नागपूर/प्रतिनिधी:
राज्यातील बल्लारशाह आणि चंद्रपूर ही दोन रेल्वे स्थानकं सौंदर्यीकरण स्पर्धेची विजेती ठरली आहेत. रेल्वेच्या स्टेशन सौंदर्यीकरण स्पर्धेत या दोन स्थानकांना प्रथम पारितोषिक विभागून देण्यात आले आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने या दोन स्थानकांवर विदर्भातील प्रसिद्ध तोडाबा राष्ट्रीय उद्यान आणि स्थानिक आदिवासी कलेच्या आधारे पेंटिंग्स, मूर्त्यांची कलाकृती आणि भित्तीचित्रांचा वापर करत हे सौंदर्यीकरण केले आहे.
या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर आहे बिहारमधील मधुबनी स्थानक. स्थानिक कलाकारांनी मधुबनी पेंटिंगने या संपूर्ण स्थानकाचे सौंदर्यीकरण केले आहे. त्याच प्रमाणे तामिळनाडूतील मदुराई स्थानकालाही या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला आहे.
असून अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकाराचे साठी अभिनंदन केले जात आहे. वनमंत्री म्हणून आपली छाप सोडणारे सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळे बाग-बगीचे निर्माण केले आहे . नैसर्गिक सौदर्याची आवड असणाऱ्या या मंत्र्यांनी अगदी फुलपाखरांच्या बागीच्यापासून निर्माण होणाऱ्या प्रत्येक इमारतीमध्ये नैसर्गिक सजावटीवर भर दिली आहे त्याचे देखणेपण वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयाच्या चमूने या दोन रेल्वे स्टेशन आकर्षक स्वरूप दिले असून त्याची नोंद या स्पर्धेमध्ये घेण्यात आली आहे .पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे यासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील दूरध्वनी करून स्वागत केले आहे. रेल्वे स्टेशनला या स्पर्धेमध्ये मिळालेल्या पुरस्काराबद्दल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आनंद व्यक्त केला असून याचे खरे श्रेय नागपूर येथील चित्रकला महाविद्यालयाच्या चमूला जात असून त्यांनी या ठिकाणच्या कलेला आणि या ठिकाणच्या वनवैभवाला चित्रात आणि हस्तकलेत अतिशय योग्य पद्धतीने साकारल्यामुळेच हे रेल्वेस्टेशन देशभरात ओळख घेऊन पुढे आले आहे. चंद्रपूरकरांसाठी ही अभिमानाची बाब असून यापुढे चंद्रपूरची ओळख देशातले सजावटीचे रेल्वे स्थानक अशी असेल असे त्यांनी अभिमानाने सांगितले.