সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, September 28, 2013

संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वाटयासाठी श्रमिक एल्गारने वनविभागाला कुलुप ठोकले

संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वाटयासाठी श्रमिक एल्गारने वनविभागाला कुलुप ठोकले

जिल्हयातील संयुक्त वनव्यवस्थापन समितीला वाटा देण्याची मागणी करीत श्रमिक एल्गारने चिचपल्ली येथील वनपरीक्षेत्र कार्यालयाला कुलुप ठोकुन वाटा देण्याची मागणी कार्यालयाच्या भिंतीवर लिहुन रात्रभर मुक्काम ठोकला.
संयुक्त वनव्यवस्थापन समिती षासनानंे जंगल गावात गठीत करून त्यांचेकडुन जंगलाचे संरक्षण व संवर्धन करून घेतले. षासकीय परीपत्रकानुसार गावातील वनाचे उत्पन्नातील 50 टक्के व 20 टक्के हिस्सा समितीला वनविभागाने काहीच दिले नाही. यापुर्वी हा वाटा देण्याची मागणी करीत श्रमिक एल्गारने मोर्चा काढला होता व यावेळी वनविभागाचे सचिव श्री. प्रविण परदेषी यांच्या निर्देषानुसार मुख्य वनसंदक्षक संजय ठाकरे यांनी एका महीण्यात समितीला वाटा देण्याचे लेखी दिले मात्र 3 महीण्याचा कालावधी लोटुनही वाटा न मिळाल्याने श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात गिलबिली येथील समिती सदस्यांना घेऊन वनपरीक्षेत्र कार्यालय चिचपल्ली येथिल कार्यालयाला ताला ठोकुन आंदोलन करण्यात आले. यावेळी वनविभागाच्या कार्यालय, विश्रांतीगृहावर व वनपरीक्षेत्राधिकारी यांच्या गाडीवर समितीला वाटा देण्याची मागणी रंगविण्यात आली. आंदोलकांनी रात्रभर मुक्काम ठोकले यावेळी क्षेत्राचे आमदार सुधिर मुनगंटीवार यंानी आंदोलकांची भेट घेऊन मागणी रास्त असल्याने वाटा देण्याचे दृश्टीने प्रयत्न करण्याचे आष्वासन दिले. याची दखल गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी घेत याबाबतचा पाठुपरावा मंुबईत करणार असल्याचे कळविले. वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, उपवनसंरक्षक चैधरी यांनी आंदालकासोबत चर्चा केली. रात्रभर आंदोलकांनी मुक्काम ठोकल्याने वनविभागाला जेवनाची सोय करावी लागली.
या आंदोलनात विजय सिध्दावार, विजय कोरेवार, डाॅ.कल्याणकुमार, प्रविण चिचघरे, संदीप गेडाम, धृपता मेश्राम, रंजना कोडापे, दादाजी गेउाम, निरन बुरांडे,छाया सिडाम, संगिता गेडाम, अनिल मडावी, किरण षेंडे, दिनेष घाटे व षेकडो आंदोलक सहभागी होते.
भरधाव ट्रकने महाविद्यालयीन विद्यार्थीनीला चिरडले

भरधाव ट्रकने महाविद्यालयीन विद्यार्थीनीला चिरडले

विद्यार्थीनीचा घटनास्थळीच मृत्यु
चिमूर/तालुका प्रतिनिधी  :-
    काम्पा-चिमूर-वरोरा राज्यमार्गावर दिनांक २८ सप्तेंबर २०१३ ला सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात बि. ए. भाग १ मध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थीनी मिनल अशोकराव नेवुलकर (वय १९ वर्षे) हि आपल्या मैत्रीणीबरोबर सायकलने महाविद्यालयात जात असतांनाच महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे कार्यालयासमोर भरधाव वेगाने येणाèया ट्रकच्या धडकेत मिनलचा घटनास्थळीच मृत्यु झाला. 
    सविस्तर वृत्त असे की, चिमूरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात बि. ए. १ मध्ये शिक्षण घेणारी मिनल नेवुलकर आपल्या सहकारी मैत्रीणीसोबत महाविद्यालयात जात असताना अचानकपणे काम्पावरुन चिमूरकडे येणारा ट्रक क्रमांक एम एच ३१-सि बी- ६८२८ याने जबर धडक दिल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यु झाला. सदर ट्रक हा चिमूर येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या शारदा अंबिका पॉवर प्लॉन्ट येथे कोळशाची चुरी पुरवठा करण्याकरीता आला होता. ट्रकला पोलीसांनी जप्त केले असून सदर ट्रक चालक नरपतqसग व्हिपतलाल इनवासे (वय २५ वर्षे) रा. मोहगावटोला तह. शिवणी जि. बालाघाट (मध्यप्रदेश) याचेवर २७९, ३०४अ भादवी अन्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वहिद शेख, उपनिरीक्षक नागोसे करीत आहेत.

Chandrapur Super Thermal Power Station

Chandrapur Super Thermal Power Station

CHANDRAPUR: The Chandrapur Super ThermalPower Station (CSTPS) has violated pollution control standards every single day over the last three years. This startling information was obtained by an NGP Eco-Pro Organisation under Right to Information. The unchecked pollution poisoned the atmosphere in Chandrapur city and around.

A report sent by local MPCB regional office to its joint director regarding CSTPS mentions that the plant's oldest unit Nos. 1 and 2 (that were commissioned in 1983 and 1984 respectively) are regularly discharging suspended particulate matter (SPM) at an average of 383.1mg/Nm3 and 642.92 mg/Nm3 respectively as against the standard of 100 mg/Nm3. "Since height of stacks (chimneys) of unit Nos. 1 and 2 is 90 metres, the dispersion of particulate matter in Chandrapur city which is about 7 to 8km cannot be ruled out and may cause air pollution," it states.

"The stack monitoring of these two units of CSTPS has regularly shown emissions higher than average of 500 mg/Nm3, there have been many instances of accidental discharge. For instance, discharge from both 1 and 2 units was as high as 2447mg/Nm3 on November 22, 2012. Similarly, discharge from unit No. 2 on January 24, 2012 and May 17, 2012, was recorded 1733mg/Nm3 and 1402mg/Nm3," alleged Eco-Pro president Bandu Dhotre citing the RTI documents.

Dhotre claimed that as current pollution standards for thermal power plant are 50mg/Nm3 and it is mandatory for the plants to have chimney of over 275 metres.

MPCB officers carry out stack monitoring (pollution inspection) only once a month and found violation of norms on every single instance during the last three years. "There could have been several instances of high accidental discharge of over 1000 mg/Nm3 which have gone unnoticed. These two units are adding poison to the atmosphere which has already started taking toll on the health of citizens," alleged Dhotre demanding immediate scrapping of unit Nos. 1 and 2. The electrostatic precipitators (ESPs) of these two units are designed to control SPM of 757 mg/Nm3 and are unable to achieve prescribed standards of 150 mg/Nm3.

MPCB have bent the rules and have prescribed unit Nos. 1 and 2 standard of 150 mg/Nm3 particulate emission as a special case. "Despite this, the CSTPS has failed to bring discharge under the specially prescribed standards despite spending hundreds of crores on repairs of these ESPs," he said.

Environment expert Naresh Dahegaonkar claimed that high pollution caused by CSTPS has direct impact on the health of the people of Chandrapur. "CSTPS emission consists of nitrogen oxide and sulphur oxides along with several volatile organic compounds. Such pollutants add to the threat of pre-natal deaths and respiratory disorders. Children are particularly prone to hazardous effect of these chemicals," he said.

Dahegaonkar claimed that high pollution is a threat to the biodiversity of the area. Emissions of CSTPS have affected the growth of plants and disturbed the ecological balance in its impact area, he said.
चंद्रपूर वीज केंद्रातील दोन्ही संच बंद करा

चंद्रपूर वीज केंद्रातील दोन्ही संच बंद करा

चंद्रपूर
चंद्रपूरजवळील महाऔष्णिक वीज केंद्रातील जुने दोन संच शहरातील वाढत्या प्रदूषणास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे सुमारे सात ते आठ किलोमीटरच्या परिघातील जनता आजारी पडत आहे. यासंदर्भात पर्यावरणमंत्री संजय देवतळे यांना पत्र देऊन दोन्ही संच बंद करण्याची मागणी केली होती. त्यांनी कारवाईसाठी पाठपुरावा केला. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने वरिष्ठ कार्यालयास दिलेल्या अहवालातील माहिती धक्कादायक आहे. हे दोन्ही संच बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी दिला आहे. 

कोळशावर आधारित वीजनिर्मिती करण्यासाठी चंद्रपूर शहरालगत १९८३मध्ये महाऔष्णिक वीज केंद्राची स्थापना झाली. १५ ऑगस्ट १९८३मध्ये पायाभरणी झाल्यानंतर संच क्रमांक १ मधून १ नोव्हेंबर १९८४ पासून २१० मेगावॅट वीज उत्पादन सुरू झाले. त्यानंतर १६ सप्टेबर १९८५मध्ये युनिट क्रमांक दोनमधून २१० मेगावॅट क्षमतेची वीजनिर्मिती सुरू झाली. या दोन्ही संचाच्या चिमणीची उंची केवळ ९० मीटर आहे. या संचाचे डिझाइन जुन्या तंत्रज्ञानानुसार करण्यात आले आहे. या संचाचे डिझाइन ७५७.५ मायक्रो ग्रॅम प्रती घनमीटर इतके आहे. मात्र हे दोन्ही संच आता ३० वर्षे जुने असल्याने प्रदूषणाची पातळी वाढली आहे. नवीन नियमानुसार नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्र्रकल्पांना प्रदूषणाचे मानक हे ५० मायक्रो ग्रॅम असे आहेत. मात्र या दोन संचाकरिता १५० मायक्रोग्रॅम प्रती घनमीटरचे मानक निश्चित केले आहेत. म्हणजेच या संचाना एकप्रकारे सूट देण्यात आली आहे. त्यानंतरही या दोन्ही संचातून सुमारे ५०० मायक्रोग्रॅमपेक्षा अधिक प्रदूषण होत आहे. 

प्रदूषणाचे परिणाम 

संचातून होणाऱ्या प्रदूषणाचा परिणाम नागरिकांसोबत वृक्ष लोकवस्ती पक्षी जनावरे यांच्यावर होतो. श्वसननलिका खराब होऊन दमा अस्थमा तसेच त्वचेचे डोळ्याचे आजार होत आहेत. जन्माला येणारे बाळ आजार घेऊनच येत आहे. प्रदूषणामुळे झाडांमध्ये कार्बोहायर्डेड तयार होत नाही. परिणामी झाडांची पूर्ण वाढ न होता निष्पर्ण होतात. 

धक्कादायक अहवाल 

पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांनी इको-प्रोच्या तक्रारीची दखल घेतल्यानंतर संबधित विभागाने येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयास विचारणा केली. वरिष्ठ कार्यालयास लेखी स्वरूपात देण्यात आलेला अहवाल धक्कादायक आहे. यात प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांनी संच क्रमांक १ व २ मधून होणारे प्रदूषण निर्धारित मानकापेक्षा जास्त आहे. जानेवारी २०१२ ते एप्रिल २०१३ पर्यंत संच क्रमांक १ व २ मधून सरासरी अनुक्रमे ३८३.९१ व ६४२.९२ इतके धोक्याच्या पातळीबाहेर आहे. या अहवालात नमूद केल्याप्रमाणे वीज प्रकल्पाच्या सभोवताल ७ ते ८ किमीपर्यंत वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याचे नाकारता येत नाही असे प्रदूषण नियत्रंण मंडळाने संच १ व २ बाबत स्पष्ट केले आहे.
चिमुरात १२0 क्विंटल तांदूळ जप्त

चिमुरात १२0 क्विंटल तांदूळ जप्त

अनेक मासे अडकणार
धान्याची अफरातफर: सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह चौघांना अटक
चिमूर: शासकीय गोदामातील स्वस्त धान्य दुकानदारांना अडीच रुपये किलो दर असलेला १२0 क्विंटल तांदूळ चिमूर येथील सौदागर यांच्या गोदामात उतरविताना चिमूर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत ट्रकचालकासह, गोदामकिपर, स्वस्त धान्य दुकानाचा संचालक व माल विकत घेणार्‍याला रंगेहात पकडून अटक करण्यात आली. नामदेव हिवरकर, गजानन लोणकर, फारुख गुलाम शेख सौदागर, भगवान तुकाराम राखडे अशी आरोपींची नावे आहेत. 
आरोपीमध्ये चिमूर विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष नामदेव हिवरकर यांचा समावेश आहे. अशा पद्धतीने शासकीय धान्याची नियमीत अफरातफर केली जात असावी, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे. शासकीय गोदामातून शासकीय मालाची अफरातफर होत असताना प्रशासकीय अधिकार्‍यांनी मौन पाळले असल्याने हा प्रकार अधिकारी कर्मचार्‍यांच्या संगनमताने होत असावा, अशी चर्चा आहे. 
गोरगरीबांना स्वस्त दरात धान्याचा पुरवठा व्हावा, यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु या धान्याचे लार्भार्थ्यांना वितरण न करता ते मोठ्या व्यापार्‍यांना विकल्या जात आहे. असाच प्रकार चिमूर पोलिसांच्या सतर्कतेने आज उघड झाला. संबंधित अधिकार्‍यांशी हात मिळवणी करून होत असलेल्या आर्थिक व्यवहारामुळे या विषयात कोणतीही कारवाई केली जात नाही. आज चिमुरात भरदिवसा शासकीय गोदामातील धान्य व्यापार्‍याच्या खासगी गोदामात उतरविण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला. 
शासकीय गोदामातील धान्य खासगी गोदामात उतरविला जात असल्याची गोपनिय माहिती ठाणेदार हेमंत खराबे यांना मिळाली. त्यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक ठाकरे ताफ्यासह सौदागर यांच्या गोदामाजवळ पोहचले. यावेळी शासकीय धान्याची अफरातफर होत असल्याचे दिसताच, त्यांनी ट्रकचालकासह सर्वांना आपल्या ताब्यात घेतले. एकूण तांदळापैकी ८0 कट्टे तांदूळ खासगी गोदामात उतरविण्यात आले होते. तो मालही पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.
चिमूर विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष नामदेव नारायण हिवरकर यांना यापूर्वी असाच अफरातफरीचा प्रकार करताना गिरड पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते, हे विशेष. आरोपी नामदेव हिवरकर, गजानन लोणकर, फारुख गुलाम शेख सौदागर, भगवान तुकाराम राखडे यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी) अनेक मासे अडकणार शासकीय गोदामातील धान्य खासगी गोदामात उतरवित असताना पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. यात विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह चौघांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार असून यापूर्वीही अशा प्रकारे धान्याची अफरातफर झाली काय, हेदेखील तपासाचा विषय ठरणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यातील २०३ अंगणवाडी इमारतींचे बांधकाम रखडले

जिल्ह्यातील २०३ अंगणवाडी इमारतींचे बांधकाम रखडले

बांधकाम करण्याची आ. नाना श्यामकुळे यांची मागणी
चंद्रपूर, २७ सप्टेंबर
सन २०११ ते २०१३ या वर्षात एकूण ६४३ अंगणवाडीच्या इमारत बांधकामास मंजुरी प्राप्त झाली असून, अद्याप केवळ १६३ अंगणवाडी इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर, २७७ अंगणवाडी इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. मात्र, २०३ अंगणवाडीचे बांधकाम अद्यापही सुरू झालेले नाही. योग्य प्रकारे नियोजन न झाल्यामुळे हे बांधकाम रखडलेले असून, लहान मुलांना चांगल्या व पोषक वातावरणात शिक्षण मिळावे याकरिता उर्वरित अंगणवाडीचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याची मागणी आमदार नाना श्यामकुळे यांनी केली आहे.
राज्य विधानसभेच्या मार्च १३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार श्यामकुळे यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अंगणवाडी इमारत नसल्यामुळे भाड्याच्या खोलीत, झाडाखाली लहान मुलांना शिक्षण घ्यावे लागत असल्याची बाब निदर्शनास आली. तेव्हा तातडीने अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्याची मागणी त्यांनी केली होती.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्र राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली चालविल्या जातात. चंद्रपूर जिल्हा परिषदेला अंगणवाडी इमारत बांधकामासाठी २०१०-११ या वित्तीय वर्षात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ११.६५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला होता. त्यातून ३३२ अंगणवाडी इमारत केंद्राचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. २०११-१२ या वित्तीय वर्षात जिल्हा वार्षिक योजना आदिवासी उपयोजना, १३ वित्त आयोग, मानव विकास मिशन या योजनेंतर्गत ११.१८ कोटी रुपये निधी अंगणवाडी इमारत बांधकामाकरिता प्राप्त झाला. त्यातून ३०९ अंगणवाडी इमारत बांधकाम हाती घेण्यात आले आहे. २०१२-१३ या वित्तीय वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून आणि १३ व्या वित्त आयोगाकडून मार्च २०१३ अखेर २.१० कोटी निधी अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाकरिता प्राप्त झाला आहे. त्यातून पंचायत समितीकडून तांत्रिक मंजुरीसह प्राप्त झालेल्या २ अंगणवाडी इमारतीची बांधकामे हाती घेण्यात आली आहेत. उर्वरित निधी २०१३-१४ मध्ये खर्च करण्यात येईल, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी कळविले असल्याची माहिती आमदार श्यामकुळे यांनी दिली.
 तीव्र आंदोलन करण्याचा इशारा: इको-प्रो

तीव्र आंदोलन करण्याचा इशारा: इको-प्रो

दिनांकः 27 सप्टे 2013

चंद्रपूर शहरालगत असलेल्या महाऔष्णीक वीज केंद्रातील जुने संच क्रं 1 व 2 शहरातील वाढत्या प्रदुषणास कारणीभुत ठरत असुन, सुमारे सात ते आठ किलोमीटरच्या परिघातील जनता आजारी होत आहे. यासंदर्भात पर्यावरणमंत्री संजय देवतळे यांना एप्रील 2013 मध्ये पत्र देऊन दोन्ही संच बंद करण्याची मागणी केली होती. त्यांनी उर्जामंत्री, पर्यावरण विभाग, प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे उचित कारवाईसाठी पाठपुरावा केला. त्यांनतर येथील प्रदुषण नियंत्रण मंडळाने वरीष्ठ कार्यालयास दिलेल्या अहवालातील माहिती धक्कादायक आहे. त्यानुसार हे दोन्ही संच बंद करण्याच्या मागणीकरीता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी दिला आहे.
कोळशावर आधारीत विजनिर्मीती करण्यासाठी चंद्रपूर शहरालगत 1983 मध्ये महाऔष्णीक वीज केंद्राची स्थापला झाली. 15 आॅगष्ट 1983 मध्ये पायाभरणी झाल्यानंतर संच क्रमांक 1 मधुन1 नोव्हे 1984 पासुन 210 मेगावॅटची वीज उत्पादन सुरू करण्यात आले. त्यानंतर 16 सप्टेबर 1985 मध्ये युनीट क्रमांक दोन मधुन 210 मेगावॅट क्षमतेची वीज निर्मीती सुरू झाली. या दोन्ही संचाच्या चिमणीची उंची केवळ 90 मीटर आहे. या संचाचे डिझाईन जुन्या तंत्रज्ञाानानुसार करण्यात आले असुन या संचाचे डिझाईन 757.5 मायक्रो गॅ्रम/प्रती घनमीटर इतके आहेे. मात्र, हे दोन्ही संच आता 30 वर्षे जूने असल्याने प्रदुषणाची पातळी वाढलेली आहे. नवीन नियमानुार नव्याने उभारण्यात येणारे प्र्रकल्पांना प्रदुषणाचे मानक हे 50 मायक्रो ग्रॅम/प्रती घनमीटर असे आहेत. मात्र या दोन संचाकरिता 150 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर चे मानक निश्चीत केलेले आहेत, म्हणजेच या संचाना एकप्रकारे सुट देण्यात आलेली आहे असे असतांना सुध्दा या दोन्ही संचातुन सुमारे 500 मायक्रोग्रॅम/घनमीटर पेक्षा अधीक प्रदुषण होत आहे.
पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांनी इको-प्रोच्या तक्रारीची दखल घेतल्यानंतर संबधित विभागाने येथील प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयास विचारणा केली असता वरीष्ठ कार्यालयास देण्यात आलेला लेखी स्वरूपात देण्यात आलेला अहवाल धक्कादायक आहे. या अहवालात प्रादेशीक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुंषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर यांनी संच क्रमांक 1 व 2 मधून होणारे प्रदुषण निर्धारीत मानकापेक्षा (100 मायक्रो गॅ्रम/प्रती घनमीटर) पेक्षा जास्त आहे. जाने 2012 ते एप्रील 2013 पर्यत संच क्रमांक 1 व 2 मधुन सरासरी अनुक्रमे 383.91 व 642.92 इतके धोकाच्या पातळीबाहेर आहे. या अहवालात नमुद केल्याप्रमाणे वीज प्रकल्पाच्या सभोवताल 7 ते 8 कीमी पर्यत वायुप्रदुषणास कारणीभुत ठरत असल्याचे नाकारता येत नाही असे प्रदुषण नियत्रंण मंडळाने संच 1 व 2 बाबत स्पष्ट केले आहे. यावरून शासन मंुबई-पुणे सारख्या पच्छिम महाराष्ट्रात विजेच्या गरजेसाठी संच 1 व 2 सारख्या प्रदुषीत संचाना विज निर्मीती करीता सुरू ठेवून सर्वसामान्याचे आरोग्य बेजार करीत आहे.

प्रदुषणाचे परिणामः
या संचामधुन होणारे प्रदुषणामुळे शहरातील जनजीवनावर मोठया प्रमाणात होण्यामागे हे संच खुप जुने असणे, जुन्या तंत्रज्ञानुसार बनल्याने तसेच या संचाच्या चिमणीची उंची कमी असणे हे मुख्य कारण आहे. या राखेच्या प्रदुषणाचा परिणाम नागरीकांसोबत, वृक्ष, लोकवस्ती, पक्षी, जनावरे यांच्यावर होतो. श्वसननलिका खराब होऊन दमा, अस्थमा तसेच स्किनचे आजार, डोळयाचे आजार होत आहेत. नवीन जन्माला येणारे बाळ आजार घेऊन जन्मास येत आहे. त्यामुळे वृक्षांमध्ये कार्बोहायडेªड तयार होत नाही. झाडाची पुर्ण वाढ न होता निष्पर्ण होतात. मानव, प्राणी, वृक्ष या तिन्ही घटकांवर परिणाम होतो. घरात, गाडीवर धूळ साचलेली दिसते त्याची बाधा पोहचुन मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.
इको-प्रो चा पाठपुरावाः
1. 4 एप्रील 2013 पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांना निवेदन
2. 16 एप्रील 2013 इको-प्रोच्या पत्राची दखल घेत मा. संजय देवतळे यांचे मा. उर्जा मंत्री, प्रधान सचिव,     उर्जा, सचिव, पर्यावरण विभाग, सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांना पत्र
3. 2 मे 2013 महाराष्ट्र प्रदुषण मंडळ, मंुबई यांचे प्रादेशीक अधिकारी, मं.प्र.नि. मंडळ, चंद्रपूर यांना पत्र
4. 7 मे 2013 प्रादेशीक अधिकारी, मं.प्र.नि.मंडळ, चंद्रपूर यांचा अहवाल महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांना सादर
5. 23 मे 2013 इको-प्रो ने मं.प्र.नि. मंडळ चंदपूर कडुन माहीती अधिकारात माहीती मिळविली.
6. 26 जुलै 2013 इको-प्रो ने सिटीपीएस कडुन माहीती अधिकार माहीती मिळवीली.


पत्रकार परिषदेस सहभागी पदाधिकारी/कार्यकर्तेः
बंडु धोतरे, अध्यक्ष इको-प्रो संस्था, चंद्रपूर
नितीन रामटेके, इको-प्रो, पर्यावरण विभाग प्रमुख
प्रा. डाॅ. नरेद्र दहेगांवकर, नितीन बुरडकर, संदीप इंगोले

Thursday, September 26, 2013

मजुरांची मजुरी वाटप

मजुरांची मजुरी वाटप

चंद्रपूर तालुक्यातील पिंपळखुट येथील कृशी विभागाच्या बंधारा बांधकामाची मजुरी महीलांना न मिळाल्याने श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात आंदोलन करताच मजुरीचे वाटप करण्यात आले.

पिंपळखुट येथे पाणलोट योजनंेतर्गत बंधाÚयाचे बांधकाम करण्यात आले. सदर काम पाणलोट समिती व तालुका कृशी विभाग चंद्रपूर यांचे मार्फत करण्यात आले. सदर काम 6 लाखाचे करण्यात आले परंतु येथे काम करणा-या महीला मजुरांची 4 महीण्यापासुन मजुरीच देण्यात आली नाही. त्यामुळे श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे मार्गदर्षनात कार्यकत्र्यांनी महीला मजुरांना घेऊन तालुका कृशी अधिकारी चंद्रपूर यांचे कक्षातच ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. मजुर आले असतांनाही अधिकारी कार्यालयात न पोहचा मिटींगमध्ये असल्याचे सांगण्यात येत होते पंरतु मजुरांनी मजुरी घेतल्याषिवाय येथुन जाणार नसल्याची भुमिका घेतल्याने कार्यालयात उपविभागीय कृशी अधिकारी खातोडे, तालुका कृशी अधिकारी येरगुडंे, कृशी सहाय्यक खेकारे उपस्थित झाले. यावेळी रेकार्डनुसार मजुरी वाटप करण्याची माागणी केली परंतु कार्यालयात रेर्कार्डच उपलब्ध नव्हते. मोजमाप पुस्तीकेत रेती मुल तालुक्यातील राजोली घाटावरून आणल्याचे दाखविण्यात आले होते तर दगड खालवसपेठ येथिल दाखविण्यात आले परंतु महीलांना रेती व दगड गावाजवळील जंगलातील वापरल्याचे सांगीतले. खात्यातील रक्कम 15 दिवसापुर्वी काढण्यात आली परंतु महीला मजुरांना न देता कृशी पर्यवेक्षक श्री. ठाकरे यांनी 256000 रूपये स्वतःकडे ठेऊन अपरातफर केल्याचे निदर्षनात आले. महीलांना न हटण्याची भुमिका घेतल्याने येथील तहसिलदार षिंदे हे आंदोलक महीलांना समजविण्याचा प्रयत्न करू लागले परंतु मजुरीषिवाय हटणार नसल्याची भुमिका कायम असल्याने उपविभागीय कृशी अधिकरी, तालुका कृशी अधिकारी व कृशी सहायक यांनी प्रतीदिन 227 रूपये प्रमाणे उदया 12 वाजेपर्यत मजुरी गावात वाटप करण्याची लेखी दिल्याने व बांधकामात भ्रश्टाचार करणाÚयांवर कारवाइ्र्र करण्याचे आष्वासन दिल्याने आंदोलन स्थगीत करण्यात आले. यावेळी श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिध्दावार, विजय कोरेवार, डाॅ. कल्याणकुमार, प्रविण चिचघरे, फरजाना षेख, छाया सिडाम, किरण षेंडे, दिनेष घाटे,यमराज बोदलकर ंआदींसह पेठ व पिंपळखुट येथील मजुर सहभागी होते

दुस-याच दिवषी दिनांक 25 सप्टेंबरला 42 महीलांची 1 लाख 29 हजार रूपये मजुरी गावात जाऊन वाटप करण्यात आली.

Wednesday, September 25, 2013

यवतमाळ जिल्ह्यात तीन खुन

यवतमाळ जिल्ह्यात तीन खुन

यवतमाळ- जिल्ह्यात एका दिवसात विविध ठिकाणी खुनाच्या तीन घटना घडल्याने जिल्हा पोलीस प्रशासन हादरले आहे. पुसद तालुक्यातील हर्शी गावात घडली. येथे संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलाने आईचा खून केल्याची दुर्दैवी घटना घडली. भूखंडाच्या मालकीच्या वादावरून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरी घटना मानपूर गावात घडली असून येथे एका तरुणाचे डोके ठेचून हत्या करण्यात आली आहे. तर तिसरी घटना जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात चिखली गावात घडली. येथे एका तरुणीचा खून करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुसद तालुक्यातील हर्शी गावात मंगळवारी संपत्तीच्या वादातून गजानन संभाजी वाडे (वय ३१) या तरुणाने त्याची आई सयाबाई वाडे (वय ६०) हिचा खून केला. आरोपी गजानन वाडेला एक भूखंड स्वतःच्या नावावर करून हवा होता. मात्र यावरून मुलगा आणि आईमध्ये वाद झाला. आरोपी गजानने तिक्ष्न हत्याराने भोसकल्याने तिची आई, सयाबाई वाडे हिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी गजानन वाडेला अटक केली आहे. माणपूर गावात एका २५ वर्षाच्या तरुणाचा मृतदेह सापडल्याचे कळताच पोलीस पथकाने येथे धाव घेतली. परंतु मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याने त्याची ओळख मात्र पटू शकली नाही. याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तिसऱ्या घटनेत चिखली गावात लक्ष्मी भीमराव दाभे (२१) ही तरुणी सकाळी प्रातर्विधीसाठी घराबाहेर गेली होती. परंतु बराच वेळ ती घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबियांनी शोध घेतला असता जवळच्या जंगलात तिचा मृतदेह मिळाला होता. 
महावितरणला 'फेसबुक अकाउंट'चा आधार

महावितरणला 'फेसबुक अकाउंट'चा आधार

महावितरणसारख्या सरकारी कंपनीनेही अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी 'फेसबुक अकाउंट'चा आधार घेतला आहे. विशेष म्हणजे अल्पावधीतच महावितरणच्या फेसबुक पेजला हजारो 'लाइक्स' मिळाले आहेत. महावितरण वीजग्राहकांशी 'फेस टू फेस' संवाद साधत आहे.

शासकीय कार्यालय किंवा संस्था म्हटल्या की तंत्रज्ञानाच्या बाबतीतील त्यांचे मागासलेपणच डोळ्यापुढे येते. मात्र, महावितरणने या सर्व संकल्पनांना छेद आता थेट फेसबुकच्या माध्यमातून वीजग्राहकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत सरकारी कंपनीही 'टेक्नोसॅव्ही' असल्याचे सिद्ध केले आहे. जगभरात संवाद साधण्यासाठी महत्त्वाच्या पंधरा सोशल नेटवर्किंग साइट्समध्ये फेसबुक सध्या आघाडीवर आहे. नेमकी हीच बाब हेरून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजॉय मेहता यांच्याद्वारे कंपनीचे फेसबुक पेज तयार करण्याची संकल्पना पुढे आली.महावितरणने राज्यभरातील त्यांच्या विविध शहर परिमंडळात फेसबुक अकाउंट सुरू केले आहे. विशेष म्हणजे याद्वारे कंपनीने अनेक मित्र जोडले. काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आलेल्या नागपूर परिमंडळातील फेसबुक अकाउंटला दोन हजारांहून अधिक मित्र मिळाले आहेत.
अश्लील एसएमएस : पुरवठा विभाग अधिकारी  डॉ. मडावी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल

अश्लील एसएमएस : पुरवठा विभाग अधिकारी डॉ. मडावी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल

चंद्रपूर, ता. २५ : पुरवठा विभाग कार्यालयातील अधिकारी डॉ. सचिन मडावी यांनी त्यांच्या खासगी शिकवणीतील मुलिनां अश्लील एसएमएस पाठवील्याची घटना घडली. ‘मगळवारी (ता. २४) दुपारच्या सुमरास शहर पोलिस ठाण्यात डॉ. मडावी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला. शहरातील रघुवंशी संकुल येथे डॉ. सचिन मडावी हे स्पर्धा परिक्षांचे खासगी शिकवणी वर्ग घेतात. त्यातील अनेक मुलीस अश्लील एसएम‘एस पाठवुन स्वताच्या शासकीय निवासस्थानी बोलावित असल्याचा आरोप ‘मुलींनी केला आहे. असा प्रकार काही दिवापासुन सुरू आहे. स्पर्धा परिक्षेतील एका मुलीस मी  तुझा सोबत लग्न करतो असे त्यांनी म्हटले. त्या मुलीने शिववणी वर्गास येणे बंद केले होते. त्यांनतर मडावी यांनी तीला भ्रम्हणध्वनीवर संभाषण केले व सांगीतले की तुजे करीअर तु आधी बंघ नंतर आपन लग्नाच बघु त्यांनतर ती मुलगी शिकवणी वर्गास आली. तेव्हा तीच्या मत्रीनीम‘ध्ये या शिक्षकावीषयी बèया वाईट चर्चा चालु होत्या. त्या‘ध्ये तीच्या मेत्रीनीच्या भ्रम्हणध्वनीत देखील अश्लील एसएमएस पाठविले असे तीला कळले. त्यांनतर त्यातील तिन ‘मुलींनी या शिक्षकाविरूध्द पोलिसांत तक्रार करून धडा विकवीण्याचे ठरविले. त्यानंतर त्यांनी येथील एका नगरसेविकेला या संबधीची महीती दिली. नगरसेविकेसोबत पोलिस अधिक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांना घटनेची महीती दिली. त्यांनतर शहर पोलिस ठाण्या‘मध्ये घटनेची तक्रार तीन्ही ‘ुमलींनी दिली. पोलिसांनी आरोपी विरूध्द ५०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलिसांनी एक पथक निरिशन  करून रात्री उशीरापर्यत आरोपी डॉ. सतीशम‘डावी यांना अटक केली. त्यानंरत आरोपीच्या कबुली जवाब पोलिसांनी नोंदविला आहे. पुढिल तपास पोलिस करीत आहे. या शिकवणी वर्गातील अशा अनेक मुली समोर येवुन शकतात.
'इको-प्रो' च्या पत्राची पर्यावरणमंत्र्यांनी घेतली दखल

'इको-प्रो' च्या पत्राची पर्यावरणमंत्र्यांनी घेतली दखल


                                       
चंद्रपूर- महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रदूषणामुळे या जिल्हय़ाच्या नावाची नोंद जागतिक पातळीवर प्रदूषित शहर म्हणून घेण्यात आली. १९८३ ला सुरू झालेल्या या प्रकल्पात आणखी हजार मे. वॅ. च्या संचाला मंजुरी देण्यात आली. या संचाला पाचशे मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर पर्यंतचे प्रदूषण मान्य करण्यात आले. असे होत असताना जुन्या संचातून दीडशे मायक्र ोग्रॅम प्रती घनमीटरपेक्षा अधिक प्रदूषण होत असल्याचे इको-प्रो या सामाजिक संस्थेने शासनाला लक्षात आणून दिले. त्यामुळे हे संच बंद करण्यात यावे, यासंदर्भातील पत्र इको-प्रोचे संस्थापक बंडू धोतरे यांनी एप्रिल महिन्यात पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच जिल्हय़ाचे पालकमंत्री संजय देवतळे यांना दिले. या पत्राची दखल पालकमंत्र्यांनी घेतली असून, निवेदनातील विनंतीच्या अनुषंगाने आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती उपमुख्यमंत्र्यांना केली आहे.

संपूर्ण आशिया खंडात सुप्रसिद्ध असलेले चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र आता चंद्रपुरकरांच्या विनाशासाठी कारणीभूत ठरत आहे. या विद्युत केंद्रातील सात संचापैकी चार संच कालबाहय़ झाले असून, ३८ हजार मे. टन कोळशातून केवळ १५00 मे. वॅ. विजनिर्मिती होत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. एवढेच नव्हे तर या विद्युत केंद्रातून निघणार्‍या राखेमुळे चंद्रपुरकरांचे जीवन धोक्यात आले आहे. चार संचाचे आयुष्य संपल्यानंतरही ते सुरूच ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्राला प्रकाश देण्यासाठी चंद्रपुरकरांचा विनाश होतोय, अशी ओरड नागरिकांची असून, नागरिकांनी आता याविरोधात आंदोलनाची तयारी चालविली आहे.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राज्याच्या विकासासाठी चंद्रपुरात औष्णिक विद्युत केंद्राची मुहूर्तमेढ किमान तीन दशकापूर्वी केली. त्यावेळी टप्याटप्याने चार संच सुरू करण्यात आले. पहिला संच १९८३ ला तर चौथा संच १९८६ ला उभा झाला. प्रत्येक संचातून २१0 मे. वॅ. वीजनिर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले. जिल्हय़ात उपलब्ध असलेला कोळशाचा साठा लक्षात घेता विद्युत निर्मिती संचाची संख्या नंतर सात करण्यात येऊन २,३४0 मे. वॅ. वीजनिर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले. परंतु, हे लक्ष्य आजपर्यंत शासनाला गाठता आले नाही. पाहता-पाहता सुरुवातीला उभारण्यात आलेल्या संचाचे आयुष्य दहा वर्षापूर्वीच संपले. परंतु, त्यानंतरही या संचातून वीजनिर्मिती केली जात आहे. ३४ हजार मे. टन कोळशाचा व ३५ हजार घन मीटर प्रती तास पाण्याचा वापर होत असतानाही निव्वळ १५00 मे. वॅ. वीजनिर्मिती केली जात आहे. वास्तविक पाहता एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कोळशाचा वापर होत असताना ३ हजार मे. वॅ. वीजनिर्मिती होऊ शकते, असे जानकारांचे मत आहे. शासनाने काही वर्षापूर्वी या जिल्हय़ात उर्जानिर्मिती प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यात वर्धा पॉवर, धारीवाल पॉवर यासारख्या मोठय़ा कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या कमी खर्चात जास्त वीजनिर्मिती करीत असून, त्यांचे हवेतील प्रदूषणही अत्यल्प व निर्देशांकानुसार आहे. हीच बाब मात्र चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या बाबतीत नसल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करते तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या औष्णिक केंद्रातील जुने संच व इलेक्ट्रोस्टेटीक प्रेसीप्रीपेटर(इएसपी) हे कोळशातून २५ टक्के राख असेल या तत्वावर तयार करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र चंद्रपूर परिसरातील कोळसा चाळीस टक्के राख असलेला आहे. त्यामुळे चंद्रपुरातील ईएसपी नेहमी बंद पडताना आढळतात. यामुळे हवेतील राखेचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. औष्णिक विद्युत केंद्रातून हवेत सोडण्यात येणार्‍या राखेमध्ये सल्फर गॅस, कार्बनडायऑक्साईड, नायट्रोजनडायऑक्साईड, पारा यासारखे धातू हवेत सोडले जातात. त्यामुळे मज्जातंतूचे आजार फोफावताना दिसतात. मूळात २00 ते ४00 पार्टीक्यूलेटपर मीटर(पिपिएम) इतके प्रदूषण मानकानुसार व्हायला हवे. परंतु, हे प्रमाण आता चार ते पाच हजार पीपीएम पर्यंत पोहचले आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरावर राखेची एक मोठी 'लेअर' तयार झाली असून, त्याचा विपरित परिणाम काही दिवसांपूर्वी बघायल मिळाला. नासाने चंद्रपूर शहरावर नायट्रस ऑक्साईडचे ढग असल्याचा अहवाल काही वर्षापूर्वी शासनाला दिला होता. त्यानंतरही शासन जागे झाले नसून, चंद्रपुरातील कालबाहय़ झालेले विद्युत निर्मिती संच केवळ पश्‍चिम महाराष्ट्राला वीज पुरविता यावी, म्हणून सुरू ठेवण्यात आले आहे. हे संच त्वरित बंद करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
बाळ हुनगुंद
9326641177
प्रमोद काकडे
9922540074
अरुण सहाय
9922919459
आशिष आंबाडे
9422891334
बाळू रामटेके
9403866996
Deven gavande
9822467714
Gajannan tajne
9881156188
Golu barahate
9096923609
Irshad शेख
9860273759
जितेंद्र masharkar
9325242852
महेंद्र ठेम्स्कर
9422838911
मजहर अली
9422137199
मंगेश खाटिक
9011043653
मुकेश वाळके
9421993900
पंकज शर्मा
9823350111
प्रकाश शर्मा
9423117393
प्रमोद उंदिरवाडे
9921009653
प्रशांत देसाई
9423675901
प्रवीण बतकी
9881750655
Prshant devtale
8888828027
रमेश kalepalli
9960033592
संजय रामगीवार
9881717832
रवी जवळे
9850050811
रवी जुनारकर
9423117394
साईनाथ सोनटक्के
8007347925
संजय तायडे
9822237638
सुनील देशपांडे
9822737841
सुनील तायडे
9422140045
सुशांत घाटे
9422131588
Sushli nagrale
9923838961
Yashvant mullemwar
9890331996
विशाल tokekar
9421812456
Govil meharkure
9689988282
निलेश लाइव्ह
9860774567
शासकीय रुग्णवाहिकेला निधीचा आजार, खासगीमुळे रुग्ण बेजार

शासकीय रुग्णवाहिकेला निधीचा आजार, खासगीमुळे रुग्ण बेजार

चंद्रपूर, ता. २४ : जीवनदानात डॉक्टरांसोबत महत्त्वाची भूमिका ठरते ती रुग्णवाहिकांची. मात्र, जीवनदायी रुग्णवाहिकांचीच शासनाने हेळसांड चालविली आहे. देखभाल आणि दुरुस्तीसाठी अत्यल्प निधी दिला जात असल्याने रुग्णवाहिका असूनही सेवा देण्यास अडचण निर्माण होत आहे. त्याचा ङ्कायदा खासगी रुग्णवाहिका घेत असून, रुग्णांची मोठी लूट होत आहे.


अत्यल्प निधी वाटायचा कसा?
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत ५८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. याशिवाय सात ङ्किरती पथके आहेत. आरोग्य केंद्रे आणि पथकांकडे रुग्णसेवेसाठी ६५ रुग्णवाहिका आहेत. मुख्यालयाच्या दिमतीला सात रुग्णवाहिका आहेत. अशा एकूण ७२ रुग्णवाहिका असल्याने कुणाला किती आणि कसा निधी द्यायचा, या विवंचनेतच अधिकारी सापडले आहेत. रुग्णवाहिकांना डिझेलसाठी सात लाख चार हजार रुपये, तर किरकोळ दुरुस्तीसाठी ६८ हजार रुपयांचा निधी या सत्रात सहा महिन्यांसाठी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाला. मिळालेला निधी आता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पथकाला वाटप करण्याचे मटेन्शनफ विभागाच्या अधिकाèयांना आले आहे. आरोग्य विभागाला एप्रिल ते डिसेंबर आणि डिसेंबर ते मार्च अशा दोन टप्प्यांत निधी मिळतो.


महिन्याला केवळ तीन हजारांचा निधी
राज्य शासनाच्या आरोग्य विभागामाङ्र्कत चालविण्यात येणाèया जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेची स्थिती याहून काही वेगळी नाही. जिल्ह्यात ११ ग्रामीण रुग्णालये, दोन उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. या सर्व रुग्णालयांकडे १९ रुग्णवाहिका आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत महिन्याकाठी प्रत्येक रुग्णवाहिकेसाठी फक्त तीनच हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वर्षाला ३६ हजार रुपयेच एका रुग्णवाहिकेच्या वाट्याला येतात. या अत्यल्प निधीत डिझेल, ऑइल, टायरट्यूब आणि छोट्या-मोठ्या दुरुस्तीचीदेखील कामे करता येत नाही. कित्येकदा मरेफरफ करताना मोठा गोंधळ उडतो. तेव्हा रुग्णांचे नातेवाईक पैसे देऊन आपले काम करवून घेतात. अत्यल्प निधीच्या तरतुदीचा परिणाम म्हणूनच सुस्थितीतील रुग्णवाहिका आजारी पडल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहेत. अनेकदा रुग्णवाहिका पुढे नेण्यासाठी ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात पैसेच नसतात. त्यामुळे रुग्णांच्या खिशाला चुना लागतो.
-----------------
प्राथमिक आरोग्य केंद्रे- ५८ङ्किरती पथके- जिल्हा रुग्णालय- ग्रामीण रुग्णालये-११उपजिल्हा रुग्णालये-
------------------
जननी सुरक्षेचे वाहन गॅरेजमध्ये
जननी सुरक्षा योजनेअंतर्गत गरोदर महिलांना घरून रुग्णालयात दाखल करण्यासाठी वापरली जाणारी रुग्णवाहिका अनेक दिवसांपासून आजारी पडली आहे. या आजारी रुग्णवाहिकेवर सध्या गॅरेजमध्ये उपचार सुरू आहेत. यामुळे महिलांना रुग्णालयात येताना मोठी कसरत करावी लागत आहे. जननी सुरक्षा योजना केंद्र सरकारची आहे. या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात ने- आण करण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली आहे. या रुग्णवाहिकेमुळे दुर्गम भागातील महिलांना मोठा दिलासा मिळाला होता. योजनेअंतर्गत जिल्ह्याच्या वाट्याला आलेल्या रुग्णवाहिकेत गेल्या काही दिवसांपासून बिघाड आला आहे. त्यामुळे या रुग्णवाहिकेवर उपचार सुरू आहे. रुग्णवाहिकाच आजारी असल्याने जिल्हाभरातील गरोदर महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळेल त्या वाहनाने रुग्णालयात जावे लागत आहे. यासाठी पैसेही मोजावे लागत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय व्यवस्थापनाने एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मात्र, तशी सोय करून देण्यात येत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांत संतापाचे वातावरण पसरले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक वाहने सध्या धूळखात पडली आहेत. बिघाड आणि अन्य कारणांमुळे ही वाहने जागच्या जागीच आहेत. ही वाहने दुरुस्त करून त्यांचा उपयोग गरजू महिलांना ने- आण करण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे ही वाहने दुरुस्त करण्याची गरज आहे.

नागपूर रेफरफसाठी साडेतीन हजार रुपये
शासनाने जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून समाजातील अत्यंत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना योग्य उपचार देण्यासाठी विविध योजना सुरू केल्या. मात्र, रुग्णांची ने-आण करण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका असतानाही जिल्हा रुग्णालयात खासगी रुग्णवाहिकांच्या माध्यमातून समाजसेवेच्या नावाखाली रुग्णांची लूट केली जात आहे. चंद्रपूर येथून नागपूरला रेफर करण्यासाठी शासकीय रुग्णवाहिकेसाठी १६०० रुपये लागतात. मात्र, हाच प्रवास समाजसेवेच्या नावाखाली रुग्णवाहिका चालविणारे साडेतीन हजार रुपये आकारत आहेत.
जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून समाजातील अत्यंत गरीब घटकालाही उपचार मिळावेत, हा शासनाचा प्रयत्न आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात होणारे विविध अपघात आणि गंभीर जखमींना उपचारासाठी तातडीने जिल्ह्याच्या ठिकाणी हलवावे लागते. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर शासकीय रुग्णवाहिकेची सोय करण्यात आलेली आहे. जिल्हा रुग्णालयातून रुग्णांना इतरत्र उपचार घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयांना रुग्णवाहिका दिलेल्या आहेत. परंतु, सध्या जिल्ह्यातील शासकीय रुग्णावाहिकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक प्राथमिक रुग्णालयांतील रुग्णवाहिकांचा वापर केवळ वैद्यकीय अधिकारी आणि औषधांचा पुरवठा करण्यासाठी केला जातो. त्यामुळे रुग्णांना जिल्हा रुग्णालयात qकवा इतरत्र ठिकाणी उपचारासाठी जाताना खासगी रुग्णवाहिकांचाच आधार घ्यावा लागत आहे. समाजसेवेच्या नावाखाली रुग्णालयाच्या आवारात रुग्णावाहिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. परंतु, अनेक रुग्णवाहिकांनी या सेवेच्या नावाखाली रुग्णांची लूट सुरू केली आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार होत नसलेल्या रुग्णांना नागपूर येथे नेण्यासाठी qकवा मृतदेह नेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना या खासगी रुग्णवाहिका मोठ्या प्रमाणावर पैसे मागतात. नागपूर येथे रुग्णांना हलविण्यासाठी शासकीय रुग्णवाहिकेचा दर १६०० रुपये असताना खासगी रुग्णवाहिका साडेतीन हजार रुपये घेते. याशिवाय मृतदेह असल्यास यापेक्षा जास्त पैसे मागितले जातात.

अनेक रुग्णवाहिका नावालाच लोकार्पण
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असणाèया अनेक रुग्णवाहिका या जिल्ह्यातील नेत्यांच्या वाढदिवसासह विविध कार्यक्रमांनिमित्त मलोकार्पणफ करण्यात आलेल्या आहेत. अनेक रुग्णवाहिका या प्रतिष्ठान, युवा मंच, विविध पक्ष, गणेश मंडळ, सामाजिक संस्थांतङ्र्के सेवेसाठी मलोकार्पणफ करण्यात आल्या आहेत. परंतु, मलोकार्पणफच्या नावाखाली रुग्णवाहिकांच्या माध्यमातून रुग्णांची सर्रास लूट होत आहे.

रुग्णांच्या लुटीत दलाली
खासगी रुग्णवाहिकाधारकांनी रुग्णालयातील कर्मचाèयांना आपल्या हाताशी धरून आपला मधंदाफ तेजीत सुरू केला आहे. रुग्णालयातील हे कर्मचारी ज्या रुग्णांची प्रकृती qचताजनक आहे व पुढील उपचारासाठी नागपूर qकवा शहरातीलच खासगी रुग्णालयात पाठवायचे आहे, अशा रुग्णांच्या नातेवाइकांना आमच्या ओळखीची रुग्णवाहिका आहे, तो तुम्हाला कमी पैशांत घेऊन जाईल, अशी ग्वाही देऊन पैसे उकळतात.

नागपूर- ३५०० (ऑक्सिजनसह)
- २५०० (साधारण वाहन)
शहरात- एक किलोमीटर अंतरावर- २५० रुपयेपाच किलोमीटरपर्यंत - ५०० रुपये

सुविधांचा अभाव
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असणाèया अनेक रुग्णवाहिकांतील सुविधांची पाहणी करण्यासाठी मसकाळ टीमफने ङ्केरफटका मारला असता अनेक गंभीर बाबी पुढे आल्या. वाहनात ऑक्सिजन सिqलडर, मेडिसिन किट या प्राथमिक सुविधा नव्हत्या.

चालकांतही स्पर्धा
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात खासगी रुग्णवाहिका असल्याने चालकांत स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी हे चालक कर्मचाèयांशी साटेलोटे करतात. शिवाय काही दलाल ठेवून रुग्णांना थेट भेटून रुग्णवाहिका करून दिली जाते.

रुग्णालयाच्या आवारातच मांडला धंदा
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अनेक खासगी रुग्णवाहिका उभ्या असतात. रुग्णांना पोहोचवून दिल्यानंतर त्या परत जाण्याऐवजी पार्किंगमध्ये लावतात. दिवसभर तिथेच थांबून असतात. या परिसरात संजीवनी हॉस्पिटल, मॉ भगवती जागरण सेवा समिती, वासाडे हॉस्पिटल, जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट, बाबा ताज, मानवटकर हॉस्पिटल, मेहरा हॉस्पिटल, इंडियन मेडिकल असोसिएशन, संभाजी ब्रिगेड यांची वाहने अनेक दिवसांपासून ठाण मांडून आहेत. याशिवाय एमपी २८-पीबी ०१०२ हे वाहन अनेक दिवसांपासून उभे असून, त्यावर कोणत्याही संस्थेचा नामोल्लेख नाही.


------------
१२ ते १५ रुपये प्रतिकिलोमीटर
------------

सात रुपये प्रतिकिलोमीटर शासकीय 

Tuesday, September 24, 2013

वरोर्‍यात २५ क्विंटल मासे मृत्युमुखी

वरोर्‍यात २५ क्विंटल मासे मृत्युमुखी

वरोरा: येथील आनंदवनातील आनंद सागर तलावातील मासे मागील दोन दिवसांपासून अचानक मृत्युमुखी पडत आहेत. दोन दिवसांत २५ क्विंटल मासोळ्यांचा मृत्यू झाला असून त्यांची किंमत अडीच लाख रुपयांच्या घरात आहे. काही महिन्यांपूर्वी याच तलावात शेकडो मासोळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती, हे विशेष.
रोहू व कथला वगळता अन्य जातींच्या मासोळ्या मात्र मृत्यूमुखी पडल्या नाहीत, हे विशेष. तलावातील पाण्यात विषबाधा झाली असती तर संपूर्ण मासोळ्याच मृत्युमुखी पडल्या असत्या, मात्र केवळ दोन जातीच्याच मासोळ्या मृत्युमुखी पडल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
आनंदवनातील मूकबधिर शाळेच्या मागे आनंदसागर तलाव आहे. हा तलाव अतिशय जुना असून त्यातून मोठय़ा प्रमाणावर माशांचे उत्पादन घेतले जाते.तलावात रोहू, कथला, मांगूर, दाडक या जातींचे मासे आहेत. २२ व २३ सप्टेंबर रोजी रोहू व कथला या दोन जातींच्या मासोळ्या मृत्यूमुखी पडल्या. त्या २५ क्विंटलच्या जवळपास असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.तलावात मोठय़ा प्रमाणात पाणी आहे व तलावही मोठा असल्याने मासे उत्पादनासाठी उपयुक्त आहे. काही महिन्यांपूर्वी आनंदवन तलावातील शेकडो मासोळ्या मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली होती. पाण्यातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी झाल्याने मासोळ्या मृत्यू पडल्याचे कारण तज्ज्ञांनी दिले होते. परंतु दोन जातीच्या मासोळ्या मरण पावल्याने तज्ज्ञही अचंबीत झाले आहेत. काही मृत मासोळ्या परिक्षणासाठी नागपूर येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आल्या आहेत. उर्वरित मृत मासोळ्या खड्डा करून जमिनीत पुरण्यात आल्या आहेत. परिक्षणाचा अहवाल दोन दिवसांत आल्यानंतरच त्यांच्या मृत्युमुखी पडण्याचे कारण समोर येईल, असे मत महारोगी सेवा समितीचे विश्‍वस्त सुधाकर कडू यांनी व्यक्त केले.


 दोरीने गळा आवळून खून

दोरीने गळा आवळून खून

गडचिरोली - पहिल्या बायकोच्या पोटगी प्रकरणात सायंकाळच्या सुमारास एका व्यक्तीला चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरीत अटक झाल्यानंतर रात्रीच्यावेळी दुसऱ्या बायकोच्या पोटच्या पाच वर्षीय मुलाचा गडचिरोली जिल्ह्यातील तुमडी गावात दोरीने गळा आवळून खून झाला. ही खळबळजनक घटना रविवारी (ता. 22) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. 

दरम्यान, या चिमुकल्याच्या मारेकऱ्याच्या शोधात असलेल्या घोट पोलिसांसमोर दोन बायकांमधील आरोप-प्रत्यारोपाची विचित्र परिस्थिती येऊन ठेपली. यामुळे मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यातून चिमुकल्याचा मारेकरी कोण, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

आदित्य विठ्ठल मुजुमकर (5) रा. तुमडी असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. चामोर्शी तालुक्‍यातील तुमडी येथील रहिवासी विठ्ठल मुजुमकर (45) याने 20 वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील माया हिच्याशी विवाह केला. त्यांना 2 मुली व 1 मुलगा तीन मुले झाली. मात्र, सात वर्षांपूर्वी विठ्‌ठलने मायाशी फारकत घेतली. आणि अर्चना हिच्याशी विवाह केला. त्यामुळे विठ्‌ठल व माया या दोघांमध्ये पोटगीबाबत वाद सुरू होता. दरम्यानच्या काळात विठ्‌ठल आणि अर्चनाला दोन मुले झाली. यातील आदित्य हा 5 वर्षांचा, तर दुसरा 4 वर्षांचा मुलगा आहे. 

दरम्यान, रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास मायाच्या पोटगी प्रकरणात विठ्ठलला गोंडपिपरी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर रात्रीच्या सुमारास इकडे तुमडीत अर्चना व विठ्‌ठलचा मोठा मुलगा आदित्य याची गळा आवळून हत्या झाली. त्यामुळे तुमडीत मोठी खळबळ उडाली आहे. मुलाच्या हत्येबाबत अर्चनाने घोट पोलिस मदत केंद्रात तक्रार नोंदविली. यात तिने रात्रीच्या सुमारास आपल्या राहत्या घरी मायासह चार ते पाच व्यक्ती आले होते. त्यांनीच आदित्यचा खून केल्याचे सांगितले. तर, इकडे विठ्‌ठलची पहिली पत्नी मायाने या आरोपाचा इन्कार केला. अर्चनावरच पोटच्या मुलाचा जीव घेतल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे घोट पोलिसांसमोर आदित्यच्या मारेकऱ्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आहे. घोटचे उपविभागीय पोलिस अधिकारी खंडेराव धरणे यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. आदित्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चामोर्शीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. 

Monday, September 23, 2013

गाईड्स इंग्रजी शिकू लागलेत

गाईड्स इंग्रजी शिकू लागलेत

इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. या वाक्यावर तासनतास चर्चा घडू शकते. मात्र जेव्हा वीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी हे दुध प्यावे लागणार असेल तर चर्चा बंद अन शिक्षण सुरु अशीच स्थिती असते. चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या याचाच अनुभव येत आहे. ताडोबातील स्थानिक गाईड्स इंग्रजी शिकू लागलेत.
चेन्नई-जयपूर हिंगणघाटला थांबणार

चेन्नई-जयपूर हिंगणघाटला थांबणार

हिंगणघाट- चेन्नई-जयपूर , म्हैसूर-जयपूर व कोईमतूर-जयपूर या गाड्यांना हिंगणघाट स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.  या गाड्या आता हिंगणघाट स्थानकावर थांबणार असल्याची नोंद प्रवाशांनी घ्यावी , असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी येत्या २५ सप्टेंबरपासून होत असून हा थांबा सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर आहे. या गाड्यांचा तपशील असा : १२९६७
चेन्नई-जयपूर द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस- चंद्रपूर (आगमन ८.१९ , प्रस्थान ८.२०) , हिंगणघाट (९.२३, ९.२४) , सेवाग्राम (९.५९ , १०.००). १२९६८ जयपूर-चेन्नई द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस-सेवाग्राम (१५.१२ ,१५.१४) , हिंगणघाट (१५.३९ , १५.४०) , चंद्रपूर (१६.४८ , १६.५०). १२९७५ म्हैसूर-जयपूर द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस-चंद्रपूर (८.१९ , ८.२०) ,हिंगणघाट (९.२३ , ९.२४) , सेवाग्राम (९.५९ ,१०.००). १२९७६ जयपूर-म्हैसूर द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस-सेवाग्राम (१५.१२ , १५.१४) , हिंगणघाट (१५.३९ , १५.४०) , चंद्रपूर (१६.४८ , १६.५०).
१२९६९ कोईमतूर-जयपूर साप्ताहिक एक्स्प्रेस-चंद्रपूर (८.१९ , ८.२०) , हिंगणघाट (९.२३ , ९.२४) ,सेवाग्राम (९.५९ , १०.००). १२९७० जयपूर - कोईमतूर साप्ताहिक एक्स्प्रेस-सेवाग्राम (१५.१२ , १५.१४), हिंगणघाट (१५.३९ , १५.४०) , चंद्रपूर (१६.४८ , १६.५०). या गाड्या आता हिंगणघाट स्थानकावर थांबणार असल्याची नोंद प्रवाशांनी घ्यावी , असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
आधार कार्ड बनवाना अनिवार्य नहीं

आधार कार्ड बनवाना अनिवार्य नहीं

हर नागरिक को पहचान देने वाला आधार कार्ड बनवाना अब अनिवार्य नहीं है। यह बात खुद केंद्र सरकार ने सुप्रीम कोर्ट में कही है। सरकार ने यह भी कहा है कि आधार कार्ड बनाने का फैसला लोगों की इच्छा पर है।

सुप्रीम कोर्ट ने आज केंद्र औऱ राज्यों सरकारों को आदेश दिए हैं कि इस बात का ध्यान रखा जाए कि किसी भी अवैध नागरिक का आधार कार्ड न बने। इसके साथ ही कोर्ट ने कहा है कि आवश्यक सुविधाओं जैसे एलपीजी, टेलीफोन कनेक्शन वगैरह के लिए आधार कार्ड अनिवार्य नहीं है।

गौरतलब है कि सरकार अपनी कई योजनाओं को पहले ही आधार कार्ड से जोड़ चुकी है। ऐसे में सरकार का सुप्रीम कोर्ट में यह कहना कि इसे बनवाना लोगों की इच्छा पर है उस पर कई सवाल उठते हैं।

Sunday, September 22, 2013

 ७ बालक कुपोषणाच्या उपचारासाठी रुग्णालयात

७ बालक कुपोषणाच्या उपचारासाठी रुग्णालयात

चंद्रपूर- आर्थिक दुर्बल घटकांसाठी डझनभर योजना आणि त्याची जोरदार प्रसिद्धी करूनही कुपोषणाची समस्या जैसे थेच असल्याचं दिससंय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना या अतिदुर्गम भागात कुपोषणाच्या समस्येने आरोग्य विभाग हादरलाय. आतापर्यंत ७ बालकांना कुपोषणाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातले राजुरा, कोरपना आणि जिवती ही तालुके म्हणजे नक्षलग्रस्त भाग. टेकड्या आणि वनाच्छादीत असलेला हा भाग विकासापासून वंचित आहे. सततचा पाऊस असलेल्या या भागात रोजगाराची समस्या पाचवीला पुजलेली आहे. त्यातच आता कुपोषणाची भर पडलीय. 

कोरपना तालुक्यातल्या शिवापूर आणि मांगलहिरा गावातल्या ७ बालकांना कुपोषणाच्या उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. सर्व बालकांचं वय ७ ते १५ महिने एवढं आहे. तालुक्यातल्या अनेक गावांत रस्ते नाहीत. आरोग्ययंत्रणा तर फारच वाईट अवस्थेत आहे. अंगणवाड्या कुषोषण रोखण्यात महत्त्वाचं योगदान देतात. पण त्याबाबत पालकांमध्ये माहितीची कमतरता दिसून येत आहे. त्यातच आर्थिक विपन्नावस्थाही कुपोषणाला कारणीभूत ठरत आहे. 

कोरपना हे तालुक्याचं गाव असूनही याठिकाणी आवश्यक असलेलं तालुका वैद्यकीय अधिका-याचं कार्यालय दूर आहे. आरोग्य अधिका-यांची पदं रिक्त आहेत. कुपोषणाची समस्या या भागात वाढत आहे. या समस्येकडे सरकारने तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे
ताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी आता होणार ऑनलाईन रिझर्व्हेशन!

ताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी आता होणार ऑनलाईन रिझर्व्हेशन!

चंद्रपूर- ताडोबातील वाघ बघण्यासाठी थेट चंद्रपूरात येउन परवानगीचे सोपस्कार करण्याची प्रतिक्षा संपली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनानं आगाऊ आरक्षणाची सोय उपलब्ध करून दिलीये. जगभरातील पर्यटक आता ताडोबा दर्शनाच्या परवानगीसाठी इंटरनेटवर आरक्षण करु शकतात.

गेल्या वर्षभरात सुमारे १ लाख पर्यटकांनी ताडोबाला भेट दिली. हा आकडा आता दुपटीनं वाढण्याची शक्यता आहे. कारण ताडोबातील परवानगीसाठी रेल्वे आरक्षणाच्या धर्तीवर इंटरनेटवरुन आगाऊ आरक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आलीये. आता घरबसल्या ताडोबाच्या वाघांचं दर्शन नक्की करण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. याआधी चंद्रपूर शहरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयात तास न तास उभं राहून प्रवेशाचे कंटाळवाणे सोपस्कार पार पाडल्यावर मग वाघोबा भेटतील का याची प्रतिक्षा करावी लागायची. आता या वाघाला बघण्यासाठी सहज-सोपी व्यवस्था झालीये.

सुमारे ६२५ चौ. किमी पसरलेल्या या जंगलात वाघ, बिबटे, रानकुत्रे, गवे, नीलगाय, अस्वल, सांबर, चितळ, भेकर, गरुड, मोर, टकाचोर, निळकंठ, मगर, घोरपड यासह इतर वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. देशात वाघांवर संकट ओढविलं असताना चंद्रपुरकरांनी मात्र या पट्टेदार, ऐटबाज प्राण्याला प्रसंगी हल्ले सोसूनही नुसतं संरक्षित केलं नाही तर त्यात वाढ होईल असंच सहकार्य केलंय.

देशातील अन्यत्र असलेल्या वन्यजीव अभयारण्यांप्रमाणं ताडोबाही पावसाळ्यात अंशतः बंद आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून व्याघ्रदर्शन सुरु होईल. रोज ६ द्वारांच्या माध्यमातून दोन सत्रात एकूण ५२ वाहनं ताडोबात प्रवेश करू शकणार आहेत. अशी आहे व्याघ्रप्रेमींच्या ताडोबा दर्शनाची नवी सोय. सो फ्रेंड्स उचला माऊस अन करा बुक तुमची ताडोबा व्हिजीट mahaecotourism.gov.in या संकेतस्थळावर. तुम्ही दोन महिने अगोदर तुमचं बुकींग करु शकता. ताडोबातील वाघोबा आपली वाट बघतो आहे.
खून होऊनही पत्ता लागेना

खून होऊनही पत्ता लागेना

खून होऊनही पत्ता लागेना
चंद्रपूर- एका ५० वर्षीय वेकोलितून सेवा निवृत्त झालेल्या चंदू पाल नामक खून झाला. पण  कुणी सांगायला तयार नहि. कुणी तक्रार केली नाही, आरोपी मोकाट फिरत आहेत. 


दिल्लीतून पळून जाणारी तरुणी चंद्रपुरात

दिल्लीतून पळून जाणारी तरुणी चंद्रपुरात

चंद्रपूर- दिल्ली येथील एक १३ वर्षीय मुलगी कुटूबीयांच्या त्रासाला कंटाळून रेल्वेने पळून जात असताना इको प्रो च्या एका कार्यकर्त्याने तिला चंद्रपूर रेल्वे स्थानकावर थांबवून सुरक्षित ठिकाणी पोचविले. नेपाली असलेली हि मुलगी दिल्लीत राहते. तिचे वडील वाहन चालक आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून तिचे कुटुंबीयसोबत पटत नव्हते. त्यामुळे ती दिल्लीतून दक्षिण एस्क्प्रेस ने हैद्राबादकडे निघाली. सेवाग्राम रेल्वे स्थानकावर पोचल्यानंतर ती बसलेल्या डब्यात चंद्रपूर येथिल इको प्रो चे कार्यकर्ते राजू पाटील यांनी तिची विचारपूस करून चंद्रपूर रेल्वे स्थानकावर सुखरूप आणले. आता ती रामनगर पोलिसात असून तिला दिल्लीला पोचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 
विनयभंगप्रकरणात १७ दिवसांत निकाल ; आरोपीला तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा

विनयभंगप्रकरणात १७ दिवसांत निकाल ; आरोपीला तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा

वर्धा: वर्धा जिल्ह्यातील विनयभंग प्रकरणाचा निकाल दिवाणी फौजदारी न्यायालयाने अवघ्या १७ दिवसांत निकाल दिला. आरोपी आरोपी मोरेश्वर माणिक सोनावणेला तीन वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. 

वर्ध्यातील कारंजा तालुक्यातील काजळी येथे २८ ऑगस्टला एका महिलेचा विनयभंग झाला. या प्रकरणाचा घटनेपासून २१ दिवसातच तर न्यायलयात दाखल केल्यापासून १७ दिवसातच निकालाची प्रक्रिया पार पडली. 

२९ तारखेला आरोपी मोरेश्वर माणिक सोनावणे वय ३६ वर्ष रा. काजळी यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर करंजा पोलीस स्टेशनने २ सप्टेंबरला २२ पानांचे आरोपत्र न्यायालयात दाखल केलं.

फिर्यादीची बाजू सरकारी वकील राजेश रेखे यांनी न्यायालायात मांडली. यानंतर ७ सप्टेंबरला फिर्यादी महिलेची साक्ष न्यायालायात नोद्वली गेली. त्यानंतर ७ साक्षीदारांच्या साक्ष न्यामुर्तीनी एकूण घेतली. यामध्ये सात वेळा सुनावणी झाली. आरोपीवर लावलेले आरोप सिद्ध झाले. यात ३५४ सह ३५४ (अ) आणि ३५४(ब) कलमाचा समाविष्ट करण्यात आला आणि आठव्या सुनावणीत निकाल देण्यात आला. 

दिवाणी फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश रितेश मावतवाल यांनी १९ सप्टेंबरला अखेरच्या सुनावणीत, आरोपी मोरेश्वर माणिक सोनावणे याला तीन वर्षांचा कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
दिवसभर पावसाची रिपरिप

दिवसभर पावसाची रिपरिप

चंद्रपूर- गेल्या काही दिवसांपासून मॉन्सून सक्रिय झाला असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. यामुळे कापूस, धानाला लाभ मिळाला आहे. कोरडवाहू शेतीत धानाला या हंगामात एका पाण्याची गरज असते. त्यामुळे तलाव, धरणांतून पिकासाठी पाणी सोडले जाते. मात्र गेल्या चार दिवसांपासून रोज हजेरी लावणाऱ्या या पावसाचा धान व इतर पिकांना लाभ मिळणार आहे. 
घुग्घुसमध्ये 'नकोशी'ला फेकले

घुग्घुसमध्ये 'नकोशी'ला फेकले

घुग्घुस : स्त्रीभ्रूणहत्या थांबवाव्या, यासाठी शासन समाजजागृतीसह कठोर कायद्याची अंमलबजावणी करीत असली तरी भ्रूणहत्येचे प्रकरण दिवसागणिक वाढत आहेत. आज शनिवारला चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये पहाटेच्या सुमारास एका जिवंत नवजात शिशूला फेकण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरासह ग्रामीण भागात स्त्रीभ्रूणहत्येचे प्रकरणे वाढू लागले आहे. शासन-प्रशासनातर्फे राज्यभरात घटलेल्या मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी, यासाठी समाजजागृती करण्यात येत असतांना, आज सकाळला वॉर्ड क्र मांक ५ मध्ये नवजात शिशूच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. नागरिकांनी घटनास्थळावर तोबा गर्दी केली. घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसानी पंचनामा करून जीवंत असलेल्या अर्भकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले
शहीद पोलिसांचे कुटुंबिय महाराष्ट्र दर्शनावर

शहीद पोलिसांचे कुटुंबिय महाराष्ट्र दर्शनावर


गडचिरोली - जिल्हय़ातील शहीद झालेल्या पोलिस कर्मचार्‍याच्या कुटुंबीयांच्या समस्याचे वरिष्ठ पातळीवर निदान व्हावे आणि त्यांच्यात नवचैतन्य निर्माण व्हावे, या अभिनव उपक्र माच्या उद्देशाने शहीद झालेल्या पोलिस कर्मचार्‍यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र दर्शन करण्याची संधी गडचिरोली पोलिस विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली. ल्ल
महाराष्ट्र दर्शनच्या नियोजित कार्यक्रमानुसार, बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेसने पुरुष महिला सदस्यांच्या ७६ जणांच्या समूहाला रवाना होण्यापूर्वी लोहमार्ग जिल्हा नागपूर पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव, चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक राजीव जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी यादव, जी. एस. गौतम यांच्या मार्गदर्शनात बल्लारशाह रेल्वे पोलिस चौकी परिसरात शहीदांच्या कुटुंबीयांचे पुष्प गुच्छ देवून सन्मान करण्यात आला. यावेळी शहीदांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मेजर दत्ता पेंडके यांच्यासह रेल्वे पोलिस कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

Saturday, September 21, 2013

बेरोजगारांना गंडविणार्‍या टोळीचा पर्दाफाश

बेरोजगारांना गंडविणार्‍या टोळीचा पर्दाफाश

चंद्रपूर- घुग्घुस एमआयडीसी परिसरात कार्यरत असलेल्या धारीवाल कंपनीमध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी लावून देण्याच्या नावाखाली बेरोजगार युवकांची फसवणूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला.

गोरखधंदा करणार्‍या टोळीने धारीवाल कंपनीमध्ये नोकरी पाहिजे असल्यास पॉलिटेक्नीक धारक बेरोजगाराला दीड लाख, आयटीआयधारकास एक लाख, हेल्पर ५0 हजार व मजूर या पदासाठी २0 रुपये ठरविले. कंपनीच्या नावे बनावट दस्ताऐवज तयार करून बेरोजगारांची फसवणूक केली. फिर्यादीच्या तक्र ारीवरून आज शुक्रवार(२0 सप्टेंबर) ला उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. राजीव भुजबळ यांनी सहाजणांच्या टोळीला अटक केली.
आरोपींमध्ये हेमंत बबनराव बुरडकर (२६) रा. चंद्रपूर, दीपक काशीराम जेनेकर (४२), पवन यादव मेर्शाम (२३) रा. सुगम नगर, पवन नरेंद्र चौबे (२३), अविनाश लक्ष्मण जेनेकर (२७) रा. दुर्गापूर, समीर तानाजी बैसरकर (३८) रा. गवराळा (ता. भद्रावती) यांचा समावेश आहे.

घुग्घुस एमआयडीसी अंतर्गत धारीवाल कंपनी कार्यरत आहे. या कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली सदर आरोपींनी पॉलिटेक्नीकधारक बेरोजगाराला दीड लाख, आयटीआयधारकास एक लाख, हेल्पर ५0 हजार व मजूर या पदासाठी २0 रुपये ठरविले. नोकरीसंदर्भात आरोपी व बेरोजगार युवकांमध्ये सौदेबाजी झाल्यास लगेच अँडव्हान्स स्वरूपात अर्धी रक्कम घेण्याचा गोरखधंदा सुरू केला. नोकरी मिळताच पूर्ण रक्कम देण्याचा सौदा त्यांनी आजपर्यंत अनेक बेरोजगारांशी केला आहे. प्रफु ल्ल तडवटकर व पवन साधनकर यांना पैशाची मागणी करून नगदी ११ हजार रुपये घेतले. कंपनीच्या नावे बनावट दस्ताऐवज तयार करून नोकरीवर रुजू होण्याचे आदेश दिले. सदर युवकांनी आरोपींनी दिलेला आदेश घेऊन धारीवाल कंपनी गाठली. तेव्हा युवकांना आपली फसवणूक झाल्याची बाब उघडकीस आली. दरम्यान धारीवाल कंपनीचे अधिकारी संतोष वसंतराव काकडे यांनीही कंपनीची फसवणूक होत असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत सदर आरोपींना अटक केली.

यापूर्वीही नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना गंडविल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात मुख्य सूत्रधार कोण? बनावट दस्ताऐवज कोठून व कोणत्या साधनांचा वापर करून तयार करण्यात येत होते. या टोळीचे धागेदोरे आहेत काय? यासंदर्भात तपास करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. भुजबळ यांनी दिली.

जिल्ह्यात पुन्हा संततधार पाऊस

जिल्ह्यात पुन्हा संततधार पाऊस

चंद्रपूर : १५ ते २0 दिवसांच्या विश्रांतीनंतर वरूणराजा पुन्हा सक्रिय झाला आहे. आज जिल्हाभर पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाच्या या पुनरागमनाने काही भागातील शेतकरी आनंदी झाले असले तरी काही भागातील शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
जाणकारांच्या मते रिमझिम पाऊस पडत राहिला तर तो पिकांसाठी व पुढे रब्बी हंगामासाठी फायद्याचा आहे. मात्र मुसळधार स्वरुपाचा पाऊस बरसला तर पिकांची पुन्हा नासाडी होण्याची शक्यता आहे. आज जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू होता. मात्र बहुतांश भागात संततधार पाऊस बरसला.
उल्लेखनीय असे की पावसाने यंदाचा खरीप हंगाम खाऊन टाकला. दरवर्षीचे कटू अनुभव विसरून यंदा बळीराजाने मोठय़ा उत्साहाने पेरणी केली होती. कृषी विभागानेही प्रारंभी चार लाख ५८ हजार हेक्टरवर पिकांचे नियोजन केले होते. यात एक लाख ४४ हजार हेक्टरवर सोयाबीन, एक लाख ३ हजार हेक्टरवर कापूस तर एक लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्रात भात पिकांचा समावेश होता.
यंदा प्रारंभापासूनच पावसाने अतिरेक करणे सुरू केले. पेरणी झाल्यानंतर २५ व २६ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्‍यांच्या पेरण्यांचा खेळखंडोबा केला. अनेकांची बिजाई वाहून गेली. आधी कर्जबाजारी होऊन कसेबसे बियाणे खरेदी केले. तेही हंगामाच्या प्रारंभीच वाहून गेल्याने शेतकर्‍यांना पुन्हा कर्ज काढून दुबार पेरणी करावी लागली होती. त्यानंतर पाऊस बरसतच राहिला. जुलै महिन्यात तर पावसाने कहर केला. अतवृष्टीमुळे जिल्हाभरातील नदी-नाल्यांना पूर येऊन शेतात, नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले. त्यानंतर जणू पुराची श्रृंखलाच निर्माण झाली. जिल्ह्यात एक, दोन नव्हे तर तब्बल चार वेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली. सर्वत्र हाहा: कार उडाला. जिल्ह्यात कोट्यवधींची हानी झाली. २५ ते ३0 लोकांचा बळी गेला. खुद्द मुख्यमंत्र्यांना पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात यावे लागले. मदतीसाठी ओरड होऊ लागल्यानंतर महसूल आणि कृषी विभागाला तातडीने सर्वेक्षण करावे लागले. दोन लाख ३९ हजार ९१२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. यात सोयाबीन-८७ हजार ८४२ हेक्टर, कापूस- ८१ हजार ३३४ हेक्टर व धान-५४ हजार ९६७ हेक्टर असा नुकसानीचा आकडा आहे. प्रत्यक्षात याहून अधिक नुकसान झाले आहे. शासनाने खरडून गेलेल्या पिकांसाठी प्रति हेक्टर २0 हजार रुपये आणि ५0 टक्क्याहून अधिक नुकसानग्रस्तांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये मदत जाहीर केली आहे. प्रत्यक्ष एकाही शेतकर्‍यांना मदत दिली नाही.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात पावसाने दिर्घ विश्रांती घेतली. त्यामुळे उरलेल्या पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी पुन्हा कामाला लागले. अशातच आज जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, राजुरा, कोरपना, बल्लारपूर, मूल, सावली, ब्रह्मपुरी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. वरोरा, भद्रावती परिसरात तुरळक पाऊस झाला. असा पाऊस पिकांना उपयोगाचा असल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान आहे. मात्र राजुरा, कोरपना, मूल, जिवती तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले आहे. पावसाची संततधार सुरूच असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत बर्‍याच ठिकाणी पाऊस सुरूच होता. पावसाचे बरसणे असेच सुरू राहिले तर शेतकर्‍यांना आणखी फटका बसण्याची शक्यता आहे. 
जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, सिंदेवाही, नागभीड तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू असली तरी पाऊस मुसळधार स्वरुपाचा नव्हता. पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांनी खते टाकली आहेत. रिमझिम पाऊस असला तर ही खते पिकांच्या मुळाशी जाऊन परिणामकारक ठरतात. त्यामुळे येथील शेतकरी समाधानी आहेत. मात्र राजुरा, कोरपना, जिवती, मूल तालुक्यात संततधार पाऊस बरसल्याने शेतात पाणी साचले आहे. अशावेळी कपाशीची मुळे सडून कपाशी पिवळी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे येथील शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. चंद्रपुरात आज सकाळी पाऊस बरसला. त्यानंतर काही तास पावसाने उसंत घेतली. सुर्याचे दर्शनही झाले. त्यामुळे नागरिक निवांत घराबाहेर पडले. मात्र सायंकाळी ४ वाजतापासून काळे ढग दाटून दमदार पाऊस पडला. त्यामुळे नागरिकांची व फुटपाथवरील व्यावसायिकांची एकच तारांबळ उडाली.


Friday, September 20, 2013

महिना उलटूनही दाभोलकरांचे मारेकरी मोकाटचं!

महिना उलटूनही दाभोलकरांचे मारेकरी मोकाटचं!

पुणे: जादूटोणा विरोधी कायद्याचे आग्रही आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा विवेकवादी विचार मांडणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्येला महिना उलटूनही याबाबत पोलिसांना एकही ठोस पुरावा सापडत नसल्याने सर्व तपास यंत्रणा प्रचंड दबावाखाली आहे.
गणेशभक्तीसोबत केली पर्यावरणाची रक्षा

गणेशभक्तीसोबत केली पर्यावरणाची रक्षा

  प्रशांत विघ्नेश्‍वर (लोकशाही वार्ता)
चंद्रपूर- श्रीगणेशाची पूजा.. सारेच भक्त गणेशभक्तीत तल्लीन.. अनेक सामाजिक उपक्रमाची सार्वजनिक मंडळात रेलचेल.. नयनरम्य देखावे.. त्या देखाव्याला बघण्यासाठी लोकांची गर्दी.. कुठे गणेशमूर्तीचे आकर्षण तर कुठे देखाव्याचे आकर्षण.. कधी डीजेच्या तालावर नाच तर कधी भजनाचा आस्वाद.. सारे वातावरण आनंदमय.. पाहता पाहता दहा दिवस ओसरले.. आणि उजाडला गणेशाच्या विसर्जनाचा दिवस. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यास सारेच सरसावले. परंतु, यातील बोटावर मोजण्याइतक्या गणेशभक्तांनी जाणीवपूर्वक पर्यावरणाची रक्षा केली. शहरात गणेश विसर्जनाची तलाव आणि नदीवर झुंबड उडाली असताना हे गणेशभक्त मात्र आपल्या लाडक्या बाप्पाला बादली, पाण्याची टाकी व स्विमिंग टँकमध्ये विसर्जन करून निरोप देत होते. ही कपोलकल्पीत गोष्ट नसून 'इको-प्रो' या सामाजिक संस्थेने चालविलेल्या 'ग्रीन गणेशा' उपक्रमाचे फलित होय. 
                                           
नरकेसरी लोकमान्य टिळकांनी समाजाला एकसूत्रात बांधून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना गावोगावी केली. या उत्सवातून समाज जागृतीचे कार्य केले जात होते. नागरिकांच्या मनात ज्वाजल्य देशभक्ती निर्माण करण्याचे कार्य यानिमित्ताने झाले. तेव्हापासून आजतागायत हा उत्सव देशात साजरा केला जातो. कालांतराने या उत्सवाचे स्वरूप बदलत गेले. ऐरवी उत्सवानिमित्त होणार्‍या व्याख्यानमालेतील प्रबोधनाच्या जागेवर ऑर्केस्ट्राने कब्जा मिळविला. त्यावेळी ऑर्केस्ट्रा समूहाला बरेच उधाण आले. परंतु, नंतर रात्री १0 पर्यंतची परवानगी सार्वजनिक कार्यक्रमासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने ऑर्केस्ट्रा, कव्वाली, मिमीक्री यासारखे लोकांच्या आवडीचे विषय कालबाह्य ठरले. परंतु, गणेश मंडळांनी लोकांना आकर्षित करण्यासाठी नवीन शक्कल लढविली. पाहता पाहता गणेश मूर्त्यांचे आकार अवाढव्य झाले. या आकारावर कुणाचेच बंधन राहिले नाही. यातच गणेशमूर्तीला आकर्षित करण्यासाठी रासायनिक रंग, थर्माकोल इत्यादींचा वापर मोठय़ा प्रमाणात होऊ लागला आणि समाजाला दिशा देणारा गणेश उत्सव दिशाहिन होऊन साजरा केला जाऊ लागला. परिणामी, त्याचे परिणाम पर्यावरण संतुलनावर झाले. गणेश उत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापरही मोठय़ा प्रमाणात होऊ लागला. चंद्रपूर शहर हे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून उदयास येत असतानाच इको-प्रो या संस्थेने २00६ मध्ये या प्रकरणी आवाज बुलंद केला. आणि नागरिकांना पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. या माध्यमातून नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची स्थापना करू नये, रासायनिक रंगाचा वापर करू नये, थर्माकोलचा वापर करू नये, मूर्तींचा आकार र्मयादेत ठेवून त्याचे विसर्जन घरीच करावे, असे अनेक आवाहन केले. तर गणेश मंडळांनी मातीच्या मूर्तीचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले. या आवाहनाला मोजक्याच लोकांनी प्रतिसाद दिला. त्यातही विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद खरोखरच वाखानन्याजोगा आहे. २00८ मध्ये रामाळा तलावात 'इकोर्निया' वनस्पतीची चादर पाण्यावर पसरली. शहराच्या मध्यभागी चंद्रपूरची शान असणारा हा तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर होता. त्यावेळी इको-प्रो संस्थेने संपूर्ण तलाव आटवला. तेव्हा मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांंची झालेली विटंबना समोर आली. तेव्हापासून हे अभियान आणखी जोमाने राबविण्याचा संकल्प इको-प्रोने सोडला.
प्रारंभी ही योजना इको-प्रो पर्यावरणपूरक गणेश उत्सव या नावाने राबविण्यात आली. परंतु मोठय़ा गणेशभक्तांचा या उपक्रमाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मात्र बालमनावर या संदर्भातील संस्कार करण्याचा निर्धार इको-प्रोचे संस्थापक बंडू धोतरे यांनी केला. उद्याच्या नागरिकाला पर्यावरणाचे महत्त्व कळले तर तो पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे धजावेल, ही बाब बहुदा इको-प्रोच्या सदस्यांना माहित होती. त्यांनी यासाठी जिल्ह्यातील शेकडो शाळांना गाठले आणि चंद्रपूर शहरातील २५ शाळांमध्ये इको-प्रो स्कूल क्लब स्थापित झाले. या क्लबच्या माध्यमातून २५ हजार विद्यार्थ्यांपर्यंंत पर्यावरणपूरक गणेश उत्सवाची संकल्पना पोहचली. आणि त्या विद्यार्थ्यांंनी ही संकल्पना आपल्या आजी-आजोबा, आई-बाबा आणि नातेवाईकांसमोर मांडली.
यातील काही लोकांनी या संकल्पनेचा स्वीकार केला असून ज्यांनी स्वीकार केला त्यांनीच काल बुधवार (१८ सप्टेंबर)ला रामाळा तलाव व इरई नदीमध्ये विसर्जन सुरू असताना घरातील बादली, पाण्याची टाकी, स्विमिंग टँकमध्ये गणेशाचे विसर्जन करून बाप्पाला निरोप दिला. समाज सुधारायचा असेल तर त्याची सुरुवात स्वत:पासून करावी लागते, ही बाब या गणेशभक्तांनी कृतीतून सिद्ध केली.
आई आपल्या मुलाला घरी संस्कार देऊन घडवित असते. त्यानंतर त्यावर संस्कार घडविण्याचे कार्य शिक्षकांतर्फे केले जाते. अनेकवेळा तर बहुतांश पालक आणि समाज विद्यार्थ्यांना घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर टाकून मोकळे होतात. आणि काही घडलेच तर त्याचा दोष शिक्षकांना दिल्या जातो. तरीही शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी अहोरात्र पर्शिम घेत असतात. परंतु, आता पर्यावरणपूरक विद्यार्थी घडविण्याची संकल्पना इको-प्रोच्या माध्यमातून राबविली जात आहे. इको-प्रोने २५ इको-प्रो स्कूल क्लब स्थापन केले असले तरी त्याचा अंगिकार मात्र येथील चांदा पब्लिक स्कूलने केलेला आहे. मागील तीन वर्षांपासून या शाळेत पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. यासाठी शाळा व्यवस्थापन हिरीरिने पुढाकार घेत असते.
पर्यावरण मंडळाच्या निर्देशाप्रमाणे या शाळेतील मूर्ती शाडुच्या मातीने व कागदाच्या लगद्याचा वापर करून तयार करण्यात आली. एवढेच नव्हे तर मूर्तीला रंगरंगोटी करण्यासाठी चुना, हळद, कुंकू, गुलाल-बुक्का याचा वापर करण्यात आला. कला शिक्षक मोनाली बावणकर यांच्या पुढाकारातून गणेश मूर्ती साकारण्यात आली. पुढे दहा दिवस या मूर्तीची स्थापना करून रोज सकाळी विद्यार्थ्यांनी गणेशाच्या आरतीत प्रार्थनेच्या वेळी सहभाग घेतला. जणू दहा दिवस बुद्धीच्या देवतेची प्रार्थना हे विद्यार्थी करीत होते. शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना या निमित्ताने मागील तीन वर्षापासून पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचे जणू प्रशिक्षण दिले जात आहे. शाळेने निर्माल्य संकलनासाठी एक कुंडही तयार केले होते. सरतेशेवटी गणेश मूर्तीचे विसर्जन प्रि-प्रायमरी स्कूलच्या स्विमिंग टँकमध्ये आदराने करण्यात आले. शाळेच्या संचालिका स्मिता जिवतोडे व प्राचार्य भावना व्ही.एस. यांच्या प्रोत्साहनामुळेच हा उपक्रम यशस्वी होऊ शकला. त्यामुळे चांदा पब्लिक स्कूल घडवित आहे पर्यावरणपूरक विद्यार्थी, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
मातीच्या मूर्तीचीच परंपरा जोपासणे आवश्यक : धोतरे
आपल्या संस्कृतीमध्ये असलेला कोणताही उत्सव पर्यावरणाला धोका निर्माण करणार नाही, याची काळजी घेऊनच त्या उत्सवांची योजना पूर्वजांनी आखली होती. त्यामुळेच पूर्वी मातीच्या मूर्तीचे प्रचलन होते. नागरिक पोळा उत्सवादरम्यान मातीच्या बैलाची तर आठवीच्या सणाला मातीचा हत्ती बनवून त्याची पूजा करतात व त्या मातीचा पुनर्वापर व्हावा म्हणून त्या मूर्ती झाडाखाली ठेवण्यात येतात. हाच दृष्टिकोन गणेश उत्सव सुरू झाला तेव्हाही होता. परंतु, काळाच्या ओघात आधुनिकतेच्या नादात उत्सवाचे स्वरूप बदलले. हा उत्सव पर्यावरणाला नुकसान पोहचवणारा केव्हा झाला हेही कोणाला कळले नाही. तरीही आता वेळ गेलेली नसून मातीच्या मूर्तीची पूजा करण्याची परंपरा जोपासली जाऊ शकते. चंद्रपूर सारख्या अतिप्रदूषित शहरातील नागरिकांनी ही परंपरा जोपासणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया इको-प्रोचे संस्थापक बंडू धोतरे यांनी दिली.

साभार- (लोकशाही वार्ता)

Thursday, September 19, 2013

सावलीत अपघातात एक ठार

सावलीत अपघातात एक ठार

सावली- गणेश विसर्जन आटोपून ट्रॅक्टरने परत येत असताना ट्रॅक्टरवरून खाली पडल्याने एका इसमाचा मृत्यू झाला. सदर घटना रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास घडली. कालिदास सोमा भोयर रा. पाथरी असे मताचे नाव आहे.

वीज दरवाढीवर व्याख्यान 
वीज दरवाढीसाठी जबाबदार कोण, यावर मार्गदर्शन, वेळ सायंकाळी ५.४५ वाजता, स्थळ- रोटरी हॉल, आझाद बागेजवळ, चंद्रपूर, उपस्थिती- आमदार शोभाताई फडणवीस

सरकारी अधिका-याच्या अलीशानावर बंदी  
नवी नोकरभरती, पंचतारांकित हॉटेल्समधील बैठका आणि सरकारी अधिकाऱ्यांचा आलिशान विमानप्रवास यावर सरकारने काही काळासाठी बंदी आणली आहे. आर्थिक तूट कमी करण्यासाठी आणि कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी सरकारने ही कडक पावले उचलली आहेत


पोलिसांची दंडेलशाही 
चंद्रपूर : काल चंद्रपुरात झालेल्या विसर्जनादरम्यान इरई नदीवर पोलिसांच्या दंडेलीचा अनुभव नागरिकांना आला. काल सकाळी १0 वाजताच्या सुमारास श्रीकांत होकम आपल्या विवाहित बहिणीसह कारने घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी गेले होते. नदीच्या काठावर कार थांबवून मूर्ती खाली उतरवित असताना एका पोलीस अधिकार्‍याने कार बाजूला घेण्यावरून होकम यांना शिविगाळ केली. शिवाय सोबत असलेल्या बहिणीसमोर अश्लिल शब्दात पाणउतारा केला.

महिलांचे आमरण उपोषण सुरु
चंदनखेडा: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला अनेकवेळा निवेदन देऊनही समस्या सुटल्या नसल्याने स्वाधार महिला बटत गटाच्या महिलांनी आजपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. दीर्घ रजेवर गेलेल्या डॉक्टरांच्या जागेवर नवीन डॉक्टरची नियुक्ती करावी तसेच अन्य मागण्यांसाठी सदर उपोषण सुरु केले आहे.
२० ऑगस्ट अंधश्रद्धा निर्मुलन दिन म्हणून पाळण्यात यावा

२० ऑगस्ट अंधश्रद्धा निर्मुलन दिन म्हणून पाळण्यात यावा

Narendra Dabholkar

गेल्या महिन्यात, २० ऑगस्टला पुण्यात भरदिवसा नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले होते. हा दिवस अंधश्रद्धा निर्मुलन दिन म्हणून पाळण्यात यावा, अशी मागणी आता शासनाकडे करण्याची गरज आहे . 
नरेंद्र अच्युत दाभोलकर यांचा जन्म नोव्हेंबर १, इ.स. १९४५ रोजी सातारा जिल्यात झाला . ते  मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी इ.स. १९८९साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली.

नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतीलविलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. इ.स. १९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी सातारायथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. 
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ठ रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येत आहे. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते. पुरोगामी महाराष्ट्राच्या वैचारिक वर्तुळामध्ये अजातशत्रू असेच दाभोलकरांचे व्यक्तिमत्त्व होते.

नरेंद्र दाभोलकर
जन्मनरेंद्र
नोव्हेंबर १इ.स. १९४५
सातारा
मृत्यूऑगस्ट २०इ.स. २०१३
पुणे
मृत्यूचे कारणअज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात गोळ्या घालून हत्या केली
राष्ट्रीयत्वभारतीय
नागरिकत्वभारतीय
प्रशिक्षणसंस्थामिरज वैद्यकीय महाविद्यालय
पेशावैद्यकीय
मूळ गावसिंधुदुर्ग जिल्ह्यातील दाभोली
ख्यातीसाधना (साप्ताहिक)
पदवी हुद्दासंपादक
कार्यकाळ१ मे १९९८ ते पासून
पूर्ववर्तीवसंत बापट
धर्महिंदू
जोडीदारशैला
अपत्येडॉ मुग्धा दाभोलकर देशपांडे(कन्या); हमीद(पुत्र)
वडीलअच्युत लक्ष्मण दाभोलकर
आईताराबाई अच्युत दाभोलकर
नातेवाईकडॉ. देवदत्त दाभोलकर(बंधू)
संकेतस्थळ
www.antisuperstition.org