সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, April 30, 2018

आज नागपुरातील पेट्रोलपंप बंद

आज नागपुरातील पेट्रोलपंप बंद

नागपूर/प्रतिनिधी:

 १ मे रोजी शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याची घोषणा विदर्भ डीलर्स असोसिएशनने केली आहे. गुरुदेवनगर येथील पंचशील पेट्रोल पंपावर झालेला सशस्त्र दरोडा व चौकीदाराच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी पत्रकाद्वारे सांगितले. दुपारी १२ वाजतापासून सायंकाळी ५ वाजतापर्यंत सर्व पेट्रोल पंप बंद राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२९ एप्रिलच्या मध्यरात्री गुरुदेवनगर येथील पंचशील पेट्रोल पंपावर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून रोकड लुटली व येथील पहारेकऱ्याचा निर्घृण खून केला. या घटनेमुळे पेट्रोल पंप चालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवर लुटीच्या इराद्याने सातत्याने हल्ले होत असून, यामुळे पेट्रोल पंप संचालित करणे कठीण आणि जोखमीचे झाले आहे. गुरुदेवनगर येथील पेट्रोल पंप हल्ल्याच्या आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी तसेच अशा हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.
वाढीव पाणी पुरवठा योजनेची जोरगेवार यांचे कडून पाहणी

वाढीव पाणी पुरवठा योजनेची जोरगेवार यांचे कडून पाहणी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी १७ एप्रिल २०१८ ला मुंबई येथे पालकमंत्री यांच्या समवेत चंद्रपूर येथील पाणी समस्येवर बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये ज्या अधिकार्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं कि आम्ही चंद्रपूरचा पाणी पुरवठा सुरळीत ठेऊ असे त्यावेळी बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले होते. म.जी.प्र.चे अधीक्षक अभियंता जगदाळे यांनी २४ एप्रिल २०१८ पासून वाढीव पाणी पुरवठा सुरु करू असही त्या बैठकीमध्ये सांगण्यात आले होते पण अजूनपर्यंत २४ तारीख हि लोटूनही अद्याप वाढीव पाणी पुरवठा चालू झालेला नाही. म्हणून आज शिवसेना नेते किशोर जोरगेवार  यांनी धानोरा नदीवरील वाढीव पाणी पुरवठा योजनेचे सुरु असलेल्या कामाची पाहणी केली असता येथील नदीमधील पाण्याची व सुरु असलेल्या कामाची परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी १ महिना कालावधी लागणार आहे अस त्यावेळी निदर्शनास आले. यावेळी नगरसेवक विशाल निंबाळकर, अमोल शेंडे, इरफान शेख, हर्षद कानमपल्लीवार, राशीद हुसैन, विलास सोमलवार, विनोद अनंतवार, शंकर दंतुलवार, अशपाक खान, बादल हजारे, बबलू मेश्राम, यांची उपस्थिती होती.
           सुरु असलेल्या कामाची पाहणी करत असताना म.जी.प्र.चे अधीक्षक अभियंता जगदाळे  यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा पूर्णपणे माहिती दिली नाही आणि त्यांनी सांगितलं आम्ही आतापर्यंत ६ kmकिमी अंतर पर्यंत पाण्याची टेस्टिंग केली आहे. नदीच्या पात्रामध्ये पाणी नाही पात्र पान्याअभावी पूर्णपणे कोरडे पडलेले आहे, नदीतच पाणी नाही आहे तर चंद्रपूर येथील जनतेला कुठून पाणी देणार असा प्रश्न या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी केल्यावर जोरगेवार यांनी उपस्थित केला. इतक्या मोठ्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम याठिकाणी नदीवर चालू आहे पण कामाच्या ठिकाणी एकही अधिकारी किव्हा कंत्राटदाराचे सुपरवायजर, इंजिनिअर कोणीही त्याठिकाणी नाही ते काम चंद्रपुरकरांची दिशाभूल करण्यासाठी रामभरोसे चालू आहे. असा आरोप जोरगेवार यांनी केला. केवळ चार ते पाच कामगारांच्या भरोशावर काम चालू आहे. चंद्रपूर येथील जनतेच्या जीव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी असून सुद्धा येथील लोकप्रतिनिधी व प्रशासन उदासीन आहे हे दिसत आहे. बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना आकडेवारी सांगीतल्याप्रमाणे त्यांनी त्या बैठकीमध्ये १५ जूनपर्यंत शहरातील जनतेला पाणी पुरेल असा अंदाज लावत समोर आढावा बैठकीचे आयोजन केले. पण प्रत्यक्ष पाहता येथील पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. याठिकाणी पाण्याच्या बाबतीमध्ये चंद्रपूरकरांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. इरई धरणात सुद्धा पाणी नाही आहे आणि वाढीव पाणी पुरवठा च्या माध्यमातून जे पाणी मिळण्याची आशा होती ती आशा सुद्धा पूर्ण होणार नाही अस याठिकाणी दिसत आहे. चंद्रपूरच्या जनतेला जर जून महिन्यापर्यंत पाणी मिळाले नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल व पाणी द्यायला प्रशासनाला भाग पाडेल वेळ प्रसंगी जर सी.टी.पी.एस. चे जर वीजनिर्मिती संच बंद करण्याची वेळ आली तर ते बंद करू असा इशारा जोरगेवार यांनी दिला आहे.
चंद्रपुरातील रणरणत्या उन्हात संवेदनशील पत्रकाराची दुचाकीवर फिरती पाणपोई

चंद्रपुरातील रणरणत्या उन्हात संवेदनशील पत्रकाराची दुचाकीवर फिरती पाणपोई

तहानलेल्या घश्यांचे मसीहा बनले सुनील तिवारी
चंद्रपूर/(ललित लांजेवार):
दरवर्षी जगाच्या नकाश्यावर हॉटसिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपुरातले तापमान म्हंटल कि जीव नको-नको व्हायला लागतो. अश्यातच ४६ अंश तापमानात काम करणार्यांना तहान कित्तेकदा लागते मात्र प्रत्तेक ठिकाणी थंड पाण्याची सोय नसल्याने व कोरडा पडलेल्या घश्याची तहान भागू शकत नाही, सोबतच कडाक्याच्या उन्हात जवळचे पाणी संपले व थंड पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी पैसे नसतील तर. या तहानलेल्या घश्याच्या प्रश्नाचे उत्तर एका चंद्रपूरकर सेवाभावी पत्रकाराने दिले आहे. त्याने आपल्या दुचाकीवर चक्क निशुल्क फिरती पाणपोई सुरु केली आहे.सुनील तिवारी असे या व्यक्तीचे नाव असून ते पत्रकार देखील आहे. 
शहरातील नागरिक व शहरात येणाऱ्या प्रवाशांची तहान भागवण्यासाठी येथील संवेदनशील पत्रकार सुनील तिवारी यांनी एक नवी युक्ती अंमलात आणली असून स्वत:च्या दुचाकीवर वाटसरूंची तहान भागवण्यासाठी त्यांनी सुरु केलेली फिरती पाणपोई सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या पाणपोईच्या माध्यमातून दिवसभर पाणी मोफत देण्यात येत आहे. सोबतच या फिरत्या पानपोईवर "पाणी वाचवा" "जल ही तो कल है" असा संदेश लिहिला असून तिवारी हे पाणी वाचविण्यासाठी जनजागृती देखील करत आहेत. या फिरत्या पाणपोईचा हा पहिलाच उपक्रम असून सुनील तिवारी यांच्या या उपक्रमाची सध्या चांगलीच चर्चा आहे, हा उपक्रम सुनील तिवारी हे प्रत्तेक उन्हाळ्यात राबवीत असून या उपक्रमाला अंगाची लाही लाही करणाऱ्या चंद्रपुरात चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
तहानलेल्यांना पाणी पाजणे हे पुण्यांचे काम समजले जाते. मात्र तहानलेल्यांना थंडगार पण पाजणे हे त्याहून दुप्पट पुण्यांचे काम म्हणावे लागेल. अशेच हे पुण्यांचे काम सुनील तिवारी चंद्रपूरात करत आहेत.
राज्यभर पाणीटंचाई निर्माण झाली असून लोक पाण्यासाठी वणवणतांना दिसत आहे. कुठे साध्या पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. मात्र सुनील तिवारी या समाजसेवकाने नागरिक व वाटसरूंना पिण्याच्या पाण्यासाठी कुठेही भटकावे लागणार नाही, याची खबरदारी घेऊन स्वत:च दुचाकीवर दररोज वाटसरूंची तहान या माध्यमातून भागवत आहे. पाण्यासाठी एकीकडे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात आटलेल्या विहिरीत उतरून पिण्याच्या पाण्यासह असल्या नसल्या पाण्यावर भांडे घासत आहे. थेंबभरासाठी भावा-भावात भांडणे सुरू असून बाटलीभर रक्त काढायला निघालेले असताना या उपक्रमाचे महत्व अधोरेखित होते.
या शहरातील तापमान दिवसेंदिवस वाढत असून पाणपोईंची संख्या शहरात नसल्यासारखीच आहे. मात्र हे महाशय दुचाकीवर दररोज तहानलेल्या वाटसरूंसाठी जवळपास दररोज ५०० रुपयांचे थंड पाणी वाटून तहानलेल्या घश्यांचे मासिहाच बनले आहे. त्यांच्याकडे चारचाकी असूनही ते चंद्रपुरातील रणरणत्या उन्हात डोक्याला दुपट्टा बांधून दुचाकीने शहरातील कामे करायला आपली फिरती पाणपोई घेऊन निघतात. त्यांची गाडी जेथे जेथे थांबते,किव्हा एखाद्याने चालत्या गाडीला हात दाखविला तरी हे महाशय जागीच गाडी थांबवून तहानलेल्यानची तहान भागवत आहेत. उन्हाळा सुरू होताच शहरात अनेक ठिकाणी सामाजिक संघटनांकडून विविध ठिकाणी पाणपोईचे उद्घाटन करून वृत्तपत्रातून चमकोगिरी केली जाते. मात्र, कोणतीच पाणपोई निरंतर सेवा देऊ शकत नाही.
वाहतूक पोलिसांचे जलमित्र
 ४६ अंश तापमानात वाहतूक पोलिसांची नौकरी म्हणजे चोविस तास तैनात अशीच असते ,अश्यातच तहानलेल्या पोलिसांना देखील सुनील तिवारी यांच्या या फिरत्या पाणपोईची वाट असते, जवळच्या बाटलीतील पिण्याचे पाणी संपले कि पोलीस दादा हे सुनील तिवारीच्या फिरत्या पाणपोईची वाट बघत असतात,जशे ते जवळ आले कि आपल्या गाडीच्या डिक्कीत ठेवलेली खाली बॉटल काढून या फिरत्या पाणपोईच्या पाण्याने भरून घेतात,त्यामुळे चंद्रपुरातील वाहतूक पोलिसांना देखील हक्काचे ‘जलमित्र’ मिळाले आहेत.सुनील तिवारी यांच्या उपक्रमाचे वाहतूक पोलीस फॅन झाले असून अनेक वाहतूक पोलीस त्यांना धन्यवाद म्हणत त्यांच्या सोबत सेल्फी काढत आहेत.  
दिवसभरात ५०० नागरिकांना लाभ
या सर्व संदर्भात ते म्हणाले की, आज घोटभरासाठी माणसाची तडफड बघून लोकसेवेच्या भावनेतून हा उपक्रम राबवताना आनंद वाटतो. शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून पाणपोईची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकतांना अनेकदा बघितले, त्यामुळे विचार केला की, आपल्या हातून सुद्धा काही तरी सेवा या तहानलेल्यासाठी झाली पाहिजे. त्यामुळे स्वखर्चाने दुचाकीला एक लोखंडी ढाचा बसवून त्यात दोन ग्लास व एक थंड पाण्याची २० लीटर क्षमतेची कॅन बसवली आहे. दररोज १० कॅन्समधून दिवसभरात ५०० नागरिकांना याचा लाभ होत आहे.






नागपुरात पेट्रोलपंपावरील चौकीदाराची हत्या करून १३ लाख रोकड उडविली

नागपुरात पेट्रोलपंपावरील चौकीदाराची हत्या करून १३ लाख रोकड उडविली

नागपूर/प्रतिनिधी:
नागपुरात ४ ते ५ अज्ञात व्यक्तींनी एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकून १३ लाखांची रोकड लंपास केली. दरम्यान याच  दरोडेखोरांनी पंपावरील सुरक्षा रक्षकाची हत्या केली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारत पेट्रोलियम पंपावर घडली. 
 नागपूर शहरातील श्रीगुरूदेव नगर येथे भारत पेट्रोलियम कंपनीचा पंप आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बँका बंद असल्यामुळे पेट्रोल पंपाची मोठी रक्कम पेट्रोलपंपच्या कार्यालयात होती. दरोडेखोरांनी त्याचाच फायदा घेत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास या पंपावर दरोडा टाकला. दरोडेखोरांनी १३ लाखांची रोकड लंपास केली. त्यावेळी तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षारक्षक नूर खान यांची दरोडेखोरांनी हत्या केली. दरोडेखोरांनी जाताना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआरही लंपास केले आहेत. त्यामुळे नेमके दरोडेखोर कोण होते, याची माहिती अद्याप समजलेली नाही.सध्या पोलीस तपास करत आहेत.


Sunday, April 29, 2018

 "पोक्सो"च्या अंमलबजावणीसाठी चंद्रपूर जिल्हयातील पोलिसांची कार्यशाळा

"पोक्सो"च्या अंमलबजावणीसाठी चंद्रपूर जिल्हयातील पोलिसांची कार्यशाळा

चंद्रपूर/प्रतिनिधी:  
बालकांच्या लैंगिक अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासनाने २०१२ मध्ये पारित केलेल्या राज्य शासनाने २०१२ मध्ये प्रोटेक्शन आॅफ चिल्ड्रेन फॉर्म सेक्लुअल आॅफेन्स (पॉक्सो) हा कायदा तयार केला. या कायद्याच्या सर्व कलमांची जिल्ह्यामध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रशिक्षण देण्यात आले. तज्ज्ञांनी या कायद्याच्या पैलुंवर मार्गदर्शन केले.

महाराष्ट्रामध्ये प्रोटेक्शन आॅफ चिल्ड्रेन फॉर्म सेक्लुअल आॅफेन्स (पॉक्सो) कायद्याचा वापर आणि उपयोग करण्यामध्ये चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यात कार्यरत असणाºया ३३ पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांना या कायद्याच्या सर्व तरतुदींची माहिती देण्यात आली. तसेच कायद्याची अंमलबजावणी करताना मुलांसोबत कशा पद्धतीने व्यवहार करावा, तपासामध्ये मुलांचे सहकार्य कसे घ्यावे, यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. कायद्यातील विविध कलमांची माहिती आणि अंमलबजावणीच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय वैद्यकीय सुविधा, पालक आणि मुलांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा, महिला पोलिसांची मदत आदी अनेक विषयांवरही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस विभागातील बहुसंख्य अधिकारी उपस्थित होते.
स्वयंसेवी संस्थांची घेणार मदत

जिल्ह्यात टाटा ट्रस्टच्या मदतीने पॉक्सो कायद्याबद्दलची जनजागृती मोहीम सुरू आहे. या क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून कार्य करणाऱ्या आणि मुलांवर होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध विधायक व कृतिशील कार्य करण्याºया स्वयंसेवी संघटनांची जिल्हा प्रशासन मदत घेणार आहे. सामाजिक कार्यकर्ते व समुपदेशकांना पॉक्सो कायद्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर विधी व आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे व किसन नवघरे यांना महासंचालकाचे सन्मानचिन्ह

पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे व किसन नवघरे यांना महासंचालकाचे सन्मानचिन्ह


चंद्रपूर/ विशेष प्रतिनिधी:
राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या 571 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस महासंचालक सन्मानचिन्हे जाहीर करण्यात आली आहेत. येत्या 1 मे रोजी पोलीस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर होणार्‍या समारंभावेळी ही पदके प्रदान करण्याचे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी बुधवारी दिले.
राजुरा येथे कार्यरत पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांना 1 मे रोजी पोलीस मुख्यालयात महासंचालकाचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे सन्मानचिन्ह मिळविणारे जिल्ह्यातील एकमेव पोलीस अधिकारी ठरले आहेत.
राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी 13 एप्रिल 2017 चा निर्णयानुसार सन 2017 या वर्षकरिता सन्मानचिन्ह प्राप्त करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. राज्यातील 571 पोलीस अधीक्षक,पोलीस उपायुक्त,सहाययक पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राखीव पोलीस निरीक्षक,पोलीस शिपाई, असे विविध कर्मचारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
ओमप्रकाश कोकाटे यांच्या 25 वर्षाच्या सेवेत त्यांच्या विरोधात एकही तक्रार नाही तसेच त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहुन विविध केसेस चा निपटारा केला.सामान्य जनतेच्या मधोमध जाऊन संवाद केला व जनतेच्या मनात आपली छाप सोडली.
मागील 3 वर्षांपासून कोकाटे हे राजुरा पोलीस ठाण्यात आपली सेवा देत आहेत.जिल्ह्यातील एकमेव अधिकाऱ्याला सन्मानचिन्ह मिळाल्याने कोकाटे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

किसन नत्थूजी नवघरे यांना देखील उल्लेखनीय सेवेसाठी
 पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह
तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील पोहा गावचे मुळचे रहिवासी असलेल्या किसन नत्थूजी नवघरे यांना देखील उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस महासंचालक सन्मानचिन्हे जाहीर करण्यात आल आहे. किसन नत्थूजी नवघरे हे सध्या अकोला येथे कार्यरत आहेत,१६/०५/१९८९  रोजी ते पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झाले,गडचिरोली गोंदिया या नक्षलग्रस्त भागात वेळोवेळी बंदोबस्त केले आहे. नागपूर जिल्ह्यातील मोहोळ गावात 1991साली  धरणाचे बांधकाम झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांचे प्राण वाचविले व जखमींना तात्काळ रुग्णालयात भरती केले.२९/०९/१९९३  रोजी किल्लारी लातूर येथील भूकंप झालेल्या मनुष्यहानी अनेक लोकांच्या जमिनी दबल्या गेलेल्या मृतदेह बाहेर काढून त्यांनी विल्हेवाट लावली व जखमींना योग्यवेळी दवाखान्यात पाठविले सन 2003 नाशिक कुंभमेळा येथील रामकुंडावर चेंगराचेंगरी होऊन 56 लोकांचे प्राण गेले अनेक जण जखमी झाले होते तसेच जखमींना दवाखान्यात नेण्याची मोलाचे कार्य व वर्तकांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले नागपुर शहरातील मुस्तफा बाबाच्या निधनानंतर मोमीनपुरा या भागात तणावाची परिस्थिती कठोर बंदोबस्तात पार पाडली पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे जानेवारी 1999 ते नोव्हेंबर 2010 पर्यंत पोलीस खात्यात भरती नव्याने भरती झालेल्या प्रशिक्षणार्थी यांना उत्कृष्ट प्रकारे मोलाचे प्रशिक्षण देणे आतापर्यंत अमरावती पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर,चंद्रपूर,नागपूर शहर पोलीस, प्रशिक्षण केंद्र अकोला येथे त्यांनी कार्य केले असून राष्ट्रपती पोलीस पदकासाठी त्यांच्या नावाची शिफारस झालेली आहे, २०११  मध्ये राखीव पोलीस उपनिरीक्षकपदी त्यांना पहिली पदोन्नती मिळालेली होती तर २०१६  मध्ये राखीव पोलिस निरीक्षकपदी त्यांना दुसरी पदोन्नती मिळालेली आहे सध्या ते अकोला येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रावर राखीव पोलिस निरीक्षक म्हणून काम बघत आहेत.

राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उन्नत भारत अभियानामध्ये समावेश

राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उन्नत भारत अभियानामध्ये समावेश

चंद्रपूर/विशेष प्रतिनिधी:
राजीव गांधी महाविद्यालय चंद्रपूर साठी इमेज परिणाम
भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे उच्च शिक्षण क्षेत्राची नाळ ग्रामीण भारतासोबत जोडण्याच्या उद्देशाने उन्नत भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. मागील वर्षी सुरु झालेल्या या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यामध्ये देशातील IITs व NITs सारख्या मोजक्याच शासकीय संस्थांचा समावेश करण्यात आला होता. 
या वर्षी उन्नत भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये देशातील २५० तंत्रशिक्षण संस्थांची निवडकरण्यात आलेली आहे. संपूर्ण देशातून निवड झालेल्या २५० अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये चंद्रपूर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा देखील समावेश आहे. गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये उन्नत भारत अभियानात स्थान मिळवणारे हे एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे.
देशातील उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी यांना ग्रामीण जीवनातील समस्यांचा अभ्यास करून ग्रामीण जीवनमान उंचावण्यासाठी संशोधन करण्यासाठी प्रेरित करावे या उद्देशाने उन्नत भारत अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे. ग्रामीण जीवनातील सोयीचा अभाव, कष्टप्रद जीवन, शेतीतील अडचणी, बेताची प्राथमिक शिक्षण व्यवस्था यामुळे प्रत्येक दशकात ग्रामीण जनतेचा शहराकडे ओढा वाढत चाललेला आहे. अल्प शिक्षणात शहरामध्ये स्थलांतरित होणारे ग्रामस्थ शहरातील कनिष्ठ उत्पन्न गटातील जीवनमानाचा सामना करतात. अश्या अनेक अडचणींवर दूरगामी उपाय म्हणून ग्रामीण जीवनाचा स्तर उंचावण्याच्या दृष्टीने उन्नत भारत अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे. 
२५ एप्रिल २०१८ रोजी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या दिल्ली येथील मुख्यालयात उन्नत भारत अभियान २.० ची अधिकृत सुरुवात केंद्रीय मानव संसाधन राज्य मंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी AICTE चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे, पद्मश्री, पद्मभूषण तसेच महाराष्ट्र भूषण श्री. विजय भाटकर यांच्यासह संबंधित अनेक मंत्रालयाचे सचिव देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.उन्नत भारत अभियानामध्ये मानव संसाधन मंत्रालयाच्या सहकार्याला केंद्रीय क्रीडा व युवा मंत्रालय तसेच स्वच्छता व पेयजल मंत्रालय यांचा देखील सहभाग असणार आहे.तंत्रशिक्षणातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जीवनातील समस्या जाणून घ्याव्या व अभ्यासक्रमातील प्रकल्प हे ग्रामीण जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने तयार करावे असा उन्नत भारत अभियानाचा दृष्टिकोन आहे.
या अभियानामध्ये सुरवात करण्यासाठी राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाने चंद्रपूर तालुक्यातील ५ गावांची नावे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी साठी पाठवली आहेत. उन्नत भारत अभियान २.० चे महाविद्यालय समन्वयक म्हणून प्रा. डॉ. सचिन वझलवार हे अभियानाचे उदघाटन व कार्यशाळेला उपस्थित होते.
या अभियानाच्या प्रत्यक्ष कामाला महाविद्यालय लवकरच सुरुवात करणार असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. खान यांनी सांगितले.

१ मे रोजी विधानभवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकणार

१ मे रोजी विधानभवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकणार

नागपूर/प्रतिनिधी:
भारतीय जनता पक्षांने सत्तेत येणाऱ्यापुर्वी वेगळ्या विदर्भाचे आश्‍वासन दिले. आता सत्तेवर आल्यानंतर आश्‍वासनाला केराची टोपली दाखवली आहे. यामुळेच भाजपाचा निषेध करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे एक मे रोजी विधानभवनावर विदर्भाचा झेंडा फडकवणार आहे. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहे. हे आंदोलन चिंता करणाऱ्यांचे नव्हे तर चिडलेल्यांचे आहे, अशी माहिती आंदोलनाचे नेते माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांनी पत्रपरिषदेत दिली. 

दिनांक एक मे रोजी दुपारी बारा वाजेपर्यत संपूर्ण विदर्भातून मोठया संख्येने कार्यकर्ते यशवंत स्टेडीयम येथे एकत्र येतील. दुपारी साडे बारा वाजता विदर्भ मार्च निघेल. यशवंत स्टेडीयम - मुंजे चौक - राण्धी झॉंशी चौक, व्हेरायटी चौक, लोखंडी पूल, रेल्वे स्टेशन, कस्तुरचंद पार्क, रिझर्व बॅंक चौक मार्गे मोर्चा विधानभवनावर जाईल. हजारोंच्या उपस्थितीत विधानभवनावर विदर्भाचा झेंडा फडकवण्यात येईल. देशाला स्वातंत्र मिळण्यापूर्वीची वेगळया विदर्भ राज्याची मागणी आहे. 1947 पासून कॉग्रेस पक्षाने सत्ता असताना काही लहान राज्ये निर्माण केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजयेपी यांनी पाच वर्षाच्या कारकिर्दीत छत्तीसगढ, उत्तरांचल, व झारखंड ही तीन लहान राज्ये निर्माण केली. राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी विद्यमान भाजपा सरकानेही वेगळा विदर्भ देण्याचे आश्वासन दिले. मात्र, ते देण्यास आता टाळत आहेत. त्यामुळेच एक मे रोजी विधानभवनावर विदर्भाचा झेंडा फडकवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दोन्ही नेते आपल्या आश्‍वासनाला बगल देत आहेत. त्यामुळेच आगामी काळात हे आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला समितीचे निमंत्रक राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रबिरकुमार चक्रवर्ती , ऍड. नंदा पराते, रंजना मामर्डे, विष्णू आष्ठीकर, अरूण केदार, अरविंद देशमुख, राजकुमार नागुलवार, अरविंद देशमुख यांचा समावेश होता.

Saturday, April 28, 2018

पोलीस भरतीत बनावटी प्रमाणपत्रे सादर करणाऱ्या चंद्रपुरातील दोघांना अटक

पोलीस भरतीत बनावटी प्रमाणपत्रे सादर करणाऱ्या चंद्रपुरातील दोघांना अटक

नागपुर/विषेश प्रतिनिधी:
पोलीस खात्यात भरती होण्यासाठी बनावटी प्रमाणपत्र सादर करणाऱ्या तसेच ते प्रमाणपत्र विकणाऱ्या चंद्रपूरच्या दोघांना मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे. मोसीम नईम शेख रा.जटपुरा गेट, सपना टाकीस व स्वप्नील पोडगले रा. चंद्रपूर असे या आरोपींची नावे आहेत. मोसीन हा हँडबॉल पटू असून त्याने विविध ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या आहेत. तर पोलीस होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या स्वप्नीलने नागपूर ग्रामीण पोलीस भरतीत सर्व चाचण्या पार पडल्या होत्या. शासकीय नोकरीत स्पोर्ट कोट्यातून राष्ट्रीय स्पर्धा खेळणाऱ्या क्रीडापटूला वेगळे गुण मिळतात. त्यामुळे स्वप्नील ने मोसीन ला असे एखादे प्रमाणपत्र जमवून देण्याची विनंती केली होती. मोसीनने कलरप्रिन्ट च्या साहाय्याने ४५ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे प्रमाणपत्र बनविले. हे प्रमाणपत्र स्वप्नीलने नागपूर ग्रामीण पोलीस भरतीच्या वेळेस सादर केले. त्याची पळताळणी क्रीडा संचालक कार्यालयातून झाली तेव्हा ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर मानकापूर पोलिसांनी स्वप्निलच्या माध्यमातून मोसीनला नागपुरात बोलावून घेतले.प्रमाणपत्र विकत पाहिजे असेच त्याला सांगण्यात आले होते. त्यामुळे तो नागपुरात पोहोचला.पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने घरीच क्रीडा संचालकांचे कार्यालय उघडून अनेकांना बनावट स्पोर्ट सर्टिफिकेट तयार करून दिले असल्याचे सांगितले आहे. पुढील तपास नागपूर पोलीस करीत आहे .

Friday, April 27, 2018

IPL वर सट्टा लावणाऱ्याला लालपेठ परिसरातून अटक

IPL वर सट्टा लावणाऱ्याला लालपेठ परिसरातून अटक

चंद्रपुर/विशेष प्रतिनिधी:
चंद्रपूर  येथील लालपेठ परिसरात सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर चंद्रपूरच्या शहर पोलिसांनी  गुरूवारी रात्री धाड टाकली.
यात एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल 46 हजार 205 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. यात TV,मोबाईल,सेटपबॉक्स,गादी यासह अन्य वस्तूंचा समावेश आहे.
सचिन रामचंद्र साहू असे या आरोपीचे नाव असुन शहर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
सध्या देशभर IPL क्रिकेटचा भूत खेळत आहे, घर बसल्या कींवा दलालाच्या मार्फत सट्टा लावल्या जात आहे. अश्यातच शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून पोलिसांनी धाड टाकत लालपेठ परिसरातून एका आरोपींना अटक केली आहे.या धाडीमुळे शहरातील अनेक बुकींचे व सट्टाबाजाचे धाबे दानानले आहे. 
सदर कारवाई  हि शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस. भगत व त्यांचे सहकारी  सहाय्यक पुलिस निरीक्षक ठाकुर , सहाय्यक पुलिस निरीक्षक कोंडावार , डीबी चे पुलिस उपनिरीक्षक मुंडे  व पुलिस स्टेशनचे कर्मचारी आदींनी पार पाडली.

Wednesday, April 25, 2018

ब्रिजभूषण पाझारेंनी मागितली माफी

ब्रिजभूषण पाझारेंनी मागितली माफी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
"सुधीरभाऊत मला बाबासाहेब आंबेडकर दिसतात" या वादग्रस्त वक्तव्या नंतर  राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली,या प्रकरणी पाझारे यांनी पत्रपरिषद घेऊन तसेच सोशल मिडिया वरून माफी मागितली.
गेल्या काही दिवसांपासून पाझारेंच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. पाझारे यांच्या वक्तव्यावर जिल्हाभरातून रोष व्यक्त करण्यात आला.पाझारेंचा प्रतिमेला काळे फासले गेले.यातच  जिल्हातून संताप व्यक्त होत असतांना पाझारे यांनी पत्रकार परिषद घेऊन तसेच सोशल मिडियावरून माफी मागीतली आहे. त्याचे स्क्रीनचित्र सोशल मिडीयावरुन वायरल होत आहेत .ज्यात मी बाबासाहेबांच्या विचारावर श्रद्धा ठेवणारा माणूस असून नकळत कोणाचे मन दुखावले गेले असतील तर मी माफी मागतो.मात्र माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला जात आहे,असे ते म्हणाले. या माफिनाम्यानंतर पाझारे यांचे काय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले राहणार आहे.
  
राजीनामा द्यावा.....
या प्रकरणानंतर पाझारेनी राजीनामा द्यावा अशी मागणी प्रविण खोब्रागडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.पाझारेंचा व्यक्तव्याचे समस्त आंबेडकरी जनतेचा वतिने जाहीर निषेध करतो असे ते म्हणाले. मुल येथिल कार्यक्रमात बोलतांना ब्रिजभुषण पाझारे यांनी ना.सूधिर मुनगंटीवार यांच्यात मला बाबासाहेब आंबेडकर दिसतात असे वादग्रस्त व्यक्तव्य केले.
दरम्यान बुधवारी आज समता सैनिक दल,भारतीय बौद्ध महासभा,रिपब्लिकन पक्ष व शतकोत्तर जयंती महोत्सव यांच्या मार्फत  प्रविण खोब्रागडे,यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत पाझारे यांनी सभापती पदाचा  राजीनामा द्यावा हि मागणी करण्यात आली,तसेच या मागणीसाठी जिल्हाधिकारी आशुतोष सलील,व जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अशोक निमगडे, विशालचंद्र अलोणे,राजूभाऊ खोब्रागडे,स्नेहल रामटेके,महादेव कांबळे,वामणराव सरदार,हरिदास देवगडे,अशोक टेंभरे,अशोक फुलझले,भाउराव दूर्योधन,सिध्दार्थ वाघमारे,सूरेश नारनवरे,सूरेश रंगारी,निर्मला नगराळे,गिता रामटेके आदीनी पत्रकार परिषद घेवून पाझारे यांचा निषेध केला.

Tuesday, April 24, 2018

वर्षभरात ३० कोटीच्या वीजचोरीचा भांडाफ़ोड

वर्षभरात ३० कोटीच्या वीजचोरीचा भांडाफ़ोड

नागपूर/प्रतिनिधी:

महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रा अंतर्गत कार्यरत असलेया सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकांनी आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये तब्बल 29 कोटी 59 लाख 76 हजार रुपये मुल्यांकनाच्या वीजचो-या उघडकीस आणल्या असून त्यापैकी 20 कोटी 14 लाख 21 हजार रुपयांची वसुली करण्यात यश मिळविले आहे. भरारी पथकाच्या वर्षभर चाललेल्या या कारवाईमुळे वीजचोरांना अटकाव करण्यात महावितरणला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे.
                 महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक अरविंद साळवे आणि नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या मार्गदर्शनात नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी उपसंचालक मंगेश वैद्य यांच्या नेतृत्वात विदर्भातील अकराही जिल्ह्याच्या भरारी पथकांनी 2017-18 या आर्थिक वर्षात तब्बल 9320 वीज जोडण्यांची तपासणी केली, या मोहीमेत भरारी पथकांनी वीज वाहिनीवर थेट आकडा टाकून होत असलेल्या वीजचोरीची 3689 प्रकरणे उघडकीस आणली याशिवाय भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 आणि 138 अन्वये मीटरमध्ये फ़ेरफ़ार अथवा अन्य प्रकारांनी होत असलेल्या 10 कोटी 96 लाख 80 हजार रुपये मुल्यांकनाच्या वीजचोरीची 2482 प्रकरणे उघडकीस आणली. यात अकोला मंडलातील 243, अमरावती 229, बुलढाणा 200, भंडारा 251, चंद्रपूर 205, नागपूर शहर 187, नागपूर ग्रामिण 189, वर्धा 200, यवतमाळ 250, गोंदीया 217, गडचिरोली 124 तर वाशिम मंडलातील 187 वीजचो-यांचा समावेश आहे.
                       याशिवाय भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 126 अन्वये 48 लाख 38 हजाराच्या 107 प्रकरणात वीज वापरातील अनियमितता आढळल्या आहेत, यात सर्वाधिक 23 प्रकरणे यवतमाळ मंडलातील तर त्याखालोखाल अमरावती मंडलातील 21 प्रकरणे असून अकोला 5, बुलढाणा 4, भंडारा 12, चंद्रपूर 9, नागपूर शहर 8, नागपूर ग्रामिण, वर्धा आणि गोंदीया मंडलातील प्रत्येकी 7 तर गडचिरोली आणि वाशिम मंडलांतील प्रत्येकी 2 प्रकरणांचा समावेश आहे. तर अनियमित वीज वापराची इतर 1115 प्रकरणातून 18 कोटी 13 लाख 62 हजाराचा अनियमित वीजवापर उघडकीस आणण्यात भरारी पथकाला यश मिळाले आहे. यात अकोला मंडलातील 115, अमरावती मंडलातील 71, बुलढाणा 33, भंडारा 116, चंद्रपूर 106, नागपूर शहर 162, नागपूर ग्रामिण 150, वर्धा 58, यवतमाळ 71, गोंदीता 97, गडचिरोली 38 तर वाशिम मंडलातील 98 प्रकरणांचा समावेश आहे.
                या सर्व 2482 प्रकरणांतून एकूण 29 कोटी 59 लाख 76 हजार रुपये मुल्यांकनाची वीज वापरातील अनियमितता आणि वीजचोरी उघडकीस आली असून त्यापैकी 20 कोटी 14 लाख 21 हजार वसुल करण्यात महावितरणला यश मिळाले आहे. संपुर्ण वर्षभर राबविण्यात आलेल्या भरारी पथकाच्या या कारवाईत डोंगरवार, डी. बारापात्रे, एस. कुथे, ए. ओझा, एस. दास, व्ही. नवघरे, एस. हेडाऊ, एस. कन्नाके, डी. नागपूरकर, एस. पेगलपट्टी, आर. हस्ते आणि एस. देशमुख यांचा सहभाग होता. 


विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

कोणत्याही परिस्थितीत आचार संहितेचा भंग होता कामा नये-जिल्हाधिकारी
विविध राजकीय पक्ष व प्रमुख अधिका-यांची बैठक

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची निवडणूक 21 मे 2018 रोजी होत आहे. चंद्रपूर जिल्हयामध्ये वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची निवडणूक होत असून त्यासाठी प्रशासनाने आज सर्व अधिकारी तसेच राजकीय पक्षांना या निवडणुकीची माहिती दिली. यावेळी कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही. याची काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत.
            राज्यात रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद-लातूर-बिड, परभणी-हिंगोली या स्थानिक प्राधिकारी मतदार संघामध्ये निवडणुका होत आहेत. त्यामुळे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आलेल्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हयातील सर्व तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक नियती ठाकर, मनपा आयुक्त संजय काकडे, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर आदी उपस्थित होते. दुसरी बैठक दुपारी 3 वाजता राजकीय पक्षांची घेण्यात आली. या बैठकीला जिल्हयातील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिष्ट पार्टी, सीपीआय, बहुजन समाज पार्टी या प्रमुख पक्षांच्या प्रतिनिधीची उपस्थिती होती.
            या बैठकीमध्ये उन्हाळयाचे दिवस असल्यामुळे पाणी टंचाई संदर्भात सुरु असणा-या कामांमध्ये कुठलाही अडथळा नसेल असे स्पष्ट करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या नियमित बैठकांमध्ये आचार संहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी. जुनी सुरु असलेली कामे बंद करु नये, मात्र आवश्यकता नसलेली व निवडणुकीवर प्रभाव टाकणारी कामे नव्याने सुरु करु नये. तसेच पदाधिका-यांना वाहने देण्यात येवू नयेत, कोणतेही भूमिपुजन, शुभारंभ अशा प्रकारचे राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येवू नयेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्यात आली आहे. या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीत सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, महानगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायतचे सदस्य मतदान करणार आहेत. सदर निवडणुकीच्या संबंधाने कोणतीही तक्रार असल्यास दुरध्वनी क्रमांक 07172-270322 वर संपर्क साधावा.
जिल्हा परिषदेत आंबेडकरी कार्यकर्त्यांनी पाझारेच्या फोटोला फासले काळे

जिल्हा परिषदेत आंबेडकरी कार्यकर्त्यांनी पाझारेच्या फोटोला फासले काळे

चंद्रपूर/प्रतिनिधी: 
चंद्रपूर जिल्हापरिषदेचे समाजकल्याण सभापती व भाजपचे पदाधिकारी असणारे ब्रिजभूषण पाझारे  यांनी आक्षेपार्य विधान मूल येथे एका कार्यक्रमाप्रसंगी केले होते. त्याचे पडसाद आज मंगळवारी चंद्रपूरात उमटले असून रिपब्लिकन सेना व बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने जिल्हा परिषद येथे ब्रिजभूषण पाझारे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या फोटोला काळी शाही लावण्यात आली जिल्हा परिषदेच्या बाहेर फोटोला काळे फासण्यात आले . तसेच ब्रिजभूषण पाझारे मुर्दाबादचे नारे सुद्धा लावण्यात आले. 
मूल येथील"शाहू फुले आंबेडकर विचारमंच" च्या कार्यक्रमात डाॅ. आंबेडकर यांचे प्रमाणेच सुधीर  मुनगंटीवार काम करीत असून सुधीरभाऊत मला बाबासाहेब आंबेडकर दिसतात" असे वादग्रस्त वक्तव्य केले.या विधानामुळे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला असून त्यांच्या विरुद्ध  पोलीस स्टेशन मध्ये तक्रारही दाखल केली आहे.
आज रिपब्लिकन सेना व बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने त्यांच्या फोटो ला कालिक पोतुन त्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष तथागत पेटकर, बीआरएसपीचे महासचिव राजू झोडे महेंद्र झाडे,मोनल भडके  यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Monday, April 23, 2018

महानिर्मितीच्या हॅप्पी स्ट्रीट" कार्यक्रमात ३००० नागरिकांचा सहभाग

महानिर्मितीच्या हॅप्पी स्ट्रीट" कार्यक्रमात ३००० नागरिकांचा सहभाग

कोराडीत साकारलं मामाचं गाव;मराठमोळ्या संस्कृतिचं घडलं दर्शन 
नागपूर/प्रतिनिधी:उन्हाळ्यात शाळेला सुट्ट्या लागल्या कि मामाच्या गावाला जाऊन धमाल मस्ती करायची,गावाकडील निसर्गरम्य मातीशी नातं जोडीत, नात्यांची वीण अधिक घट्ट करायची अशी आपली मराठी संस्कृती. मात्र धकाधकीच्या जीवनात हि जागा टी.व्ही.,मोबाईल, फेसबुक,व्होट्सअप सारख्या आभासी दुनियेने व्यापल्याने जीवनाचा खरा-खुरा आनंदच दूर झाला, मानवी जीवन तांत्रिक झाले व यातून उदयास आलेली संकल्पना म्हणजे "हॅप्पी स्ट्रीट". मामाच्या गावाला न जाता सुटीच्या दिवशी सकाळच्या प्रहरी मुख्य रस्त्यावरील रहदारी काही वेळापुरता बंद करून त्याठिकाणी मनसोक्त खेळ, धमाल मस्ती करायची हा यामागचा उद्देश. 
महानिर्मितीच्या कोराडी येथील सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या ६६० मेगावाट क्षमतेच्या तीन संचांच्या राष्ट्रार्पण समारंभ प्रथम वर्षपूर्ती निमित्ताने कोराडी विद्युत विहार वसाहतीतील मुख्य रस्त्यावर "हॅप्पी स्ट्रीट" कार्यक्रमाचे नुकतेच भव्य आयोजन करण्यात आले.  महानिर्मितीच्या राज्यभरातील अधिकारी-कर्मचारी व कुटुंबीयांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेषतः कोराडी, खापरखेडा,चंद्रपूर, पारस,भुसावळ, नाशिक, परळी व मुंबई मुख्यालयातील अश्या सुमारे ३००० व्यक्तींनी या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष आनंद घेतला. हिरव्यागार वृक्षांच्या सावलीत, रंगबिरंगी फुगे,झेंडे, तोरणे, टोप्या,छत्र्या, कागदी फुलांनी रस्त्याला सजविण्यात आले होते. सोबतीला चार्ली चॅपलीन, छोटा भीम आणि छुटकी कार्टून्स उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. वयाचे भान विसरून, आपलं-परकं विसरून, प्रत्येकाने बालपणीच्या खेळाचा निखळ आनंद लुटला. नेहमी चारचाकी चालविणारा बैलबंडी चालवीत होता तर माता-भगिनी आपल्या मुलांना विसरून लगोरी,दोरीवरच्या उड्या इत्यादींचा मनसोक्त आनंद घेत होत्या. तीन साडेतीन तास कसे संपले कोणालाच कळाले नाही. घराकडे परतीची पाउले वळायला तयार नव्हती एवढा जीव "हॅप्पी स्ट्रीट" ने लावला. एरवी घरात बोलायला वेळ नसणारी पालक मंडळी "हॅप्पी स्ट्रीट" वर एकमेकांशी खुलून बोलताना दिसली तर मुले-मुली देखील आपले आई-वडील टायर, लोखंडी रिंग चालवीत धावत असल्याचे पाहून आश्चर्य चकित झाले. अनेकांनी गाणे म्हणून आपले गळे साफ केले. जात,पात,धर्म,वय,पद, गर्व दूर सारून प्रत्येक व्यक्ती स्वत:ला व्यक्त करीत निस्वार्थपणे सहभागी झाल्याचे दिसून येत होते. "हॅप्पी स्ट्रीट" च्या माध्यमातून अख्ख मामाचं गावच कोराडीत साकारण्यात आले होते.
विशेष म्हणजे, राज्याचे उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती लाभली. अखंडित वीज उत्पादनाचे राष्ट्रीय कार्य करणाऱ्या महानिर्मितीच्या अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी "हॅप्पी स्ट्रीट" हा उत्तम पर्याय असल्याचे नामदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. याप्रसंगी त्यांनी "चलते-चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहेना" या गीताच्या काही ओळी सादर केल्या. 
या कौटुंबिक कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला त्याचे कारण लहान मुला-मुलींसाठी चेहऱ्याचे मास्क, बक्षिसे, बुढ्ढी का बाल(सुगर कँन्डी),कागदी फुले(ओरेगामी) प्रशिक्षण,जादूचे प्रयोग, रिंग टोस, बंदुकीच्या गोळीने फुगे फोडणे,दोरीचे झुले,बैलगाडी,गाय,बैल,वासरू,उंट,बॉल गेम्स, टायर, लोखंडी रिंग चालविणे, दोरीवरच्या उड्या,लहान सायकल, स्केटिंग, चित्रकला तर तरुणी व महिलांसाठी मेहंदी, टॅटू,बॅडमिंटन,फुटबॉल,लगोरी,दोरीवरच्या उड्या,बास्केटबॉल,कंबर रिंग, प्लेट थ्रो, रबर रिंग,रेखाचित्र, पुरुष वर्गासाठी फुटबॉल, बास्केटबॉल, दोरीवरच्या उड्या,प्लेट थ्रो, बॅडमिंटन, रेखाचित्र, कार्टून्स, लाइव कार्टून्स,कंचे,भौरे. फूड झोनमध्ये इंडियन कॉफी हाउसचे खाद्यपदार्थ, शबाना बेकरीचे प्रोडकट्स,दिनशा आईस्क्रीम,समोसा,चहा,पाणी, नारळपाणी, ताक,पन्हे, असे विविध खाद्यपदार्थांची रेलचेल होती. ज्येष्ठ नागरिकांसाठी योगासन,बुद्धिबळ, कॅरम, वृत्तपत्र,मासिके वाचन व संगीत तर मुख्य स्टेजवर डी.जे.संगीत, रेडीओ जोकीची धमाल कॉमेंट्री,डान्स थरार तर  दुसऱ्या मंचावर प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी ज्यामध्ये गाणे,नृत्य,मिमिक्री, कविता, वाद्य वाजविणे इत्यादी कला अनेकांनी  सादर केल्या.  
कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे व राजकुमार तासकर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम महाजेनको कोराडी चमूच्या सहकार्याने "हॅप्पी स्ट्रीट" कार्यक्रम अतिशय यशस्वीरीत्या संपन्न झाला.  कार्यक्रमाला महानिर्मितीचे मुख्य अभियंते अनंत देवतारे, सुनील आसमवार,विवेक रोकडे,  मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनिल मुसळे, कोराडी-खापरखेडा,नागपूर-परळी-चंद्रपूर  औष्णिक विद्युत केंद्राचे उप मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते, विभाग प्रमुख, अधिकारी,अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी व  कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेत "हॅप्पी स्ट्रीट" कोराडी आयोजन समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी मोलाची भूमिका बजावली.

 





कार्यक्रमातील जेवणातून शेकडो लोकांना विषबाधा

कार्यक्रमातील जेवणातून शेकडो लोकांना विषबाधा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
राजुरा तालुक्यातील चिंचोली येथील एका देवादेवीच्या समारंभातील जेवणातून जवळपास १०० लोकांना विषबाधा झाल्याचे उघडकीस आले आहे.
तालुक्यातील चिंचोली येथील सुधाकर चौधरी यांचे घरी रविवारी रात्री देवादेवीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक तसेच अन्य नातेवाईक देखील उपस्थित होते,या कार्यक्रमात नागरिकांनी भोजनाचा आस्वाद घेतला मात्र अवघ्या काही वेळातच त्यांच्या प्रकृतीत बिघाड होत डोकं दुखी व पोट दुखी सुरु झाली,अश्या पद्धतीचा त्रास हा संपूर्ण जेवणाऱ्या मंडळींना झाल्याने अशे शेकडो लोक वेगवेगड्या ठिकाणी डोके-पोट धरून बसले होते,त्या नंतर अनेकांना उलट्या देखील झाल्या हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच तत्काळ काही लोकांनी स्थानिक आरोग्यकेंद्रात भरती करण्यात आले. मात्र रुग्णांची संख्या वाढतच जात असल्याने इतर रुग्णांना राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले,मात्र हा संपूर्ण प्रकार कशामुळे घडला याचा शोध घेणे सुरु आहे .या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ.कुलमेथे यांनी सांगितले.



ग्राम स्वराज्य अभियानात १०६ घरे उजळली

ग्राम स्वराज्य अभियानात १०६ घरे उजळली

 सहा गावांचे शंभर टक्के विदुयतीकरण पूर्ण
नागपूर/प्रतिनिधी:
प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजने अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य सुरु करण्यात आलेल्या ग्राम स्वराज्य योजनेत  नागपूर परिमंडलात येणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील ६ गावातील  १०७ घरे मागील आठ्वड्यात महावितरणकडून जोडणी देऊन गरीब गावकऱ्यांची घरे प्रकाशमान करण्यात आली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नागपूर परिमंडलात कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांच्या मुख्य उपस्थितीत सावनेर तालुक्यातील रामपुरी येथे योजनेचा शुभारंभ करण्यात आला.  सावनेर तालुक्यातील रामपूरी येथील  उकठराव नागपुरे आणि लक्ष्मण वरखेडे या दोन वीज ग्राहकांना कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे , नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या मुख्य उपस्थित वीज जोडणी देण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य सुरु करण्यात आलेल्या ग्राम स्वराज्य योजनेत ज्या गावात ८० टक्के पेक्षा जास्त जनता दलित आहे आणि गरीब कुटुंबातील आहे अश्या गावातील सर्व घरांचे विदुयतीकरण करण्याची योजना महावितरणकडून आखण्यात आली होती . राज्यात अश्या गावाची संख्या १९२ तर नागपूर जिल्ह्यात ४ गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला होता.  जिल्ह्यातील महावितरणच्या कन्हान उपविभागात येणाऱ्या सिहोरा , भिवापूर उपविभाग येणाऱ्या धुरखेडा  आणि सावरगाव उपविभागातील खेडी-गवरगोंडी येथील १२  वीज ग्राहकांना ग्राम स्वराज्य योजनेत वीज जोडणी मागील आठवड्यात देण्यात आली. यात रामपुरी गावात २४,सिहोरा येथे १६, धुरखेडा येथे ५० जोडण्या विशेष मोहीम घेऊन देण्यात आल्या. या शिवाय वर्धा जिल्ह्यातील पुलगाव तालुक्यातील हिवरा येथे ४ तर कवठा  येथे १ वीज जोडणी मोहिमेत देण्यात आली.
ग्राम स्वराज्य योजनेमुळे  योजनेमुळे वरील सर्व ६ गावात गावात ३१ मार्च २०१८ पूर्वी असलेल्या सर्व घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे आणि नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी वरील मोहीम यशवीपणे राबवून केवळ एक आठड्यात वरील सर्व ६ गावात विदुयतीकरणाचे काम १०० टक्के  पूर्ण केले.
दिलीप घुगल यांचे हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव

दिलीप घुगल यांचे हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव

चंद्रपूर/प्रतिनिधी:
परिमंडळ स्तरावर काम करतांना निकोप स्पर्धेतून महावितरणच्या अभियंता, अधिकारी व कर्मच्याऱ्यानन्द्वारा 
 गुणवत्तापूर्ण सेवा देण्यात येवून महावितरणचा नावलौकीक वाढण्यास मदत होण्यासाठी नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक श्री. भालचंद्र खंडाईत यांच्या  मार्गदर्शनात  चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. दिलीप घुगल यांनी, सन 2017-2018 या आर्थिक वर्षात  उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभियंता,अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव  करून त्यांचे धैर्य वाढविले. नुकत्याच पार पडलेल्या परिमंडळ आढावा बैठकीत हा गौरव करण्यात आला. 
     वीजेसारखी महत्वाची सेवा प्रदान करतांना तसेच ग्राहकांच्या अपेक्षा वाढलेल्या असल्याने महावितरणचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी हे कायम तणावात काम करीत असतात. चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्हयात काम करतांना महावितरणचे अभियंता कर्मचारी यांना चंद्रपूरचे कधी कडक उन्ह सोसावे लागते तर कधी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त व दुर्गम भागात वीजपुरवठा करण्यास दुर्गम वाट धरावी लागते. वादळ, वारे, पा७स व त्यामुळे उन्मळून पडणारे वीजेचे खांब, तुटणाऱ्या  वीजवाहिण्या यामुळे तर त्यांची परीक्षा पाहिली जाते. अशा परिथितीत काम करणाऱ्या अभियंता, अधिकारी, कर्मचारी तसेच वीजबिल वसुली, वीजहानी कमी करणे, व सोबतच महावितरणची आर्थिक, सांघिक बाजू सांभाळणारे लेखा व मानव संसाधन विभागातील अधिकारी, माहिती तंत्रज्ञान विभागातील अधिकारी, स्थापत्य विभागातील अभियंते व कर्मचारी अषा सर्वांचा गौरव मुख्य अभियंता श्री. दिलीप घुगल यंानी केला. 
     आलापल्ली, गडचिरेालीच्या जंगलात गरीब आदिवासींच्या जीवनात वीजेची गरज पूर्ण करणाÚया आलापल्लीचे कार्यकारी अभियंता श्री. अमित परांजपे यांचा उत्कृष्ट कार्यकारी अभियंता म्हणून गौरव करण्यात आला, प्रणाली विष्लेशक पंकज साटोने व पी.एन.येळणे  यांचा उत्कर्ष प्रणाली विषलेशक म्हणून तसेच वीजबिलवसुली, ग्राहकसेवा या मानकांवर उत्कृश्ठ काम करणाऱ्या श्री. सचिन बद्खल व अमर लिखार यांचा उत्कृष्ट  उपकार्यकारी अभियंता म्हणून गौरव करण्यात आला. उत्कृष्ट शाखा अभियंता म्हणून- प्रशांत  आवारी, विनोद भलमे, अतूल रोडगे, रोजेश कुमार रंगारी, जगदिश माटे, सचिन रणदिवे यांचा गौरव करण्यात आला तसेच जयंत खिरकर, चंद्रकांत सडमेक, कृणाल बागुलकर, विनोद  भोयर शैलेश  वाशीमकर , मिलींद गाडेगोणे या अति.कार्य. तथा उपकार्य. अभियंत्यांना गौरविण्यात आले . अब्दुल शेख, नटराज थंगवेल, महेश निंदेकर व रविंद्र राउत या लेखा व मा.सं. विभागातील कर्मचार्यांना  गौरविण्यात आले.
    याच जोमाने 2018-19 या आर्थिक वर्शात अधिक कसोशीने काम करण्याचे मुख्य अभियंता श्री. दिलीप घुगल यांनी सर्वांना निर्देष दिले. याप्रसंगी अधिक्षक अभियंता -श्री.हरीश गजबे, अशोक  कार्यकारी अभियंता, प्रणाली विष्लेशक, सर्व उपकार्यकारी अभियंता व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
पारदर्शकता व गतीमानता आणण्यासाठी महावितरणद्वारे केंद्रीकृत देयक प्रणालीचा अवलंब

पारदर्शकता व गतीमानता आणण्यासाठी महावितरणद्वारे केंद्रीकृत देयक प्रणालीचा अवलंब

चंद्रपूर/प्रतिनिधी:
केंद्र सरकारने सर्व रोख व्यवहार कमी करून ऑनलाईनद्वारे व्यवहार करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्याच धर्तीवर महावितरणच्या सर्व आर्थिक व्यवहारात अधिक गतीमानता, पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी 01 मे 2018 पासून महावितरणच्या ईआरपी प्रणालीतून केंद्रीकृत देयक प्रणाली राबविण्यात येणार आहे. या प्रणालीत राज्यातील सर्व कार्यालयातील देयकांची अदायगी केवळ मुंबई मुख्यालयातूनच थेट आदात्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
सध्या महावितरणमध्ये स्थानिक पातळीवर देयक अदायगीची प्रक्रिया राबविण्यात येते. यामुळे या सर्व प्रक्रियेस काही प्रमाणात विलंब लागतो. त्यामुळे आर्थिक कामकाजात अधिक गतीमानता, पारदर्शकता आणण्यासाठी स्वयंचलित सॅप प्रणालीद्वारे ही केंद्रीकृत देयक अदायगीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. 
या केंद्रीकृत प्रणालीतून कंत्राटदारांच्या देयक अदायगीसाठी दरमहा सुमारे 20 हजार आर्थिक व्यवहार हाताळले जाणार आहेत. अपारंपारिक वीज खेरेदीशी संबंधित 5 ते 6 हजार आर्थिक व्यवहाराची ही प्रक्रिया यापूर्वीच महावितरणने सुरू केलेली आहे. याशिवाय महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित ७५ ते ८० हजार एवढ्या आर्थिक व्यवहारासाठी ही प्रक्रीया लवकरच राबविण्यात येणार आहे. या प्रणालीचा लाभ घेण्यासाठी कंत्राटदारांनी महावितरणच्या विभागीय कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी कंत्राटदाराने बँकेच्या तपशीलासह व्हेंडर नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल इत्यादी माहिती देणे बंधनकारक आहे. 
याशिवाय रोख व्यवहार कमी करण्यासाठी महावितरण कार्यालयातील दैनंदिन आर्थिक व्यवहारासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना प्री-प्रेड कार्ड देण्यात येणार आहेत. राज्यभरात सुमारे 2 हजार कर्मचाऱ्यांना या कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्डाद्वारे ते आपल्या कार्यालयातील प्रशासकीय बाबीसंबंधिचा खर्च करतील.
आता मिळणार 70 टक्के स्वस्त दरात औषधी

आता मिळणार 70 टक्के स्वस्त दरात औषधी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
जेनेरीक स्वस्त औषधी केंद्र ही भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना असून येथे मिळणारी औषधी खुल्या बाजारात येणाऱ्या औषधीपेक्षा 70 टक्के स्वस्त असल्याने जनतेने त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रीय गृह
राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. दि. 22 एप्रिल रोजी चंद्रपूरातील तुकूम परिसरात एस.टी. वर्कशाॅप चैकात प्रभुछाया स्वस्त औषधी सेवा केंद्राचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आज देशात निर्मित होत असलेली औषधी ही जगात 200 हून अधीक देशात निर्यात होत असून पाश्चात देशाच्या निकषात सिध्द झालेल्या या  औषधांची गुणवत्ता  उत्तम असुन विविध आजारांवर या औषधी प्रभावी ठरली आहेत. परंतू समाजातील काही लोक सदर औषधांच्या गुणवत्तेविषयी शंका निर्माण करून समाजात भ्रम पसरवित आहेत, याला लोकांनी अजिबात थारा देवू नये असेही ना. अहीर यांनी याप्रसंगी आवाहन केले. मधुमेह, उच्चरक्तदाब यासारख्या रोगांकरिता नियमितपणे घ्यावयाच्या गोळ्या  येथे स्वस्त दरात मिळत असल्याने रूग्णाने त्याचा लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, चंद्रपूर मनपाचे उपमहापौर अनिल फुलझेले, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, रविकांत वाघाडे, जेनेरीक औषधी समन्वयक प्रभुदास रायपुरे, अब्राहम रायपुरे, सौ. छाया रायपुरे, श्री.सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते





चंद्रपूर पोलिसांतर्फे २९ वे रस्ता सुरक्षा अभियानाचे थाटात उदघाटन

चंद्रपूर पोलिसांतर्फे २९ वे रस्ता सुरक्षा अभियानाचे थाटात उदघाटन



चंद्रपूर/प्रतिनिधी:
वाहतूक नियम व रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याकरिता वाहतूक नियंत्रण शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालय चंद्रपूर यांच्या वतीने आजपासून २९ व्या रस्ते सुरक्षा अभियान सुरू झाले आहे. आज पोलीस मुख्यालय येथील ड्रिल शेड येथे या रस्ता सुरक्षा अभियान चे उदघाटन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वम्भर शिंदे यांच्या सह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. या रस्ता सुरक्षा अभियानात विविध कार्यक्रम व उपक्रम पोलीस विभागाच्या वतीने राबविले जाणार आहेत.
                       रस्ता सुरक्षा अभियानात वाहतुकीच्या नियमांचे बॅनर्स, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन,होणारे अपघात याबाबत जनजागृती करण्यासाठी बॅनर्स, वाहतुकीच्या नियमांचे व चिन्ह दर्शविणारे पत्रक देण्यात येणार आहे.


 मुनगंटीवारांची तुलना बाबासाहेबांशी केल्याने ब्रिजभूषण पाझारे विरोधात पोलिसात तक्रार

मुनगंटीवारांची तुलना बाबासाहेबांशी केल्याने ब्रिजभूषण पाझारे विरोधात पोलिसात तक्रार

चंद्रपूर/प्रतिनिधी:
नेहमी वेगवेगड्या कारणाने चर्चेत राहणारे चंद्रपूर जिल्हापरिषदेचे समाजकल्याण सभापती व भाजपचे पदाधिकारी असणारे ब्रिजभूषण पाझारे आणखीन एका नवीन अडचणीत सापडले आहेत,१५/४/२०१८ ला मूल येथील"शाहू फुले आंबेडकर विचारमंच" च्या कार्यक्रमात डाॅ. आंबेडकर यांचे प्रमाणेच सुधीर  मुनगंटीवार काम करीत असून सुधीरभाऊत मला बाबासाहेब आंबेडकर दिसतात" असे वादग्रस्त वक्तव्य केले.या विधानामुळे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला असून, त्यांचेवर कारवाई करावी अशी मागणी विदर्भ राज्य आघाडीचे मूल तालुका अध्यक्ष गौरव शामकुळे यांनी मूल पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारीत केली आहे.
पाझारे हे अर्थमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजपचे सक्रिय कार्यकर्ते देखील आहे मात्र पाझरेच्या या वक्तव्याचा हा व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाला असून आता त्यांच्यावर विविध स्तरावरून टीकेची झोड उठली आहे, तसेच वीराचे मूल तालुका अध्यक्ष गौरव शामकुळे यांनी केल्या तक्रारीत असे म्हटले आहे कि कार्यक्रमाचे स्वरूप पाहता ब्रिजभूषण पाझारे यांना मुनगंटीवार यांच्याबद्दल बोलण्याची आवश्यकता नव्हती, मात्र जाणीवपूर्वक दलितांच्या भावनांना ठेच पोहचविण्यासाठी त्यांनी असे व्यक्तव्य केले असल्याने दलितांमध्ये यामुळे प्रचंड असंतोष पसरलेला असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पाझरे चांगलेच अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे.

माझा बोलण्याचा उद्देश तसा नसून त्याचा चूकीचा अर्थ काढून विरोधक माझ्यावर निशाणा साधत आहे,मी बाबासाहेबांचे काम समजून घेतले आहे,बाबासाहेब ज्या प्रमाणे अहो रात्र काम करत होते त्याच प्रमाणे सुधीर मुनगंटीवार देखील काम करत आहे.असा माझ्या बोलाचाच उद्देश होता मात्र विरोधक याला जास्त प्रसिद्धी देत आहेत 
ब्रिजभूषण पाझारे
जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती चंद्रपूर 

Sunday, April 22, 2018

कुलरचा शॉक लागून चिमुरडीचा मृत्यू

कुलरचा शॉक लागून चिमुरडीचा मृत्यू

चंद्रपुर/रोशन दुर्योधन:
उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने एसी, कूलरचा वापर घराघरात केला जातो. मात्र या उपरकरणांची योग्य ती देखभाल केली नाही तर ती जीवघेणी ठरु शकतात.
अशीच एक घटना चंद्रपुरात घडलीय. घरातील कुलरचा शॉक लागल्याने ६ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरच्या समाधी वार्ड परिसरात घडलीये.
सुमिधा दीक्षित असं या चिमुरडीचं नाव आहे. सुमिधा ही घरात खेळत असताना कुलरशी तिचा संपर्क आला. यावेळी कुलरचा शॉक लागल्याने त्यात चिमुरडीचा मृत्यू झाला. चिमुरडीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. 
कॅटर्सच्या वाहनाला अपघात ;२ठार१४ गंभीर

कॅटर्सच्या वाहनाला अपघात ;२ठार१४ गंभीर

  दोन महिला जागीच ठार तर 14 गंभीर
वरोरा/शिरिष उगे :
वरोरा येथील कैटर्स व्यवसायिक   इरफान रंगरेज यांच्या कामगार वाहतूक करणाऱ्या   टाटा एस या मालवाहक वाहन क्रमांक MH34 AB 7280 ची  उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक MH29 T0397 ला आज रविवार च्या पहाटे  दोन वाजताच्या दरम्यान  जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात  दोन महिलांचा जागिच मृत्यू तर 14 जण गंभीर जखमी  झाले .  हा अपघात वरोरा- वणी मार्गावरिल शेंबळ नजिक च्या  जगन्नाथ  बाबा यांच्या मठाजवळ झाला.  कोळस्याने भरलेला नादुरस्त ट्रक रोड वर उभा होता. या ट्रकचे  इंडिकेटर  दिसत नव्हते त्यामुळे रात्री येणाऱ्या  सदर कैटर्स वाहन चालकला तो ट्रक  दिसला  नसावे आणि त्यामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की टाटा यस या गाडीचा चुराडा  झाला. हा अपघात रात्री दोन वाजताच्या सुमारास झाल्याने यावेळी मदत भेटणे गरजेचे होते  अपघाताची माहिती मिळताच आमदार प्रतिनिधी सुभाष दांदडे व लखन केशवानी यांनी तात्काळ 108 आणि  खाजगी रुग्णवाहिकेला फोन लावून रुग्णांना  प्रथम उपजिल्हा रुग्णालयात आणले आणि प्राथमिक उपचारा नंतर जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यासाठी मदत केली .
या घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करत असून अशा अवैध मार्गाने प्रवास करणाऱ्या मालवाहू गाडीत प्रवासी नेणे धोकादायक असून सुद्धा लग्नसराईत मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी नेल्या जातात. त्यामुळे अशा अवैध प्रवासी वाहतुकीवर पोलीस काय कडक  कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
४६ अंश तपत्या उन्हात वृद्धाला ठेवले बांधून:धक्कादायक प्रकार

४६ अंश तपत्या उन्हात वृद्धाला ठेवले बांधून:धक्कादायक प्रकार

चंद्रपूर/विशेष प्रतिनिधी:
माणूस किती क्रूर कृत्याची परिसीमा गाठू शकतो याचं एक उदाहरण चंद्रपूरात पहायला मिळालंय. चंद्रपुरात ४६ अंश तापमानात  एका वृद्धाचे पाय बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील महाकाली कॉलरी परिसरातील या घटनेने सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली आहे.
 ४६ डिग्री तापमानात या वृद्धाला पाय बांधून चक्क जमिनीवर उन्हात टाकले होते. अखेर सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर त्याची या नर्कातून सुटका झाली.
जिल्ह्याचे तापमान सध्या जगाच्या नकाश्यावर प्रथम क्रमांकावर आहे.सूर्य इथे आग ओकत असतांना येथील एका कॉटरच्या समोर याला मरणासन्न अवस्थेत सोडून देण्यात आले होते,हे चित्र एका व्यक्तीच्या निदर्शनात येताच त्याने चौकशी केली अन संपूर्ण प्रकार समजून घेतला, माहिती मिळाल्यावर माहीत झाले की या वृद्धाचे मानसिक संतुलन बिघडले असून हा कपडे घातल्यावर काढून टाकतो.  नग्न होऊन फिरत असल्याने त्याच्या दूरच्या नातेवाईकांनी वृद्धांचे पाय बांधून त्याला बाहेर टाकून दिले होते. या अमानवीय प्रकारची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली.पोलिसांनी हस्तक्षेप करून कुटुंबाशी बोलून यातील तथ्य जाणून घेतले.दरम्यान खाण्यासाठी काहीही दिले जात नसल्याने त्याला तिथलीच माती खावी लागत असल्याचे उघड झाले. अखेर पोलिसांनी त्याचे बांधलेले पाय मोकळे करून त्याची सुटका केली आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने खाऊ घातले. 

अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हात ८० वर्षाच्या या वृद्धाला अशा प्रकारे पाय बांधून ठेवण्याच्या प्रकाराविषयी संताप व्यक्त होत आहे. मात्र सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या पुढाकाराने या वृद्धाचे जगणे आता सुसह्य होणार आहे.