाषाणहृदयी माणसांचाही थरकाप उडावा, असा प्रसंग दीड-दोन महिन्यांपूर्वी "रेडलाइट झोन'मधील चंद्रपूरच्या गौतमनगर आणि वणी (जि. यवतमाळ) येथे घडला होता. मात्र, या घटनेने धास्तावलेली वस्ती अद्याप सावरलेली नाही. अद्याप पोलिसांकडून त्यांना त्रास सुरू असल्याने आंध्र पोलिसांच्या क्रूरतेचा पाढाच व्यथित महिलांनी पत्रकारांसमोर शनिवारी (ता. 12) मांडला. या वस्तीत देहविक्री व्यवसायात आंध्रप्रदेशातील मुलींचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याची तक्रार एका स्वयंसेवी संघटनेने केली होती. नलगोंडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक एम. तिरुपती यांच्या नेतृत्वातील पथकाने मागील 29 नोव्हेंबर रोजी चंद्रपुरात; तर 27 डिसेंबर रोजी वणी येथे पोलिसांनी छापा टाकला होता. या छापासत्रात त्यांनी सुमारे 120 जणांना अटक केली. दोन महिन्यांचा कालावधी होऊनही अनेकांची सुटका झालेली नाही. यातून चिमुकलेही सुटले नाहीत. आंध्र पोलिसांच्या क्रूरतेचा पाढा वाचताना गौतमनगरातील फातिमा म्हणाल्या, ""उभ्या आयुष्यात पोलिसांचा असा धिंगाणा आम्ही बघितलेला नाही. अमानुष मारहाण केली. एका 45 वर्षीय महिलेच्या अंगावर पाणी ओतून मारहाण केली. महिन्याभराचे बाळ असलेल्या महिलेस धक्काबुक्की करण्यात आली; शिवाय पोलिसांनी अटकसत्रात अनेकांच्या घरांची कुलपे न उघडताच दरवाजे तोडले.'' सोबतच एका घरातून सोन्याचे दागिने आणि पैसेही पोलिसांनी चोरल्याचा आरोप केला. यावेळी लक्ष्मीबाईंनी सांगितले, ""सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत वाट चुकून या व्यवसायात आलेल्या अनेक महिला एचआयव्ही एड्‌सने बाधित आहेत. त्यांना नोबल शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आरोग्यविषयक सेवा दिल्या जातात. जीवनमरणाच्या लढाईत संघर्ष करीत असलेल्या या बाधित महिलांना पोलिसांनी अटक केल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा बाधितांना दररोज आणि नियमित औषध घेणे बंधनकारक असते; मात्र या महिला आता पोलिस कोठडीत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अटक करण्यात आलेल्या महिलांवर बलात्कार, मारझोड, बेकायदेशीरपणे डांबणे, अनैतिक कृत्याला प्रोत्साहन देणे, जीवे मारण्याची धमकी, ये-जा करणाऱ्या नागरिकांना अश्‍लील हातवारे करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले.


""पोलिसांनी छापासत्र राबविताना 12 लाख रुपये आणि 25 तोळे सोने लंपास केले. मात्र, नलगोंडा येथील न्यायालयात केवळ 10 हजार रुपयेच जप्त केल्याचे दाखविण्यात आले.''
शिट्टीबाई महमद अकबर
 अध्यक्ष, जीवनधारा महिला संजीवनी संस्थ
वणी

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.