लीस अधीक्षक नियती ठाकर |
चंद्रपूर- जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दिवसा व रात्रीच्या घरफोडी च्या घटना घडल्या.
सोने चांदी चे दागिने चोरी गेल्याची माहिती होती. हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी सुधाकर अंभोरे यांनी तपास केला.
तपासादरम्यान गोपनीय माहिती काढली असता २ इसम सराफ लाईन चंद्रपूर येथे सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ इसमांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यांच्या जवळून सोन्याची चैन जप्त करण्यात आली. त्यांनी ८ गुन्ह्यांची कबुली सुद्धा दिली. त्यांची हि आंतरराज्यीय घरफोडी करणारी टोळी असून या टोळीने आंध्रप्रदेश, कर्नाटक इत्यादी राज्यात मोठ्या प्रमाणात घरफोडी केल्याची माहिती आहे. या सदर टोळीतील आरोपी हे मूळ चे तामिळनाडू राज्यातील तामरम आणि कल्लुट येथील रहिवासी आहेत. त्यांचे वास्तव्य चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, पिपरबोडी, गोपाळपुरी, रयतवारी कॉलरी या ठिकाणचे असून ते नाममात्र स्वीपर चे काम करतात आणि लहान मोठे गुन्हे करीत आता टोळ्याने जबरी चोरी, घरफोडी,दरोडा या सारखे गंभीर गुन्हे करू लागले. सदर गुन्हेगार हे दिवसा किंवा रात्री बंद असलेले घर बघतात आणि दरवाज्याचा कुलूप फोडून आत प्रवेश करतात व सोन्या चांदीच्या दागिन्यांचे चोरी करून ओळखीच्या सोनारांना विकतात. सदर गुन्ह्यातील आरोपींकडून आणि विक्री केलेल्या सोनारांकडून एकूण १५ लाख ५२ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व १ मोटारसायकल किंमत २० हजार रुपये असा एकूण १५ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन आरोपी व दोन सराफा दुकानदार यांना अटक करण्यात आली असून आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. हि कामगिरी पोलीस अधीक्षक नियती ठाकर व अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी सुधाकर अंभोरे, सुनील उईके, दौलत चालखुरे, नितीन जाधव आदींनी केली आहे.