काव्यशिल्प Digital Media: निवेदन

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label निवेदन. Show all posts
Showing posts with label निवेदन. Show all posts

Wednesday, June 06, 2018

कारंजाच्या युवकांचे तहसीलदारांना निवेदन

कारंजाच्या युवकांचे तहसीलदारांना निवेदन

  वाढते अपघात टाळण्यासाठी केली गतिरोधक निर्मितीची मागणी
कारंजा (घा)/प्रतिनिधी:
 कारंजा हे शहर तालुक्याचे ठिकाण असून या शहरातील मध्य वस्तीतून महामार्ग क्रमांक ६  जातो.या मार्गावरून नेहमीच वाहने वेगाने जातात.शासकीय कार्यालयाचा व नागरिकांच्या दैनंदिन कार्याकरिता जाण्यायेण्याचा मग देखील एकच आहे, त्यामुळे प्रत्तेक दिवशी एका निरअपराध्याचा या शहरातून जाणार्या मार्गावर बळी जात आहे. या मार्गावर अपघात प्रमाण वाढले असून याला आळा बसला पाहिजे यासाठी  नारा टी. पॉईंट ते स्मशानभूमी प्रयन्त ब्रेकर तयार करावे अशीं मागणी कारंजा येथील युवकांनी तहसीलदार यांचे मार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सह आमदार अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे यांना निवेदनातून  करण्यात आली .कारंजा शहरातून रस्ता ओलांडताना शाळकरी मुले, नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. या मागणीची त्वरित नोंद घेऊन तत्काळ हि मागणी पूर्ण करावी.अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.