हिंगणघाट : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला बौद्ध धर्म देऊन ६१ वर्ष झालीत. १९५६ च्या आधीची परिस्थिती फारच गंभीर होती. आम्हाला कमी लेखून हिणवल्या जायचे. १४ आक्टोबर १९५६ ला या देशात बाबासाहेबांच्या महान क्रांतीने आम्ही बौद्ध झालोत. बुध्दांचा धम्म मिळाला. संपूर्ण जग बुध्दांच्या मार्गाने पुढे धावत आहे. बाबासाहेबांच्या संकल्पनेतील तिन्ही संघटनांचे ऐक्य लोकशाहीला बळ देणारे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी हिंगणघाट येथील बौद्ध महोत्सवात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलसचिव पुरण मेश्राम होते. व्यासपीठावर आ. नानाभाऊ शामकुळे, आ. समीर कुणावार, जि. प. सदस्य विजय आगलावे, माजी आमदार अनिल गोंडाणे, भुपेश थुलकर, भीमराव बन्सोड, लहुदास खोब्रागडे, प्रभाकर कांबळे, प्रभाकर भगत, राष्ट्रपाल मेश्राम, सुधाकर तायडे, राजन वाघमारे, बाळु घरडे, सागर मानकर, ललित धनविज, प्रकाश कांबळे आदींची उपस्थिती होती.
ना. आठवले पुढे म्हणाले, देशात जाती व्यवस्था मजबुत होईल, अशा भावनेतून जातिनिहाय जनगणना होत नाही. पण, त्याची भीती बाळगणे चुकीचे आहे. जातिनीहाय जनगणना व्हायलाच पाहिजे. दलितांवर होणाºया अत्याचाराला कांग्रेस जबाबदार आहे. कांग्रेसने ७० वर्षाच्या काळात कधीही धर्मांतरीत नवबौध्दांना सवलती देण्याचा प्रयत्न केला नाही. उलट मोदी सरकारने नवबौध्दांना सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या पक्षाची व भाजपाची विचारसरणी ही वेगवेगळी असली तरी आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाच्या आधारावर सत्ता चालवित आहोत. सत्तेत राहुन सामाजिक व आर्थिक समतोल सांभाळण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आ. नानाभाऊ शामकुळे यांनी भगवान गौतम बुद्ध हे पहिले विज्ञानवादी महानायक आहेत. त्यामुळे संपूर्ण जग बुध्दांना वंदन करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आ. समीर कुणावार यांनी हिंगणघाट दिक्षा भुमी स्मारकाला शासन स्तरावरुन निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्न करू. आपण आमदार निधीतून येथे विविध वास्तू तयार करू. दिक्षा भूमी स्मारकाचे बांधकाम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. जि.प. सदस्य विजय आगलावे यांनी रिपब्लिकन जनतेने निळ्या झेंड्याखाली एकत्र येण्याचे आवाहन केले. रिपब्लिकन विचाराने जनतेची विधायक कामे करुन आंबेडकरी चळवळ गतिमान करणे हे महत्त्वाचे आहे. बाबासाहेबांच्या प्रेरणेतुन आपणाला ऊर्जा मिळते. बाबासाहेबांच्या विचाराशी प्रामाणिक राहून आपण विधायक कामे करण्यासाठी जि.प.च्या सभागृहात प्रयत्न करीत असून मरेपर्यंत प्रयत्न सुरू राहील असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक समितीचे समन्वयक धाबर्डे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र मुनेश्वर यांनी केले तर आभार प्रभाकर कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्यने बौद्ध बांधव उपस्थित होते.