সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, October 31, 2013

डॉ. परशुराम खुणे यांना राज्य सरकारचा पुरस्कार

डॉ. परशुराम खुणे यांना राज्य सरकारचा पुरस्कार

 
 राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारा कलावंताचा एक लाख रुपये पुरस्कार झाडीपट्टीचे दादा कोंडके डॉ. परशुराम खुणे यांना जाहीर झाला आहे.
झाडीपट्टीतील दादा कोंडके म्हणून डॉ. परशुराम खुणे प्रसिद्ध आहेत. झाडीपट्टीतील विनोदाचा बादशहा म्हणून ते गाजले. 1975 मध्ये डाकू जीवनावरील "येळकोट मल्हार' या नाटकातील पोलिसाची विनोदी भूमिका करून त्यांनी धमाल उडवून दिली. त्याच काळात दादा कोंडके यांचा पांडू हवालदार हा चित्रपट आला. दादा कोंडके सारखीच हुबेहूब भूमिका डॉ. खुणे करीत असल्याने त्यांना पुढे झाडीपट्टीतील दादा कोंडके म्हणूनच ओळखले जाऊ लागले.
कुरखेडा तालुक्‍यातील एका खेड्यात जन्मलेल्या या कलावंताने श्रीकृष्ण प्राथमिक नाट्य मंडळाची स्थापना करून महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज कलाकारांना आमंत्रित केले. वयाच्या 12 व्या वर्षांपासून डॉ. खुणे झाडीपट्टी रंगभूमीवर कार्यरत आहेत. आजवर त्यांनी सहा हजारांवर नाट्यप्रयोगात आपली कला प्रदर्शित केली आहे. उमाजी नाईक, सिंहाचा छावा, स्वर्गावर स्वारी, तंट्या भिल्ल, मरीमाईचा भूत्या, सासू वरचढ जावई, बायको तुझी नजर माझी, संत तुकाराम आदी शेकडो नाटकात डॉक्‍टरांनी आपल्या विनोदी अभिनयाने रसिकांना पोट धरून हसविले आहे.
अभिनयाची पावती म्हणून नागपुरात स्मिता स्मृती पुरस्काराने 1997 मध्ये त्यांना गौरविण्यात आले. चंद्रपूर येथे 1996 व 1999 मध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. खुणे हे केवळ कलावंतच नाही, तर एक प्रगतिशील शेतकरीसुद्धा आहेत. 1991 मध्ये त्यांचा उत्कृष्ट शेतकरी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने गौरव करण्यात आला. ते गुरनोली गावाचे सरपंच व तालुका सरपंच संघटनचे अध्यक्षपदीसुद्धा विराजमान होते. चित्रकार धनंजय नाकाडे यांना ते गुरू मानतात. डॉ. सुधाकर जोशी, प्रभाकर आंबोने, मधू जोशी, वडपल्लीवार गुरुजी, माजी न्यायमूर्ती ज्ञानदेव परशुरामकर, वत्सला पोडकमवार, मीना देशपांडे, रागिणी बिडकर, शबाना खान हे त्याचे आवडते सहकारी कलावंत, ईस्माईल शेख, शेखर डोंगरे, कमलाकर बोरकर आदी मंडळीचे विशेष सहकार्य त्यांना मिळाले. डॉ. खुणे १५ वर्षे गुरनुलीचे सरपंच व ५ वर्षे उपसरपंच होते. १० वर्षांपासून झाडीपट्टी कला मंचचे ते अध्यक्ष असून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यही करीत आहेत.
त्यांना १९९१ ला महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार, १९९२ ला जादूगार सुनील भवसार स्मृती पुरस्कार, १९९५ ला श्यामराव बापू प्रतिष्ठानच्या कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. खुणे यांच्या सिंहाचा छावा, स्वर्गावर स्वारी, लग्नाची बेडी, एकच प्याला, मरीमायचा भुत्या, लावणी भुलली अभंगाला, मी बायको तुझ्या नवऱ्याची, एक नार तीन बेजार, बायको का मातून गेली? नाथ हा माझा, इत्यादी नाटकातील भूमिका अत्यंत गाजल्या.  नाटय़क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांना 'गडचिरोली गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले 
 हत्येच्या आरोपात 3 मित्रांना अटक

हत्येच्या आरोपात 3 मित्रांना अटक

चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर पोलिसांनी देविदास कीर्तने या ४० वर्षीय इसमाच्या हत्येच्या आरोपात त्याच्या ३ मित्रांना अटक केली आहे. वरवट गावात राहणा-या देविदास कीर्तनेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत २० ऑक्टोबर रोजी गावाजवळील एका विहिरीत आढळून आला होता मात्र देविदासचा खून ही फक्त एक हत्या नसून त्याचा नरबळी देण्यात आल्याचा त्याच्या घरच्यांना दाट संशय आहे. 

Wednesday, October 30, 2013

पाथरीच्या ठाणेदाराविरुद्ध आज मोर्चा

पाथरीच्या ठाणेदाराविरुद्ध आज मोर्चा

 गोंडवाना क्रांती संघर्ष संघटना  

सावली - आदिवासींचे दैवत राजा रावण यांची विटंबना करून शिक्षकाविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी पाथरीचे ठाणेदार घुगल यांच्याविरुद्ध गोंडवाना क्रांती संघर्ष संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. ३१) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे.

दसरा उत्सव हा आदिवासी समाजबांधवांचा मोठा उत्सव असून, या दिवशी मोठ्या प्रमाणात राजा रावण यांची पूजा अर्चना करण्यात येते. यानिमित्त संभाजी कुमरे, महानंदा टेकाम, मारोती उईके यांनी काही पत्रके कार्यक्रमास्थळी वाटप केली. सम्राट राजा रावण त्यांच्याबद्दल समाजात जागृती व्हावी, हा त्यामागील उद्देश होता. कार्यक्रम शांततेत पार पडल्यानंतर पाथरी येथील ठाणेदार घुग्घुस यांनी सामदा येथील शाळेचे शिक्षक पी. डी. कुमरे यांना त्यांच्या शाळेत जाऊन धमकावले आणि पोलिस ठाण्यात तातडीने हजर होण्याची सूचना केली. रावणाची पूजा केल्याप्रकरणी ठाणेदारांनी जातिवाचक शिवीगाळ केली.
 आदिवासी समाजाकडून भगवान रावणाची पूजा दस-याच्या दिवशी केली जाते. यंदा सावली तालुक्यात सम्राट रावण यांच्याबद्दल जनजागृती करणारी पत्रके वाटण्यात आली. याप्रकरणी सामदा येथील शाळेचे शिक्षक पी. डी. कुमरे यांना अटक करण्यात आली.


या प्रकारामुळे आदिवासीबांधवांची मने दुखावली आहेत. त्यामुळे ठाणेदारांवर अ‍ॅक्ट्रासिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मानिक सोयाम, धीरज शेडमाके, मनोज आत्राम, मधू मेश्राम, बंडू मडावी, जोतिराव गावळे, मुक्तेश्वर मसराम, अशोक कुळमेथे, पुरुषोत्तम कुमरे यांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले. मात्र, अनुसूचित जमातीविरोधी असलेल्या पाथरी येथील ठाणेदार घुघुल यांनी कार्यक्रमावर आक्षेप घेऊन आदिवासींच्या भावना दुखावल्या. याप्रकारामुळे आदिवासी समाज अपमानीत झाला असून, त्यांच्यावर अ‍ॅक्ट्रासिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा जागतिक गोंड सगा मांदी संघटनेने दिला आहे.

Tuesday, October 29, 2013

477 समित्या करणार वनाचे संरक्षण

477 समित्या करणार वनाचे संरक्षण

संरक्षणासाठी 80 हजार हेक्टर वनक्षेत्र वनसंरक्षण समितीला

चंद्रपूर दि.29- चंद्रपूर, ब्रम्हपूरी व मध्यचांदा वनविभाग अंतर्गत येणारे 80 हजार 296 हेक्टर वनक्षेत्र 477 वनसंरक्षण समित्यांना वनसंरक्षणासाठी हस्तांतरीत करण्यात आले असून या वनातून निघणा-या वनौपजाची विक्री झाल्यानंतर उत्पन्नाच्या 20 टक्के वाटा या समित्यांना मिळणार आहे.

शासनाने 1995-96 पासून संयुक्त वनव्यवस्थापना योजना राज्यात सुरु केली असून चंद्रपूर वनवृत्तातील चंद्रपूर, ब्रम्हपूरी व मध्यचांदा या तीनही वनविभागात ही योजना प्रभावीपणे राबविली गेल्यामुळे वनाचे उत्कृष्ट संवर्धन झाले आहे. वन संवर्धनात उत्सुक असणा-या गावांमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समिती तयार करण्यात येते. या समितीमार्फत वनाचे संवर्धन करण्यात येते व वनौपजातून मिळणा-या उत्पन्नाचा 20 टक्के उत्पन्न सदर समितीला देण्यात येते.

चंद्रपूर वनविभागात 142 वनसंरक्षण समित्या असून त्यांना 18 हजार 389 हेक्टर वनक्षेत्र, ब्रम्हपूरी वनविभागात 193 समित्यांना 48 हजार 977 हेक्टर वनक्षेत्र व मध्य चांदा विभागातील 142 वनसमित्यांना 12 हजार 939 हेक्टर असे 477 समित्यांना एकूण 80 हजार 296 हेक्टर वनक्षेत्र संरक्षणासाठी वाटप करण्यात आले आहे. यासाठीचा एक प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यास शासनाने मंजूरी प्रदान केली आहे.

संयुक्त वनव्यवस्थापन समित्या आपल्या गावालगतच्या वनाचे संरक्षण करतात. त्यामुळे वनविभगाला गावक-यांचा खूपमोठा हाताभार लागतो. यासोबतच वनविभाग घरघुती गॅस, बायोगॅस, सोलर फेन्सिंग व रोपवने यासारख्या उत्पन्न वाढविणा-या योजना या गावाक-यांसाठी राबवित आहे.

संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे कार्य चांगले आहे व त्याचा वनसंवर्धनासाठी खूप फायदा होत आहे. त्या मोबदल्यास गावक-यांना वनौपजाच्या उत्पन्नाच्या 20 टक्के वाटा वनसमित्यांना देण्यात येतो. त्यामुळे त्यांचेही उत्पन्नात भर पडते असे मुख्य वन संरक्षक संजय ठाकरे यांनी सांगितले. यासोबत गावाच्या विकासासाठी वनविभाग विविध योजना राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.

Sunday, October 27, 2013

मोदीच्या सभेपूर्वी  बॉम्बस्फोट

मोदीच्या सभेपूर्वी बॉम्बस्फोट

पाटण्यात सात साखळी स्फोट, 5 ठार, 50 जखमी

नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी रविवारी पाटणा बॉम्ब स्फोटांच्या मालिकेने हादरले. पाटण्यात एकूण आठ स्फोट झाले दोन बॉम्ब निकामी करण्यात आले. 
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी रविवारी पाटणा शहर बॉम्बस्फोटांच्या मालिकेने हादरले.गांधी मैदान परिसरात सहा आणि पाटणा रेल्वे स्टेशनजवळ दोन बॉम्बस्फोट झाले. दोन बॉम्ब निकामी करण्यात आले आहेत. हे सर्व स्फोट कमी तीव्रतेचे होते. या स्फोट मालिकेत ५ मृत्यू असून, ५० जण जखमी झाले आहेत.
सभेपूर्वी गोंधळ निर्माण करण्यासाठी आणि लोकांमध्ये घबराट पसरवण्यासाठी हे स्फोट घडवून आणल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
या स्फोटामागे स्थानिक गुन्हेगारी टोळया असाव्यात असा अंदाज गुप्तचर खात्याने वर्तवला आहे.  पाटणा रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर दहावर रविवारी सकाळी पहिला स्फोट झाला त्यानंतर एलफिन्स्टन चित्रपटगृहाजवळ दुसरा स्फोट झाला.
नरेंद्र मोदींच्या सभास्थळापासून १५० मीटर अंतरावर दुसरा स्फोट झाला. बि्हारचे पोलिस प्रमुख अभयानंद यांनी दुसरा स्फोट झाल्याची पुष्टी केली. पहिला गावठी बॉम्बचा स्फोट होता मात्र दुसरा स्फोट गावठी बॉम्बचा नसल्याचे त्यांनी सांगितले. दुसरा स्फोट झाडाखाली झाला.
उन्हाच्या झळा लागू नयेत, यासाठी काही लोक येथे विश्रांती घेत होते त्यावेळी हा स्फोट झाला. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दोन गावठी बॉम्बपैकी एकाचा स्फोट झाला दुसरा बॉम्ब निकामी करण्यात आला.   
पाटणा रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर दहावर रविवारी सकाळी एका गावठी बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटात एक जण जखमी झाला आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या काहीतास आधी हा बॉम्बस्फोट झाल्याने उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

प्लॅटफॉर्मवर फारशी वर्दळ नसलेल्या ठिकाणी हा स्फोट झाल्याने मोठी जिवतहानी टळली असे एसएसपी मनू महाराज यांनी सांगितले. बिहारची राजधानी पाटण्यामध्ये रविवारी नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. या सभेला गर्दी जमवण्यासाठी भाजपने मोठया प्रमाणावर व्यवस्था केली आहे. या सभेसाठी लोकांना रेल्वेने आणले जात आहे. प्लॅटफॉर्मवरील शौचालयात स्फोट झाल्याचे आरपीएफच्या सूत्रांनी सांगितले.

Saturday, October 26, 2013

डॉ. विकास आमटे - वाढदिवसानिमित्य विशेष लेख

डॉ. विकास आमटे - वाढदिवसानिमित्य विशेष लेख


      २७ आक्टोबर                              

१९७० मध्ये बाबा आमटे सोमनाथला गेले. तेव्हापासून डॉ.विकास आमटे यांनी साधनाताई आणि बाबा आमटे यांनी फुलवलेले आनंदवन त्याच सामाजिक हेतूने सांभाळत असून, त्यांनी अनेक हितकारक बदल घडवून आणले. बायोगॅस संयंत्रांपासून निर्धूर चुलींपर्यंत आणि मत्स्यशेतीपासून युवाग्राम केंदापर्यंत आनंदवनाची व्याप्ती वाढवण्यात विकास आमटे यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. अंध-अपंग, मुकबधीर यांचा मेळ घालून साकारलेला स्वरानंदन जगभर प्रसिध्द आहे. 

आनंदवनातील अर्धगोलाकार छतांच्या भुकंपरोधक घरांचे प्रात्यक्षिक त्यांनी किल्लारीतील भूकंपग्रस्त भागात दाखवले. 'युवाग्राम' प्रशिक्षण केंदाच्या माध्यमातून तरुणांसाठी रोजगारसंधी निर्माण करण्यात विकास आमटे यांची भूमिका महत्त्वाची होती. यवतमाळ जिल्ह्याच्या झरी-जामणी तालुक्यातील मुळगव्हाण गावी डॉ.विकास यांनी विशेष सामाजिक कृती व पर्यावरण संवर्धन केंद सुरू केले. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण घटलेच, पण परिसरातील ४००हून अधिक शेतकरी कुटुंबांनी शेतीत आमूलाग्र बदल घडवले.

भूमीतील श्रमसिद्धांताचा परीघ यवतमाळ जिल्ह्यातील झरीझामणीपर्यंत नेऊन ठेवला. कुष्ठरुग्णांपासून सुरू झालेल्या चळवळीसाठी राबणारे हात आता आत्महत्याग्रस्त भागात दिलासा देण्यासाठी झटत आहेत. 


आनंदवनाच्या वाढत्या गरजा ओळखून विकासभाऊंनी बदल केले. सांडपाण्याच्या निचरा यंत्रणेचा अभ्यास करून त्याधारे स्वच्छतागृहांची उभारणी, त्यावर बायोगॅस संयंत्रे उभारून ऊर्जानिमिर्ती, बेंगळुरूतील तज्ज्ञांच्या मदतीने निर्धूर चुलींची बांधणी, फुटलेल्या कपबश्यांचे तुकडे वापरून उभारलेले कठडे, श्रमदानातून तयार केलेले साठवण तलाव, टाकाऊ प्लास्टिक व टायरपासून उभारलेले बंधारे अशी विकास आमटेंचे व्यवस्थापन कौशल्य आणि कार्यकुशलत यांची उदाहरणे आज आनंदवनात ठिकठिकाणी पहायला मिळतात.

आनंदवनातील कुष्ठरोगी व अपंगांसाठी त्यांनी रोजगाराची साधनेही उपलब्ध करून दिली. कोलकात्यातून माशांची पिले आणून सुरू केलेली मत्स्यशेती, चाराशेतीसाठी झाशीतील संस्थेकडून उच्च प्रथिनयुक्त गवतांच्या जातींची लागवड आदी उपक्रम सुरू केले. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यामुळेच आनंदवनातील कुटिरोद्योगातून निर्माण होणाऱ्या उत्पादनांची संख्या आज सव्वाशेवर पोहोचली आहे.
                                                                    (माहिती संकलन * देवनाथ गंडाटे ९९२२१२०५९९)
        पुरस्कार                                                                      
Shri Vikas Amte receiving honorary doctorate degree on behalf of his father Shri Baba Amte
from the Prime Minister, Dr. Manmohan Singh at Tata Institute for Social Science (TISS), Mumbai on ay 6, 2006.

२०१२                लोकमान्य टिळक पुरस्कार-  

२०१३               क्रांतीसिंह नाना पाटील पुरस्कार 

सप्टें २००९ -      ज्ञानेश्वर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दिला जाणारा दिवंगत मारुतराव घुले पुरस्कार
जानेवारी २०१२  चंद्रपूर भूषण पुरस्कार  

बालपण 



डा. भारती आमटे सोबत 

आयबी एन लोकमत च्या दिवाळी विशेष कार्यक्रमात   

झी २४ तास च्या दिवाळी विशेष कार्यक्रमात   
कॅप्शन जोडा

आनंदवनातील एक क्षण 

 

 

Friday, October 25, 2013

Village school teacher remains absent, hires boy for teaching

Village school teacher remains absent, hires boy for teaching

Gadchiroli- A teacher of a government school at a village in Gadchiroli, in which three police jawans were killed during a landmine blast triggered by Naxals last week, has allegedly hired a 10th standard pass boy for teaching even as the former remains absent from his duty.

The matter came to light on Thursday during a visit to the Motha Zalia village under Korchi taluka of the district when the villagers alleged that a 10th class pass boy had been hired by a regular school teacher to teach the 18 odd students studying in the zila parishad primary school.

Sources said the teacher appointed at the school rarely turned up, except for signing the attendance record while he had hired a village boy to render services.

To add to the woes of the students, no classes were being held since the blast on October 16 damaged the school premises and no alternative arrangements have been made so far, village's ex-sarpanch Tanu Hurra said.
Even some children studying at the school admitted that they have not been going to the school as it has been shut since October 17.
When contacted, education officer R S Uke said the block education officer has been asked to make alternative arrangements of the school.

Asked about a boy being hired by the school teacher for teaching when he himself remains absent, Uke said they would inquire the matter.
A villager, Ramsingh, claimed that no official has so far turned up to to see the precarious condition of the school.
------------------------------
गडचिरोली- येथील एका खेड्यात नुकत्याच झालेल्या नक्षलवादी हल्ल्यामुळे सरकारी शाळेच्या एका शिक्षकाने एका दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलाला वर्गात शिकविण्याचे काम दिले असून, संबंधित शिक्षक स्वतः कामावर गैरहजर असतो. 
नक्षलवाद्यांनी मागील आठवड्यात येथे सुरुंगाद्वारे घडवून आणलेल्या स्फोटात तीन पोलिस मृत्युमुखी पडले होते. कोरची तालुक्यातील मोथा झालिया या खेड्यातील शाळेत घडणारा हा प्रकार समोर आला आहे. 
येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील अठरा विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी नेहमीच्या शिक्षकाने दहावी उत्तीर्ण असलेल्या मुलाला कामावर ठेवले असल्याचा आरोप गावकऱ्यांनी गुरुवारी केला. 
संबंधित शिक्षक केवळ हजेरी नोंदविण्याकरीता स्वाक्षरी करण्यासाठी येतो. शिकविण्यासाठी मात्र त्यांनी एका मुलाची नेमले आहे. येथे १६ ऑक्टोबर रोजी शाळेच्या आवारात स्फोट झाल्याने शाळेचे नुकसान झाले आहे. तेव्हापासून येथे वर्गात शिकवलेच जात नाही. 
तसेच, पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली नाही असे माजी सरपंच तनू हुर्रा यांनी सांगितले. शाळेत वर्गच भरत नसल्याने १७ ऑक्टोबरपासून आम्ही शाळेत जात नसल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. 

Thursday, October 24, 2013

साडेतीन हजार रुपयांची लाच घेताना अटक

साडेतीन हजार रुपयांची लाच घेताना अटक

वरोरा येथील उपविभागीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक शीतल रत्नपारखी यांना साडेतीन हजार रुपयांची लाच घेताना अटक..... भूखंडाचे गुंठेवारी करण्यासाठी ज्ञानेश्वर झिले यांच्याकडून घेतली लाच......

Wednesday, October 23, 2013

पाथरीच्या ठाणेदाराविरुद्ध गुरुवारी मोर्चा

पाथरीच्या ठाणेदाराविरुद्ध गुरुवारी मोर्चा


पाथरीच्या ठाणेदाराविरुद्ध गुरुवारी मोर्चा
निलंबनाची ‘ागणी : गोंडवाना क्रांती संघर्ष संघटना

सावली - आदिवासींचे दैवत राजा रावण यांची विटंबना करून शिक्षकाविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी पाथरीचे ठाणेदार घुगल यांच्याविरुद्ध गोंडवाना क्रांती संघर्ष संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. ३१) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे.

दसरा उत्सव हा आदिवासी समाजबांधवांचा मोठा उत्सव असून, या दिवशी मोठ्या प्रमाणात राजा रावण यांची पूजा अर्चना करण्यात येते. यानिमित्त संभाजी कुमरे, महानंदा टेकाम, मारोती उईके यांनी काही पत्रके कार्यक्रमास्थळी वाटप केली. सम्राट राजा रावण त्यांच्याबद्दल समाजात जागृती व्हावी, हा त्यामागील उद्देश होता. कार्यक्रम शांततेत पार पडल्यानंतर पाथरी येथील ठाणेदार घुग्घुस यांनी सामदा येथील शाळेचे शिक्षक पी. डी. कुमरे यांना त्यांच्या शाळेत जाऊन धमकावले आणि पोलिस ठाण्यात तातडीने हजर होण्याची सूचना केली. रावणाची पूजा केल्याप्रकरणी ठाणेदारांनी जातिवाचक शिवीगाळ केली.
 आदिवासी समाजाकडून भगवान रावणाची पूजा दस-याच्या दिवशी केली जाते. यंदा सावली तालुक्यात सम्राट रावण यांच्याबद्दल जनजागृती करणारी पत्रके वाटण्यात आली. याप्रकरणी सामदा येथील शाळेचे शिक्षक पी. डी. कुमरे यांना अटक करण्यात आली.
या प्रकारामुळे आदिवासीबांधवांची मने दुखावली आहेत. त्यामुळे ठाणेदारांवर अ‍ॅक्ट्रासिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मानिक सोयाम, धीरज शेडमाके, मनोज आत्राम, मधू मेश्राम, बंडू मडावी, जोतिराव गावळे, मुक्तेश्वर मसराम, अशोक कुळमेथे, पुरुषोत्तम कुमरे यांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले. मात्र, अनुसूचित जमातीविरोधी असलेल्या पाथरी येथील ठाणेदार घुघुल यांनी कार्यक्रमावर आक्षेप घेऊन आदिवासींच्या भावना दुखावल्या. याप्रकारामुळे आदिवासी समाज अपमानीत झाला असून, त्यांच्यावर अ‍ॅक्ट्रासिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा जागतिक गोंड सगा मांदी संघटनेने दिला आहे.

रेतीचे अवैध उत्खनन करणारे वाहन जप्त

रेतीचे अवैध उत्खनन करणारे वाहन जप्त

वाहन मालकांवर गुन्हे दाखल करा

चंद्रपूर दि.23- सन 2012-13 मध्ये जिल्हयातील लिलाव झालेल्या रेतीघाटचा कालावधी 30 सप्टेंबर 2013 रोजी संपुष्ठात आलेला असून नवीन रेतीघाट लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनास एक ते दिड महिण्याचा कालावधी लागणार आहे. या कालावधी दरम्यान रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुकीचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे रेतीघाटामध्ये तसेच लिलाव न झालेल्या नदी, नाल्याच्या पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूकीवर आळा घालण्याकरीता जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रपूर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसिलदार यांनी प्रत्येक तालुक्यात संबंधीत पोलीस स्टेशन अंतर्गत पथक तयार करण्यात येवून रेतीचे अवैध वाहतुक करीत असलेले ट्रक/ट्रक्टर जप्त करुन संबंधित वाहनाच्या मालकावर गुन्हा दाखल करावा. तसेच रेती घाटावर जाणा-या मार्गात खोदून अडथळा निर्माण करुन रेतीचे अवैध वाहतुक करणा-या ट्रक/ट्रक्टरची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर यांना दयावी आणि त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दयावे असे जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर यांनी संबंधित यंत्रणेला सुचना दिलेल्या आहेत. 
आईंचवार यांनी केली हाथाबुक्यांनी मारहाण

आईंचवार यांनी केली हाथाबुक्यांनी मारहाण

गोंडपिंपरी - येथील ओम चैतन्य रूग्णालयाचे डा. आईंचवार यांनी आज मुलाची प्रकृती दाखविण्यास आलेल्या बापाला हाथाबुक्यांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याच्या पत्नीलाही मारण्याचा प्रयत्न केला.
आपल्या चेंबरमध्ये दिलेली औषधीही फोडली. डाक्टरांचे बदलते रूप दाखविणारी हि खळबळजनक घटना आज अकरा वाजताच्या सुमारास घडली.अन्यायग्रस्त पित्याने याप्रकरणी गोंडपिंपरी पोलीसांत तक्रार दाखल केली असून डाक्टरी पेशाला  कलंकित करू पहाणा-यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

जिल्हा सामान्य रूग्णालय पाहणी

जिल्हा सामान्य रूग्णालय पाहणी

जिल्हा सामान्य रूग्णालय येथे आरोग्य सेवा संचालक डॉ. पवार यांनी पाहणी केली.
यावेळी आमदार सुधीर मूनगण्तीवार यांनी समस्याचा पाढा वाचला.  सकाळ ने मांडलेल्या रुग्णवाहिका लुटीवर इको-प्रो च्या प्रज्ञा सराफ यांनी निवेदन दिले. मल्हार सेनेचे संजय कन्नावार यांनि विविध समश्याचे निवेदन दिले.   
बांधकाम सभापतीच्या शासकीय बंगल्यावर धाड

बांधकाम सभापतीच्या शासकीय बंगल्यावर धाड

युवाशक्तीचे नेते, बांधकाम सभापती गुणवंत कारेकर यांच्या शासकीय बंगल्यावर पोलिसांनी धाड टाकून सहा जणांना अटक केली.   हे सर्व जुगार खेळत होते. 
चंद्रपुर में बनेगा वाइल्ड लाइफ ट्रीटमेंट सेंटर

चंद्रपुर में बनेगा वाइल्ड लाइफ ट्रीटमेंट सेंटर

चंद्रपुर। वन्य प्राणियों से गुलजार चंद्रपुर जिले में जल्द ही 'वाइल्ड लाइफ ट्रीटमेंट सेंटर' साकार किया जाएगा. इसके लिए वन विभाग के साथ ही राज्य सरकार ने भी मंजूरी दे दी है. महाराष्ट्र में अपनी तरह का यह पहला वाइल्ड लाइफ ट्रीटमेंट सेंटर होने की जानकारी चंद्रपुर के मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे ने दी. इस केंद्र के साकार होने से चंद्रपुर में वन्यप्राणियों के इलाज की सुविधा के साथ ही लोगों के लिए परेशानी पैदा करने वाले तेंदुओं को एक जगह रखने में सहायता मिलेगी.
यह वाइल्ड लाइफ ट्रीटमेंट सेंटर एमईएल के सामने स्थित वन विभाग की करीब 100 एकड. जमीन पर साकार होगा. इस योजना को पूर्ण करने के लिए करीब 1 करोड. रुपए की लागत आएगी. इसके मद्देनजर यह परियोजना कई चरणों में पूरी की जाएगी. मुख्य वनसंरक्षक ठाकरे ने बताया कि इस परियोजना के लिए 65 लाख रुपए की पहली किश्त को मंजूरी मिल गईहै, जबकि पहली किश्त में से 47 लाख रुपए वन विभाग को मिल गए है.ं उन्होंने यह भी बताया कि इस संबंध में जल्द ही निविदा प्रक्रिया पूर्ण कर कार्यशुरू किया जा सकेगा. उन्होंने बताया कि इस केंद्र के साकार होने से वन्यप्राणियों के इलाज की सुविधा उपलब्ध हो जाएगी. इलाज के लिए उन्हें नागपुर या अन्य स्थानों पर स्थानांतरित करने की आवश्यकता नहीं होगी. उनका उपचार भी तात्कालिक रूप से किया जा सकेगा.
उल्लेखनीय है कि वन्यप्राणियों से समृद्ध चंद्रपुर जिले में अक्सर वन्यप्राणियों के आपसी भिड.ंत में जख्मी होने या फिर सड.क दुर्घटना में जख्मी होने की घटना सामने आती है. इस दौरान समुचित उपचार की सुविधा उपलब्ध नहीं होने के कारण उन्हें नागपुर स्थानांतरित करना पड.ता है., जिससे रास्ते में कई बार वन्यप्राणियों को अपनी जान भी गंवानी पड.ती है. यह केंद्र साकार होने के बाद वन्यप्राणियों की जान बचाने में भी मदद हो सकेगी.
जिल्हा सामान्य रुग्णालयाचा पाहणी दौरा

जिल्हा सामान्य रुग्णालयाचा पाहणी दौरा

आरोग्य सेवा संचालक डॉ. पवार पाहणी करणार 
जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर यांचा दु. १२ ते २ पर्यंत
नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

उच्च न्यायालयाची मूल पोलिसांना नोटिस

उच्च न्यायालयाची मूल पोलिसांना नोटिस


मूल- र्शमिक एल्गारच्या कार्यकर्त्यांवर अकारण कारवाई करून मानवी हक्काचे उल्लंघन केल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने मंगळवार(२२ ऑक्टोबर)ला दाखल करून घेतली. न्यायालयाने पोलिसांना नोटिस बजावून चार आठवड्याच्या आत उत्तर मागितले आहे. याचिकाकर्ते दिनेश विठ्ठलराव घाटे व अमोल रामदास राऊत यांची याचिका दाखल करून घेत नोटिस बजावली आहे.
सदर याचिकेमध्ये पोलिसांनी र्शमिक एल्गारच्या संस्थापिका अँड. पारोमिता गोस्वामी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना सर्च वॉरंट नसतांना जबरीने घराची झडती घेणे, आवश्यकता नसताना कार्यकर्त्यांना आरोपी बनवून हातकडी लावणे, त्यानंतर कार्यकर्त्यांचा अपमान करण्यासाठी त्यांना त्याच अवस्थेत पोलिस स्टेशनपासून कोर्टापर्यंत पायी नेऊन बदनामी करणे, परिस्थिती हाताळतांना प्रशासनाकडून झालेल्या चुका, लाठीमार करताना कायद्याची प्रक्रिया न करणे, घटनेत सहभागी नसणार्‍यावरही कारवाई करणे यासारख्या गंभीर बाबी न्यायालयासमोर मांडण्यात आल्या. या याचिकेमध्ये ठाणेदार यांच्यासह राज्याचे प्रधान गृह सचिव, उपविभागीय पोलिस अधिकारी मूल, उपविभागीय दंडाधिकारी व तहसीलदार यांना प्रतिवादी करण्यात आले.
याचिकेत ९ ऑक्टोबर २0१३ रोजी दुपारी १२ वाजता मूल-नागपूर मार्गावर दारूच्या दुकानासमोर भादूर्णी येथील शंकर मेर्शाम या इसमाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिस उशिरा पोहचल्याने नागरिक खवळले. जमाव पोलिसांना अनियंत्रित झाल्याने दंगल नियंत्रण पथकाल पाचारण करण्यात आले. तत्पूर्वी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेनंतर तब्बल तीन तासांनी तहसीलदार सोनवणे घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी जमावावर लाठीहल्ला केला. तसेच १५ जणांवर गुन्हे दाखल केले. त्यावेळी पोलिसांनी पहाटे चार वाजता र्शमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार यांच्या घराची बिनापरवानगी झडती घेतली. व त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. तसेच पत्रकारांजवळ सिद्धावार फरार असल्याची खोटी माहिती दिली. या सर्व बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. एवढेच नव्हे तर, दिनेश राऊत व अमित घाटे या युवकांना बयान घ्यायचे आहे असे सांगून पोलिस स्टेशनला नेले व त्यांना सराईत गुन्हेगारासारखी वागणूक देण्यात आली.
त्यांना हतकड्या घालून आठ कि.मी. पर्यंत पायी नेऊन कोर्टाच्या आदेशाचा भंग केला. या सर्व प्रकारामुळे न्यायालयाने या घटनेची न्यायिक तपासणी करून दोषी पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. सदर नोटिस न्यायमूर्ती बी.आर.गवई व न्यायमूर्ती जे.ए.हक यांच्या खंडपीठाने बजावला असून याचिकाकर्त्यांच्या वतीने अँड. हरीश गढिया, अँड. अश्‍विनी तंगडपल्लीवार तर सरकारच्या वतीने अँड. घोडेस्वार यांनी काम पाहिले. 
उमेश बोढेकर यांच्यासह सात मनसे कार्यकर्त्यांना अटक

उमेश बोढेकर यांच्यासह सात मनसे कार्यकर्त्यांना अटक

चंद्रपूर- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजय मराठे यांनी काल सोमवार (२१ ऑक्टोबर)ला मनसे कामगार नेते उमेश बोढेकर यांनी मारहाण केल्याचा आरोप करीत पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली.  पोलिसांनी मनसेचे कामगार नेते उमेश बोढेकर यांच्यासह सात मनसे कार्यकर्त्यांना अटक केली.
मागील काही दिवसापासून मनसेच्या कार्यकर्त्यांत पदाच्या वाटपाला घेऊन वाद चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसापूर्वी अशाच एका पदाचे वितरण झाले असता मनसे कार्यकर्त्यांत चांगलीच जुंपली. या प्रकरणाची शाई वाळायची असतानाच आणखी एक वाद चव्हाट्यावर आला आहे. काल सोमवारला दुपारच्या सुमारास मनसे जिल्हाध्यक्ष विजय मराठे यांनी एका बैठकीचे आयोजन शासकीय विर्शामगृहात केले होते. ही बैठक आटोपून परतत असताना मनसेचे कामगार नेते उमेश बोढेकर यांनी मराठेवर आपल्या साथीदारांसह हल्ला चढविला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेल्याने बोढेकरांनी पळ काढला. या विषयाची गंभीर दखल घेत मनसे महिला जिल्हाध्यक्ष अमृता सूर यांनी आता विजय मराठे यांच्यावर आपली तोफ डागली आहे. सूर म्हणाल्या, वरोरा-भद्रावती क्षेत्रात काँग्रेसचे प्राबल्य असताना माझे पती प्रवीण सूर यांनी मनसेचा पाया या क्षेत्रात मजबूत केला. त्यांच्याच मार्गदर्शनात बोढेकर काम करीत होते. बोढेकर यांच्या प्रयत्नाने अनेकांना न्याय मिळाला. पक्षाचे काम सुरळीत सुरू असतानाच मराठेंनी बोलाविलेल्या बैठकीत कोणत्याही मनसेच्या जबाबदार पदाधिकार्‍यांना बोलविण्यात आले नव्हते. सोबतच त्यांनी ज्या व्यक्तीने या जिल्हय़ात मनसेचा पाया रोवला त्यांच्याबाबत अपमानजनक उद्गार काढले. या संदर्भात जाब विचारण्यासाठी बोढेकर आणि मराठे यांच्यात बाचाबाची झाली. परंतु, मराठेंनी प्राणघातक हल्ला झाल्याचे सांगून मनसेच्या कार्यकर्त्यांचीच नव्हे तर पोलिसांचीही दिशाभूल केली आहे. मराठे औद्योगिक क्षेत्रातून अवैध वसूली करीत असतात, असा गंभीर आरोप सूर त्यांनी पत्रपरिषदेत केला. मराठेंचे हे नाट्य बोढेकरांना बदनाम करण्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

Tuesday, October 22, 2013

ताडोबा-अंधारी सीमेवर संशयिताला अटक

ताडोबा-अंधारी सीमेवर संशयिताला अटक

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेल्या संरक्षित वनात संशयितरीत्या फिरत असलेल्या मध्य प्रदेशातील एका इसमाला वन विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्याला न्यायालयाने २२ ऑक्टोबरपर्यंत वन कोठडीत ठेवण्याचे आदेशदिले आहेत.
मंगलप्रसाद पटेल असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून तो मध्य प्रदेशातील कोहरा (जि.कटनी) येथील रहिवासी आहे. घोसरी संरक्षित वनात तो संशयितरित्या फिरत असल्याचे एका वनरक्षकाला दिसले. त्याने लगेच याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती दिली.
त्यानंतर वन अधिकार्‍यांनी तेथे जाऊन त्याला अटक केली. त्याची विचारपूस केली जात असून तो नेमका या परिसरात कशासाठी फिरत होता, याचा अद्याप सुगावा लागलेला नाही. अद्याप कुठलीही माहिती उजेडात आली नाही. मात्र विविध शंका उपस्थित होत आहेत.यासंदर्भात ताडोबा कोअरझोनचे उपवनसंरक्षक सुजय डोडल यांना विचारणा केली असता, अटक करण्यात आलेल्या आरोपीची विचारपूस केली जात असून त्याच्याजवळ कोणतेही शस्त्र आढळले नसल्याचे ते म्हणाले.
ब्रह्मपुरीच्या नगराध्यक्षपदी संदीप आमले

ब्रह्मपुरीच्या नगराध्यक्षपदी संदीप आमले

ब्रह्मपुरी : नगरपालिकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली. यात नगराध्यक्षपदी लोकमंच विकास आघाडीचे संदीप आमले तर उपाध्यक्ष पदी आघाडीचेच सतिश हुमने यांची अविरोध निवड झाली.
मागील एक वर्षापासून ब्रह्मपुरी नगरपालिकेला ग्रहण लागले होते. प्रथम नऊ नगरसेवक पक्षांतर बंदी कायद्यान्वये अपात्र झाले होते. त्यात तत्कालिन नगराध्यक्षाचा समावेश होता. त्यामुळे नगराध्यक्षपद रिक्त होते. त्यानंतर नऊ अपात्र नगरसेवकांच्या जागेवर पोटनिवडणूक होऊन नव्याने नऊ नगरसेवक निवडण्यात आले. परंतु अपात्र नगरसेवकांनी न्यायालयातून स्टे आणला. गटनेते अशोक भैय्या यांनी प्रयत्न करुन स्टे हटविल्यामुळे आज नगरपालिकेच्या सभागृहात निर्वाचन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दीपा मुधोळ यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये लोकमंच विकास आघाडीचे संदीप आमले नगराध्यक्षपदी तर आघाडीचेच सतिश हुमने उपाध्यक्षपदी अविरोध विजयी झाले.

Monday, October 21, 2013

मनसेच्या जिल्हाध्यक्षांना कार्यकत्याकडूनच मारहाण

मनसेच्या जिल्हाध्यक्षांना कार्यकत्याकडूनच मारहाण

वरोरा दौ-यादरम्यान विश्रामगृहातील घटना
वरोरा,   : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय मराठे यांच्यावर वरोरा येथील का‘गार सेनेच्या कार्यकत्यानी प्राणघातक हल्ला केला. वरोरा दौ-यादरम्यान विश्रामगृहात बैठक घेत असताना सोमवारी (ता. २१) ही घटना घडली. याप्रकरणी वरोरा पोलिसांनी कामगार सेनेचे उमेश बोढेकर यांच्यासह कार्यकत्र्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
मागील दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दोन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. त्यात विजय मराठे यांना भद्रावती-वरोरा या भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. २१ ऑक्टोबर रोजी विजय मराठे आपल्या काही पदाधिका-यांना घेऊन भद्रावती-वरोरा तालुक्याच्या दौ-यावर गेले होते. येथील विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे प्रमुख तथा राज्य कार्यकारिणी सदस्य उमेश बोढेकर आपल्या कार्यकत्र्यांसमवेत येऊन मराठे यांना लाथाबुक्यांनी मरहाण केली. यावेळी एका कार्यकर्तेयाने लोखंडी पाइपने डोक्यावर प्राणघातक हल्ला केला. यात त्यांच्या डोक्यावर आणि छातीवर दुखापत झाली. दरम्यान, मराठे यांचेही कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्याम‘ुळे म‘ोठी घटना घटली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांत पूर्वीपासूनच दोन गट आहेत. हाच वाद पुन्हा उङ्काळून आला. विजय मराठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी उ‘ेश बोढेकर आणि त्यांच्या सहका-यांविरुद्ध भादंवि कलम‘  १४३, १४७, ३४१, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
 बिडीओ पुददटवार अपघातात जखमी

बिडीओ पुददटवार अपघातात जखमी

गोंडपिंपरीः-गोंडपिंपरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी चंद्रषेखर पुददटवार यांचा अपघात झाल्याची घटना आज घडली. अपघातात पुददटवार हे जखमी झाले.असुन त्यांच्या चेह-याला काही जखमा झाल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती होताच प्रशासकिय यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली.बिडीओ पुददटवार यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
अवैध गुटखा विक्री : पसार विक्रेते पोलिसांच्या जाळ्यात

अवैध गुटखा विक्री : पसार विक्रेते पोलिसांच्या जाळ्यात

चन्द्रपुर- परराज्यातून आणलेला गुटखा व तंबाखूची अवैध विक्री करणा-या  गोदामावर छापे मारून २० लाखाचा अवैध गुटखा जप्त केल्यानंतर पसार झालेल्या अनिल राजकुमार पंजवानी, जितेंद्र प्रेमजीभाई ठक्कर व नूतन ठक्कर या तिघांना शहर पोलिसांनी सोमवारी दुपारी अटक केली. 
आंध्रप्रदेश व छत्तीसगड राज्यातून सुगंधी तंबाखू व गुटखा आणायचा आणि त्याची पूर्व विदर्भातील चार जिल्हय़ात जादा दराने विक्रीचा गोरखधंदा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सतर्कतेने उघडकीस आला आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा या चार जिल्हय़ांना आंध्रप्रदेश व छत्तीसगडचा सीमावर्ती भाग लागू आहे. आज महाराष्ट्रात संपूर्ण गुटखा बंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे छोटे मोठे पानठेले व टपऱ्याुवर गुटखा किंवा तंबाखू शोधून सुध्दा मिळत नाही. कारवाईच्या भीतीने सुध्दा हे छोटे दुकानदार गुटखा ठेवत नाहीत. मात्र गुटखा विक्रीच्या तस्करीत बडे व्यापारी गुंतले असल्याची माहिती अनिल पंजवानी, जितेंद्र व नूतन ठक्कर यांच्यावरील कारवाईतून समोर आली आहे. हे तिन्ही व्यापारी छत्तीसगड व आंध्र प्रदेशातून गुटखा व सुगंधित तंबाखू चोरटय़ा मार्गाने आणायचे आणि पूर्व विदड्टरातील शहरी आणि ग्रामीण ड्टाागात त्याची खुलेआम विक्री सुरू होती. येथील बागला चौकातील मुन्नालाल बागला यांच्या मालकीची गोदामे आहेत. यातील तीन गोदाम अनिल राजकुमार पंजवानी, जितेंद्र प्रेमजीभाई ठक्कर आणि नूतन प्रेमजीभाई ठक्कर यांनी भाडय़ाने घेतली होती. या तिघांच्याही गोदामातून सुगंधित तुबाखू आणि तत्सम पदार्थाची छुप्या मार्गाने विक्री केली जात होती. लगच्या आंध्रप्रदेश व छत्तीसगड राज्यातून तंबाखू व गुटखा आणायचा आणि या तसेच गडचिरोली जिल्हय़ात जादा किंमतीने विक्री करण्याचा हा गोरखधंदा हे तीन तंबाखू तस्कर गेल्या अनेक दिवसांपासून करीत होते. एकीकडे समाजात प्रतिष्ठीत म्हणून वावरायचे आणि दुसरीकडे तस्करीचा काळा धंदा करायचा असा या तिघांचा व्यवसाय होता. या गोदामातून सुगंधित तंबाखूची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका-ना मिळाली होती. गेल्या काही दिवसांपासून या खात्याचे अधिकारी गोदाम व ठक्कर बंधू आणि पंजवानी या तिघांवर नजर ठेवून होते. दोन दिवसापूर्वीच या गोदामात वीस लाखाचा माल आल्याची माहिती मिळताच शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास अन्न व औषध प्रशासन विड्टाागाच्या अधिकाऱ्यांनी ठक्कर व पंजवानी यांच्या गोदामावर छापे टाकले. या तीन गोदामात मोठय़ा प्रमाणावर माल असल्याचे बघून अधिकारीही चक्रावून गेले. सुगंधित तंबाखू, मजा, गुटखा आणि अन्य तत्सम पदार्थाचे मोठे बॉक्स या गोदामात मिळाले. रात्री उशिरा दहा वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. यावेळी गोदामातून १९ लाख ५० हजाराचा माल जप्त करण्यात आला.
या तिन्ही गोदामातील संपूर्ण गुटखा हा चंद्रपूर तालुक्यात वितरित केला जाता होता. तसेच शहरातील काही बडय़ा व्यापाऱ्यांना सुध्दा तंबाखू आणि तत्सम पदार्थाची विक्री करण्यात येत होती अशीही माहिती तपासात समोर आली आहे. ठक्कर बंधू व पंजवानी यांच्याकडून जिल्हय़ातील गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, जिवती तसेच मूल, सावली, भद्रावती वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी, नागभीड व सिंदेवाही आणि बल्लारपूर या तालुक्यांमध्ये सुध्दा माल पोहोचविला जात होता. अन्न व औषध प्रशासन या तिघांवर कारवाई केली असली तरी गुटखा व तंबाखू तस्करीचे हे रॅकेट मोठे असल्याची माहिती तपासात समोर आली असून, शहरालगतच्या एका गावात मोठे गोडाऊन असल्याची माहिती आहे. 
छत्तीसगड व आंध्रप्रदेशात या तिघांचे पगारी कर्मचारी सक्रिय असून त्यांच्या माध्यमातूनच या जिल्हय़ात हा माल आणला जात असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच बहुतांश तालुक्यांच्या ठिकाणी सुध्दा या तिघांचे गोदाम आहेत. रॅल्वे किंवा खासगी मालवाहक ट्रकच्या माध्यमातून हा तंबाखू या जिल्हय़ात आणला जायचा आणि इथून तो ग्रामीण भागात वितरीत केला जात असल्याची माहिती आहे. दरम्यान या कारवाइने तंबाखू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाच्या चंद्रपूर कार्यालयाने गोंदिया, भंडारा व गडचिरोली येथील जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून पूर्व विदर्भात चालणाऱ्या गुटखा व तंबाखूच्या तस्करीच्या विरोधात संयुक्त अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील धुळीचे प्रदुषण नियत्रंणात आणा

शहरातील धुळीचे प्रदुषण नियत्रंणात आणा

 बंडु सितारामजी धोतरे यांची मागणी 

चंद्रपूर- देशात व राज्यात सर्वाधिक प्रदुषीत असणाच्या मान चंद्रपूरला मिळालेला आहे, ही नक्कीच भुषणावह नाही. परंतु, प्रदुषीत शहर म्हणुन चंद्रपूर समोर आल्यानंतर वेळो-वेळी प्रदुषण नियत्रंणाबाबत ‘कृती आराखडा’ तयार करण्यात आला. यात उदयोगासोबत स्थानिक संस्था व इतर संबधित विभागाच्या जबाबदा-या सुध्दा ठरविण्यात आलेल्या होत्या. शहरातील अंतर्गत रस्ते व बाहेरील रस्ते यावरील धुळ साफ करण्यात न येत असल्याने वाहनाच्या सततच्या वर्दळीमुळे ही धुळ रस्त्यावर उडत असते. यामुळे धुळीचे प्रचंड प्रदुषण आहे. याउपर सततच्या खोदकामामुळे यात भरच पडत आहे. रस्त्यावर निर्माल झालेले खड्डे व्यवस्थीतरित्या बुजविण्यात येत नसल्याने तसेच मुरूम सारख्या घटकांचा वापर होत असल्याने या प्रदुषणात आणखीच भर पडत असते. यामुळे या रस्त्याने प्रवास करणारे सामान्य नागरीक, फेरीवाले, रस्त्या दुर्तफा असलेले व्यावसायीक यांना या प्रदुषणामुळे आरोग्य बाधीत होत आहे. शहरातिल धुळीचे प्रदुषण नियत्रंणात आणण्याची मागणी इको-प्रोचे संस्थापक अध्यक्ष तथा, जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य बंडु सितारामजी धोतरे यांनी केली आहे. 
शहराबाहेरील रस्ते हे सार्वजनीक बांधकाम विभागाकडे आहेत या रस्त्याची सुध्दा अवस्था याच पध्दतीची आहे. या रोडवर सुध्दा धुळीचे प्रचंड प्रमाण असल्याने प्रदुषणाची तिव्रता अधिक आहे. या रोडवरील धुळ साफ करण्याकरिता संबधीत विभागाचा नियोजनपुर्वक कार्यक्रम असायला पाहीजे. तेव्हाच शहरातील धुळीची समस्या कायम स्वरूपी दुर होऊ शकते. याकरिता शहरातील प्रमुख रस्त्यासोबत खालील ठिकाणी उपाय योजना करणे गरजेचे आहे.  शहरातिल रस्ते सफाई दरम्यान रस्त्याच्या दुर्तफा जमा होणारी धुळ, रेती उचलण्यात यावे.  दर हप्तात एक/दोन दिवस कार्यक्रम ठरवून ‘ब्रशचा’ वापर करून रस्त्यावरील धुळ साफ करण्यात यावी.  शहरातील व बाहेरील रस्त्यावरील रस्ता दुभाजकाच्या बाजुला जमा होणारी धुळ साफ करण्यात यावे. लखमापुर परिसरात जुने कोल डेपो मुळे जमा असलेली ‘कोल डस्ट’ साफ करणे.  रस्त्याच्या बाजुला रिकाम्या जागेवर ‘सिंमेट ब्लाॅक’ लावण्याचे काम त्वरीत पुर्ण करणे.  वरोरा नाका ‘उड्डाणपुल’ बांधकामामुळे शहिद स्मारकामागुन पर्यायी रस्ता तयार करण्यात आलेला आहे, या रत्याचे त्वरीत डांबरीकरण करणे. बिनबा गेट ते रामनगर चैक पर्यतचा रस्ता त्वरीत डांबरीकरण करणे.  रस्त्याचे खड्डे बुजविण्याकरिता मुरूमचा वापरावर बंदी करावी. शहरात कुठलीही केबल लाईन करिता नालीचे खोदकाम रात्रीच्या वेळेत करावे, तेवढेच काम करावे जेवढे त्या रात्रीत खोदल्यानंतर बुजविता येईल.

मारहाण करून दुचाकीस्वाराला लुटले

मारहाण करून दुचाकीस्वाराला लुटले

चंद्रपूर- लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास रामनगर पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर अयप्पा स्वामी मंदिर परिसरात घडली. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सुमीत जगदीश सरकार (२९) असे फिर्यादीचे नाव आहे. सुमीत हा दुर्गापूर डब्लूसीएलमध्ये नोकरीला आहे. तो नोकरीहून रात्री ८ वाजता दुचाकीने परतत असताना नेहरूनगर अयप्पा स्वामी मंदिर परिसरात दोन अनोळखी युवकांनी त्यांना लिफ्ट मागितली. माणुसकीच्या नात्याने सुमीतने दुचाकी थांबवून त्यांना लिफ्ट दिली. दरम्यान, रस्त्याने येत असताना अर्ध्यात युवकांनी सुमीतच्या मागील खिशातील पाकिट मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुमीतने दुचाकी थांबवून युवकांना खाली उतरवले.
दरम्यान, युवकांनी सुमीतला मारहाण करून जखमी केले आणि त्यांच्या खिशातील साडेसात हजार रुपये लुटले व पळ काढला. मारहाणीत सुमीत बेशुद्ध होवून रस्त्यावर पडला. काही नागरिकांना हा प्रकार दिसताच त्यांनी सुमितला शुद्धीवर आणले. यानंतर सुमितने रामनगर पोलिस ठाण्यात अनोळखी युवकांविरूद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी युवकांविरूद्ध भादंवि कलम ३४९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहे.
वाचक संख्येचा अहवाल

वाचक संख्येचा अहवाल

Weekly Stats Report: 14 Oct - 20 Oct 2013 
ProjectChandrapurnews.blogspot.in
URLhttp://chandrapurnews.blogspot.in

Summary
                           14     15    16       17    18   19  20  
 MonTuesWedThurFriSatSunTotalAvg
Pageloads81541205985607953877
Unique Visits3326503032264424134
First Time Visits2213382017163816423
Returning Visits11131210151067711

Sunday, October 20, 2013

बाळ चोरी : ती महिला वेडसर

बाळ चोरी : ती महिला वेडसर

चौकशीअंती पोलिसांनी केली सुटका

चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालय येथील प्रसूती कक्षातून नवजात बाळाला पळवून नेत असल्याच्या संशयावरून प्रमिला प्रमोद गहूकर या महिलेस शनिवारी (ता.१९) दुपारी १२ वाजताच्या सुमाराला अटक करण्यात आली. मात्र, महिला वेडसर असून, ती दोन दिवसांपासून घरून निघून गेली होती. शहानिशा झाल्यानंतर या महिलेस पोलिसांनी सोडून दिले.
स्थानिक बालाजी वॉर्डातील रहिवासी प्रमिला प्रमोद गहूकर ही महिला विश्वकर्मा चौकात राहते. मागील अनेक दिवसांपासून ती मानसिकरित्या अशक्त असून, वेडसरपणात कधीकधी घरूनही निघून जाते. शुक्रवारपासून ती बेपत्ता होती. यासंदर्भात शहर पोलिस ठाण्यात तक्रारही देण्यात आली होती. शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात बालरोग कक्ष वॉर्ड क्रमांक १९ मध्ये आली. एका नवजात बाळात ती कुशीत घेऊन होती. तिच्या वर्तणुकीवर संशय आल्याने काही महिलांनी तिला याबाबत विचारणा केली, तेव्हा घाबरून तिने पळ काढला. दरम्यान काही महिला आणि सुरक्षारक्षकांनी तिला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने एका महिलेच्या हाताला चावा घेऊन आपली सुटका केली. समोर एका सुरक्षारक्षकाने तिला पकडले. त्याचा तावडीतून सुटका करण्यासाठी त्याच्या हाताला चावण्याचा प्रयत्न केला. मात्र, गर्दी जमल्याने ती लोकांच्या तावडीत सापडली.

त्यानंतर तिला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. रविवारी सकाळी वृत्तपत्रात बातमी वाचल्यानंतर कुटुबीयांना बेपत्ता असलेल्या प्रमिलासंदर्भात माहिती कळली. ती वेडसर असल्याने ती घरून निघून गेली होती. मूल चोरण्याचा तिचा कोणताही उद्देश नव्हता. लहान बाळांचे तिला आकर्षण असल्याने ती रुग्णालयात जावून बाळंतीण मातांसोबत बोलणे, नवजात बाळांना सांभाळणे, त्यांची देखभाल करणे, अशी कामे ती करायची. त्यामुळे पोलिसांनी चौकशीअंती तीला मुक्त केले.
पाथरीच्या ठाणेदारांची मुजोरी कायम

पाथरीच्या ठाणेदारांची मुजोरी कायम

दस-याच्या रावणपूजेवर घेतला आक्षेप आदिवासींच्या भावना दुखावल्या

चंद्रपूर पाथरी पोलिस ठाण्यात रुजू झाल्यापासून वादग्रस्त ठरलेले ठाणेदार घुघुल यांची मुजोरी अद्यापही कायम आहेयापूर्वी अनेकदा तक्रारी झाल्यावरिष्ठ अधिका-यांनी समज दिलीमात्रया ठाणेदाराच्या वर्तणुकीत कोणताही बदल झालेला नाहीदारुबंदीसंदर्भात आंदोलन करणा-या श्रमिक एल्गारच्या कार्यकत्र्यांना अपमानीत करणेअवैध दारूजुगार व्यावसायिकांकडून हप्ता वसुली आणि तक्रारकत्र्यांना धमकाविण्याचे प्रकार यापूर्वी झाले आहेतसावली तालुक्यातील मेहा (बूजयेथील एका महिलेला झालेल्या मारहाण प्रकरणातही आरोपींना अभय देण्याचे काम या ठाणेदारांनी केलेशिवाय गावकèयांनी पोलिस पाटलाविरुद्ध निलंबनाची मागणी केल्यानंतर बनावट अहवाल तयार करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप ठाणेदार घुघुल यांच्यावर आहे.

ठाणेदाराकडून आदिवासींचा अवमान
आदिवासी समाजाकडून भगवान रावणाची पूजा दस-याच्या दिवशी केली जातेयंदा सावली तालुक्यात सम्राट रावण यांच्याबद्दल जनजागृती करणारी पत्रके वाटण्यात आलीमात्रअनुसूचित जमातीविरोधी असलेल्या पाथरी येथील ठाणेदार घुघुल यांनी कार्यक्रमावर आक्षेप घेऊन आदिवासींच्या भावना दुखावल्यायाप्रकारामुळे आदिवासी समाज अपमानीत झाला असूनत्यांच्यावर अ‍ॅक्ट्रासिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावाअन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा जागतिक गोंड सगा मांदी संघटनेने दिला आहे.
दसरा उत्सव हा आदिवासी समाजबांधवांचा मोठा उत्सव असूनया दिवशी मोठ्या प्रमाणात राजा रावण यांची पूजा अर्चना करण्यात येतेयानिमित्त संभाजी कुमरेमहानंदा टेकाममारोती उईके यांनी काही पत्रके कार्यक्रमास्थळी वाटप केलीसम्राट राजा रावण त्यांच्याबद्दल समाजात जागृती व्हावीहा त्यामागील उद्देश होताकार्यक्रम शांततेत पार पडल्यानंतर पाथरी येथील ठाणेदार घुग्घुस यांनी सामदा येथील शाळेचे शिक्षक पीडीकुमरे यांना त्यांच्या शाळेत जाऊन धमकावले आणि पोलिस ठाण्यात तातडीने हजर होण्याची सूचना केलीरावणाची पूजा केल्याप्रकरणी ठाणेदारांनी जातिवाचक शिवीगाळ केलीया प्रकारामुळे आदिवासीबांधवांची मने दुखावली आहेतत्यामुळे ठाणेदारांवर अ‍ॅक्ट्रासिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा जनआंदोलन करण्यात येईलअसा इशारा मानिक सोयामधीरज शेडमाकेमनोज आत्राममधू मेश्रामबंडू मडावीजोतिराव गावळेमुक्तेश्वर मसरामअशोक कुळमेथेपुरुषोत्तम कुमरे यांनी दिला आहेयासंदर्भातील निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले.

Saturday, October 19, 2013

बाळाला पळून नेणारी महिला पोलिसाचा ताब्यात

बाळाला पळून नेणारी महिला पोलिसाचा ताब्यात

चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालय येथील बालरोग कक्ष वार्ड,  १९ माधुन एक महिला बाळाला पळवून नेत असल्याच्या सशंयातुन येथील नर्सने त्या महिलेस पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना आज शनिवारी (ता. १९) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.

Friday, October 18, 2013

आम आदमी पक्षाच्या कार्यकत्यांनी फासले निवासी वैद्यकीय अधिका-यांना काळे

आम आदमी पक्षाच्या कार्यकत्यांनी फासले निवासी वैद्यकीय अधिका-यांना काळे

जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध समस्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या कार्यकत्यांनी शुक्रवारी (ता. १८) सकाळी ११.३० सुमारास निवासी वैद्यकीय अधिका-यांना काळे फासले. या घटनेच्या निषेधार्थ वैद्यकीय अधिका-यांनी आता काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.



Thursday, October 17, 2013

भूसुरुंग स्फोट, ३ पोलीस ठार

भूसुरुंग स्फोट, ३ पोलीस ठार





गडचिरोली- गडचिरोलीतील कुरखेड तालुक्यातल्या छोडाजुलिया गावामध्ये भूसुरुंग स्फोटामध्ये तीन पोलीस ठार झाले. नक्षलग्रस्त भागात पोलीस पथकाची गस्त सुरू असताना भूसुरुंग स्फोट झाला.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील कोटासुर्य जंगलात आज (गुरूवारी) पहाटे नक्षलवादी हल्ल्यात तीन पोलिस हुतात्मा झाले. पोलिस दलात कमांडो असलेल्या तिघांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. कोटासुर्य जंगलातील नक्षल प्रभावित भागात कमांडोंची गाडी नक्षलवाद्यांनी भूसुरंगाने उडविली. त्यानंतर कमांडोंच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. या हल्ल्याची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुरखेडा तालुक्यातल्या झरी गावातल्या जंगलात ही घटना घडलीय. काल रात्री नक्षलविरोधी अभियानादरम्यान नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला. कुरखेडा जंगल परिसरात विशेष कृती दलाचे जवान जीपने गस्त घालीत होती. मात्र, त्याआधीच नक्षलवाद्यांनी झरी गावातल्या जंगलात भूसुरुंग पेरून ठेवले होते. त्यात हे विशेष कृती दलाचे जवान शहीद झाले आहेत. ग्यारापट्टी पोलीस हद्दीत ही घटना घडली आहे.

Wednesday, October 16, 2013

हजारो अनुयायांनी घेतले अस्थिकलशाचे दर्शन

हजारो अनुयायांनी घेतले अस्थिकलशाचे दर्शन

चंद्रपूर। बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे भवनातून फुलांनी सजविलेल्या एका वाहनातून अस्थिकलशाची मिरवणूक काढण्यात आली.  दीक्षाभूमीवर मिरवणूक पोहचल्यानंतर हजारो अनुयायांनी रात्री उशिरापर्यंत अस्थिकलशाचे दर्शन घेतले.
यात हजारो अनुयायांसह देश-विदेशातून आलेला भिक्खू संघ व समता दलाचे सैनिक सहभागी झाले होते. अगदी शिस्तबद्ध निघालेल्या या मिरवणुकीत ‘जयभीम’चे नारे देण्यात आले. 
मिळेल त्या वाहनांनी आलेल्या बाबासाहेबांच्या अनुयायांनी येथे गेल्या दोन दिवसांपासूनच हजेरी लावली होती. आज दुपारी बॅरी. राजाभाऊ खोब्रागडे भवनातून बाबासाहेबांच्या पवित्र अस्थिकलशाची मिरवणूक निघाली. एका सजविलेल्या वाहनातून निघालेल्या या मिरवणुकीत हजारो बांधव सहभागी झाले होते.  अस्थिकलश मिरवणूक दीक्षाभूमी परिसरात दाखल होताच जय भीमच्या नार्‍यांनी परिसर दुमदुमून गेला होता. दीक्षाभूमीच्या प्रवेशद्वारापासून भन्ते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी अस्थिकलश स्वत:च्या डोक्यावर घेऊन विहारापर्यंत नेला. विहारात अस्थिकलश अनुयायांच्या दर्शनार्थ ठेवण्यात आला. यावेळी समता सैनिक दलाच्या सैनिकांचे पथसंचलन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते.या कार्यक्रमानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली.
 अस्थिकलशाची मिरवणूक निघाली

अस्थिकलशाची मिरवणूक निघाली

चंद्रपूर। चंद्रपुरातील दीक्षाभूमीवर उसळलेल्या जनसागराने आज पुन्हा 57 वर्षापूर्वीच्या सोनेरी दिवसाची आठवण करून दिली.  येथील दीक्षाभूमीवर महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्‍यातून आणि विदेशातूनही आलेल्या अनुयायांच्या गर्दीने आज चंद्रपुरातील दीक्षाभूमीवर जणू निळाईच अवतली. ‘जयभीम’च्या घोषणा आणि जत्थ्याजत्थ्याने येणार्‍या अनुयायांच्या अलोट गर्दीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून चंद्रपूरच्या मुख्य मार्गाने अस्थिकलशाची मिरवणूक निघाली. चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेबांनी १६ ऑक्टोबर १९५६ ला हजारो बौद्ध बांधवांना भगवान बुद्धांच्या धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेबांच्या पदचिन्हांनी पावन झालेल्या या पवित्र भूमीवरून धम्माची प्रेरणा मिळत रहावी, यासाठी डॉ. बाबासाहेबांचा अस्थिकलश दरवर्षी दर्शनार्थ ठेवला जातो. बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे भवनातून फुलांनी सजविलेल्या एका वाहनातून अस्थिकलशाची मिरवणूक काढण्यात आली. यात हजारो अनुयायांसह देश-विदेशातून आलेला भिक्खू संघ व समता दलाचे सैनिक सहभागी झाले होते. अगदी शिस्तबद्ध निघालेल्या या मिरवणुकीत ‘जयभीम’चे नारे देण्यात आले. 
update- 12.50 pm/16 oct.2013
बौद्ध धम्मासाठी पंचशीलाचे पालन करा

बौद्ध धम्मासाठी पंचशीलाचे पालन करा

चंद्रपूर- समाजाचे, संस्कृतीचे, धम्माचे नाव मोठे करताना बौद्ध म्हणून आपला आदर्श ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने त्रिशरणाचे उच्चारण करून पंचशीलाचे पालन करावे, जेणेकरून या देशात बौध्द धम्माची पूनस्र्थापना होऊन बौद्ध धर्म गतिमान होईल, असे प्रतिपादन श्रीलंका येथील उच्च आयोगाचे प्रशासकीय सचिव भदन्त पाल्लेगम विजिया थेरो यांनी व्यक्त केले.
ते येथील दीक्षाभूमिवरील ५७ व्या धम्मचक्रप्रवर्तन दिन सोहळय़ाच्या उद््घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. समारंभाच्या उद््घाटनाप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अशोक घोटेकर अध्यक्षस्थानी होते तर मंचावर भदन्त महापंथ महाथेरो, भदन्त विनय बोधीप्रिय थेरो, भदन्त धम्मज्योती, भदन्त आनंद, भदन्त सुमंगल, भदन्त शुद्धारक्षित, संघवंश, प्राचार्य राजेश दहेगावकर, कुणाल घोटेकर, वामनराव मोडक, स्वागताध्यक्ष मारोतराव खोब्रागडे आदींची उपस्थिती होती.
धम्मचक्रप्रवर्तन महोत्सवाचा प्रारंभ विश्‍वशांती व विश्‍वबंधुत्व वाहन रॅलीने झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळय़ाला माल्यार्पण व सामूहिक बुद्ध वंदनेनंतर या भव्य वाहन रॅलीचे जटपुरा गेट मार्गाने प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकातून वरोरा नाका मार्गाने दीक्षाभूमीवर प्रस्थान झाले. यामध्ये समता सैनिक दलाची चार वाहने, शंभर मीटरवर वाहनधारक पायलट, लाउडस्पीकर, आयोजकांची वाहने अशी मिरवणूक होती.
त्यानंतर बुद्ध विहारात बुद्ध वंदना घेण्यात आली. या समारंभाचा प्रारंभ तथागत भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व सामूहिक बुद्ध वंदनेने झाला. वंदनिय भदन्त धम्मप्रिय थेरो यांच्या हस्ते या समारंभाचे रितसर उद््घाटन झाले.
याप्रसंगी मारोतराव खोब्रागडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भदन्त पाल्लेगम विजिया थेरो म्हणाले, जीवनात पंचशीलाचे पालन करायला पाहिजे. मनुष्याचे जीवन आनंदमय होण्यासाठी चिताची शुद्धी आवश्यक आहे आणि ही चिता शुद्धी विपश्यनाद्वारा प्राप्त होते. याप्रसंगी भदन्त विनय बोधीप्रिय थेरो म्हणाले, मनुष्य जीवन सुखमय होण्यासाठी पंचशीलाचे पालन करणे अनिवार्य आहे. जेणेकरून मनुष्याला सुगती प्राप्त होईल. भदन्त संघकिर्ती म्हणाले, आपण फक्त नावाने बौद्ध आहोत. काया, वाचा, मनाने बौद्ध झाले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त दलित समाजाला दारिद्रय़ातून व अगतिकतेतून बाहेर काढण्यासाठी बुद्धाचा धम्म दिला. भदन्त पद्माबोधी म्हणाले, या देशात निर्माण झालेल्या दहशतवादाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरवाद उत्तर देऊ शकते. संघकिर्ती यांनी बुद्धाचा धम्म माणसाच्या उन्नतीसाठी असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर व राष्ट्रीय एकात्मता या विषयावर परिसंवाद झाला. संचालन डॉ. भगत तर आभार डॉ. विजया गेडाम यांनी मानले.
मूलचे चार मजूर जीप अपघातात ठार

मूलचे चार मजूर जीप अपघातात ठार




यवतमाळ  : सोयाबीन काढणीसाठी आलेले मजूर परतीच्या प्रवासावर असताना त्यांच्या क्रुझर वाहनावर काळाने घाला घातला. भरधाव क्रुझर झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर १९ जण जखमी झाले. जखमींपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना पांढरकवडा तालुक्यातील रुंझा बायपासवर रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळावर रक्तामांसाचा सडा पडला होता. गावकर्‍यांनी जखमींना मदत करून तत्काळ यवतमाळच्या रुग्णालयात उपचारार्थ रवाना केले.
कोमदेव लक्ष्मण भोयर (३५), संजय पांडुरंग गावतुरे (३0), जंगलू लक्ष्मण भोयर (४0), राजू आत्माराम सातक (४५) सर्व रा.हळदी (ता.मूल, जि.चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत. हळदी येथील ही मंडळी १५ ते २0 दिवसांपूर्वी सोयाबीन काढण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात आली होती. नेर तालुक्यातील उमरठा येथे सोयाबीन काढणीचे काम आटोपून काल रात्री एम.एच.१२/बीपी-३४४१ या क्रुझरने हळदीकडे निघाले. क्रुझरमध्ये तब्बल २३ जण प्रवास करीत होते. रुंझा बायपासवर रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण गेल्याने क्रुझर झाडावर जावून आदळली. समोर बसलेले तीन जण जागीच ठार झाले तर राजू सातक याचा उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला. अपघातात ठार झालेले कोमदेव आणि जंगलू हे सख्खे भाऊ आहेत. या अपघातात संगीता शालिक भोयर (३0), शालिक सकरू भोयर (३२), बालाजी सकरू भोयर (४0), दर्शना संतोष भोयर (३५), मीराबाई जंगलू भोयर (४२), प्रमिला सकरू भोयर (१९), अरविंद मारोती शिंदे (२५) हे गंभीर जखमी झाले. तर सुशीला हरिदास भोयर (५0), सिंधु राजू सातक (४0), संतोष जगू भोयर (२३), हरिदास गणपत भोयर (४0), मायाबाई कोमदेव भोयर (३0), रंजिता श्रीराम शिंदे (४१), श्यामराव सुखदेव भोयर (२८), संतोष गेडाम (२५), दुर्गा संतोष गेडाम (२३), संतोष देवतळे (२१), शालू शंकर बोबडे (२५), उषा संजय गोटुरे (३२) हे जखमी झाले. अपघाताची माहिती रुंझा गावात एका दुचाकीस्वाराने येऊन दिली. तेव्हा इमरान पठाण, अशोक सहारे, विनोद दारव्हणकर, चंदन तोडसाम, विक्रम राठोड, साजिद शेख, सतीश तोडसाम यांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना तत्काळ रुंझाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र सर्वांचीच प्रकृती गंभीर असल्याने आरोग्य केंद्राचे एक व तीन वाहने भाड्याने घेऊन चार वाहनातून सर्वजखमींना यवतमाळकडे रवाना करण्यात आले.

Tuesday, October 15, 2013

जादुटोण्याच्या संशयावरून हत्या

जादुटोण्याच्या संशयावरून हत्या

नवरगाव(अर्‍हेर) येथील घटना

ब्रम्हपूरी« जादुटोण्याच्या संशयावरून २0 वर्षिय युवकाने शेजारी वास्तव्य करणार्‍या ५५ वर्षिय इसमाची निघरूण हत्या केली. ही घटना १३ ऑक्टोबरला तालुक्यातील नवरगाव(अर्‍हेर) येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दादू उर्फ आशीष अतुल देवतळे यास अटक केली. महादेव भागडकर असे मृताचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वी आरोपी आशीषने सुनेची छेड काढल्याच्या कारणावरून महादेव भागडकर व त्यांच्या मुलाने आशीषला मारहाण केली होती. तेव्हापासून दोन्ही घरचे सबंध वितृष्टाला आले होते. महादेव भागडकर हा देवदेवतांची परिवारासह पूजा करायचा. मात्र पूजाअर्चा करून तो जादुटोणा करतो, असा अशीषचा समज झाला. यातच आशीषच्या काही जनावरांचा मृत्यू झाला तर कुटुंबातील सदस्यांची प्रकृती बरी राहत नव्हती. आशीषच्या पायात गाठ निर्माण झाली. मात्र औषधोपचार केल्यानंतरही सुधारणा झाली नाही. त्यामुळे महादेवनेच करणी केल्याची अंधर्शद्धा त्याच्या मनात निर्माण झाली आणि महादेवचा काटा काढण्याचे ठरविले.
आज रविवारला शारदा विसर्जनासाठी मिरवणूक काढण्यात आली. त्यात संपूर्ण गावातील नागरिक सहभागी झाले. पण महादेव काही कारणास्तव मिरवणूकीत आला नव्हता. महादेवच्या कुटुंबातील सदस्य मिरवणुकीत सहभागी होते. याचदरम्यान महादेवच्या मार्गावर असलेला आशीषही मिरवणुकीत सहभागी होता. महादेव घरी गेल्याचे लक्षात येताच आरोपी आशीष महादेवच्या घरी गेला. त्याच्याच घरच्या कुर्‍हाडीने महादेववर वार करून जागीच मुडदा पाडला. रक्ताच्या थारोळ्यात महादेव पडताच आरोपीने पळ काढला. सायंकाळी सात वाजता त्याची पत्नी घरी येताच तिला पती मृत्यू पावलेला दिसला आणि एकच हंबरडा फोडला. घटनेची तक्रार पोलिसात नोंदविण्यात आली. पोलिसानी लागलीच गाव गाठून पंचनामा केला आणि प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविले. पोलिस पंचनामा करीत असताना मृतकाजवळ कुर्‍हाड व दुप्पटा आढळला. मृतकाच्या कुटुंबांनी कुर्‍हाड आमची असल्याचे सांगितले पण दुप्पटा नाही. त्यामुळे पोलिसी बंदूकीचा धाक दाखवताच दुप्पट्टा असणारा व्यक्ती समोर आला आणि त्याने आशीषने दुप्पटा नेल्याची कबुली दिली. त्यानंतर आशीषचे घर गाठून त्यांना ताब्यात घेतले असता, त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली.
अनुयायांचे जत्थे दीक्षाभूमीकडे दाखल

अनुयायांचे जत्थे दीक्षाभूमीकडे दाखल

आजपासून प्रारंभ : धम्मचक्र अनुवर्तन सोहळा
चंद्रपूर: येथील पवित्र दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाला १५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. या दोन दिवशीय सोहळ्यासाठी देशभरातील भिक्खुगण, बौद्ध, आंबेडकरी विचारवंत, विविध समीक्षक, साहित्यिक, देश-विदेशातील अभ्यासकांचे प्रबोधन यावेळी होणार आहे. त्यासाठी येथील दीक्षाभूमी सज्ज झाली आहे.
समारंभस्थळी विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिचे जतन केलेला अस्थिकलश दर्शनार्थ उपलब्ध ठेवण्यात येणारआहे. बुद्धधम्म प्रचारकांकडून धम्ममय आनंदाची रुजवण, जगविख्यात बुद्धधम्म प्रचारकांकडून धम्म श्रवण, धम्मसंबंधित उपयुक्त वस्तुंचे स्टॉल, श्रीलंकेतील बोधीवृक्षाच्या शाखेचे दीक्षाभूमीवरील रोपणातून बहरलेल्या बोधीवृक्षाचे दर्शन हे या समारंभाचे खास वैशिष्ट आहे.
संपूर्ण दीक्षाभूमी परिसर रोषणाईने न्हाऊन निघाला आहे. दीक्षाभूमीस्थळी तथागत गौतम बुद्ध व प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य छायाचित्र उभारण्यात आले आहे.
या समारंभाची जवळपास यारी पूर्णतयारी झाली असून येणार्‍या पाहुण्यांच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभादरम्यान १५ ऑक्टोबरला दुपारी ३वाजता वाहनासह मिरवणूक निघेल. १६ ऑक्टोबरला सकाळी १0 वाजता डॉ. बाबासाहेबांच्या अस्थिकलशासह मिरवणूक निघणार आहे. यात बौद्ध बांधवांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याची विनंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी) अनुयायांचे जत्थे दाखल धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्यासाठी धम्मभूमी परिसरात सजावट व रोषणाई करण्यात आली आहे. पुस्तके, मूर्ती व इतर अनेक साहित्यांच्या दुकानांचे स्टॉल लावण्यात आले आहे. चंद्रपूर महानगरपालिकाही या कामी लागली असून परिसरात स्वच्छता बाळगली जात आहे. सोहळ्यासाठी देशभरातून बौध्द अनुयायांचे जत्थे चंद्रपुरात दाखल होत आहे. त्यांच्या व्यवस्थेकडे आयोजक सातत्याने लक्ष देऊन आहेत. याशिवाय बाहेरगावावरून आलेल्या बौध्द अनुयायांसाठी सामाजिक संघटनांनी भोजन व पाण्याची व्यवस्था केली आहे. यासाठीही स्टॉल उभारण्यात आले आहे. एकूणच सोहळ्यासाठी धम्मभूमी सज्ज झाली आहे.


  •  ■ १५ ऑक्टोबरमिरवणूक- दुपारी ३ वाजताधम्म ध्वजारोहण-दुपारी ३.३0 वाजता धम्मसमारंभ उदघाटन-दुपारी ३.४५ वाजतापरिसंवाद-सायंकाळी ६ वाजताजागर भीम संगराचा-रात्री ८ वाजता
  • ■ १६ ऑक्टोबरडॉ. बाबासाहेबांच्या अस्थिकलशासह मिरवणूक-सकाळी १0 वाजतासामूहिक बुध्दवंदना/धम्मप्रवचन-दुपारी १२.३0 मुख्य समारंभ-सायंकाळी ५ वाजताभीमा तुला ही वंदना-रात्री ९ वाजता 


रिलायन्स जीओला ७५ लाखांचा दंड

रिलायन्स जीओला ७५ लाखांचा दंड

चंद्रपूर : रिलायन्स जीओ कंपनीला महानगरपालिकेची कुठलीही परवानगी नसताना कंपनीने शहरात खोदकाम केले. यावरून नगरसेवकांनी चांगलाच गदारोळ केला. केलेल्या खोदकामाबाबत रिलायन्स जीओ कंपनीला ७५ लाखांचा दंड ठोठवावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. नगरसेवकांचा हट्ट बघता रिलायन्स कंपनीकडून ७५ लाखांचा दंड वसूल करण्याचा ठराव पारित करण्यात आला.
रिलायन्स जीओ कंपनीने शहरात विनापरवानगीने केलेले खोदकाम, भूमिगत मलनिस्सारण योजनेचा वाजलेला बोजवारा व वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा विषय, यावरून महानगरपालिकेच्या आजच्या आमसभेत एकच गदारोळ झाला. 
चंद्रपूर महानगरपालिकेची आमसभा आज मनपाच्या सातमजली इमारतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. रिलायन्स जीओ कंपनीला शहरात केबल टाकण्यासाठी परवानगी देण्याचा विषय चर्चेला ठेवण्यात आला. मात्र या विषयाला हात घालताच बहुतेक नगरसेवक संतापले. विशेष म्हणजे, या याविषयाला स्थायी समितीच्या सभेत आधीच मंजुरी देण्यात आली होती. मात्र रस्त्यांबाबत नागरिकांची ओरड बघता त्यानंतर झालेल्या आमसभेत याला विरोध करण्यात आला. आजच्या आमसभेतही याला बहुतेक नगरसेवकांनी विरोध दर्शविला. 
केंद्र शासनाची योजना असल्याने आज ना उद्या खोदकाम करण्याची परवानगी द्यावी लागेलच, असे काही नगरसेवकांनी लक्षात आणून दिले. यावर पुढील दोन वर्ष या कंपनीला खोदकाम करण्याची परवानगी द्यायची नाही, अशी मागणी नगरसेवकांनी केली आणि हा ठरावही पारित करण्यात आला. शहरात मागील तीन वर्षांपासून भूमिगत मलनिस्सारण योजनेची कामे सुरू आहेत. काम पूर्ण करण्याची तारीख निघून गेल्यानंतरही ६0 टक्केही काम झाले नाही. अशातच महानगरपालिकेने भूमिगत गटर योजनेचे एक कोटी रुपयांचे बिल काढले, यावरून नगरसेवक प्रविण पडवेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर या योजनेचा शहरात कसा धिंगाना सुरू आहे, याचा पाढाच अनेक नगरसेवकांनी सभागृहात वाचला. दरम्यान, सदर काम जलदगतीने करून मार्च २0१४ पर्यंत जोडण्या केल्या जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 
यावर संजय वैद्य यांनी सदर योजनेसाठी अद्याप रेल्वे व पुरातत्व विभागाची परवानगी घेतली नाही, हे लक्षात आणून देत योजना पूर्ण व्हायला आणखी बराच कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली. मुळात या योजनेचा आराखडाच चुकीचा तयार करण्यात आल्याने या योजनेचा बट्टय़ाबोळ होत असल्याचा आरोपही वैद्य यांनी यावेळी केला. या योजनेचे अद्याप टेकनिकल ऑडीटही झालेले नाही. मनपा प्रशासनाने या योजनेच्या शहरात बट्याबोळ होत असल्याचे प्रांजळपणे कबूल करावे, असे मतही सभागृहात व्यक्त केले. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा विषय चर्चेसाठी आला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसंबंधी आधीपासून मतभिन्नता असल्याने आमसभेत जागेसंबंधी वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या. अखेर बायपास मार्गावरच जागा आरक्षित करावी, असे ठरले. 

जनरल फंडातील ३५ कोटींचे आमसभेत नियोजन
नगरोत्थान व इतर अनेक योजनांसाठी महापालिकेला आपल्या हिस्सेपोटी ५0 टक्के रक्कम खर्च करावी लागते. उर्वरित शासन अनुदान देते. अशा योजनांसाठी मनपाच्या सामान्य फंडातून ३५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. महापौर संगिता अमृतकर यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. तो पारित करण्यात आला. विशेष म्हणजे, स्थायी समितीच्या दर आठवड्याच्या बैठकीत ३0-३५ लाखांचा कामांना मंजुरी दिली जाते. शासनाच्या नगरोत्थानसारख्या योजनेतून विकास होत असताना त्याच कामासाठी वेगळा निधी मंजूर होत असताना मनपाला आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळेच महापौरांनी हा प्रस्ताव सादर करून सामान्य फंडातील रक्कम वळती केल्याची माहिती सूत्राने दिली. झोनमध्ये राहणार वैद्यकीय अधिकारी
शहरातील वैद्यकीय झोनमध्ये कधीच वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसतात. तिथे नेहमी अस्वच्छता असते, असा आरोप आमसभेत नगरसेवकांनी केला.आता महानगरपालिका झाल्याने प्रशासनानेही गंभीरता दाखवून झोनमध्ये वैद्यकीय अधिकार्‍यांना उपलब्ध ठेवावे, अशी मागणी केली. नगरसेवकांची ही मागणी सभागृहात मान्य करण्यात आली.

Monday, October 14, 2013

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा

चंद्रपूर : तुकूम परिसरातील अंकुर निवास येथे राहणाèया मनीषा दुर्गेश qसग (वय २४) हिने गळङ्कास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. ११) दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी पती दुर्गेश qसग विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह. मनीषा व दुर्गेश यांचा १२ जानेवारी रोजी प्रेमविवाह झाला. दुर्गेश व मनीष यांच्यात काही दिवसांपासूनच वाद सुरू होता. दुर्गेशच्या मोबाईलवर एका मैत्रीणीचा एसएमएस आला होता. तो मनीषाने वाचला. तेव्हापासून दोघांमध्ये वाद झाला होता. याच कारणातून मनीषाने आत्महत्या केली. घटनेच्या दिवशी दुर्गेश कामावरून रात्री सात वाजता घरी आला. तेव्हा मनीषा एका घरातील एका खोलीमध्ये गळङ्कास घेतलेल्या स्थितीत आढळून आली. दुर्गेशने या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. त्यानंतर घटनेची तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या आत्महत्येला पती जबाबदार असल्याच्या कारणावरून पोलिसांनी दुर्गेशला अटक केली.
निकृश्ट कामामुळे ट्रक पलटला

निकृश्ट कामामुळे ट्रक पलटला

सावली (तालुका प्रतिनिधी) - सावली-गडचिरोली महामार्गावर मागील 2 वर्शापासुन सुरू असलेले काम निश्कृश्ट व कासवगतीने सुरू असल्यामुळे अनेकदा अपघाताची घटना घडत असतांनाच काल दि. 11 आॅक्टोंबर रोजी रात्रो 10 वाजताच्या दरम्यान चंद्रपूर वरून राजनांदगावकडे जाणारा ट्रक किसाननगर जवळ रस्ता खोदकामामुळे पलटला. सदर रस्त्याकडे बांधकाम विभागाच्या अधिकाÚयाचे दुर्लक्ष होत असल्यामुळेच अपघाताची मालिका सुरूच आहे. 
चंद्रपूर-गडचिरोली या राज्य महामार्ग क्रं. 7 या रस्त्याच्या कामासाठी केंद्रषासने केंद्रीय मार्ग निधी प्रकल्पाअंतर्गत 13 किमी रस्त्याच्या सुधारणेसाठी सुमारे 8 कोटी रूपयाचे निधी मंजुर करून सुरूवात करण्यात आलेले आहे. मागील 2 वर्शापासुन सदर काम चंद्रपूर येथील मे. लक्ष्मी कंट्रक्षन कंपनीने सुरू केलेले आहे. परंतु कामाला पाहिजे ती गती अजुनही आलेली नाही. यामुळे याठिकाणी अनेकदा अपघाताचे प्रमाण घडत आहे. सदर काम मूल येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कं्र. 2 यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. परंतु सदर विभागाचे अधिकारी याकामाकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. सदर रस्त्याच्या कामाचा निकृश्ठपणा यावेळी आलेल्या पावसाने उघडकीस आणला आहे.
चकपिरंजी ते हिरापूर पर्यंत सुरू झालेल्या कामावर अंदापत्रकानुसार 40 एमएम गिट्टी टाकणे गरजेचे
असतांनाही माती मिश्रीत छोटी-छोटी गिट्टी टाकुन काम करण्यात आले. त्यानंतर हिरापूर ते किसाननगर पर्यंत रस्त्याचे काम करतांना खोदकाम केलेली माती त्याच ठिकाणी टाकण्यात आली. व वरवर मुरूम पसरवुन पुर्ण मुरूच टाकल्याचे भासविल्या जात आहे. त्याचप्रमाणे किसाननगर जवळ रस्ता खोदुन वर्शेभर काम सुरू न केल्याने अनेकदा अपघात झाले. आणि त्याच खोदलेल्या ठिकाणी मातीने बुजविले. मात्र काम पुर्ण न झाल्याने अजुनही अपघाताची मालीका सुरूच आहे.