चंद्रपुरात होत असलेल्या ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनची तयारी जवळपास पूर्ण होत आली आहे. सरदार पटेल सोसायटी आणि सर्वोदय शिक्षण मडळाच्या वतीनं आयोजित हे संमलन येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन ते पाच फेब्रुवारी दरम्यान होत आहे. अध्यक्ष ज्येष्ठ सक्षक- वसंत आबाजी डहाके- आहेत, तर उद्घाटन न्या. चंद्रशेखर धर्ङ्काधिकारी यांच्या हस्ते होणार आहे.
व्ही. ओ. संङ्केलनाची तारीख जसजशी जवळ येऊ- लागली, तसतशी राजीव गांधी अभियांत्रिकी ङ्कहाविद्यालयातील व्यवस्थाही पूर्णत्वाक-डे जाऊ- लागली. महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसराचं सुशोभीक-रण सुरू- आहे. संमेलनस्थळाच्या तयारीसाठी जवळपास दररोज चारशे ते पाचशे कामगार राबत आहेत. व्यासपीठ अठराशे चौरस मी मध्ये तयार केलं जात आहे. या व्यासपीठाचं बांधकाम आहे. त्यालाच लागून 'ग्रीन रू-ङ्क'ची व्यवस्था क-रण्यात आली आहे. मुख्य संमैलनस्थळ ५० हजार चौरस मि मध्ये आहे. या ठिकाणी आठ ते दहा हजार श्रोत्यांच्या बसण्याची व्यवस्था आहे. हे आता अंतिम टप्प्यात आलं आहे. तसंच या संङ्केलनस्थळी येणार्या प्रत्येकाला संमलनाच्या परिसरातील कोणत्याही ठिकाणाहून कार्यक्रम बघता यावा, यासाठी जागोजागी 'एलसीडी'ची व्यवस्था क-रण्यात येणार आहे. ग्रंथप्रदर्शनासाठी २२० स्टॉल्सची नोंदणी झाली आहे. हा परिसरही जवळपास तीस हजार चौरस मी, राहणार आहे. भोजन सभागृह १२ हजार चौरस मी आहे.