সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, October 17, 2017

चंद्रपुरातही प्रवाश्यांचे हालःचंद्रपूर डेपोत बस उभ्या


(रोशन दुर्योधन) चंद्रपूर : ऎन दिवाळीच्या धावपळीत पगारवाढीच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे दिवाळीसाठी बाहेरगावी जाणा-या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मध्यरात्रीपासून संपाला सुरूवात झाली असून राज्यभर एसटी सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होण्यास सुरूवात झालीय.

चंद्रपूर डेपोतून तसेच जिल्ह्यातील ईतर डेपोतून मध्यरात्री सुटणाऱ्या गाड्या बाहेर पडल्या नाहीत. त्यामुळे दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. सर्व गाड्या आगारातच उभ्या आहेत. एसटी कर्मचारी आगारात जमले असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस देखील बसस्थानक परिसरात पहारा देत आहेत.

वेतनवाढीच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी सोमवारी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांसोबत बैठक झाली. मात्र या बैठकीनंतरही समाधान न झाल्याने कर्मचारी संघटना संपावर ठाम राहिल्या आहेत.

या संपामध्ये राज्यातील 1 लाख 7 हजार कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्यामुळे तब्बल 17 हजार गाड्यांना ब्रेक लागला आहे. 258 बस आगार आणि 31 विभागिय कार्यलयांमध्ये सामसुम आहे.याआधी 1972 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा 12 दिवसांचा संप झाला होता. त्यावेळी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यानंतर 1996, 2007 सालीही संप झाले होते.

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाला दिवसाला 20 कोटींचं नुकसान होणार आहे.
एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपकाळात सर्व खासगी प्रवासी बस, शालेय बस, खासगी बस व मालवाहू गाड्यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता दिली आहे.




শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.