সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, May 30, 2015

पदे सरळसेवेने भरणार

पदे सरळसेवेने भरणार

जलसंपदा विभागांतर्गत कनिष्ठ अभियंताची 1400 पेक्षा अधिक पदे सरळसेवेने भरणार

जलसंपदा विभागामार्फत कनिष्ठ अभियंता पदावरून उपअभियंता/उपविभागीय अधिकारी या पदावर 473 पदे पदोन्नतीने भरण्यात आली आहेत. सदर पदोन्नतीची प्रक्रिया तातडीने राबविणेबाबत फेब्रुवारी 2014 मध्ये सुरू करण्यात आली व त्याप्रमाणे चार महिन्यांच्या कालावधीत 473 पदे पदोन्नतीने भरण्यात आली. एवढ्या अल्प कालावधीत मोठ्या प्रमाणावर पदोन्नतीने उपअभियंताची पदे भरण्याची प्रक्रिया पहिल्यांदाच झाल्याचे जलसंपदा मंत्र्यांनी सांगितले. या पदांमध्ये विदर्भातील 130 पदे मराठवाड्यातील 93 पदे समाविष्ट आहेत. यामुळे विविध विभागांतर्गत प्रलंबित प्रकल्‍पांना गती देणे सुकर होणार आहे. तसेच शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता या पदावरील मोठ्या प्रमाणात बऱ्याच कालावधीपासून रिक्त असलेल्या जागा देखील तातडीने भरण्याबाबत जलसंपदा मंत्र्यांनी निर्देश दिले असून सुमारे 1400 पेक्षा अधिक पदे सरळसेवेने भरण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
प्रलंबित 32 प्रकल्पांना शासनाची सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान

दरम्यान बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या विविध 32 प्रकल्पांना शासनाची सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे सदर प्रकल्प मार्गस्थ होण्यातील मोठा अडसर दूर झाला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी महाकाय पुनर्भरण योजनेचा समावेश असून विदर्भातील एकूण 12 व मराठवाड्यातील एकूण 7 प्रकल्पांचा समावेश आहे.
बल्लारपूर उपविभागीय कार्यालय उद्घाटन

बल्लारपूर उपविभागीय कार्यालय उद्घाटन

बल्लारपूर विधानसभा क्षेत्र राज्यात आदर्श बनविणार - सुधीर मुनगंटीवार 



चंद्रपूर : कोट्यवधी रुपयांचे सिमेंट रस्ते, 100 कोटींचे वनस्पती उद्यान, सैनिकी शाळा, अद्ययावत असे तालुका क्रिडा संकुल अशा विविध विकास कामांचा झंझावात बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात सुरु असून पुढील 4 वर्षांत बल्लारपूर तालुका विकासाच्या दृष्टीने राज्यात आदर्श बनविणार असल्याचा संकल्प पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
दोन डॉक्‍टरांसह पाच ठार

दोन डॉक्‍टरांसह पाच ठार

नागपूर : छिंदवाडा जिल्ह्यातील जुंगवाही गावाजवळ ट्रक- मारुती स्वीफ्ट कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन डॉक्‍टरांसह पाच जण ठार झाले. ही घटना 30 मे रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली.
मृतात नागपूरचे प्रसिद्ध डॉक्‍टर डॉ. अनिल गोल्हर यांचा मुलगा डॉ. साकेत गोल्हर, खापरखेडा येथील डॉ. आशिष बांडोले, वैद्यकीय प्रतिनिधी सत्येंद्र अवदेश सिंग, विजय ठाकरे आणि हॉस्पिटल कर्मचारी यांचा समावेश आहे. हिंगणा मार्गावरील लता मंगेशकर हास्पिटलमध्ये कार्यरत डॉ. साकेत गोल्हर हे पचमेढी येथे आरोग्य शिबिराकरिता चार जणांसह गेले होते. परत येताना त्यांच्या मारुती स्वीफ्ट एम. एच. 40/एसी 5852 ला ट्रकने धडक दिली. यात पाचही जण ठार झाले. 

Friday, May 29, 2015

स्वच्छता अभियान बंद

स्वच्छता अभियान बंद


वे को ली कामगार वसहति में दो महीनो से स्वच्छता अभियान बंद।


घुग्घुस - वे को ली वणी परिक्षेत्र में ही सब से अधिक कामगार वसहति परिसर में पिछले दो महीनो से साफ सफाई बन्द रहने से कूड़ादान पेटी में क्षमता से अधिक् कचरा होचुका है।इस कचरे में फालतू जानवर चरते देखा जा सकता है। प्राप्त जानकारी के अनुसार रामनगर,गांधी नगर,सुभाष नगर,राजीव नगर,इंदिरा नगर,शास्त्री नगर कॉलोनी परिसर में पिछले दो महीनो से सफाई नहो ने से इस कचरे में फल फूल तहे विशेरि जानलेवा कीटाणु घरो में प्रवेश कर स्वस्त पर बुरा परिणाम निर्माण कररहे है।इन वे को ली वसहति में पच हजार से भी अधिक इंसान निवासित है इन में से 70 प्रतिशत लोग ह्रदय रोग,चर्म रोग,धमा जय सी जानलेवा भिमारियों से पहले से ही जंज रहे है। वे को ली वणी क्षेत्र के सब से बड़ी कामगार वसहति में स्वच्छतापर यहाँ के अला बड़े अधिकारी , यूनियन वा घुग्घुस ग्राम पंचायत के लोग अनदेखी कर 5000 पाँच हजार नागरी कोण की स्वस्त के साथ खिलवाड़ कररहे है

Thursday, May 28, 2015

चंद्रपुरात जाणारी दारू बुटीबोरीत जप्त

चंद्रपुरात जाणारी दारू बुटीबोरीत जप्त

सात जणांना अटक : नागपूर जिल्ह्यातील चार जणांचा समावेश

बुटीबोरी,  : बंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात अवैध मार्गाने जाणाऱ्या दारूचा साठा बुटीबोरी पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी महिलेसह तिघांना अटक करण्यात आली. याशिवाय अवैध दारू नेताना आणखी चार जणांना ताब्यात घेण्यात आले.
एमआयडीसीतील इंडो रामा गेट क्र. 3 च्या समोर 27 मे रोजी पहाटेच्या सुमारास गस्त घालणाऱ्या पोलिसांना काही व्यक्ती संशयास्पद स्थिती दिसले. त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडील महिंद्रा एक्‍सयुव्हि कार (क्र. एमएच-31/ ईए- 8787) ची तपासणी करण्यात आली. त्यात मॅकडोनॉल्ड नं. 1-व्हिस्की, प्रत्येकी 180 एमएलच्या 201 बाटल्या, ऑफिसर्स चॉईस व्हिस्की प्रत्येकी 180 एमएलच्या 34 बाटल्या आढळल्या. ही या दारूची किंमत 45 हजार 300 रुपये आहे. याप्रकरणी चंद्रपूरच्या राहुल रवींद्र गिरी (वय 22), भारत किसन पडेलवार (वय 22) आणि एका महिलेचा समावेश आहे. याशिवाय उमेश गोपाल धुर्वे (वय 28, रा. खापरखेडा), गणेश बापूराव पाटील (वय 34, रा. कामठी) विजय राजकुमार शर्मा (वय 27, रा. कन्हान), रॉकी धनराज संतापे (वय 32, रा. कामठी) यांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल दौंड करीत आहेत.

Wednesday, May 27, 2015

चार वाजंत्री ठार

चार वाजंत्री ठार

लग्नाच्या वाहनाला अपघात

ट्रकने टाटा सुमोला चिरडले

कन्हान (जि. नागपूर) : मौदा तालुक्‍यातील रेवराल येथून नागपूर येथे विवाहासाठी जाणाऱ्या बॅंण्ड पार्टीच्या टाटासुमोला ट्रकने चिरडले. यात चार जणांचा मृत्यू झाला. सहा जण गंभीर आहेत. ही घटना कन्हान परिसरातील नीलज (खंडाळा) गावाजवळ बुधवारी (ता. 27) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. मृतात गणपत रामाजी हरकंडे (वय 28, रा. रेवराल), राष्ट्रपाल सुखराम बावणे (वय 27) मु. पो. टावेपार (भंडारा), राजू सोनवाने, कपूरचंद लाडेकर यांचा समावेश आहे.
रेवलराल येथील बेबीताई ठाकरे यांच्या मुलाचा विवाह नागपूर येथे होता. वरपक्षाची मंडळी सकाळीच निघाली. टाटो सुमो (क्र. एम.एच. 31 झेड-06335) मध्ये सर्व बॉण्ड पार्टीचे वाजंत्री बसले होते. हे वाहन तारसा-कन्हानमार्गे जात असताना नीलज (खंडाळा)जवळ समोरून आलेल्या दहाचाकी ट्रक (क्र. एम.एच. 49-0508)ने जोरदार धडक दिली. दोन्ही वाहने भरधाव होती. त्यामुळे ट्रकने सुमोला रस्त्याच्या खाली फरफटत नेत चिरडले. यात सुमोचा चेंदामेंदा झाला. यात गणपत रामाजी हरकंडे (वय 28, रा. रेवराल) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. यात बसलेले सर्वजण गंभीर जखमी झाले. वाहनात फसलेल्या सर्वांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, राष्ट्रपाल सुखराम बावणे (वय 27) मु. पो. टावेपार (भंडारा) याचा मेयो रुग्णालय नागपूर येथे हलविल्यानंतर मृत्यू झाला. अतिगंभीर जखमीत राजू सोनवाने, कपूरचंद लाडेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एक अनोळखी व्यक्तीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मेयोतील वॉर्ड क्रमांक 21मध्ये जितेंद्र ताराचंद वाढवे (वय 24, पुजारी टोला गोंदिया), रामा जगन हरकंडे (वय 50), बबन केशवराव लेंढे (वय 42, रा. रेवराल), गणेश मारोतराव शेंडे (वय 30, रा. कोदामेंढी), पंकज सुखराम बावणे (वय 26, टावेपार, जि. भंडारा) यांना भरती करण्यात आले.

Tuesday, May 26, 2015

तिवारी बंटी बबलीविरुद्ध गुन्हा दाखल

तिवारी बंटी बबलीविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर : भाग्यलक्ष्मी पंâड योजनेअंतर्गत बंटी बबलीने गुंतवणूकदारांना दामदुप्पट व्याजाचे आमिष दाखवून ४ लाख ५४ हजार २०० रुपयाचा अनेकांना गंडा घातल्याचे प्रकरण कोतवाली हद्दीत नुकतेच समोर आले आहे. हे फसवणूकीचे प्रकरण नोव्हेंबर २०१३ ते २०१४ दरम्यानचे आहे.

Saturday, May 23, 2015

पेपर मिलला  आग

पेपर मिलला आग

कोंढाळी जवळ असलेल्या हरदोली पेपर मिलला आज दुपारच्या सुमारास आग लागल्याने, या आगीत पाच कोटीं रुपयांचा पेपर जळून राख झाला आहे. अमरावती मार्गावरील हरदोली येथील पेपरमिल शनिवारी दुपारी 11.45 वाजता आग लागली. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्‍यात आली. कोंढाळीपासून जवळ असलेल्या हरदोली येथे पेपर मिल आहे. येथील एका खर्ड्याला आग लागली. सुसाट्याच्या वाऱ्यामुळे आग पसरली. जळता तुकडा उच्च प्रतिच्या कागदावर पडला आणि आगीने संपूर्ण मिल कवेत घेतली. बायलरजवळील कच्चा माल जळून खाक झाला. यात पाच कोटींच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Wednesday, May 20, 2015

सोशल मीडियातील पत्रकारितेलाही पुरस्कार

सोशल मीडियातील पत्रकारितेलाही पुरस्कार


 मंगळवार, १९ मे, २०१५



मुंबई : प्रगत तंत्रज्ञानामुळे नवनवी माध्यमे निर्माण झाली असून अभिव्यक्तीसाठी सोशल मीडिया व ई-माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे लक्षात घेऊन राज्य शासनाकडून सोशल मीडियातील पत्रकारितेसाठी राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे. 41 हजार रूपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

विकास पत्रकारितेत योगदान देणाऱ्‍या मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील पत्रकारितेसाठी शासनाकडून पुरस्कार दिले जातात. त्याचप्रमाणे सोशल मीडियासाठीही पुरस्कार देण्यात येणार आहे. संकेतस्थळ व ब्लॉग या सोशल मीडियातील प्रसारित मराठी भाषेतील वृत्त व पत्रकारिताविषयक मजकुरासाठी ही स्पर्धा आहे. या माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्‍या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना सहभाग घेता येईल.

स्पर्धेच्या नियमानुसार स्वतंत्र ब्लॉगद्वारे लेखन केलेले असल्यास ब्लॉगला किमान एक वर्ष पूर्ण झालेले असावे. वृत्तविषयक संकेतस्थळ हे अधिकृत असावे व सोशल मीडियाचा वापर करताना केंद्र शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका या विकास पत्रकारिताविषयक लेखनाच्या असणे आवश्यक असून त्यात शासनाच्या विविध योजनांना पूरक अभिव्यक्ती असणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शासन निर्णय उपलब्ध आहे.

Tuesday, May 19, 2015

“सायकल चालवा - प्रदूषण हटवा”

“सायकल चालवा - प्रदूषण हटवा”

  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त्या सायकल रली
  • चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचा उपक्रम
प्रदूषणाच्या बाबतीत देशात अग्रक्रमावर असलेल्या चंद्रपूर शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे आणखी प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे चंद्रपूर करांमध्ये सायकल चालविण्याची आवड निर्माण व्हावी, या उद्धेशाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्य चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे सायकल रालीचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात विविध संघटना या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
५ जून रोजी स्थानिक गांधी चौकातून सकाळी ८ वा. सायकल रालीची सुरुवात होणार आहे. हि राली प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकाला वळसा घालून पुन्हा गांधी चौकात जाणार असून प्रत्येकांनी किमान आठवड्यातून एक दिवस सायकल चालवावी, असा संदेश देणार आहे.

Sunday, May 17, 2015

चंद्रपूर उपविभागाचे विभाजन

चंद्रपूर उपविभागाचे विभाजन

चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर उपविभागाचे विभाजन.... चंद्रपूर व बल्लारपूर असे दोन उपविभाग होणार... नवनिििर्मत उपविभागीय अधिकारी कार्यालयात पदभरती होणार..

Saturday, May 16, 2015

नराधम पित्याचा पोटच्या दोन मुलींवर अत्याचार

नराधम पित्याचा पोटच्या दोन मुलींवर अत्याचार

कामठीत नराधम बापाला अटक

कामठी : एका नराधम बापाने चाकूच्या धाक दाखवून स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना कामठी येथील कामगार नगर येथे आज ता. 16 षनिवारला उघडकीस आली. पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नराधम पित्याविरूध्द गुन्हा दाखल केली. कामठी पोलीसांना आरोपी नराधम पित्यास अटक केली असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Friday, May 15, 2015

सोमनाथच्या श्रमविद्यापिठात तरुणाई गिरविणार श्रमाचे धडे

सोमनाथच्या श्रमविद्यापिठात तरुणाई गिरविणार श्रमाचे धडे

सचिन वाकडे 
मूल- श्रमर्षी बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या सोमनाथ प्रकल्प ( ता. मूल जि. चंद्रपूर ) येथे शुक्रवार दिनांक 15 मे पासून तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात श्रमसंस्कार छावणीला सुरुवात झाली असून श्रमसंस्कार छावणीचे हे सलग 48 वे वर्ष आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि  ईतर राज्यातून सहाशेच्यावर युवक युवती शिबिर स्थळी पोहचले आहेत.
महारोगी सेवा समितीच्या वतीने स्थापन झालेल्या आनंदवन मधील कृष्ठरुग्णांनी बाबा आमटेंच्या प्रेरणेतून सोमनाथ प्रकल्प उभा केला आहे. 1967 साली देशभरातील युवकांना एकत्रित करुन याच प्रकल्पात श्रमसंस्कार छावणी सुरु करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत या श्रमसंस्कार छावणीत सहभागी होण्यासाठी युवक युवती वर्षभर मे महिण्याची वाट पाहतातदरवर्षी दि. 15 मे ते 22 मे दरम्यान हे शिबिर पार पडते. चंद्रपूर सारख्या हाॅट जिल्हयात मे महिण्याच्या रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता युवा पिढीचे शेकडो हात सोमनाथच्या भूमीत जलसंधारण, मृदसंधारण, शेतीची कामे यासाठी सरसावतात. यासोबतच विधायक कार्याच्या चळवळीतील जेष्ठ श्रेष्ठांच्या मार्गदर्शनात स्वताचे व्यक्तीमत्व घडवितातबाबा आमटेंच्या पश्चात महारोगी सेवा समितीचे सचिव डाॅ. विकास आमटे यांच्या  मार्गदर्शनात श्रमसंस्कार छावणीतून युवा पिढीला देश आणि विधायक कार्यात सामावून घेतले जाते.


तरुण्ईचा प्रतिसाद:- यंदा पहिल्यांदाच सोमनाथ श्रमसंस्कार छावणीसाठी आॅनलाईन नांेदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला असून  दि 25 एप्रिल रोजी नोंदणी बंद करण्यात आली. तोपर्यंत 650 जणांनी नोंदणी केली होती. िाबिराच्या एक दिवस अगोदर पर्यंत राज्यातील कानाकोपÚयातून शिबिरात सहभागी होण्यासाठी आयोजकांना शेकडो काॅल्स आणि मेल्स येत होते. मात्र शिबिराथ्र्यांची गैरसोय होवू नये म्हणून नाईलाजास्तव प्रवेश बंद करण्यात आले. शिबिरासाठी सहा वर्षाच्या बालकांपासून तर 75 वर्षाच्या आजी आजोबा सुध्दा सहभागी झालेले आहेत. अर्थातच त्यामध्ये 15 ते 35 वर्षाच्या तरुण तरुणींच्या सहभाग सर्वाधिक आहे. िाबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मार्गदर्शक डाॅ. विकास आमटे, संयोजक कौस्तुभ आमटे, डाॅ. शितल आमटे हे पूर्णवेळ शिबिरस्थळी आहेत.अशी माहिती शिबिरप्रमुख रविंद्र नलगिंटवार यांनी सदर प्रतिनिधीला दिली. 

Thursday, May 14, 2015

अंधारलेला गुन्हेगारीला प्रकाशाचे दिवा'ण'

अंधारलेला गुन्हेगारीला प्रकाशाचे दिवा'ण'

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याचे नवे पोलीस अधिक्षक म्हणून संदीप दिवाण लवकरच येत आहेत. नाशिक शहरात तीन वर्षांपासून असलेले गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप दिवाण यांची चंद्रपूर येथे पोलिस अधीक्षकपदी बदली झाली आहे. अंधारलेला गुन्हेगारीला प्रकाशाचा दिवा'ण' मात करेल अशी आशा आहे.

Designation: Superintendent of Police/ चंद्रपूर 
जन्म : 1 जून 1972
श्री संदीप दिवान B.E. आणि L.L.B. चे शिक्षण घेतले आहे. कायदा आणि सुव्यवस्था यात पारंगत आहेत. M.P.S.C. परीक्षा पास झाल्यावर उप पोलीस अधीक्षक म्हणून 1996 मध्ये प्रशिक्षण. अहमद नगर येथे उप पोलीस अधीक्षक म्हणून पहिल्यांदा निवड झाली. त्या नन्तर चंद्रपूर, कोल्हापूर, नागपूर येथेही काम केले. नाशिक येथे शहर पोलिस आयुक्तालयात उपायुक्त म्हणून सेवेचा मोठा अनुभव आहे. गुन्हे विभाग, विशेष पथकाचे त्यांनी नेतृत्व केले आहे.

आठवणीतील कारवाई
सावली (जि. चंद्रपूर) - येथील महिला तहसीलदार नीता भैसारे यांना रेती व मुरूम पुरवठादार किशोर आत्राम यांच्याकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले होते. तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर येथे उपायुक्‍त असताना संदीप दिवाण यांनी  नीता भैसारे यांच्या आरमोरी येथील निवासस्थानाची झडती घेऊन दोन लाख 25 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. 

२०१०मध्ये एसीबीचे तत्कालिन अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक राजेश दुद्धलवार यांनी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील (माफसू) पदभरती घोटाळ्यात अखेर १४ जणांवर शुक्रवारी दोषारोपपत्र दाखल केले. दोन वर्षांच्या सखोल चौकशीनंतर ३,८८० पानांचा अहवाल तयार करण्यात आला. या प्रकरणात एकूण ५० जणांवर दोषारोप ठेवून ९ मे २०१२ रोजी गुन्हे दाखल करण्यात आले होते. आरोपी तत्कालीन कुलगुरू डॉ. अरुण निनावे याच्या दिल्लीतील निवासस्थानाची झडती घेतली होती. यात नागपुरातील लाखो रुपयांच्या खरेदी-विक्रीचे दस्तऐवज आढळले. ते जप्त करण्यात आले होते. डॉ. निनावे याच्याशिवाय पथकाने तत्कालीन कुलसचिव डॉ. ढोबळेच्याही घराची झडती घेतली. झडतीदरम्यान पथकाला डॉ. ढोबळेची स्टेट बँक ऑफ इंडियात पाच लाखांची जमाठेव आढळली.


Wednesday, May 13, 2015

भूकंपाच्या भीतीने पर्यटक माघारले

भूकंपाच्या भीतीने पर्यटक माघारले

कामठी - मंगळवारी नेपाळसह उत्तर भारतात पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. पश्‍चिम बंगालमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या कामठी, नागपूर येथील 40 पर्यटकांनी हा धक्का अनुभवला आणि भूकंपाच्या भीतीने सर्वजण परतीच्या मार्गावर आहेत.
नागपुरातील जुना सक्करदरा, कामठीच्या नागसेननगर व न्यू खलाशी लाइन येथील 40 नागरिक बुद्धगया, सारनाथ, नालंदा यांसह पश्‍चिम बंगाल येथील पर्यटन स्थळाचे दर्शन करण्याकरिता पाच मे रोजी गेले. ते 20 मे रोजी परत येणार होते.
जलयुक्त शिवारची कामे वेळेत पूर्ण करा

जलयुक्त शिवारची कामे वेळेत पूर्ण करा

- जिल्हाधिकारी डॉ. म्हैसेकर



चंद्रपूर : जलयुक्त शिवार अंतर्गत निवड करण्यात आलेल्या 218 गावातील प्रस्तावित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

Sunday, May 10, 2015

जुलाई से वैद्यकिय महाविद्यालय की प्रवेश प्रक्रिया

जुलाई से वैद्यकिय महाविद्यालय की प्रवेश प्रक्रिया

चंद्रपुर। लंबे इंतजार तथा राजकीय माथापच्ची से हटकर अब कहीं चंद्रपुर वैद्यकीय महाविद्यालय का ‘‘बोर्ड’’ लगा है. गत दो वर्षों से चंद्रपुर वैद्यकीय महाविद्यालय के शुरू होने से सभ्रमित जनता को अब इंतजार वैद्यकीय महविद्यालय प्रवेश प्रक्रिया का है. जिला रूग्णालय तथा वैद्यकिय महाविद्यालय के समन्वयक डा. हजारे के बयान ने यह स्पष्ट कर दिया की 1 जुलाई 2015 से यहां प्रवेश प्रक्रिया शुरू हो जायेगी. वैसे टि.बी. अस्पताल परिसर में तैयारीयां जोरो पर शुरू है. वैद्यकीय साधनों का इन्स्टालेशन चल रहा है.

Saturday, May 09, 2015

चंद्रपुरात आढळली दुर्मिळ कोलेगल जातीची पाल

चंद्रपुरात आढळली दुर्मिळ कोलेगल जातीची पाल

चंद्रपूर:- चंद्रपूर पासून नजीकच असलेल्या पठाणपुरा भागातून वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे यांनी दुर्मिळ कोलेगल जातीची पाल मिळाल्याची नोंद केली.त्याच्या कार्यामुळे सरपटनारे प्राण्यान मध्ये आणखी एका पालीची नोंद झाली,मागील ७ वर्षापासून सरपटनाऱ्या प्राण्याचे अध्ययन सुरु असून त्यांच्या प्रयत्नांना ह्या कार्यामुळे यश मिळाल आहे. 
युवकांना विनाअट सोडा

युवकांना विनाअट सोडा

नांदेडवासीचा नागभीड पोलीस ठाण्यावर हल्लाबोल

नागभीड : खोट्या तक्रारीच्या आधारे नागभीड पोलिसांनी नांदेडच्या दोन व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. या युवकांना विनाअट सोडण्यात यावे, या मागणीसाठी नांदेडवासीयांनी शुक्रवारी नागभीड पोलीस ठाण्यावर हल्लाबोल आंदोलन केले. जवळपास २00 नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. नांदेडवासीयांचे हे आंदोलन नागभीडमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरला.
इंटकच्या पदाधिकाऱ्याची हत्या- दोघांना अटक

इंटकच्या पदाधिकाऱ्याची हत्या- दोघांना अटक

पाटणसावंगी - इंटक व कॉंग्रेसचे पदाधिकारी चिरकूट मौजे (वय 55) यांची दोन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पाटणसावंगी येथील राजहंस लॉनसमोर घडली. हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. फिरोज ताज मोहम्मद शेख (वय 46), दिलीप रतनलाल मदने (वय 42) अशी आरोपींची नावे आहे. शॉपिंग काम्प्लेक्‍समधील दुकान गाळ्याच्या खरेदी-विक्रीच्या मागणीवरून ही हत्या झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

Friday, May 08, 2015

चंद्रपूरला जाणारी दारू नागपुरात जप्त

चंद्रपूरला जाणारी दारू नागपुरात जप्त

नागपूर- चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी असताना अवैध मार्गाने दारू घेऊन जाणा-या चौघांना आज सकाळी नागपूरच्या  गणेशपेठ पोलिसांनी जाधव नगर चौकात अटक केली. ही सर्व दारु मध्यप्रदेश मधून आणून ते चंद्रपूरला पोहचविण्याच्या तयारीत होते. याबाबत ची माहिती गणेशपेठ पोलिसांना मिळताच सापळा रचून चौघांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी १९ ते २२ या वायोगटातील आहेत. दारूसह एकूण ४८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हाजीची हजेरी अन पोलिसांची उचलबांगडी

हाजीची हजेरी अन पोलिसांची उचलबांगडी

हाजीची हजेरी अन पोलिसांची उचलबांगडी
घुग्घूस येथील कुख्यात गुंड हाजी सरवर याच्या अटकेनंतर पोलिसांची उचलबांगडी झाल्याने आजवरच्या चोर - पोलिस खेळातील तथ्य समोर येवू लागले आहे. मात्र या अटकेनंतर पोलीस खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचा काळा चेहरा मात्र समोर आला आहे. अटकेनंतर आपल्या यंत्रणेतील काही पोलीस अधिकारी आणि शिपायांबद्दलचा खळबळजनक खुलासा पोलीस अधिक्षकांच्या हाती लागला आहे.

हाजी तीन गुन्ह्यांमध्ये फरार होता. घुग्घुसमध्ये सैयद इस्त्राईलच्या वाहनावर ३ मे २०१४ मध्ये त्याने गोळीबार केला होता. त्यानंतर अक्षय येरूळकर याचे अपहरण करून मारहाण करण्याचा गुन्हाही त्याच्यावर आहे. या सोबतच खंडणीचेही गुन्हे त्याच्यावर आहेत.

कोळसा तस्करीच्या याच शीतयुध्दाची परिणती गॅंगवॉरमध्ये झाली होती. शेख हाजी सरवर याने राष्ट्रवादीचे चंद्रपूर शहर अध्यक्ष तिरुपती पॉल यांची भरदिवसा मुख्य रस्त्यावर तलवारीने हत्या केली. याचे पडसाद कोळसा तस्करीच्या व्यवसायावर पडले.

घुग्घूस येथील कोळसा व्यापारी टुल्लू उर्फ शागीर मुखत्यार अहमद याचा सोमवार (८ डिसेंबर)ला सकाळी ७ वाजताच्या सुमारास नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही वार्ता घुग्घूस येथे पोहचताच ५० ते ६० युवकांनी व्यापाºयांना धमकावून बळजबरीने घुग्घूस बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.घुग्घूस येथील कोळसा व्यापारी टुल्लू उर्फ शागीर अहमद मुखत्यार याच्यावर नागपूर येथे गोळीबार करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा सोमवारी मृत्यू झाला. ही वार्ता घुग्घूस येथे पसरताच ५० ते ६० युवक दुचाकीने बाजार परिसरात पोहचले व त्यांनी व्यापाºयांना धमकावून दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबतची माहिती घुग्घूस पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस दंगा नियंत्रण पथकासह दाखल झाले. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे तणाव शांत झाला. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. टुल्लू मुखत्यार याच्यावर हत्येचा प्रयत्न करणे, धमकाविणे, खंडणी वसूल करणे असे १४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे घुग्घूस पोलिस ठाण्यात दाखल होते. त्याला तडीपारही करण्यात आले होते. तो काही दिवसांपूर्वी घुग्घूस सोडून नागपूरला वास्तव्यास गेला होता. तिथे त्याच्याच वाहनामध्ये बसलेल्या युवकाने त्याच्यावर गोळी झाडली. कुख्यात गुंड हाजी शेख सरवर याच्यासोबत टुल्लूने घुग्घूस येथे कोळशाचा व्यापार सुरू केला होता. शेख सरवरशी खटकल्यामुळे त्याने स्वत:च हा व्यवसाय सुरू केला व नागपूर येथे राहायला गेला होता. 

विविध गुन्ह्यांचे आरोप शिरावर घेऊन पोलिसांना गुंगारा देत गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात हाजी सरवर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला. एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रभाकर टिक्कस यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. राजीव जैन यांच्या कानावर ही बाब टाकली. त्यांनी या मोहिमेत कुणालाही सहभागी न करता केवळ स्थानिक गुन्हे शाखेवर ही कामगिरी सोपविली. या शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश तुंकलवार यांच्यासह निवडक शिपायांना घेऊन सापळा रचला. हाजीला नकोडा परिसरातून अलगदपणे पकडण्यात यश आले. अटकेनंतर त्याला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या समोर हजर करण्यात आले. त्याच्याकडून घेतलेल्या कबुलीजबाबात मात्र खबळजनक माहिती पुढे आली. आपल्या विरूद्ध सुरू असलेल्या पोलिसाच्या प्रत्येक हालचालीची माहिती आपणास काही पोलीसच पुरवत असल्याचा खळबळजनक खुलासा त्याने अधीक्षकांसमक्ष केला. यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मध्यंतरी नकोड्यात स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या अटकेसाठी फिल्डींग लावली होती. मात्र पोलीस खात्यातीलच काही मुखबीरांनी त्याला माहिती दिली. त्यातून तो पळून जाण्यात यशस्वी झाला. हाजीच्या अटकेनंतर त्याने स्वत: जिल्हा पोलीस अधिक्षकांपुढे दिलेल्या बयाणातून हे सत्य उजेडात आले. त्याची दखल घेत त्याच दिवशी पोलीस अधिक्षकांनी संबंधित पोलीस अधिकारी व अन्य पोलीस कर्मचार्‍यांची तातडीने उचलबांगडी केली.
चंद्रपूर जिल्ह्यासह नागपूर परिसरातही गुन्हेगारीचे साम्राज्य उभे करणारा हाजी पोलिसांच्या हाती लागल्याने अनेक गंभीर गुन्ह्यांच्या तपासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गुन्हेगारी विश्‍वात अत्यंत सराईत म्हणून ओळख असलेल्या हाजीला परजिल्ह्यातील अन्य गुंडांच्या टोळ्यांशी वैर होते. घुग्घूस परिसरात कोळशाच्या तस्करीत त्याने चांगलाच जम बसविला होता. या व्यावसायिक स्पर्धेतून त्याचे अन्य गुन्हेगारी टोळ्यांशी नेहमीच वाद होत असत. यादरम्यान, हाजीचा अनेक गंभीर गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे पोलिसही हाजीच्या मागावर होते. पोलिसांचा वाढता दबाव आणि गुंडाच्या अन्य टोळ्यांकडून त्याला भीती होती.

भाडय़ाचे गुंड पोसून कोळसा तस्करीचा हा व्यापार सुरू झाला. त्याला पोलीस दलाची मदतही मिळाली. त्यामुळेच चंद्रपूर जिल्ह्य़ातील कोळसा खाणींचा परिसर तस्करी आणि गुंडांच्या दहशतीने काळवंडला आहे. त्याला स्थानिक कोळसा व्यापाऱ्यांचीही साथ मिळाली. 
बाबुपेठ उड्डाण पुलासाठी ५ कोटी मंजूर

बाबुपेठ उड्डाण पुलासाठी ५ कोटी मंजूर

इको-प्रो ने केले होते आंदोलन

चंद्रपूर : बहुप्रतीक्षित बाबुपेठ उड्डाण पुलाला शासनाने अंतिम मंजूरी दिली आहे. उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी राज्य शासनाने पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. नगरविकास विभागाच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत महानगरपालिकांना अनुदान या शिषातंर्गत हा निधी मंजूर करण्यात असून उड्डाण पूल बांधकामाचा मार्ग आता सुकर झाला आहे.

Thursday, May 07, 2015

याचिका मागे घेण्याची समज द्या

याचिका मागे घेण्याची समज द्या

चंद्रपूर- जिल्ह्यातील कष्टकरी गरीब महिलांच्या आंदोलनातून दारूबंदी झाली. परंतु, ही दारूबंदी उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. राज्याचे विरोधी पक्षनेते तथा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांना याचिका मागे घेण्याची समज कॉंग्रेस नेता श्रीमती सोनिया गांधी यांनी द्यावी अशी मागणी श्रमिक एल्गारच्या संयोजिका ऍड. पारोमिता गोस्वामी यांनी बुधवारी केली. 
डॉक्‍टर ठरले देवदूत

डॉक्‍टर ठरले देवदूत

डॉ. प्रमोद गिरींमुळे मोहितला जीवदान
नागपूर - खासगी रुग्णालयातील वैद्यकीय सेवेबद्दल नेहमीच संताप व्यक्त होतो. मात्र, एका डॉक्‍टरने स्वत:हून पुढाकार घेत रुग्णाचा जीव वाचविल्याचा प्रसंग नुकताच प्रतापनगर चौकात घडला. एका वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार मोहित जयदीपकुमार रस्ता दुभाजकावर आदळला. यात तो गंभीर जखमी झाला. योगायोगाने त्या वेळी मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद गिरी हजर होते. त्यांनी आपले वाहन बाजूला उभे केले. त्या युवकाला उचलले. आपल्या वाहनात टाकले. ऑरेंज सिटी रुग्णालयात नेले. तातडीने त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया केली. उपचाराला विलंब झाला असता तर रक्तस्रावाने त्या पंचविशीतल्या तरुणाच्या जिवाला धोका निर्माण झाला असता. परंतु, डॉ. गिरी देवदूत ठरले.

रस्त्यांवरील अपघातग्रस्ताला पोलिस येण्यापूर्वी कुणी हात लावत नाहीत. खाकी वर्दीच्या भीतीपोटी जखमीला रुग्णालयात नेण्यापूर्वी पोलिसांना खबर देतात. परंतु, डॉ. गिरी यांनी त्याची तमा न बाळगता सामाजिक बांधीलकी जोपासली. रुग्णसेवेचा डॉक्‍टरधर्म पाळला. या वेळी उपस्थितांनीही त्या डॉक्‍टरसंदर्भात डॉक्‍टर असावा तर असा, असे उद्‌गार काढले. मंगळवारी (ता. पाच) सकाळी दहाच्या दरम्यान प्रतापनगरात रस्त्यावरील दुभाजकाला धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. या तरुणाकडे बघून सारेच हळहळत होते. मदतीला कोणीही पुढे आले नाही. रक्ताच्या थारोळ्यात तो युवक बेशुद्ध अवस्थेत पडून होता. याच रस्त्याने डॉ. प्रमोद गिरी जात होते. गर्दीतून वाट काढीत ते जखमीजवळ गेले. त्यांनी ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिली. जितेंद्र वर्मा या युवकाच्या मदतीने ऑटोतून जखमी युवकाला ऑरेंज सिटीत हलविले. दरम्यान, नातेवाइकांशी संपर्क साधण्यात आला. युवकाची ओळख पटण्यापूर्वीच सीटी स्कॅन करण्यात आले. डोक्‍याचा काही भाग फाटला होता. छातीच्या बरगड्या तुटल्या होत्या. संपूर्ण अंगावर खरचटले. मेंदूत रक्तस्राव सुरू होता. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करून रक्तस्राव थांबवला. मृत्यूच्या घटका मोजत असलेल्या त्या युवकाचा जीव वाचला. या तरुणांच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी ऑरेंज सिटीतील कर्मचारी कामाला लागले होते. अखेर त्या युवकाची ओळख पटली. मोहित हा त्रिमूर्तीनगरातील आहे.

Saturday, May 02, 2015

सर्पदंशाने तरुणीचा मृत्यू

सर्पदंशाने तरुणीचा मृत्यू

सर्पदंशाने 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मोहपा येथे घडली. निता लोणारी (वय 28) असे मृत तरुणीचे नाव आहे. सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास वनिता झोपेत असताना अचानक तिच्या हाताला सापाने चावा घेतला. 
मुख्यमंत्री गावांना अचानक भेट देणार

मुख्यमंत्री गावांना अचानक भेट देणार

खरीप हंगाम सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक नागपूर जिल्हयातील कोणत्याही गावांना भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी करतील. या भेटीत त्या गावात कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी, पटवारी गावात नसल्यास त्यांचेवर कडक कार्यवाही करण्यात येईल असा ईशाराही पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.

मूल तालुक्यातील जिल्हा मार्गाचा होणार विकास

मूल तालुक्यातील जिल्हा मार्गाचा होणार विकास

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग दुरुस्त करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. त्यामुळे मूल तालुक्यातील पेटगांव - भादुणी -उसराळा- मारोडा- मूल- ताडाळा- येरगांव फु टाना- नांदगांव ते प्र.रा.मा.9, इ.जि.मा. 132 र् प्र.रा.मा. 9 -मार्गाचा विकास होईल
 नागपूर  वार्तापत्र

नागपूर वार्तापत्र

 नागपूर  वार्तापत्र

 पळवून नेणा-या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल:
हुडकेश्वर - दि. 30.04.15 चे 1400 वा चे सुमारास आरोपी येशु मोहल्लम गौरखेडे वय 28 वर्ष राइंदीरानगर,
जाटतरोडी नं 3, नागपूर याने पोस्टे हुडकेश्वर हद्यीत राहणा-या फिर्यादीच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस फिर्यादीचे कायदेशिर रखवालीतून फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे हुडकेश्वर येथे सपोनि धाडगे यांनी आरोपीविरूध्द कलम 363 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

गंभीर दुखापत करणा-या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल:
कोराडी/लकडगंज -  1) दि. 01.05.15 चे 1900 वा चे सुमारास फिर्यादी शंकर गणपतराव वगारे वय 50 वर्ष राभोकारा झोपडपट्टी नागपूर यांचा मुलगा सागर वय 22 वर्ष यास अल्पवयीन 17 वर्षीय आरोपी याने घरगुती
कारणावरून वाद विवाद करून भांडण झाल्याने पोस्टे कोराडी हद्यीत भोकारा ग्राम पंचायत जवळील ठाकरे
पाणठेल्याजवळ भाजी कापण्याचे चाकुने पोटावर मारून गंभीर जखमी केले. जखमीचा उपचार मेयो
हाॅस्पिटल येथे सुरू आहे. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे कोराडी येथे पोउपनि
धानोरकर यांनी आरोपीविरूध्द कलम 326 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
 2) दि. 01.05.15 चे 2200 वा चे सुमारास आरोपी सागर शिवलाल यादव वय 22 वर्ष राइतवारी
रेल्वे स्टेशन जवळ, भारतीय आखाडयाजवळ, नागपूर याने पोस्टे लकडगंज हद्यीत इतवारी रेल्वे
स्टेशन जवळ, प्लाॅट नं 624, भारतीय आखाडयाजवळ राहणारा फिर्यादी बादल सुधाकर बरमकर वय 23 वर्ष
यास दारू पिला असे म्हटले. फिर्यादीने आरोपीस दारू पाजण्यास पैसे नाही असे म्हटल्यावरून आरोपीने
फिर्यादीस शिवीगाळ करून पाहुन घेण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी आपल्या घरी गेला असता
आरोपीने दि. 02.05.15 चे 0010 वा चे सुमारास फिर्यादीचे घरी जावून त्याच्या डाव्या मांडीवर चाकुने वार
करून गंभीर जखमी केले. जखमीचा उपचार रहाटे हाॅस्पिटल येथे सुरू आहे. याप्रकरणी फिर्यादी यांनी
दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे लकडगंज येथे सपोनि मोले यांनी आरोपीविरूध्द कलम 326,452,504,506 भादंवि
अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

 प्राणांतिक अपघात
कळमणा - दि 30.04.15 चे 1900 वा चे सुमारास फिर्यादी नितीन देवरावजी बेंद्रे वय 29 वर्ष रा. शारदा
चैक, बजरंग पार्क, कामठी यांचे वडील देवरावजी बेंद्रे व मिस्त्री मुनीवर भाई हे पोस्टे कळमणा हद्यीत
कापसी पुला समोरील हैद्राबाद कडे जाणा-या रोडवर ट्रक क्र एमएच 40/एल/1831 ची दुरूस्ती करित
असताना हिरो मॅजेस्टीक क्र एमएच/49/एल/3491 च्या आरोपी चालकाने आपल्या ताब्यातील वाहन
निष्काळजीपने चालवून देवरावजी बेंद्रे व मुनीवर भाई यांना धडक मारून गंभीर जखमी केले. त्यांना
उपचाराकरीता तारांगण हाॅस्पिटल येथे भरती केले असता उपचारादरम्यान देवरावजी बेंद्र हे मरण पावले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे कळमणा येथे पोउपनि डेरे यांनी आरोपी चालकाविरूध्द
कलम 279,337,304(अ) भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

 हयगयीने मृत्युस कारणीभूत होणा-या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल:
कळमणा -दि. 01.05.15 चे 1610 वा चे सुमारास आरोपी बजरंगीलाल जेठामल अग्रवाल वय 64 वर्ष रावर्धमान
नगर, राधाकृष्ण अपार्टमेंट, नागपूर यांनी आपल्या पोस्टे कळमणा हद्यीतील चिखली मेहता
काटयासमोर, अन्नपुर्णा फुड प्राॅडक्ट या कंपनीतील बेबे बाॅयलर ची काळजी नघेता हलगर्जीपनाने ते यंत्र
सुरू केल्याने त्याचा स्फोट होवून ते स्वतःचे मरणास व कंपनीत काम करणारे 1) भुवनेश्वर गोवर्धन देशमुख
वय 20 वर्ष रा. मांगली, जि. भंडारा 2) सचिन गौतम टे ंभेकर वय 18 वर्ष रा. हरदोली जि. बालाघाट 3)
प्रितीचंद बिसेन वय 42 वर्ष रा. दुर्गानगर, भरतवाडा 4) अनवर बिसेन वय 24 वर्ष रा. गांेदीया 5) अगनु
धनसिंग शाहु वय 45 वर्ष रा. डिप्टीसिग्नल 6) नंदलाल हेमराज भिमशाहु वय 19 वर्ष रा. छत्तीसगढ, नागपूर
यांचे जखमी होण्यास कारणीभूत झाला. याप्रकरणी पोस्टे कळमणा येथे पोउपनि ओऊळकर यांनी आरोपी
विरूध्द कलम 304(अ),337,338 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

विनयभंग करणा-या आरोपींविरूध्द गुन्हा
सक्करदरा -  दि. 01.05.15 चे 1730 वा चे सुमारास 48 वर्षीय फिर्यादी यांचा फायनांन्स कंपनीचा व्यवसाय असून त्यांचेकडील फायनांन्सवर आरोपी क्र 1) अजगर नावाचा मुलगा याचे कडे थ्री सिटर अॅटो आहेफिर्यादी व त्याचे आॅफीसमध्ये काम करणारी मुलगी आॅफीसमध्ये हजर असताना आरोपी क्र 1 याने आपल्या इतर 5 ते 6 साथीदारांसोबत येवून शिवीगाळ करून फिर्यादीला हातबुक्कीने मारहाण केली. फिर्यादीचे
आॅफीसमध्ये काम करणा-या मुलीचा हात पकडून ओढले. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे
सक्करदरा येथे पोउपनि नैताम यांनी आरोपींविरूध्द कलम 143,147,149,323,504,452,354 भादंवि अन्वये
गुन्हा नोंदविला आहे.

Friday, May 01, 2015

प्रत्येक जिल्ह्यात सोशल मीडिया लॅब

प्रत्येक जिल्ह्यात सोशल मीडिया लॅब




चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाने उभारलेल्या अत्याधुनिक सोशल मीडिया लॅबचा उपयोग गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी होणार असून अशा प्रकारच्या लॅब प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यासाठी 18 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आल्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सोशल मीडिया लॅब व मोबाईल सीसीटीव्ही व्हॅनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
शेतकऱ्‍यांच्या आत्महत्या शून्यावर आणू - मुनगंटीवार

शेतकऱ्‍यांच्या आत्महत्या शून्यावर आणू - मुनगंटीवार




चंद्रपूर :शुक्रवार, ०१ मे, २०१५
 आजचा दिवस हा संकल्प दिवस असून गेल्या सहा महिन्यात युती सरकारने गोरगरीबांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. गरीब, मजूर व शेतकऱ्‍यांच्या पाठीशी सरकार उभे असून शेतकऱ्‍यांच्या आत्महत्या शून्यावर आणत रोजगारयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करु या, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

पोलीस कवायत मैदान येथे आयोजित महाराष्ट्र दिनाच्या मुख्य समारोहात ते बोलत होते. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, महापालिका आयुक्त सुधीर शंभरकर मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, जी.पी.गरड, अपर जिल्हाधिकारी संजय धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी कल्पना निळ-ठुबे आदी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार, दारिद्रय रेषेखालील विविध घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना स्वत:ची जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करणारी अभिनव पं. दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना नुकतीच अर्थसंकल्पात जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला रु.50 हजार पर्यंत घरकुलासाठी जागा खरेदी करण्याकरिता आर्थिक मदत दिली जाईल. या योजनेसाठी अर्थसंकल्पात 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
विदर्भ राज्याचे ध्वजारोहण

विदर्भ राज्याचे ध्वजारोहण

चंद्रपूर- भाजपने वेगळा विदर्भ करण्याचे दिलेले आश्वासन पाळले नसल्याने त्याचा निषेध करताना विदर्भवाद्यांनी चंद्रपूरात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन केले.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने चंद्रपुरातील जटपुरा चौकात पुतळे जाळुन निषेध व्यक्त केला. विदर्भवाद्यांनी भाजप नेत्यांच्या विरोधात नारेबाजी करत अनेक ठिकाणी वेगळ्या विदर्भाचे झेंडे फडकविले. विदर्भ कनेक्ट या संघटनेने आज भव्य कार्यक्रम घेवुन वेगळ्या विदर्भ राज्याचे ध्वजारोहण केले. यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्याची शपथ घेवुन महाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून पाळला.आणि यापुढे विदर्भवाद्यांनी हा लढा अधिक तीव्र व युवकाभिमुख करण्याचा संकल्प करण्यात आला.
दारूमुक्ती निर्धार यात्रेचा समारोप

दारूमुक्ती निर्धार यात्रेचा समारोप

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूमुक्तीसाठी जिल्हयातील महीलांनी अथक लढा उभारलेला होता. या लढयानंतर नुकतेच महाराष्ट शासनाने दारूबंदी जाहीर करून अमलबजावणी सुरू केलेली आहे. दारूबंदीच्या निर्णयाचे स्वागत करून अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात माराईपाटन ते महाकाली अशी दारूमुक्ती निर्धार यात्रा काढण्यात आली होती या यात्रेचे समारोप व दारूबंदीचे वचनपुर्ती करणारे जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार कार्यक्रम महाकाली मंदीराचे पटांगणात करण्यात आला.