गडचिरोली सारख्या अतिदुर्गम जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील आतापर्यंत विदयुतिकरण न झालेल्या या गावाचे विद्युतीकरण दि 29.01.18 रोजी महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. दिलीप घुगल यांचे हस्ते झाले व संपूर्ण गाव चेहऱ्यावर एक आनंदाची नवी किरण बघायला मिळाली. शेती व वन रोजगारांवर अवलंबून असलेल्या केवळ 11 घरांची वस्ती असलेल्या सर्व सर्वांना महावितरणने सौभाग्य योजने अंतर्गत मोफत विजजोडण्या करून दिल्या. गडचिरोली जिल्हयातील आलापल्ली व गडचिरोलीमधील एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 610 गरीब आदिवासी बांधवांच्या घरातील तेलाच्या दिव्यांची जागा आता एलईडी दिव्यांनी घेतली आहे.
सौभाग्य योजनेच्या माध्यमातूनच गडचिरोली व आलापल्ली या दोन विभागातील एकदंरीत 610 कुटुंबांना सौभाग्य योजनेच्या माध्यमातून वीजजोडणी सुविधामहावितरण कडून प्राप्त झाली आहे. यात आलापल्लीतील 509 घरकुलांना तर गडचिरोलीतील 101 गरीब आदिवासी बांधवांच्या कुटूंबांचा समावेश आहे.
या सर्व गावात जाण्यासाठी रस्ते नाही, त्यामुळे केवळ कच्च्या रस्त्यांचा मार्ग क्रमत, मैलो न मैल रानवाटा चालत महावितरणच्या आलापल्ली व गडचिरोली विभागातील कर्मचारी व अभियंत्यांनी या वीजजोडणींसाठी पायाभूत सुविधा -वीजेची रोहित्रे, वीजेची खांबे व वीजवाहिण्या उभ्या करत आलापल्ली, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड व धानोरा उपविभागांतर्गत येणाऱ्या 40 गावातील गरीब आदिवासींच्या जीवनात प्रकाशाची वाट उपलब्ध करून दिली.
आलापल्ली विभागांतर्गत येणाऱ्या 33, भामरागड उपविभागात 110, एटापल्ली उपविभागात 136, सिरोंचा उपविभागात 230 अशा एकूण 509 दारिद्र रेशेखालील कुटूंबे तर गडचिरोली विभागांतर्गत येणाऱ्या धानोरा उपविभागातील 101 घरात महावितरणचा प्रकाश सौभाग्य योजनेच्या माध्यमातून पोहोचला आहे.
वर्षानुवर्षे रानावनात भटकून भाकरीचा चंद्र कमावणे तर चंद्रांच्या चांदण्यात उद्याच्या उदयाची स्वप्ने रंगविणे, कुडाच्या-मातीच्या घरात तेलाच्या दिव्याच्या प्रकाशात जीवन जगतांना घराच्या कौलातून येणारा चंद्रप्रकाश तेलाचा दिवा हिच प्रकाशाची साधने असतांना सौभाग्य योजनेमधून जेव्हा ६१० आदिवासींच्या जीवनात प्रकाशाची किरणे पेाहोचली तेव्हा समाधानाचा सुर्य त्या आदिवासींच्या चेहऱ्यावर उगवला.
यातच चंद्रपूर गडचिरोली जिल्याच्या सीमेवर असलेल्या चंद्रपूर परिमंडळांतर्गत बल्लारशाह विभागातील जिवती उपविभागातीतील दुर्गम अशा घाटरायगुडा, गावातील 8, पाटागुडा गावातील 11 व आंबेझरी गावातील 12 व सेवादासनगर येथिल 29 अशा एकंदरीत ६० दारीद्रय रेशेखालील गावकऱ्यांच्या जीवनात महावितरणने वीजजोडणी देवून गरीब आदिवासींच्या जीवनात प्रकाशाच्या किरणांना वाट उपलब्ध करून दिली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणाऱ्या आता लहानग्या विध्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी तेलाच्या दिव्याच्या प्रकाशाची जागा आता एलईडी बल्बचा प्रकाशाने घेतली आहे. जीवती तालुक्यातील घाटरायगुडा, पाटागुडा सेवादानगर व आंबेझरी हि गावे तालुक्याच्या शेवटच्या टोकावर दूर्गम व डोंगरव्याप्त भागात महाराष्ट्र व तेलंगणाच्या सिमेवर वसलेली आहेत. गावातील लोक आदिवासी कोलाम असून त्यांचा उदरनिर्वाह हा शेती तसेच जंगलातून मध गोळा करणे आदीवर होतो. तालुक्यापासून 15 ते 20 किमी दुर असणारी ही चारही गावे अनुक्रमे 13-14 घरांची वस्ती असलेले आहे.
चंद्रपूर मंडलाचे अधिक्षक अभियंता श्री. हरिश गजबे व जिवती उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. मांगिलाल राठोड व कनिष्ठ अभियंता श्री. विनोद भलमे, यांनी या घाटरायगुडा गावातील 8, पाटागुडा गावातील 11, सेवादासनगर गावातील 29 व आंबेझरी गावातील 12 अशा 50 कुटूंबांच्या जीवनात प्रकाश किरणे पोहोचवून समाजाचाच भाग असलेल्या परंतु प्रगतीपासून दूर असलेल्या बांधवाना प्रकाशाची भेट देवून त्यांना प्रगतीची वाट दाखवली.
भामरागड तालुक्यातील आतापर्यंत विदयुतिकरण न झालेल्या या गावाचे विद्युतीकरण दि 29.01.18 रोजी महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. दिलीप घुगल यांचे हस्ते झाले व तेव्हा संपूर्ण गाव आनंदमय झाले.कोकामेटा टोला गाव हे जिल्हा मुख्यालयापासून जवलपास 200 कि.मी व तालुका मुख्यालया पासुन जवळपास 15 कि.मी.अंतरावर असुन अतिशय दुर्गम भागात स्थित आहे. गावात जाण्यासाठी रस्ते नाही त्यामुळे केवळ कच्च्या रस्त्यांचा मार्ग क्रमत डोंगर दरीतून वाट काढत, जंगलातून महावितरणच्या आलापल्ली विभागांतर्गत भामरागड उपविभागातील कर्मचाऱ्यांनी तसेच कंत्राटदारांनी वीजेचे एक 63 केव्हीएचे रोहित्र, वीजेची खंबे 2.5 किमी उच्चदाब वाहिनी व 1 किमी लघूदाब वीजवाहिनीचे प्रयोजन करत कोकामेटा टोला वासियांच्या जीवनात प्रकाषाची वाट उपलब्ध करून दिली व मुख्य अभियंता श्री. दिलीप घुगल यांनी वीजेची कळ दाबताच सर्व गावात सुर्य, चंद्राच्या व तेलाच्या दिवाच्या प्रकाशानंतर महावितरणद्वारा प्रकाश पेरला गेला.
शेती व वन अवलंबित वन रोजगारांवर अवलंबित केवळ 11 घरांची वस्ती असलेल्या सर्व 11 घरांना सौभाग्य योजने अंतर्गत मोफत विजजोडण्या देण्यात आल्या. गोंगलू देवू कोसामी, लालसू इरपा वड्डे, चैते मंजूरू वड्डे, राकेश मुरा मडावी, कटीया पेका कुसामी,राजे देबू दुर्वे, चैतू पेका मडावी, सोमा चुक्कू महाका, इरपा कटीया पुंगाटी, केये देउ कुरसामी,सैनू पेका मडावी यांना या वीजजोडण्या देेण्यात आल्या , त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रकाश -प्रगतीची दारे उघडली जाण्यात महावितरणचा हातभार लागला.
मुख्य अभियंता श्री. दिलीप घुगल व गडचिरेाली मंडलाचे अधिक्षक अभियंता श्री. अषोक म्हस्के यांच्या मार्गदर्षनात गडचिरेाली विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. विजय मेश्राम व आलीपल्ली विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अमित परांजपे यांनी या वीजजोडण्या देण्याचे नियेाजन करीत गरीब आदिवासी कुटूंबांना प्रकाशाची भेट दिली आहे.
ज्या घरात अजूनही वीज पोहोचली नाही, अशा कुटुंबात मोफत वीज देण्याची घोषणा पंतप्रधानांनी सोमवारी केली असून, त्यानुसार महाराष्ट्रात अजून ३ लाख ६४ हजार कुटुंबांत या 'सौभाग्य' योजनेतून वीजपुरवठा करण्याचे आव्हान 'महावितरण'समोर आहे. 'महावितरण'ने मार्च २०१५ पासून तब्बल १६ लाख कुटुंबांच्या घरांत उजेड पेरण्याचे काम केले आहे.
देशात अजूनही वीज पोहोचली नाही अशी जवळ पास चार कोटी कुटुंबे आहेत. त्यांना मार्च २०१९ पर्यंत वीज देण्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. त्यासाठी केंद्र सरकार १६ हजार ३२० कोटी रुपये खर्च करणार आहे. सन २०११ च्या सामाजिक व आणि आर्थिक जनगणनेमध्ये नोंदविण्यात आलेल्या गरिबांना मोफत कनेक्शन देण्याची ही 'सौभाग्य' योजना आणली आहे