सामना ऑनलाईन । कैरो
दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ५५ पोलिसांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. इजिप्तमध्ये दहशतवाद्यांवरील कारवाईदरम्यान ही घटना घडली आहे. मृतांमध्ये २० अधिकाऱ्यांचा आणि ३२ पोलिसांचा समावेश आहे. इजिप्तच्या स्थानिक मीडियाने ही माहिती दिली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री राजधानी कैरोपासून ३५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गीजा प्रशासनाअंतर्गत येणाऱ्या अल-वहात अल-बहरिया भागात दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात आली. सुरक्षा अधिकारी आणि जवान कारवाईसाठी दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर पोहोचले तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर तुफान गोळीबार केला. यात ५५ पोलिसांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून मृतांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.