डोअर-टू-डोअर झाले जुने, आता जमाना स्क्रीन-टू-स्क्रीन चा
नागपुर, 29, ऑगस्ट 2018:
आज, तंत्रज्ञानाचा परिणाम प्रत्येक बिझनेस मॉडेलवर दिसतो. यामुळे व्यापार वाढीला मोठी गती मिळाली आहे व याला डायरेक्ट सेलिंगचा व्यवसायही अपवाद नाही. डायरेक्ट सेलिंग ही भारतातील एक जुनी आणि साधी उत्पादन वितरण यंत्रणा आहे. या यंत्रणेत, कंपन्या सामान्य व्यक्तींची नियुक्ती करतात, त्यांना डायरेक्ट सेलर्स म्हटले जाते. कोणत्याही विक्री ठिकाणापासून दूर अधिकृत लोक ग्राहकांसाठी उत्पादन विक्रीचे आयोजन करतात. जे प्रदर्शन, नमुने तयार करणे, उत्पादनांच्या साक्षीदारांची मतं प्रसारित करणे अशा पद्धतीच्या विक्री तंत्राभोवती फिरते. ज्यामुळे उत्पादने मित्रपरिवार, नातेवाईक, सहकारी आणि ओळखीच्यांना विकणे शक्य होते. अलीकडे ग्राहकवाद बराच वाढला असल्याने एफएमसीजी उत्पादनांना मागणी झपाट्याने वाढली आहे. संघटीत विक्री हे एक वेगाने वाढणारे क्षेत्र असून त्याने डायरेक्ट सेलिंग उद्योगाच्या आश्वासक वाढीला मार्ग करून दिलेला आहे. डायरेक्ट सेलिंग हे एक उद्योगक्षेत्रच आहे, जे व्यवसायाच्या विविध नैसर्गिक पैलूंच्या शोधाकरिता तंत्रज्ञानाने नेहमीच अद्ययावत राहते.
महाराष्ट्रातील पुणे येथे 2001 मध्ये नेटसर्फची स्थापना झाली असून भारताच्या 22 राज्यांमधील निरनिराळ्या स्तरातील स्त्री-पुरुषांचे मागील 17 वर्षांपासून सबलीकरण घडते आहे. महाराष्ट्रात नेटसर्फचे नेटवर्क नैसर्गिक व जैविक उत्पादने तसेच त्यांच्याशी निगडीत व्यवसाय संधींमार्फत राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये पसरले आहे. नेटसर्फ नेटवर्कने मागील आर्थिक वर्षात रु. 176 कोटींची उलाढाल केली. नेटसर्फचे 9 स्टॉक पॉइंट्स (अशा जागा जिथून डायरेक्ट सेलर्सना नेटसर्फ उत्पादने विकत घेता येतात) नागपुरात आहेत. अलीकडे आर्थिक वर्ष 2017-18 दरम्यान नेटसर्फची महाराष्ट्रात रु. 59 कोटींची उलाढाल झाली असून यावर्षात नेटसर्फची एकूण उलाढाल 33.3% इतकी नोंदवली गेली.
याप्रसंगी बोलताना नेटसर्फ कम्युनिकेशन्स प्रा. लि.चे सीओओ श्री. केतन गानू म्हणाले की, “भारतीय डायरेक्ट सेलिंग उद्योगक्षेत्राचा मुद्दा येतो तेव्हा डायरेक्ट सेलिंग व्यवसाय आणि तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान आम्हाला अद्वितीय बनवते. नेटसर्फ तंत्रज्ञानाचा वापर करून डायरेक्ट सेलर्ससाठी डायरेक्ट सेलिंग व्यवसायाच्या प्रत्येक पैलूला सुलभ बनवते. नेटसर्फ व्यवसायाच्या या तंत्रज्ञान विषयक सुलभतेकडे युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर आकर्षित झाला आहे.
बिझनेस मॉडेल, ग्राहकांची बदलती वागणूक आणि डायरेक्ट सेलर्सच्या व्यापार करण्याच्या पद्धतीत डायरेक्ट सेलिंग उद्योग क्षेत्र अनेक आव्हानांचा सामना करते आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून, नेटसर्फने आपल्या डायरेक्ट सेलर्सच्या अशा अनेक समस्या सोडविल्या.
डायरेक्ट सेलिंगमधील तंत्रज्ञान
अ. व्यापार करताना सुलभता:
सुरुवातीला अधिकृत डायरेक्ट सेलर्स त्यांच्या भावी ग्राहकाला स्वत: भेटत असे, त्याला उत्पादनाचे प्रात्यक्षिक दाखवत असे, जी एक वेळकाढू प्रक्रिया होती. आता तंत्रज्ञान बदलल्यामुळे, नेटसर्फचे डायरेक्ट सेलर्स हे ग्राहकाला उत्पादनांचे व्हिडीओ शेअर करू लागले आहेत. जर उत्पादन चांगले वाटले तर ग्राहकाला ते डायरेक्ट सेलरच्या वेबपेजवरून विकत घेता येते! ग्राहकासाठी खरेदीचा अनुभव उत्तम असावा याची खातरजमा करण्यासाठी उत्पादन 2-4 कार्यालयीन दिवसांत ग्राहकापर्यंत पोहोचते. मागील आर्थिक वर्षात नेटसर्फने आपले डायरेक्ट सेलर्स आणि ग्राहकांकरिता 150 हून अधिक व्हिडीओंकरिता डिजीटल कंटेंट तयार केला आहे.
ब. सेमिनार्सची जागा वेबीनार्स घेत आहे:
डायरेक्ट सेलिंगच्या बाजारात सेमिनार्सचे आयोजन करणे ही एक नियमित गोष्ट मानली जाते. ज्यामुळे डायरेक्ट सेलरला मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळतात. तरीच अलीकडे, वेबीनार्समुळे उद्योगक्षेत्रात सेमिनार तसेच प्रशिक्षण सत्र आयोजित करण्याचा संपूर्ण अनुभवच बदलला आहे. शिक्षण हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणता येईल.
नेटसर्फमध्ये आम्ही अशी वेबीनार्स घेतो, जिचा फायदा डायरेक्ट सेलर्सना तर होईलच; शिवाय विविध भौगोलिक ठिकाणच्या संभाव्य ग्राहकांच्या मोठ्या संख्येला होईल. हे अतिशय किफायतशीर तसेच डायरेक्ट सेलर्स व ग्राहकाच्या दृष्टीने सुलभ ठरते. नेटसर्फने अधिकाधिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आधीपासूनच फेसबुक लाईव्ह आणि युट्यूब लाईव्हची सुरुवात केली आहे.
क. व्यवसाय करताना सहजता:
मोबाईल अप्लिकेशन्सने डायरेक्ट सेलिंग व्यापाराच्या पद्धतीत क्रांती घडवली. ‘नेटसर्फ नेटवर्क मोबाईल अॅप’ डायरेक्ट सेलर्सना त्यांचा व्यापार ऑन-द-गो वापरायची संधी देते व ग्राहकांची सर्वोत्तम खरेदी अनुभव घेण्याची इच्छा पूर्ण करतो. आज 125,000 पेक्षा अधिक डायरेक्ट सेलर्स नेटसर्फच्या मोबाईल अँपच्या माध्यमातून त्यांचा दैनंदिन व्यवसाय करत आहेत. नेटसर्फ मोबाईल अॅप त्यांना अनेक कार्ये सहजतेने करण्यासाठी साह्य करते. जसे की, गेस्ट लिस्ट तयार करणे व त्यांची वर्गवारी बनवणे, सेमिनार्सचे आयोजन करणे, पाहुण्यांना सेमिनार्सचे आमंत्रण देणे, सोशल कंटेट सोशल मीडियावर देऊन व्यवसाय निर्मिती करणे, भारतात होणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंगला हजर राहणे, उत्पादनांची पुनर्खरेदी करणे व डिलिव्हरीचे व्यवस्थापन करणे.
प्रत्येक डायरेक्ट सेलरला अशाच पद्धतीच्या कठीण स्थितीचा सामना ग्राहक लक्ष वेधण्यासाठी करावा लागतो- अनेकदा ग्राहकांना डायरेक्ट सेलिंगची उत्पादने आवडतात, व उत्पादनांची आवश्यकता वाटते आणि त्यांना ती पुन्हा विकतही घ्यायची असतात. मात्र ग्राहक प्रत्यक्षात त्यांची खरेदी करू शकत नाहीत, कारण ज्यांनी सुरुवातीला उत्पादन विकलेले असते, त्या डायरेक्ट सेलरसोबत काही संपर्क उरलेला नसतो. इथेच संभाव्य प्रामाणिक ग्राहक हातातून सुटतो! तर कधी ग्राहक कंपनीने घेतलेल्या डायरेक्ट सेलिंगसाठीच्या मार्केटींग प्रयत्नांनी खेचला जातो व त्याला उत्पादन वापरायची इच्छा असते. परंतु, पारंपरिक बाजारात शेल्फवर उत्पादन उपलब्धच नसते. आता हे उत्पादन मिळवण्यासाठी पुन्हा डायरेक्ट सेलरला कसे गाठायचे हे ग्राहकाला माहीत नसते.
नेटसर्फने जिओ नावाचा जिओलोकेशन-बेस्ड प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. ज्यामध्ये ग्राहकाचे फिजिकल लोकेशन वॅल्यूएबल डेटामध्ये परावर्तीत करण्यात येते. हा डेटा वापरून संपूर्ण ग्राहक अनुभव सुलभ आणि सहज होऊन जातो. या मंचावर स्पष्टपणे डायरेक्ट सेलर्स (ज्यांच्याकडे विक्री उत्पादनांचा साठा आहे) स्क्रीनवर आसपास दिसतात. ग्राहकांना केवळ सर्वात आश्वासक डायरेक्ट सेलरची निवड करायची असते, जो त्यांना कमीतकमी वेळेत उत्तम सेवा आणि उत्पादनाची किफायतशीर किंमत देईल! अशाप्रकारच्या तंत्रज्ञान आधारीत अद्यायावतीकरणामुळे नेटसर्फ नेटवर्कच्या डायरेक्ट सेलिंग पद्धतीत बरीच पारदर्शकता आणली आहे. ग्राहक हा मंच कोणत्याही स्क्रीनकरिता वापरू शकतात, डेस्कटॉप अथवा स्मार्टफोन्स; दोन्ही! या मंचामुळे केवळ ग्राहकाचे सबलीकरण होत नाही, तर डायरेक्ट सेलिंग व्यवसायालाही चालना मिळते. भारतात वस्तू विक्रीकरिता घरोघरी गेल्यावर मिळणाऱ्या ग्राहकांच्या नकाराला मिळालेले हे ठोस उत्तर आहे. अशा डिजिटल मंचांमुळे कंपन्यांना आपली ग्राहक संख्याबळ (कन्झ्युमर बेस) राखायला मदत होते, हे सांगायची आवश्यकता नाही.
तंत्रज्ञान विकास केवळ व्यवसाय काम आणि सुलभतेसाठी नाही, तर ग्राहक, डायरेक्ट सेलर आणि त्याचवेळी कंपनीचे सबलीकरण करण्यासाठी आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग आणि सोशल मीडिया नेटसर्फ नेटवर्ककडे मोठ्या प्रमाणावर सहस्त्रकातील तरुणांना आकर्षित करत आहेत.
नैसर्गिक, हर्बल ग्राहक उत्पादने
कोणताही डायरेक्ट सेलिंग व्यवसाय हा त्याचा प्रकार आणि कंपनी देऊ करत असलेल्या उत्पादनांचा दर्जा या अनुसार बाजारात अधिराज्य गाजवतो. नेटसर्फचा कायमच भर हा नैसर्गिक आणि हर्बल उत्पादने तयार करण्यावर आणि त्यांचा प्रसार करण्यावर राहिला आहे. अधिकाधिक ग्राहक हे नैसर्गिक आणि हर्बल जीवनशैली स्वीकारू पाहत आहेत, त्यांच्यासाठी नेटसर्फ’ची उत्पादने अतिशय सुयोग्य आहेत. नेटसर्फ ग्राहक ब्रँड 4 प्रमुख वर्गवारी (एकूण 53 उत्पादने) मध्ये निर्मिती व विपणन करते. उदाहरणार्थ, बायोफिट- अॅग्रीकल्चर ( नागपुरात 46% उलाढाल), नेचरमोअर- हेल्थ केअर (नागपुरात 33% उलाढाल), हर्ब्ज अँड मोअर- पर्सनल केअर (नागपुरात 20% उलाढाल), आणि अलीकडे अनावरण करण्यात आलेला क्लीन अँड मोअर- होम केअर (नागपुरात 1% उलाढाल). नागपुर मध्ये उच्च कामगिरी बजावणारी उत्पादने आहेत, स्टिमरिच, नेचरामोअर फॉर विमेन, बायो-95 इमल्सीफायर, नेचरामोअर वेनिला, SHET
व्यवसाय संधी
नेटसर्फ’ची व्यवसाय संधी अतिशय पारदर्शक आहे, ती समजायला सोपी आणि वापरायला सुलभ आहे. ही प्रत्येकाला त्याच्या/तिच्या स्टाईलप्रमाणे अधिकाधिक वापरायची संधी देते. नेटसर्फ चांगली उत्पादने देऊ करतात आणि या उत्पादनांच्या विपणनाकरिता आम्ही डायरेक्ट सेलर्सना नियुक्त करतो, जे स्वत:च्या उपयोगासाठी सवलतीच्या दरात ही उत्पादने विकत घेतात किंवा ते त्यांच्या सोशल सर्कलमध्ये त्यांची विक्री करतात. या बिझनेस मॉडेलमध्ये, पारंपरिक मॉडेलप्रमाणे वितरक व विक्रेत्यांना कमिशन देण्याऐवजी आपल्या डायरेक्ट सेलर्सना उत्पादनांचा प्रचार-प्रसार केल्याबद्दल नेटसर्फ इन्सेन्टीव्ह देते.
आज आमच्याकडे 240 हजार कार्यशील डायरेक्ट सेलर्सचे नेटवर्क आहे.
दर महिन्याला नेटसर्फकडे सरासरी 13,200 नवे डायरेक्ट सेलर्स दाखल होतात.
अतिशय संतुलित जनसांख्यिकीसोबत 40% शहरी व 60% ग्रामीण डायरेक्ट सेलर्स आहेत. \
महिला सबलीकरण
डायरेक्ट सेलिंग ही भारतीय महिलांसाठी सर्वोत्कृष्ट करिअर असल्याचे दर्शविते. कारण त्यामुळे त्या कामकाज आणि आयुष्यात सहज संतुलन साधू शकतात. नागपुरमध्ये नेटसर्फ नेटवर्कमध्ये अंदाजे 11,000 अस्मिता (महिला) डायरेक्ट सेलर्स आहेत. या अस्मिता डायरेक्ट सेलर्सने नागपुरमध्ये आर्थिक वर्ष 2017-18 दरम्यानच्या एकूण उलाढालीच्या 30.40 % योगदान दिले आहे.
डायरेक्ट सेलिंगची मार्गदर्शक तत्वे 2016
एक स्वागतार्ह बातमी म्हणजे भारत सरकारने भारतात डायरेक्ट सेलिंगची मार्गदर्शनपर तत्वे लागू केली आहेत. काही कंपन्यांकडून सुरू असलेल्या फसवेगिरीला आळा बसण्याच्या दृष्टीने उचललेले हे पहिले पाऊल म्हणावे लागेल. अस्तित्वातच नसलेल्या कंपनीत लोक पैसे गुंतवत जातात आणि अशातऱ्हेने बनाव रचला जातो. नेटसर्फ डायरेक्ट सेलिंग उद्योगक्षेत्राच्या वाढीसाठी प्रेरीत आणि सकारात्मक आहे. हे ग्राहकोपयोगी आहे. नेटसर्फचे कामकाज हे कायदेशीर पद्धतीने चालते. ही उद्योगक्षेत्रातील दुसरी कंपनी आहे, जी डिसेंबर 2016 मध्ये सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स ऑफ इंडियासोबत नोंदणीकृत आहे.
रोजगार निर्मिती
अनेक युवक हे आज वेगवेगळ्या शहरांमध्ये नोकरी किंवा व्यवसाय संधींनिमित्त स्थलांतरीत होत आहेत, ज्यामुळे त्यांना जीवनशैलीशी तडजोड करावी लागते. उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या येते, ज्यामुळे शहरांचा सामाजिक-आर्थिक आणि पर्यावरणीय समतोल ढासळतो. डायरेक्ट सेलिंग उद्योगक्षेत्रात आलेल्या डिजीटल क्रांतीसोबत आज डायरेक्ट सेलर्स आपल्या गावांतून भारतात कुठेही उत्पादने विकू शकतात.
केपीएमजी रिपोर्ट अनुसार, महाराष्ट्राच्या डायरेक्ट सेलिंग उद्योगात 2025 मध्ये संभाव्य उलाढाल रु. 7000 कोटींचा टप्पा गाठेल. नेटसर्फ, महाराष्ट्राच्या सर्व तालुक्यांमध्ये अस्तित्वात आहे, राज्यातील अनेक घटकांत उलाढाल वाढवायची भक्कम शक्यता डायरेक्ट सेलिंगमध्ये आहे. अद्ययावत तांत्रिक विकासासोबत, नेटसर्फने नवीन पिढीसोबत संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने डायरेक्ट सेलर्ससोबत रिलेशनशीप प्लान तयार केला. नेटसर्फला त्यांचा 17 वर्षांचा व्यवसाय वारसा पुढच्या पिढीकडे सोपवायचा असल्याने या आर्थिक वर्षात सहस्त्रकातील युवा वर्गात डायरेक्ट सेलर्सची संख्या वाढवण्याकडे 100% भर देण्यात येतो आहे. महाराष्ट्रात आर्थिक वर्ष 2018-19 दरम्यान नेटसर्फने 100% वाढ नोंदवली. एकंदर महाराष्ट्रात नागपुरमध्ये देखील अशाच पद्धतीची वाढ अपेक्षित आहे. 2018 मध्ये नेटसर्फची ‘नेटसर्फ डायरेक्ट’ नावाने अमेरिकेतील डायरेक्ट सेलिंग मार्केटमध्ये उतरण्याची योजना आहे. जी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2018 दरम्यान पूर्णपणे कार्यरत होईल. अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रवेश करणारी ही पहिली भारतीय डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे. नेटसर्फची अमेरिकेत गेली 28 वर्षे डायरेक्ट सेलिंग उद्योगात कार्यरत असलेल्या ‘सर्विस क्वेस्ट’सोबत भागीदारी असून, हे नाव या क्षेत्रात नावाजलेले आहे. शिवाय त्यांच्या गाठीशी 700हून अधिक कंपन्यांना लॉन्च केल्याचा अनुभव आहे.