पर्यावरण जागृतीचा परिणाम
चंद्रपूर/प्रतिनिधी
नागरिकांमध्ये वाढलेली पर्यावरण विषयक जागृती, अनेक शालेय संस्थांनी विद्यार्थ्यांना फटाके फाेडता पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची दिलेली सामूहीक शपथ, फटाके स्टाॅल्सच्या परवानगीबाबतचा घाेळ, अशा विविध कारणांनी यंदाच्या दिवाळीत चंद्रपुर शहरात मोठ मोठ्या अावाजाचे अाणि आतिशबाजी राेषणाईचे फटाके फुटण्याचे प्रमाण निम्म्यापेक्षाही कमी झाल्याचे दिसून अाले. दिवाळीच्या पाच दिवसांएेवजी केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच मोजक्या लोकांनी फटाके फोडल्याचे लक्षात आले. यंदा बाकीच्या दिवसांमध्ये चंद्रपूरात प्रदुषणाचे प्रमाणदेखील लक्षणीयरित्या कमीच असल्याचे निदर्शनात आले.असे असले तरी देखील शहरातील प्रदूषण करणारे उद्योग मात्र शहरातील प्रदूषणात भर घालतचआहेत.
शहरातील वाढत्या प्रदुषणाच्या त्रासाने अाधीच त्रस्त असलेल्या सुजाण नागरिकांनी यंदा फटाके खरेदी करण्याबाबत प्रारंभापासूनच फारसा उत्साह दाखवला नाही. पावसाळा लांबल्याचा परिणामदेखील फटाके विक्रीवर झाल्याचे अाढळून अाले. त्यात यंदाच्या वर्षी शासन अादेश, पाेलिस , प्रशासन अाणि फटाके विक्रेत्यांमधील घाेळामुळे स्टाॅल मोकडया ठिकाणी कोठे उभारावे ही प्रक्रीया वसुबारसपर्यंत लांबली हाेती. त्याचा परिणामदेखील फटाके विक्रीवर झाल्याचे चंद्रपुर शहरातील फटाके दुकानदारांचे सांगणे आहे.
शाळांनी दिलेल्या शपथेचाही प्रभाव
दिवाळीत फटक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी माध्यमें आणि शालेय शिक्षण विभाग यांनी वायूप्रदूषण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीने दिवाळीत 'प्रदूषण मुक्त दिवाळी'या नव्या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ विद्यार्थीना दिली होती . या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले होते. यानिमित्ताने इतरही उपक्रम राबविण्याची सूचना शिक्षण विभागाने केली होती.
त्यामुळे अनेक घरांमधील मुलांनी अापापल्या पालकांना फटाके न अाणण्याचा हट्ट धरल्याचा परिणामदेखील फटाके विक्रीवर झाला . त्यामुळे शाळेतील शपथेच्या प्रभावाचाही परिणाम झाल्याचे या ठिकाणी दिसून आले.