स्वच्छ भारत अभियान, इको-प्रो चा पुढाकार
चंद्रपूर
- इको-प्रो संस्थेच्या माध्यमातून ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत सुरू
करण्यात आलेल्या ‘चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियान’ला अखंड 200 दिवस
पूर्ण झालेत.
चंद्रपूरातील
गोंडकालिन ऐतिहासिक किल्ला-परकोटाची अवस्था खंडहर स्वरूपाची झाली होती. हा
वारसा जपला जावा, त्याचे संवर्धन व्हावे याकरिता ‘स्वच्छ भारत अभियानास
जोड म्हणून इको-प्रो संस्थेच्या ‘इको-प्रो पुरातत्व संवर्धन विभाग’ च्या वतीने 1
मार्च 2017 ला किल्ला स्वच्छता अभियानाची सुरूवात करण्यात आली. 28 सप्टेंबर
2017 रोजी त्यास 200 दिवस पूर्ण झालीत.
यात
किल्लावरील वाढलेली वृक्ष-वेली तोडणे, सफाई करणे नव्हेतर मोठया प्रमाणात
फेकण्यात आलेले घर बांधकामाचे निरपयोगी साहित्य , नाली सफाई नंतरची
फेकण्यात आलेली माती, किल्लास लागुन असलेल्या घराची अडगळ आदींची सफाई करून
स्वच्छता करण्यात येत आहे.
मागील 200 पेक्षा अधिक
दिवसापासुन इको-प्रो चे सदस्य रोज सकाळी 6:00 ते 9:00 या वेळेत श्रमदान करून
किल्लाचे सौदर्य वाढविण्याकरीता प्रयत्नशील आहेत. या किल्लावरून इतिहासप्रेमीना, नागरिकांना ‘हेरीटेज
वाॅक’ करता येईल, किल्लावरील सर्व बुरूजे स्थानीकांना व्यायाम व योगा करण्यास उपलब्ध
होतील, अशी आशा आहे.
या अभियानाची दखल घेत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर
यांनी पुरातत्व खात्याचे केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांच्या सोबत
इको-प्रोच्या शिष्टमंडळाची भेट घडवून आणली. यावेळी चंद्रपूर किल्ला अभियान
बाबत सविस्तर माहीती देण्यात आली.
‘स्वच्छता
ही सेवा’ कार्यक्रमा अंतर्गत या किल्लावर केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज
अहिर, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर अंजलीताई घोटेकर, आयुक्त
श्री काकडे, नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी यांनी श्रमदान केले.
यापूर्वी
आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पुरातत्व विभागाचे
अधिक्षक पुरातत्वविद् एन ताहीर, उप अधिक्षक पुरातत्वविद हाशमी, इतिहास
अभ्यासक टी टी जुलमे, अशोकसिंह ठाकुर यांनी या अभियानास भेट देत
सहभागी सदस्याचे कौतुक केले आहे.
15
आॅगष्ट रोजी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते अभियानात
सहभागी सर्व सदस्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रमाणपत्र देउन
गौरविण्यात आले होते. यापूर्वी किल्ला अभियान च्या अनुषंगाने चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघ आणि इंडियन मेडिकल असो. सुद्धा इको-प्रो टीम चा सत्कार केलेला आहे.
चंद्रपूर
शहराच्या विकासात एेतिहासिक किल्ला-परकोट व इतर वास्तुचा उपयोग करून
पयर्टनाच्या दृष्टीने विकास व्हावा, नागरिकांमध्ये आपल्या या गोंडकालीन
वारसाबाबत आस्था वाढावी जेणेकरून जनसहभागाने या वास्तुची संवर्धन व संरक्षण
करणे सोपे होईल. तसेच किल्ला स्वच्छ राखण्यात नागरीकांचा हातभार लागेल अशा
अर्थाने या किल्ला अभियानाचे महत्व असल्याचे मत इको-प्रो चे अध्यक्ष तथा
राष्ट्रीय युवा पुरस्कारर्थी बंडू धोतरे यांनी व्यक्त केले आहे. या किल्ला
अभियानात किमान एक दिवस श्रमदानासाठी विवीध संस्था-संघटना आणी व्यक्तीनी
सहभागी व्हावे असे आवाहन सुध्दा करण्यात आले आहे.
किल्ला
स्वच्छता अभियान अंतर्गत संस्थेचे नितिन बुरडकर, धर्मेंद्र लुनावत, नितिन
रामटेके, रविंद्र गुरनले, राजू कहिलकार, बिमल शाह, संजय सबबनवार, अनिल
अङ्गुरवार, अभय अमृतकर, जयेश बैनलवार, कपिल चौधरी, मनीष गावंडे, सुधीर देव,
सूरज गुण्डावर, विनोद दुधनकार, नीलेश मडावी, सुमित कोहली, वैभव मडावी आदि
नियमित सहभागी होतात।