সর্বশেষ
Friday, January 24, 2020
Tuesday, June 04, 2019
Saturday, February 09, 2019
नागपूर:बलात्कार प्रकरणात दोन आरोपींना अटक
खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टर उभारणीवर भर देणार
• ‘मिनकॉन कॉनक्लेव्ह’चे आयोजन
• राज्यातील सर्व खाणपट्टयांचे डिजीटलायजेशन
• खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठीही वीजदरात सवलत
नागपूर, दि. 9 : राज्यात खनिजउद्योग क्षेत्रात वाढीच्या विपुल संधी उपलब्ध आहेत. खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टर उभारणीवर भर देण्यात येणार असून ज्या ठिकाणी खनिजसंपदा आढळते तेथेच त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग व मूल्यसंवर्धन उद्योग उभारण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळही भरीव सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
उद्योग आणि खनिकर्म विभाग, ‘एमएसएमसी’, विदर्भ इकॉनामिक डेव्हलपमेंट कौन्सिल (वेद) यांच्या सहकार्याने हॉटेल सेंटर पॉईंट येथे दोन दिवसीय ‘मिनकॉन कॉनक्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ ‘एमएसएमसी’चे अध्यक्ष आशिष जयस्वाल, खासदार कृपाल तुमाने, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतिश गवई, व्यवस्थापकीय संचालक एस. राममुर्ती, देवेंद्र पारेख, सुधीर पालिवाल तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ‘एमएसएमसी’ आणि खनिज क्षेत्रातील विविध उद्योग समुहांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. ‘महासँड’ आणि खनिज क्षेत्रातील उद्योग संधी यासंदर्भातील ध्वनीचित्रफितीचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, वनसंपदा आणि खनिज संपदेच्या बाबतीत विदर्भ समृध्द प्रदेश आहे. खनिजउद्योग क्षेत्रात विपुल संधी उपलब्ध असून या परिषदेच्या आयोजनामुळे या क्षेत्रातील संधींसंदर्भात साकल्याने विचारमंथन होईल. खनिजपदार्थ उत्त्खननातून शासनाला महसूल प्राप्त होतो. महत्वाच्या खनिजातून मिळणाऱ्या महसूलात वाढ होण्याची आवश्यकता आहे. पर्यावरणपूरक आणि संवर्धक असे खनिज उद्योग वाढले पाहिजेत यावर भर देण्यात येत आहेत. वनसंपदेला धोका पोहचू न देता खनिज उत्त्खनन करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. उद्योगांसाठी कोळसा उपलब्ध करुन देवून यावर आधारित उद्योग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. उद्योगांना वीजदरात सवलत देण्यात आली असून खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टरलाही वीजदरात सवलत देण्यात येणार आहे. रोजगार निर्मितीचे आव्हान पेलतांना खनिज क्षेत्रातील उद्योग यामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतील. खनिज क्षेत्रातील उद्योगांनाही भरीव सवलती उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यासाठी या क्षेत्रातील उद्योगांनी सूचना द्याव्यात. त्यांचा नक्कीच सकारात्मतेने विचार करण्यात येईल. राज्यातील सर्व खाणपट्टयांचे डिजीटलायजेशन करण्यात आले असून महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य असल्याचे श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, गौण खनिज आणि मुख्य खनिजांपासून महसूल प्राप्त होतो. खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठी विदर्भात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. तसेच याद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही शक्य आहे. वन आधारित आणि खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठी विशेष धोरण व सवलती देण्यावर भर देण्यात येत आहे. सर्व भागांचा समतोल विकास साधण्याची आवश्यकता असून विदर्भात मॅगनिजवर आधारित उद्योग वाढीस मोठी संधी आहे. विदर्भातील बंद पडलेल्या कोळसा खाणी सुरु करुन तेथे कोळशापासून युरिया तसेच मिथेनॉल अशी इतर उत्पादने निर्मिती करण्याचे उद्योग उभारणीवर भर देण्याची आवश्यकता आहे. मिथेनॉलवर चालणाऱ्या ट्रक आणि बसेस आगामी काळात सुरु करण्यात येणार आहेत. विदर्भातील कोळशाला त्याच्या दर्जानुसार भाव मिळाला पाहिजे, असेही श्री. गडकरी यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धनासंदर्भात श्री. गडकरी म्हणाले, खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या वाढीबरोबरच पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा विचारही करणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या वृक्षलागवडीमुळे राज्याच्या वनक्षेत्रात वाढ झाली आहे. नालाखोलीकरणाच्या कामातून निघणारी माती व मुरुम यांचा उपयोग रस्ते उभारणीसाठी करण्यात येत आहे. बायोडिझेलवर विमानांचे उड्डाण यशस्वी करण्यात येत आहे. बांबूपासून इंधन निर्मितीचे प्रयोगही यशस्वी होत आहेत. विदर्भ हे आगामी काळात जैवइंधनाचे ‘हब’ म्हणून विकसित होवू शकते. उद्योगांच्या विकेंद्रीकरणावर भर देण्यात येत असून यासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत असल्याचेही श्री. गडकरी यांनी सांगितले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विदर्भातील खनिजक्षेत्रात उद्योग उभारणीची मोठी संधी असून विदर्भ खनिज समृध्द प्रदेश आहे. राज्यात विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील उद्योग क्षेत्रात वाढ होत असल्याचेच हे सकारात्मक चिन्ह आहे. सौरऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातही क्रांतीकारक बदल होत आहे. फ्लायॲश संदर्भात स्वतंत्र धोरण असून फ्लायॲश क्लस्टरची उभारणी नागपूर व चंद्रपूर येथे होत आहे. कोळसा उद्योगाला प्रोत्साहन देण्यात येत असून खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठीही वीजदरात सवलत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठी एक्सप्रेस फिडरद्वारे मुबलक वीज उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
‘एमएसएमसी’चे अध्यक्ष आशिष जयस्वाल म्हणाले, वने, पर्यटन आणि खनिजसंपदा ही विदर्भाची बलस्थाने असून खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या वाढीसाठी जाणिवपूर्वक प्रयत्न कण्यात येत आहेत. या क्षेत्रातील उद्योगांना आता अधिक सुविधा व सवलती उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. खनिज क्षेत्रातील प्रक्रिया उद्योग व मुल्यवर्धीत उद्योग विदर्भातच निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. कोळशाचे उत्पादन विदर्भात मोठ्या प्रमाणात होते. या क्षेत्रात आगामी काळात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढविण्यात येणार आहे. खनिजाच्या रॉयल्टीतून मिळणाऱ्या निधीतून काही भाग संबंधित जिल्हयाच्या विकासासाठी वापरण्याचे धोरण त्या जिल्हयांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे श्री. जयस्वाल यांनी सांगितले.
अतिरिक्त मुख्य सचिव सतिश गवई म्हणाले, खनिज क्षेत्रातील उद्योग व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत असून विदर्भाचे या क्षेत्रात मोठे योगदान आहे. अर्थव्यवस्थेला आणि उद्योगक्षेत्राला चालना देणे गरजेचे आहेच परंतु त्याबरोबरच पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी असून खनिज उत्त्खननाबरोबरच पर्यावरणाचे जतन व संवर्धनाचा विचारही करणे गरजेचे आहे. खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठी सकारात्मक पाऊले उचलण्यात येत असल्याचे श्री. गवई यांनी सांगितले.
देवेंद्र पारेख म्हणाले, आपला देश विविध खनिज संपत्तीचे विपुल भांडार असून या क्षेत्रातील उद्योगांमध्ये वाढीच्या आणि विकासाच्या संधी आहेत. या क्षेत्रातील उद्योगात आता प्रक्रिया उद्योग आणि मुल्यसंवर्धन उद्योगांची वाढ होणे गरजेच आहे. ‘मिनकॉन’ कॉनक्लेव्हद्वारे खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या वाढीसाठी सर्वांगिण विचारमंथन होईल, असेही श्री. पारेख यांनी सांगितले.
रिना सिन्हा, अतुल ताजपुरिया यांनी सुत्रसंचालन केले. शिवकुमार राव यांनी आभार मानले.
· एक लाख ५७ हजार मतदारांनी केले व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक
- - व्हीव्हीपॅटमुळे मतदानामध्ये अधिक पारदर्शकता - अश्विन मुदगल
- - उच्च न्यायालय येथे व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक
नागपूर, दि. 8 : येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रासह प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर होणार असून, मतदान करताना झालेल्या मतदानासंदर्भातील माहिती सात सेकंदापर्यंत प्रत्यक्ष पाहता येणार आहे. व्हीव्हीपॅटमुळे मतदान प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून, केलेले मतदान सुरक्षित असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण होणार असल्याची ग्वाही जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ येथील सभागृहात मतदार जागृती अभियानांतर्गंत इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र व व्हीव्हीपॅटच्या वापरासंबंधीचे सादरीकरण व प्रात्यक्षिक बार असोशिएशन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी हायकोर्ट बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲङ अनिल किलोर, तसेच बार असोशिएशनच्या श्रीमती वेंकटरमन, प्रफुल्ल कुबाळकर, जयदीप चांदूरकर, मुख्य सरकारी वकील सुमंत देवपुजारी, पुरुषोत्तम पाटील तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा तसेच बार असोशिएशनचे सर्व पदाधिकारी यावेळीउपस्थित होते.
निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राचा वापर प्रारंभी केरळ राज्यातील पारावूर विधानसभा मतदारसंघात करण्यात आला होता. त्याच्या उपयुक्ततेमुळे भारत निवडणूक आयोगाने ‘भेल’ व ‘इसीआयएल’ या शासनाच्या कंपन्यांमार्फत इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राच्या निर्मितीला सुरुवात केली असून, 15 मार्च 1989 पासून संपूर्ण राज्यात निवडणुकांमध्ये या यंत्रांचा वापर करण्यात येत असल्याचे सांगताना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले की,नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात या यंत्रासोबतच प्रथमच व्हीव्हीपॅटचासुद्धा वापर करण्यात येत आहे. ही संपूर्ण यंत्रणा अत्यंत सुरक्षित असून, मतदानापूर्वी सर्व मशीनची तपासणी व मॉक पोल नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमोर करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.
मतदानासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट मशीन मतदानाच्या ४८ तासापूर्वी रॅडमायझेशन करुन पाठविण्यात येत असल्यामुळे मतदानकेंद्रांवर पाठवण्यात येणाऱ्या मशीनची पूर्वकल्पना कुणालाही असूच शकत नाही. तसेच प्रत्यक्ष मतदानापूर्वी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीसमोर मॉक पोल घेण्यात येत असल्यामुळे आपले मतदान सुरक्षित आहे, याची ग्वाही या संपूर्ण प्रक्रियेमार्फत देण्याचा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पार पाडल्या जाते. प्रत्यक्ष निवडणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिंग एजंट, मायक्रो ऑब्झर्व्हर, वेब कॉस्टींग, सीसीटीव्ही, सेक्टर ऑफिसर तसेच मीडियाचे प्रतिनिधी यांच्या देखरेखीखाली ही संपूर्ण प्रक्रियेनंतर अत्यंत सुरक्षिततेतर्गंत स्ट्राँगरुममध्ये मतमोजणीपर्यंत सर्व मशीन ठेवण्यात येतात.
यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनबाबत विविध शंका उपस्थित करण्यात येत असल्या तरी भारतीय निवडणूक आयोगाने सर्व शंकांचे समाधान केले असून, आतापर्यंत देशातील विविध उच्च न्यायालयात 37 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 30 याचिकांचा निकाल हा भारतीय निवडणूक आयोगाच्या बाजूने लागला आहे. तर 7 याचिकांवर सुनावणी सुरु आहे. इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राद्वारे होणारे मतदान अत्यंत सुरक्षित असल्यामुळेच संपूर्ण देशात ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेबद्दल संभ्रम असल्यास तात्काळ आपले मत नोंदविण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिली आहे.
गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, त्रिपुरा, आणि कर्नाटक या राज्यात झालेल्या सर्वसाधारण निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा यशस्वी वापर करण्यात आला असून, देशभरात 5हजार 626 कोटी रुपये किमतीच्या 40 लाख युनिटचा वापर करण्यात आला आहे.
नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर होत असल्यामुळे जनतेला मतदान प्रक्रियेची माहिती देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 4 हजार 832 मतदान केंद्र असून, सर्वच मतदान केंद्रांपर्यंत जनजागृती करण्यात येत आहे. या अंतर्गंत जिल्ह्यातील आतापर्यंत 1 लाख 56 हजार 696 नागरिकांनी व्हीव्हीपॅटवर प्रत्यक्ष मतदानाची माहिती घेतली आहे. ही जनजागृती मोहिमेतर्गंत चित्ररथासह विविध माध्यमांचा प्रभावी वापर सुरु असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
प्रारंभी हायकोर्ट बार असोशिएशनच्या श्रीमती वेंकटरमन यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाची माहिती दिली. तर ॲङ पुरुषोत्तम पाटील यांनी आभार मानले. इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करुन झालेल्या मतदानाची माहिती यावेळी सर्व उपस्थितांनी घेतली.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 17 फेब्रुवारीला हिरकणी योजनेचे आयोजन
जिल्हा प्रशासनांनी पुढे येण्याचे सुरेश प्रभू यांचे आवाहन
चंद्रपूर, दि 9 फेब्रुवारी : केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रशासनाशी थेट संपर्क साधत बचत गटांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये अधिक उद्योजकता निर्माण करावी यासाठी हिरकणी योजनेची घोषणा केली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 17 फेब्रुवारी पासून तालुकास्तरीय आयोजनाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी चंद्रपूर जिल्ह्याच्यावतीने महापौर अंजली घोटेकर यांनी दिले.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आज मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. मुंबई येथील मंत्रालयातील वार रूममध्ये यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, अकोला येथून कौशल विकास राज्यमंत्री रणजीत पाटील, संबंधित विभागाचे सचिव असीम गुप्ता, महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर आदी सहभागी झाले होते.
राज्य शासनामार्फत महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी हिरकणी योजनेची सुरुवात आज करण्यात आली. या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील अभिनव प्रयोग करणाऱ्या 10 बचत गटांची निवड केली जाणार आहे. या बचत गटांना आर्थिक मदत केली जाणार आहे. याशिवाय उत्तम काम करणाऱ्या बचत गटांना पुरस्कार देखील प्रदान केले जाणार आहे.
महाराष्ट्रातील चांगल्या बचत गटांना केंद्र पातळीवर काम करण्याची संधी देखील दिली जाईल, असेही आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सुरेश प्रभू यांनी जाहीर केले.
चंद्रपूर येथून संपर्क साधताना महापौर अंजली घोटेकर यांनी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी महिला बचत गटांसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आभार व्यक्त केले. महिला बचत गटांसाठी ही एक नवीन संधी असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे महिला बचत गटांचे कार्य चालू असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी हिरकणी योजनेमध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत गटांचा सहभाग नोंदविण्याबाबत यापूर्वी जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार जिल्ह्यामध्ये काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बचत गट अतिशय सक्षमतेने काम करत असताना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी देखील केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू तसेच राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन देखील यावेळी घोटेकर यांनी केले
आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी भैय्यासाहेब येरमे आदींसह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
आदिवासी महोत्सवाचे उद्घाटन थाटात
नागपूर/प्रतिनिधी:
आदिवासी समाजाला पुरातन संस्कृतीसह शौर्याचा इतिहास लाभला आहे. बदलत्या युगात आदिवासी समाजाने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. मात्र प्रगतीचे शिखर गाठताना आपल्या पुरातन संस्कृतीचे जतन होणेही आवश्यक आहे. आपल्या येणाऱ्या प्रत्येक पिढ्रयांना हा इतिहास अवगत व्हावा यासाठी आदिवासी महोत्सवाद्वारे संधी उपलब्ध करण्यात आली आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
परंपरागत आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार (ता. ८) आयोजित आदिवासी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून महापौर नंदा जिचकार बोलत होत्या. मंचावर महोत्सवाचे उद्घाटक राष्ट्रीय जनजाति आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार शाय, प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुधाकर देशमुख, महोत्सवाच्या आयोजक राष्ट्रीय जनजाति आयोगाच्या सदस्या माया इवनाते, आयोगाचे सदस्य हरीकृष्ण दामोद, सत्ता पक्षनेते संदीप जोशी, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेवक संदीप जाधव, नगरसेविका रूतिका मसराम, गोंड राजमाता राजश्रीदेवी उईके, शिवाणी दाणी, दिगंबर चौहाण, श्री. पंजवानी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, आज आदिवासी समाजातील प्रतिभावंतांनी विविध क्षेत्रात लौकिक प्राप्त केले आहे. या समाजाने इतिहासात केलेल्या शौर्याची महतीही प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा महोत्सवाचे आयोजन महत्वाचे ठरते. प्रत्येक समाजबांधवाने आपली संस्कृती न विसरता या संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.
राष्ट्रीय जनजाति आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार शाय म्हणाले, देशासाठी बलिदानात आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. मात्र देशासाठी आपले शौर्य पणाला लावणाऱ्या या महावीरांच्या कार्याला हवा तो सन्मान मिळू शकला नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना योग्य सन्मान मिळावा, लुप्त पडलेल्या इतिहासाचा अध्याय पुन्हा लिहीला जावा यासाठी राष्ट्रीय जनजाति आयोगाद्वारा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय जनजाति आयोगाच्या सदस्या व महोत्सवाच्या आयोजक माया इवनाते यांनी केले.
‘नागपुर का राजा’चे सादरीकरण शनिवारी
महोत्सवाच्या समारोप प्रसंगी सायंकाळी ५.३० वाजता ‘नागपुर का राजा’ या महानाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यावेळी आयोजित समारोप कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय जनजाति आयोगाच्या सदस्या माया इवनाते उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर नंदा जिचकार भूषवतील.
कढरे येथे अनुलोमच्या माध्यमातून गॅस वितरण
खबरबात / गणेश जैन ( धुळे)*
बळसाणे : ता. ८ रोजी कढरे तालुका साक्री येथे अनुलोम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 26 महिला लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा वाटप करण्यात आले , शासकीय योजना तळागाळातील वंचित घटकांपर्यंत पोहोचाव्या आणि त्याचा लाभ जनतेला व्हावा यासाठी अनुलोम सामाजिक संस्था शासकीय योजनांचा प्रचार प्रसारासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मा मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते , या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील वंचित लाभार्थ्यांना योजना मिळवून देण्यासाठी सहकार्य मिळत असते त्याचाच भाग म्हणून अनुलोम सामाजिक संस्थेच्या स्थान मित्रांच्या मदतीने गावात महिलांना गॅस जोडणी मोफत देण्यात आले , या कार्यक्रमाला गावातील माजी सरपंच श्री जगतसिंग राजपूत , स्थान मित्र रावसाहेब गिरासे , श्री जगदीश माळी , सामाजिक कार्यकर्ते श्री जितू गिरासे गॅस एजन्सीचे श्री संदीप वाघ आदी उपस्थित होते शासकीय योजना व त्यात जनतेचा सहभाग व उज्ज्वला योजनेचे फायदे याविषयात अनुलोम भाग जनसेवक निलेश राजपूत यांनी मार्गदर्शन केले , गॅस कसा वापरावा यासाठी संदीप वाघ यांनी माहिती दिली , योजनेचा लाभ गावातील जनतेला व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री प्रदीप राजपूत यांनी सर्व कागदपत्र अनुलोम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एजन्सीकडे सोपवली होती , या कार्यक्रमासाठी गावातील महिला व पुरुष उपस्थित होते , साक्री येथील शुभंकर गॅस एजन्सीचे सहकार्य लाभले
Friday, February 08, 2019
बिलावरील मीटरचा फ़ोटो झाला इतिहासजमा
डी.पी.कदम इंग्लिश मिडीयम चे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात
पुसेसावळी(राजु पिसाळ) :
शिक्षणाबरोबर मुलांच्या अंगी असणाऱ्या इतर कलागुणाना वाव दिला तर मुले अभ्यासाबरोबर इतर क्षेत्रातही गरूड झेप घेऊ शकतात. असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सौ सुनिता धैर्यशिल कदम यांनी केले.
डी.पी. कदम प्रायमरी स्कूल इंग्लिश मीडियम यांच्यावतीने वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा व बक्षीस वितरण सोहळा दत्त मंगल कार्यालय पुसेसावळी येथे संपन्न झाला यावेळी सौ कदम बोलत होत्या .
यावेळी श्री. बी.टी. घार्गे सर (ध्येयसिद्धी ॲकॅडमी) पुसेसावळी सरपंच सौ. मंगल ज्ञानदेव पवार, मुख्याध्यापिका एस.बी. घोडके मॅडम,
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक वर्ग आदी उपस्थित होते.
शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बालचमूंनी हिंदी, मराठी गाण्यांवर नृत्य सादर केले. अनमोल असे हे जीवन आनंदाने व उत्साहाने जगण्याचा तसेच शेतकर्यांच्या व्यथा आपल्या गाण्यातून मांडून समाजामध्ये मोलाचा संदेश लहानग्यांनी दिला.लोप पावत चाललेल्या लोकसंस्कृती व लोकगीतांकडे दृष्टिक्षेप टाकत अस्सल मराठमोळी गीतांचा कार्यक्रम यावेळी सादर झाला.भक्तिगीत,ओवी,वासुदेव गीत, गोंधळ, शेतकरी गीत,धनगरी गीत,कोळी गीत,गवळण, वाघ्या मुरुळी, जोगवा आदी गीतांनी परिसर रंगून गेला. विविधरंगी वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी प्रेक्षक वर्गाची मने जिंकली. मराठी संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी यातून घालून दिला.
यावेळी सर्व शिक्षक, विद्यार्थी, यांचेसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वडी हायस्कूलच्या ८ वी च्या विद्यार्थीनीचे शिष्यवृत्ती परिक्षेत यश
उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दंतरोग निदान व वैद्यकीय उपचार
चिमूर/रोहित रामटेके
चिमूर : - दिनांक.०८/०२/२०१९ ला उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर , जिल्हा शल्य चिकीत्सक सामान्य रुग्णालय चंद्रपूर,जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर, वैद्यकीय अधिक्षक उप जिल्हा रुग्णालय चिमूर यांच्या सयुक्त विद्यमानाने उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे ८ फेब्रुवारी ला सकाळी १० वाजता वैद्यकिय व दंतरोग निदान व उपचार , शस्त्रकीया शिबीर या कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले हे शिबिर ३ दिवस नियमित सुरु राहणार आहे. या शिबीरातील वैद्यकिय रोगनिदान व उपचार मध्ये तज्ञ डॉक्टराकडुन रोगनिदान, चाचण्या, उपचार, मार्गदर्शण व समुपदेशन करन्यात येनार असून या शिबिराचे लाभ शेकडो रुग्णांनी घेतले. या संपूर्ण शस्त्रक्रियामध्ये आवश्यकतेनुसार निवडण्यात आलेल्या गरजू रुग्णावर ८ फरवरी ते १० फेब्रुवारी पर्यत उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे तज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करन्यात येईल . रूग्ण व एका नातेवाईकास मोफत आहार देन्यात येईल. दंतरोग निदान व उपचार यामध्ये शासकिय दंत महाविद्यालय नागपूर , शरद पवार दंत महाविधालय मेघे सावनगी येथील दंतरोग तंज्ञाची चमू व वरोरा आनंदवन फिरत्या दंत रुग्णवाहीकेसह हजर राहुन ८ ते १० फरवरी पर्यत १० ते ३ वाजेपर्यत दंतरोग निदान व यावरील उपचार करन्यात येणार असून या शिबिराला राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाचे राष्ट्रिय छात्र सेना यांचा हि यामध्ये सहभाग होता तसेच आठवले समाज कार्यालयाच्या विदयार्थ्यांनीही व विदयार्थिनी यांनीही या शिबिराला सहकार्य केले. या शिबीरामध्ये बालरोग तज्ञ,भिषीक तज्ञ, शस्त्रक्रिया तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, कान - नाक व घसा तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, चर्मरोग तज्ञ, मानसिक रोग तज्ञ, दंत रोग तज्ञ, बधिरी करण तज्ञ, क्ष - किरण तज्ञ, फिजीओ थेरेपी , अक्युप्रेशर थेरेपी आदी विशेष तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध केलेली आहे. चिमूर तालुक्यातील संपूर्ण परिसरातील नागरीकांनी या निशुल्क शिबीराला मोठ्या प्रमाणात उपस्थीत राहुन शिबीरातील तज्ञ डॉक्टराचा लाभ घेतला असे आवाहन केले कि उपजिल्हा रुग्णालय चिमूर चे वैद्यकिय अधिक्षक डॉ.गो.वा.भगत , डॉ.अश्विन अगडे ,वैद्यकीय अधिकारी डॉ.रवि गेडाम व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिगांबर मेश्राम यांनी या शिबिराला प्रामुख्याने हजर राहून योग्य त्या प्रकारे कसे मार्गदर्शन करून योग्य त्या प्रकारे उपचार करता येईल याकडे लक्ष केंद्रित केले या निशुल्क शिबिराची समुर्ण चिमूर तालुक्यात चर्चा रंगली आहे.
खंडस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा संपन्न
नागपूर/अरूण कराळे:
नागपूर पंचायत समिती अंतर्गत जि. प . प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील बालकांच्या क्रीडा व सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्यासाठी खंडस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन खापरी रेल्वे येथे करण्यात आले होते . सभापती नम्रता राऊत यांचे हस्ते क्रीडाध्वजारोहन व उपसभापती सुजित नितनवरे यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून उपस्थित मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पं स . सदस्य रेखा मसराम, दिलीप नंदागवळी, प्रभाकर उईके, गट विकास अधिकारी किरण कोवे, सहाय्यक गविअ तथा गटशिक्षणाधिकारी सुभाष जाधव, शा . व्य . स . अध्यक्ष गजानन टिळक, सरपंच पप्पू ठाकूर, सुरेंद्र बानाईत, दीपक राऊत ,ज्योत्स्ना नितनवरे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान तालुक्यातील शाळांना उत्कृष्ठ सहकार्य करणाऱ्या निवडक ग्राम पंचायत सरपंच/सचिव, दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांच्या प्रमुखांचा शाल श्रीफळ, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत तेरा समूहसाधन केंद्रातील भरीव कामगिरी करणाऱ्या १३ शिक्षकांना शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून मान्यवरांची मने जिंकली . प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी सुभाष जाधव ,संचालन सरिता बाजारे व विलास भोतमांगे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी छाया इंगोले यांनी केले.आयोजनासाठी शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुनघटकर गुलाब उमाठे, छाया इंगोले, रामराव मडावी, केंद्रप्रमुख शरद भांडारकर, प्रेमा दिघोरे, हेमचंद्र भानारकर, राजेंद्र देशमुख, सीमा फेंडर आदींनी केले.