Showing posts with label लातूर. Show all posts
Showing posts with label लातूर. Show all posts

Tuesday, November 28, 2017

अपघातात सात ठार

अपघातात सात ठार

लातूर : क्लूजर वाहनाने रस्त्यावर उभारलेल्या आयशर टेम्पोसह समोरून येणाऱ्या दुसऱ्या क्लूजर वाहनाला धडक देऊन झालेल्या अपघातात सात जण जागीच ठार तर तेराजण जखमी झाले आहेत.

लातूर - नांदेड रस्त्यावर लातूरपासून पाच किलोमीटर अंतरावरील कोळपा (ता. लातूर) गावाजवळील एका पुलाच्या कडेला आज (मंगळवारी) पहाटे साडेचार वाजता हा अपघात घडला. जखमींवर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Saturday, November 18, 2017

भीषण अपघातात 8 ठार

भीषण अपघातात 8 ठार


लातूर- एसटी बस,ट्रक आणि गाडीच्या भीषण अपघातात 8 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. लातूरच्या चलबुर्गा पाटी औसाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये अनेक प्रवाशी जखमी झाले असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.