সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, October 18, 2017

ममता बॅनर्जींना जीवे मारण्यासाठी ६५ लाखाची सुपारी


काव्यशिल्प ऑनलाईन। पश्चिम बंगाल
तृणमूलच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जीवे मारण्यासाठी एका अज्ञाताने १९ वर्षीय तरुणाला ६५ लाख रुपयांची सुपारी देऊ केली आहे. या तरुणाला एका अनोळखी क्रमांकावरुन व्हॉट्सअॅपवर मेसेज आले आहेत. यात ममता बॅनर्जींना ठार केल्यास तुला ६५ लाख रुपये मिळतील असे सांगण्यात आलं आहे. दरम्यान सदर तरुणाने याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली असून तपासात अमेरिकेतील एका व्यक्तीने हे मेसेज केल्याचे समोर आलं आहे.

हा तरुण पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील बेहरामपूरमध्ये राहतो. सोमवारी दुपारी व्हॉट्सअॅपवर त्याला एका अनोळखी क्रमांकावरुन मेसेज येऊ लागले. मेसेज पाठवणाऱ्याने स्वत:चे नाव लॅटीन असल्याचे सांगितले. त्यानंतर ममता बॅनर्जींना जीवे मारल्यास तुला ६५ लाख रुपये मिळतील. तुला काहीही होणार नाही, असा मेसेज त्या व्यक्तिने पाठवला. पण मेसेज वाचून घाबरलेल्या तरुणाने मेसेजचे उत्तर दिले नाही. यामुळे तू डरपोक आहेस असा मेसेज त्याला समोरच्या व्यक्तीने पाठवला. आपण दहशतवादी संघटनांसाठी काम करत असून हिंदुस्थानात येण्याची योजना आखत आहोत. हिंदुस्थानात दहशतवादाचे जाळे पसरवण्यासाठी योग्य व्यक्तिच्या शोधात असल्याचंही समोरच्या व्यक्तिने मेसेजमध्ये सांगितलं. त्यानंतर तरुणाने आपले हिंदुस्थानवर प्रेम असून त्याला उध्वस्त होताना पाहू शकत नसल्याच मेसेजला उत्तर देताना सांगितले. यावर आम्ही हिंदुस्थानला उध्वस्त करणार नाही तर एका व्यक्तिला ठार करण्याबद्दल बोलतोय, असं उत्तर पलिकडच्या व्यक्तिने दिलं.

याप्रकारामुळे हादरलेल्या तरुणाने त्यानंतर पोलिसात धाव घेतली. पण रस्त्यातच त्याला तू पोलीस ठाण्यात जात आहे का? तुझं लोकेशन पोलीस ठाणं दाखवतंय. आमची तुझ्यावर नजर आहे. यामुळे आम्हांला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करु नकोस नाहीतर तुला ठार करू असा धमकीवजा सुचनेचा मेसेज त्याला मिळाला. याबद्दल तरुणाने पोलिसांना सांगताच त्यांनी त्याला ताबडतोब फोन बंद करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आलं असून त्याचा तपास सुरू आहे, असं सीआयडीचे पोलीस महानिरिक्षक अजय रानडे यांनी सांगितल आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.