चंद्रपूर/प्रतिनिधी:
शहरात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आल्यावर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उज्वल कंस्ट्रक्शन कंपनीला महानगर पालिका आयुक्तांनी पत्राद्वारे जलशुद्धीकरणाच्या ठिकाणचे पहिले स्वच्छताकरण करा व नंतरच नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याच्या सूचना केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर शहराला दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची बाब समोर आल्यानंतर "संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे" अध्यक्ष राजेश बेले यांनी ही बाब चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर आयुक्तांनी यावर लक्ष देत शहर अभियंता मार्फत पाणीपुरवठा करणाऱ्या उज्वल कंस्ट्रक्शन कंपनीला जलशुद्धीकरण होणाऱ्या शुद्धीकरण केंद्राची स्वच्छता करण्याचे आदेश दिले.व त्यानंतरच पाणीपुरवठा करा असे सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून शहराच्या काही भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. त्यामुळे अनेक नागरिकांच्या प्रकृतीवर देखील परिणाम पडून विविध आजारांची लागण होत असल्याचे लक्षात आल्यावर मनपाने जलशुद्धीकरण केंद्राची घान स्वच्छ करुण झाल्यावर फोटो देखील पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत.