সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, October 28, 2014

फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

भारतीय जनता पार्टी (भाजपा) चे विद्यमान प्रदेश अध्यक्ष 
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री …………. 

 विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाप साधणारे एक दुर्मिळ राजकीय व्यक्तिमत्त्व.
नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनात स्नातकोत्तर पदवी व डी. एस. ई., बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापनाच्या पद्धती व तंत्र या विषयात पदविका मिळविली. नव्वदीच्या दशकात राजकारणात प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी मोठा जनाधार प्राप्त केला.
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या जनतेचे प्रतिनिधित्त्व करत असतानाच पक्षांतर्गत विविध स्तरांवर नेतृत्त्व केले. नागपूर महानगरपालिकेतून ते सलग दोनदा (१९९२ व १९९७) निवडून आले. नागपूरचे महापौर पद त्यांनी भूषविलेले असून भारतातील आजवरचे दुसरे सर्वात तरुण महापौर अशी त्यांची ख्याती आहे. महापौर पदी पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्रातून ‘मेअर इन काऊन्सिल’ चा मान मिळविणारे ते पहिलेच.
१९९९ पासून सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. १३ वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून जनतेचे प्रतिनिधित्त्व करीत असताना विविध समित्यांवर काम केले आहे. त्यामध्ये अंदाज समिती, नगर विकास व गृहनिर्माणावरील स्थायी समिती, नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासंदर्भात नेमलेली समिती यांचा समावेश आहे.
देवेंद्र फडणवीस हे अनुभवी लोकप्रतिनिधी असून राजकीय बुद्धिचातुर्य व कौशल्य यासाठी त्यांना विविध व्यासपिठांनी गौरविलेले आहे. त्यांच्या कार्य-कर्तृत्त्वाची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेलेली असून राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसेच जागतिक संसदीय फोरमच्या सचिव पदी ते कार्यरत आहेत.
आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग व विश्लेषण यासाठी देवेंद्र फडणवीस यांची ख्याती आहे. केंद्रीय अर्थसंकल्पावरील त्यांच्या विश्लेषणाची दरवर्षी आतुरतेने वाट पाहिली जाते. आर्थिक विषमता दूर करण्यासंदर्भातील त्यांचे विचार व त्यांच्या कल्पनांचे तज्ञांनीही कौतुक केलेले आहे. इंधन / ऊर्जा सुरक्षितता व वातावरणातील बदल अशा विषयांवर बोलण्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये निमंत्रित केले गेले आहे.

विचारसरणी

देवेंद्र फडणवीस यांचा ‘बोले तैसा चाले’ या विचारावर ठाम विश्वास आहे. हाती घेतलेले काम ते तडीस नेतातच आणि ते काम अधिकाधिक चांगल्या रितीने करतात. मदत मागणारा कोणीही असो, दिवसरात्र कोणतीही वेळ असो किंवा आव्हान कितीही कठीण असो, जनतेची सेवा करताना देवेंद्र फडणवीस जराही बिचकत नाहीत. नागपूर विद्यापीठातून त्यांनी विशेष गुणवत्तेसह कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी पदवीनंतर व्यवस्थापनशास्त्राची पदवी मिळविली. त्यांनी डीएसई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला. उच्च शिक्षण असले तरी सदैव जनसामान्यांशी संपर्क ठेवून उत्साहाने लोकाभिमुख कामे करण्याचे त्यांचे वैशिष्ट्य आहे. हाती घेतलेले काम तडीस नेईपर्यंत अथवा समस्या सुटेपर्यंत त्यांना स्वस्थ बसवत नाही. त्यांचे नेतृत्व हे नैतिकतेच्या भक्कम पायावर उभे असलेले पारदर्शी नेतृत्व आहे.

लोकप्रतिनिधित्व

  • १९९९ ते आतापर्यंत – सलग तीनवेळा महाराष्ट्र विधानसभा सद्स्य
  • १९९२ ते २००१ – सलग दोन टर्म नागपूर महापालिकेचे सदस्य, दोनवेळा नागपूरचे महापौर, मेयर इन कॉन्सिल पदावर फेरनिवड, असा सन्मान मिळणारे राज्यातील एकमेव

राजकीय टप्पे

  • २०१३ – प्रदेश अध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
  • २०१० – सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
  • २००१ – राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
  • १९९४ – प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
  • १९९२ – अध्यक्ष, नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चा
  • १९९० – पदाधिकारी, नागपूर शहर पश्चिम
  • १९८९ – वॉर्ड अध्यक्ष, भाजयुमो

विधिमंडळातील कार्य

  • अंदाज समिती
  • नियम समिती
  • सार्वजनिक उपक्रम समिती
  • महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
  • नगरविकास व गृहनिर्माणाविषयी स्थायी समिती
  • राखीव निधीविषयी संयुक्त निवड समिती
  • स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समिती

सामाजिक योगदान

  • सचिव, ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटाट फॉर एशिया रिजन
  • नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्द्यांबाबत रिसोर्स पर्सन
  • संयुक्त राष्ट्रांची मान्यता मिळालेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य
  • नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (भोसला मिलिटरी स्कूल) चे उपाध्यक्ष
  • नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य

आंतरराष्ट्रीय ठसा

  • होनोलुलू, अमेरिका येथे इंटरनॅशनल एनव्हायरमेंट समिटमध्ये सहभाग आणि सादरीकरण, १९९९
  • अमेरिकेतील वॉशिंग्टन व नॅशविले येथे यू. एस. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर्स, २००५
  • स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे आयडीआरसी – युनेस्को – डब्ल्यूसीडीआर यांनी आयोजित केलेल्या ‘डिझास्टर मिटिगेशन अँड मॅनेजमेंट इन इंडिया’ या विषयावरील आंतराष्ट्रीय शिखर परिषदेत सादरीकरण, २००६
  • चीनमध्ये बीजिंग येथे डब्ल्यूएमओ – ईएसएसपी यांनी आयोजित केलेल्या ग्लोबल एनव्हायरमेंटल चेंज काँग्रेसमध्ये ‘नॅचरल डिझास्टर्स मिटिगेशन – इश्युज ऑन इकॉलिजिकल अँड सोशल रिस्क’ या विषयी सादरीकरण
  • डेन्मार्कमध्ये कोपेनहेगेन येथे आशिया व युरोपमधील तरूण राजकीय नेत्यांच्या आसेम परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व, २००७
  • अमेरिकेच्या संघराज्य शासनाच्या ईस्ट – वेस्ट सेंटरतर्फे आयोजित न्यू जनरेशन सेमिनारमध्ये ‘एनर्जी सिक्युरिटी इश्युज’ या विषयावर शोधनिबंध सादर, २००८
  • ऑस्ट्रेलिया, न्यूझिलँड आणि सिंगापूरला गेलेल्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोशिएशनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाचे सदस्य, २००८
  • रशियात मॉस्को येथे भेट देणार्‍या इंडो रशिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाचे सदस्य, २०१०
  • युरोपमध्ये क्रोएशिया येथे ‘ग्लोबल पार्लमेंटरियन फोरम ऑन हॅबिटाट’मध्ये सहभाग, २०११
  • मलेशियामध्ये ‘जीपीएच एशिया रिजनल मीट’मध्ये सहभाग, २०१२
  • केनियातील नैरोबी येथे ‘युनायटेड नेशन्स हॅबिटाट’ने निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य, २०१२

पुरस्कार

  • कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशनतर्फे वर्ष २००२ – २००३ साठीचा सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
  • राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार
  • रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ विभागीय पुरस्कार
  • मुक्तछंद, पुणे या संस्थेतर्फे स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
  • नाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे राजयोगी नेता पुरस्कार

युवा नेतृत्व

भारत हा तरुणांचा देश आहे. देशातील सुमारे ५४ टक्के लोकसंख्या पंचवीसपेक्षा कमी वयाची आहे तर ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ७२ टक्के आहे. आपल्याला लोकशाही अर्थपूर्ण बनवायची असेल तर अधिकाधिक युवकांनी सक्रीय होण्याची आणि निर्णयाच्या आणि बदलाच्या प्रक्रियेत भाग घेण्याची गरज आहे. देशातील युवकांना वाटते की त्यांच्या आकांक्षांनुसार आणि स्वप्नांनुसार देशाने झटपट विकास करावा व प्रगत बनावे. तसे घडण्यासाठी हा मुद्दा समजून युवकांच्या आकांक्षांशी एकरूप होणार्‍या नेतृत्वाची गरज आहे.

वकील

विशेष गुणवत्तेसह कायद्याची पदवी मिळविणार्‍या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कायद्याची असामान्य समज आहे व आपले हे ज्ञान नैतिक मार्गाने समाजात बदल घडविण्यासाठी वापरण्याची त्यांची क्षमता आहे. न्याय या मूल्याला ते सर्वाधिक महत्त्व देतात. तंत्रज्ञान व अर्थकारण याची आवड असलेला वकील असल्याने त्यांना या क्षमतेचा धोरणे ठरविताना व राबविताना खूप उपयोग होतो. संख्याशास्त्र व आकडेवारीचीही त्यांना समज आहे. या सर्वांमुळे ते कोणत्याही घटनेत भक्कम कायदेशीर, आर्थिक, तांत्रिक व मुख्य म्हणजे लोकहिताच्या दृष्टीकोनातून काम करतात.

लेखक आणि कवी

देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तिमत्वाची एक हळुवार व संवेदनशील बाजूही आहे. जनतेबरोबर व्यवहार करताना त्यांचा हा पैलू दिसून येतो. सामान्य माणसाच्या वेदना आणि चिंता त्यांना समजतात व ते जनतेची गार्‍हाणी आस्थेवाईकपणे ऐकून घेतात. सर्वसामान्य माणसाच्या भूमिकेत शिरून त्याच्या नजरेतून विचार करणे त्यांना जमते. सर्वसामान्य माणसाच्या मनाचा ठाव घेऊन त्याच्या वेदना समजून घेत त्याच्या समस्येवर तोडगा काढणे हे त्यांचे कौशल्य आहे. अशा रितीने समस्येवर तोडगा काढला की, समोरच्या माणसाच्या चेहर्‍यावर हसू फुलते. अर्थकारणाचा रुक्ष विषय असो किंवा कविता असो ठिकठिकाणच्या त्यांच्या लेखनात त्यांची संवेदनशीलता प्रतिबिंबित होते. केंद्रीय अर्थसंकल्पाचे त्यांनी केलेले विश्लेषण ऐकण्याची दरवर्षी लोकांना उत्सुकता असते. ‘हाऊ टू अंडरस्टँड अँड रीड द स्टेट बजेट’ या अर्थसंकल्पावरील त्यांच्या पुस्तकाची राजकीय पंडित, अर्थविषयक पत्रकार आणि विद्यार्थ्यांकडून प्रशंसा झाली आहे.

वक्ता, वादविवादपटू, वैचारिक नेता

आर्थिक विषय, आपत्ती व्यवस्थापन किंवा कायदेशीर बाबी अशा कोणत्याही विषयावर बौद्धिक विश्लेषण आणि वैचारिक नेतृत्वाचे दर्शन घडविणार्‍या मांडणीबद्दल देवेंद्र फडणवीस यांची ख्याती आहे. गरीब आणि श्रीमंतांमधील आर्थिक दरी कशी भरून काढावी याबद्दलचे त्यांचे विचार आणि कल्पनांना जाणकारांकडून दाद मिळाली आहे. नोकरशाहीचे थर आणि वैयक्तिक लाभाच्या पलिकडे जाऊन सामान्य माणसाच्या गरजांना महत्त्व देण्यासाठी धाडसी निर्णय घेण्याचे श्रेय त्यांना आहे.
जेंव्हा देवेंद्र फडणवीस बोलतात त्यावेळी जग त्याची दखल घेते. राजकीय वर्तुळातील एक आघाडीचे वक्ते म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांची भाषणे मुद्देसूद व अर्थपूर्ण असतात आणि कोणताही आडपडदा न ठेवता ते बोलतात. त्यांना आकडेवारी तोंडपाठ असते. त्यांच्या भाषणांना सखोल संशोधनाचा आधार असतो आणि ते भाषणात कायद्याचा आणि आकडेवारीचा आधार देतात. केवळ बोलघेवडेपणा न करता कृतीवर भर देणारा आणि कधीकधी आधी काम करून मगच त्याबद्दल बोलणारा नेता त्यांच्या भाषणातून जनतेला, राजकीय सहकार्‍यांना आणि जगाला जाणवतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर भरगच्च सभागृहालाही त्यांनी सहजतेने संबोधित केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळातील भाषणे म्हणजे वादविवाद कौशल्य आणि अर्थपूर्ण मांडणीचा उत्तम नमुना असतो. संसदीय कामकाज आणि वादविवाद कौशल्य याबद्दल तरुण विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्या भाषणांचा उपयोग केला जातो.

शैक्षणिक पात्रता:

  • त्यांनी डी.एस.ई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला. ‘
  • एल.एल.बी (नागपूर विद्यापीठ)
  • बोस प्राईझ इन हिंदू लॉ’ विजेता  

वैयक्तिक माहिती

  • वय :४३
  • पत्नी: श्रीमती अमृता फडणवीस
  • सुपुत्री : कु. दिविजा फडणवीस
  • कार्यालय/निवास्थान : २७६,राव साहेब फडणवीस पार्क, धरमपेठ, नागपूर -४४००१०

Sunday, October 26, 2014

गायीचा मृत्यू ...कोळशाची वाहतूक ठप्प

गायीचा मृत्यू ...कोळशाची वाहतूक ठप्प

मुंगोली खाण परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत मुंगोली येथील मारुती ठाकरे यांच्या गायीचा मृत्यू झाला. नुकसानभरपाईसाठी संतप्त मुंगोलीवासींनी तब्बल सहा तास मुंगोली-घुग्घुस मार्ग रोखून धरला. या चक्‍काजाम आंदोलनामुळे कोळशाची वाहतूक ठप्प होती.
जादूटोण्याच्या संशयावरून हत्या

जादूटोण्याच्या संशयावरून हत्या

जादूटोण्याच्या संशयावरून चंद्रपूर जिह्ल्यातील सिंदेवाही तालुक्‍यातील सावरगाटा येथे राजेंद्र नारायण ठाकरे ची हत्या करण्यात आली.सावरगाटा येथील राजेंद्र नारायण ठाकरे हा जादूटोणा करीत असल्याचा काही गावकऱ्यांना संशय होता. याच संशयावरून गावातील वासुदेव बापुची मुळे, होमराज वासुदेव मुळे, ईश्‍वर वासुदेव मुळे व रमेश धानुजी सहारे यांनी राजेंद्रला लाठीकाठीने बेदम मारहाण केली.
चंद्रपूर महापौरपदासाठी ३० ला निवडणूक

चंद्रपूर महापौरपदासाठी ३० ला निवडणूक

चंद्रपूर -३० ऑक्‍टोबरला होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. या पदासाठी कॉंग्रेसकडून राखी कंचर्लावार, सुनीता अग्रवाल, सुनीता लोढिया, तर भाजपच्या अंजली घोटेकर, राष्ट्रवादीच्या संगीता त्रिवेदी व विद्यमान महापौर संगीता अमृतकर प्रयत्नशील आहेत. सध्या राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. विद्यमान महापौर व उपमहापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ ३० ऑक्‍टोबरला पूर्ण होत आहे. महापालिकेच्या ३३ प्रभागांसाठी ६६ नगरसेवक आहेत. कॉंग्रेस आघाडी व मित्रपक्षांचे ३८, भाजप १८, राष्ट्रवादी ४, शिवसेना ५ व मनसे १, असे नगरसेवकांचे संख्याबळ आहे.

Wednesday, October 22, 2014

मेयो अस्पताल चौक पर युवक की हत्या

मेयो अस्पताल चौक पर युवक की हत्या

नागपुर। मेयो अस्पताल चौक में एक युवक की अज्ञात आरोपी ने गला
चीरकर हत्या कर दी। मृतक का नाम आरिफ बताया गया है। गणेशपेठ के
थानेदार सुधीर नंदनवार ने बताया कि मृतक आरिफ का पूरा नाम नहीं मिल
पाया है। वह आस-पास की दुकानों में काम कर अपना उदर निर्वाह कर रहा
था। संभवत: वह मध्यप्रदेश का निवासी होगा। घटना बुधवार की शाम हुई।
सूत्रों के अनुसार बुधवार की शाम करीब 6.45 बजे पुलिस नियंत्रण कक्ष
को किसी ने सूचना दी कि मेयो अस्पताल चौक पर सड़क किनारे एक युवक
खून से लथपथ पड़ा है। कुछ समय बाद गणेशपेठ के थानेदार सुधीर नंदनवार
सहयोगियों के साथ घटनास्थल पर पहुंचे। पुलिस के पहुंचने से पहले वहां
भीड़ जुट गई थी। पुलिस को मृतक का पूरा नाम नहीं मिल पाया, योंकि वह
यहां की दुकानों में काम करके रात फुटपाथ पर सोकर गुजर बसर करता था।
किसी ने बताया कि उसका नाम आरिफ है। वह कुछ समय पहले नागपुर
आया। नागपुर आने के बाद वह मेयो अस्पताल चौक के पास एक शराब की
दुकान में कुछ समय तक काम किया। उसे इसी दुकान से शराब पीने की
आदत लग गई। उसके बाद उसकी कुछ शराबियों से दोस्ती हो गई। आरिफ
पहले जिस शराब की दुकान में काम करता था। उसी दुकान में जाकर गला
तर करने लगा। सूत्रों की मानें तो शराब की दुकान से नौकरी छोडऩे के बाद
आरिफ ने होटल, दवा की दुकानों में भी काम किया। वह शराब का सेवन
अधिक करने लगा, जिससे उसकी नौकरी छूट गई। इस गम में वह शराब
पीने के लिए नए दोस्त तलाशता था। उसकी इस नए दोस्त की तलाश ने
उससे उसकी जिंदगी छीन ली।
तीन अपक्ष आमदार  भेटले

तीन अपक्ष आमदार भेटले

  • नागपुरात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटले तीन अपक्ष आमदार.
  •  
  • नागपुरात ग्रामीण पोलिसांनी घितला "सिंघम रिटर्न' हा हिंदी चित्रपट  
  •  
  • कन्हान येथे दोन गटात जिवे मारण्याचा प्रयत्न : दोन्ही गटातील आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल
18 वर्षीय युवतीवर  सामूहिक अत्याचार

18 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार

धानोरा तालुक्‍यातील निमगाव येथील एका 18 वर्षीय युवतीवर चौघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. निमगाव येथील युवती 3 ऑक्‍टोबरला गावाबाहेर शौचास गेली असता चार जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
फटाक्यांची दुकाने लागली

फटाक्यांची दुकाने लागली

चंद्रपूर : चंद्रपुरात आझाद बाग, जटपुरा गेट परिसर, गोलबाजार तसेच प्रत्येक वॉर्डातील चौकाचौकात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची दुकाने लागली आहेत. मात्र यातील अनेक दुकानांमध्ये अपघात झाल्यास कोणतेही सुरक्षा साधन नाही. एवढेच नाही तर, अनेकांकडे फटाके विक्रीचा परवाना नसतानाही ते राजरोसपणे फटाके विक्री करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत: दक्ष राहून स्वत:ची सुरक्षा स्वत: करणे गरजेचे आहे.

फडणवीस / मुनगंटीवार मुख्यमंत्री?

फडणवीस / मुनगंटीवार मुख्यमंत्री?

भारतीय जनता पार्टीला मुख्यमंत्रिपदासाठी  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवारया दोन नावांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

२७, २८ ऑक्टोबरला भाजपाची विधिमंडळ पक्षनेता निवडीची बैठक होण्याची शक्यता आहे. पक्षाचे महाराष्ट्रातील केंद्रीय निरिक्षक असणारे ओम माथूर यांनी सप्ष्ट केले की सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडे पुरेसे संख्याबळ आहे आणि ती प्रक्रिया दिवाळी नंतरच सुरु केली जाईल.  विधिमंडळ पक्षनेता निवडीच्या प्रक्रियेच्या दिवशीच मुख्यमंत्र्याच्या शपथविधीची शक्यता असून, ५ ते ७ नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाची स्थापना केली जाण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

वाघाला रेडिओ कॉलर

वाघाला रेडिओ कॉलर

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोर झोनमधील नर व मादीला कॉलर लावल्यानंतर यश आले. वाघाला रेडिओ कॉलर लावण्यासाठी वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे तज्ज्ञ अभ्यासक डॉ. हबीब बिलाल, डॉ. पराग निगम, क्षेत्र संचालक डॉ. जी. पी. गरड, ताडोबा कोरचे कळसकर, मधुरा निलांजन आणि अनिल हे तज्ज्ञ प्रयत्न करीत होते.
नवख्यांसमोर आश्‍वासनपूर्तीचे आव्हान

नवख्यांसमोर आश्‍वासनपूर्तीचे आव्हान


वृत्तविश्‍लेषण
देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा


लोकसभेत जी भाजपची लाट होती, ती विधानसभेत येणार नाही, असे राजकीय जाणकारांसह ग्रामस्थदेखील बोलून दाखवित होते. मात्र, साऱ्यांचे गणित चुकवून ग्रामीण जिल्ह्यात यंदा नवे राजकीय समीकरण तयार झाले. जुण्याजाणत्या उमेदवारांना धूळ चारून नवख्यांनी दिवाळीपूर्वीचे राजकीय कुस्ती जिंकली. पहिल्यांदाच विधानसभेची पायरी चढणाऱ्या या नवख्या आमदारांसमोर आता आश्‍वासनपूर्तीचे आव्हान आहे.
हिंगणा विधानसभेत भाजपचे विजय घोडमारे यांची तिकीट कापून समीर मेघे यांना उमेदवारी देण्यात आली. माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचा राजकीय वारसा समीर यांना लाभला आहे. मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असलेले मुरब्बी नेते रमेशचंद्र बंग यांच्याशी थेट लढत देण्यात टिकतील काय, अशी भीती अनेकांना होती. मात्र, नवख्या समीर मेघेंनी 84 हजारांवर मते घेऊन भाजपसह मेघे घराण्याची ताकद दाखवून दिली.
काटोल मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल देशमुख हे चारदा आमदार झाले. सलग 20 वर्षे त्यांनी मंत्री म्हणूनही मंत्रिमंडळात काम केले. त्यानंतरही भाजपचे उमेदवार डॉ. आशीष देशमुख यांच्यासमोर पराभव पत्कारावा लागला. या मतदारसंघात आजवर राष्ट्रवादीशिवाय अन्य मोठा पक्ष नव्हता. येथे शिवसेनेचे वर्चस्व असतानाही भाजपला मिळालेली मते परिवर्तनाची नांदीच म्हणावी.
रामटेक मतदारसंघात शिवसेना किंवा कॉंग्रेसशिवाय दुसऱ्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊच शकत नाही, हा भ्रम भाजपच्या डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या विजयाने मोडीत काढला. रामटेक म्हणजे शिवसेनेचा गड समजला जायचा. याच लोकसभा मतदारसंघातून सेनेच्या तिकिटावर सुबोध मोहिते निवडून आले होते. मात्र, हा गड आता भाजपच्या ताब्यात गेला आहे. रेड्डी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण जनतेच्या अडीअडचणी समजून समाजसेवा सुरू केली होती. त्याचे फळ यानिमित्ताने हाती पडले.
जिल्ह्यातील सावनेर, कामठी आणि उमरेड या तिन्ही मतदारसंघांत जुन्यांना संधी देण्यात आली. सावनेर वगळता जिल्ह्यातील सर्व पाचही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आली आहेत. राज्यात सत्ता स्थापन होत असल्याने सर्व भाजप आमदारांच्या आशा बळावल्या आहेत, तर ग्रामस्थ नवख्यांकडून विकासाच्या आश्‍वासनपूर्तीच्या अपेक्षेत आहेत.

बावनकुळेंना लालदिव्याची शक्‍यता?
कामठी मतदारसंघातून विजयाची हॅटट्रीक करून तिसऱ्यांदा आमदार झालेले चंद्रशेखर बावनकुळे यांना लालदिवा मिळण्याची शक्‍यता आहे. गेल्या 25 वर्षांपासून राजकारणात असलेले बावनकुळे यांनी जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा प्रवास केला आहे. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि आता प्रदेश सचिव पदावर कार्यरत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जवळचे ते असून, त्यांनी बांधकाम खात्याच्या मंत्रिपदासाठी इच्छा बोलून दाखविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Sunday, October 19, 2014

उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी

उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी

राजूरा

.क्र. .क्र.
उमेदवाराचे संपूर्ण नाव
पक्ष
मिळालेली मते
1
प्रभाकर विठ्ठलराव दिवे
स्वतंत्र भारत पक्ष
16439
2
हेमंत वैरागडे
शिवसेना
5912
3
सुभाष रामचंद्रराव धोटे
भारॉका
63945
4
संजय यादवराव धोटे
भाजपा
66223
5
सटवा केरवा थोरात
अपक्ष
837
6
सुदर्शन भगवानराव निमकर
रॉका
29528
7
विद्यासागर कालीदास कासर्लावार
अपक्ष
798
8
अरुण वसंतराव वासलवार
अपक्ष
1254
9
प्रेमदास फकरुजी मेश्राम
अपक्ष
1113
10
शोभाताई गजानन मस्के
अखिल हिंन्द फारवर्ड ब्लॉक
670
11
भारत कवडू आत्राम
बहुजन समाज पार्टी
8049
12
मदन रघुजी बोरकर
अपक्ष
1565
13
सुधाकर नारायण किनाके
गोंडवाना गणतंत्र पार्टी
7601
14
सुधाकर ताराचंद राठोड
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
3618
15
उध्दव पिठुजी नारनवरे
आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
1251
16
प्रविण मारोती निमगडे
राष्ट्रीय बहुजन काँग्रेस पार्टी
505
( श्री.संजय धोटे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी घोषित )


चंद्रपूर


.क्र. .क्र.
उमेदवाराचे संपूर्ण नाव
पक्ष
मिळालेली मते
1
प्रकाश शंकर रामटेके
बहुजन मुक्ती पार्टी
552
2
मिलींद दहिवले
अपक्ष
418
3
रविंद्रनाथ माधव पाटील
आंबेडराईट पार्टी ऑफ इंडिया
413
4
अनिरुध्द धोंडू वनकर
भारिप बहुजन महासंघ
14683
5
नलबोगा नलबोगा चिन्नाजी
अपक्ष
1698
6
प्रफुल गजानन खोब्रागडे
अपक्ष
437
7
सुनिता भगवान गायकवाड
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
1288
8
अंकलेश नथ्थुजी खैरे
बहुजन समाज पार्टी
8357
9
महेश मारोतराव मेंढे
इंडियन नॅशनलीस्ट काँग्रेस
25140
10
किशोर गजानराव जोरगेवार
शिवसेना
50711
11
नानाजी सिताराम शामकुळे
भारतीय जनता पार्टी
81483
12
अशोक नामदेवराव नागापूरे
रॉका
7459
13
प्रमोद मंगरुजी सोरते
रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया ए.
227
( श्री.नानाभाऊ शामकुळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी घोषित )


बल्लारपूर


.क्र. .क्र.
उमेदवाराचे संपूर्ण नाव
पक्ष
मिळालेली मते
1
रमेशचंद्र दत्तात्रय दहिवडे
कम्युनिष्ट पार्टी ऑफ इंडिया मा.
1571
2
राजु नेताजी मादांडे
बहुजन मुक्ती पार्टी
973
3
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार
भाजपा
103718
4
संजय निलकंठ गांवडे
अपक्ष
628
5
केशवराव बेनीराम कटरे
शिवेसना
2555
6
वासुदेव परशुराम पिंपरे
अपक्ष
788
7
घनशाम घुशीमल मुलचंदानी
भारॉका
60118
8
ॲड.सौ हर्षल कुमार चिंपळुणकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
1964
9
राजेश दुर्गासिंग सिंग
बहुजन समाज पार्टी
10344
10
मनोज धर्मा आत्राम
गोंडवाना गणपतंत्र पार्टी
6838
11
वामन दाऊजी झाडे
रॉका
1867
12
आनंद सिकंदर लाकडे
आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
750
13
प्रज्योत देविदास नळे
अपक्ष
1089
14
सौ.वंदना अजय चव्हाण
रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया
452
15
संतोष मुका रामटेके
रिपब्लीकन पक्ष (खोरिपा)
563
( श्री.सुधीर मुनगंटीवार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी घोषित )


ब्रम्हपूरी


.क्र. .क्र.
उमेदवाराचे संपूर्ण नाव
पक्ष
मिळालेली मते
1
प्रकाश बळवंतराव बन्सोड
भारिप बहुजन महासंघ
790
2
अतुल देविदास देशकर
भारतीय जनता पार्टी
56763
3
संदिप वामनराव गड्डमवार
रॉका
44878
4
जयप्रकाश नागो धोंगडे
अपक्ष
198
5
विजय नामदेवराव वडेट्टीवार
भारॉका
70373
6
प्रकाश मारोतराव लोणारे
अपक्ष
538
7
प्रदीप टिकाराम महाजन
अपक्ष
376
8
हरीदास लहानुजी लाडे
अपक्ष
1500
9
महेन्द्र लालाजी साखरे
बहुजन मुक्ती पार्टी
283
10
विश्वनाथ सित्रुजी श्रीरामे
अपक्ष
990
11
सुखदेव गणपत प्रधान
अपक्ष
433
12
गिरीष सुधाकरराव जोशी
अपक्ष
370
13
योगराज कृष्णाजी कुथे
बहुजन समाज पार्टी
7631
14
विनोद रामदास झोडगे
कम्युनिस्ट पार्टी इंडिया
2385
15
विश्वास रंगराव देशमुख
महाराष्ट नवनिर्माण सेना
756
16
देविदास नारायण बाणबले
शिवसेना
1377
( श्री.विजय वडेट्टीवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार विजयी घोषित )




  चिमूर


.क्र. .क्र.
उमेदवाराचे संपूर्ण नाव
पक्ष
मिळालेली मते
1
दिपक शिवराम कोसे
अपक्ष
790
2
हरीराम पांडूरंग दहिकर
अपक्ष
956
3
विलास नामदेवराव दोनोडे
अपक्ष
911
4
दयाराम उरकुडा मुन
अपक्ष
397
5
किर्तीकुमार नितेश भांगडिया
भाजपा
87377
6
अरविंद आत्माराम सांदेकर
मनसे
7177
7
कुरेशी महमद इकलाख महम्मद युसुफ
सोशालिष्ट पार्टी (इंडिया)
1340
8
देवराव काशिनाथ बनसोड
आंबेडकररिष्ट रिपब्लीकन
450
9
लहुजी राजेश्वर पाटील
अपक्ष
349
10
हेंमत भिमराव भैसारे
आरपीआय ए
455
11
जितेंद्र आडकुजी राऊत
अखिल भारतीय मानवता पक्ष
367
12
विजय हिरामन इंदूरकर
अपक्ष
365
13
रमेश तुळशिराम नान्ने
अपक्ष
355
14
प्रभाकर कृष्णाजी सातपैसे
अपक्ष
306
15
गोंविदराव बाबुराव भेंडारकर
रॉका
2738
16
दामोधर लक्ष्मण काळे
अपक्ष
511
17
भगवान विठुजी नन्नावरे
आंबेडकरराईट पार्टी आँफ इंडिया
1287
18
गजानन तुकाराम बुटके
शिवसेना
12105
19
दिनेश दौलतराव मेश्राम
अपक्ष
387
20
परशुराम वारलुजी नन्नावरे
अपक्ष
279
21
भगवान आत्माराम वरखडे
बहुजन मुक्ती पार्टी
417
22
रमेशकुमार बाबुरावजी गजभे
अपक्ष
762
23
नरेंद्र नामदेवराव राजुरकर
अपक्ष
297
24
देवराव माधोराव भुरे
अपक्ष
594
25
अविनाश मनोहर वारजुकर
भारॉका
62222
26
विनोद लक्ष्मण देठे
भारीप
423
27
नरेंद्रकुमार गुलाबराव दडमल
बहुजन समाज पार्टी
9841
28
दयाराम शिवराम कन्नाके
गोंडवाना गणतंत्र पार्टी
700
29
बाबुराव लक्ष्मण दांडेकर
अपक्ष
384
( श्री.किर्तीकुमार भांगडिया भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी घोषित )



वरोरा

.क्र. .क्र.
उमेदवाराचे संपूर्ण नाव
पक्ष
मिळालेली मते
1
शेख रजाक शेख रसीद
अपक्ष
334
2
रुपेशकुमार अर्जुन घागी
अपक्ष
1127
3
दिलीप नारायण दरेकर
बहुजन मुक्त पार्टी
1151
4
सुरेश नारायण धानोरकर
शिवसेना
53877
5
अजय हिरन्ना रेड्डी
कम्युनिष्ट पार्टी ऑफ इंडिया
1611
6
केशव रामदास लोणारे
आंबेडकररिष्ट रिपब्लीकन पार्टी
406
7
जयवंत मोरेश्वर टेमुर्डे
रॉका
4720
8
सिध्दार्थ सुमन वारके
रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया
681
9
कु.तारा महादेव काळे
अपक्ष
428
10
विलास नामदेव परचाके
गोंडवाना गणतंत्र पार्टी
2015
11
डॉ.आसावारी विजय देवतळे
भारॉका
31033
12
दिनेश शिवराव पढाल
अपक्ष
2214
13
सुनील निळकंठ खोब्रागडे
भारीप बहुजन महासंघ
1262
14
भुपेन्द्र वामन रायपूरे
बहुजन समाज पार्टी
18759
15
संजय वामनराव देवतळे
भाजपा
51873
16
प्रदीप शामराव देशमुख
अपक्ष
1252
17
डॉ.अनिल लक्ष्मण बुजोने
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
7981
18
दुर्गा प्रशांत भडगरे
अपक्ष
439
(श्री.सुरेश उर्फ बाळु धानोरकर शिवसेनेचे उमेदवार विजयी घोषित)



पहिल्या पाच उमेदवारांचे मताधिक्‍य

पहिल्या पाच उमेदवारांचे मताधिक्‍य

नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील 
पहिल्या पाच उमेदवारांचे मताधिक्‍य
भाजप  5
कॉंग्रेस 1
 
1. रामटेक
1) डी. मल्लीकार्जून रेड्डी- भाजप- 59343
2)आशिष जयस्वाल - शिवसेना- 47262
3) सुबोध मोहिते- कॉंग्रेस- 35546
4) योगेश वाडिभस्मे- मनसे - 2343
5) डॉ. अमोल देशमुख- राष्ट्रवादी- 9162
------------------------------
--
2. सावनेर
1) सुनील केदार- कॉंग्रेस - 84630
2) विनोद जिवतोडे- शिवसेना- 75421
3) सुरेश डोंगेरे- बहूजन समाज पक्ष- 11097
4) प्रमोद ढोले- मनसे- 1042
5) किशोर चौधरी- राष्ट्रवादी- 6139
--------------------------------
3. उमरेड
1) सुधीर पारवे- भाजप- 92399
2) रुक्षदास बनसोड- बसप- 34077
3) राजू पारवे- 23497
4) रमेश फुले- राष्ट्रवादी- 2747
5) जगन्नाथ अभ्यंकर- शिवसेना- 7180
-------------------------------
4. कामठी
1) चंद्रशेखर बावनकुळे- भाजप - 126755
2) राजेंद्र मूळक - कॉंग्रेस - 86753
3) महेंद्र लोधी- राष्ट्रवादी - 752
4) तापेश्‍वर वैद्य- शिवसेना - 12791
5) नंदा गजभिये- आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया - 802
-------------------------------
5. काटोल
1) डॉ. आशिष देशमुख- भाजप- 70344
2) अनिल देशमुख - राष्ट्रवादी कॉंग्रेस - 64787
3) दिनेश ठाकरे - कॉंग्रेस 4778
4) राजेंद्र हरणे - शिवसेना - 13575
5) दिलीप गायकवाड - महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 943
------------------------------------
6. हिंगणा
1) समीर मेघे- भाजप - 84139
2) रमेशचंद्र बंग - राष्ट्रवादी 60981
3) कुंदा राऊत - कॉंग्रेस 20573
4) भदन्त महापंत - बसप 19450
5) प्रकाश जाधव - शिवसेना 6997