काव्यशिल्प Digital Media: होमगार्ड

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label होमगार्ड. Show all posts
Showing posts with label होमगार्ड. Show all posts

Monday, June 25, 2018

बुधवार पासुन होमगार्ड भरतीस सुरवात

बुधवार पासुन होमगार्ड भरतीस सुरवात

चंद्रपूर/प्रतिनिधी:
मा. महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशाने व जिल्हा समादेशक होमगार्ड चंद्रपुर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 27/06/2018 रोजी संपूर्ण चंद्रपुर जिल्हयाची पुरुष व महीला उमेदवाराची होमगार्ड भरती ‘पोलीस मुख्यालय चंद्रपुर येथिल कवायत मैदानावर राबविण्यात येणार आहे.सदर भरती करीता स्थानिक पोलीस स्टेशन  येथील 20 ते  50 वयोगटातील उमेदवार आणि जर स्थानिक पो.स्टे येथील उमेदवार उपलब्ध न झाल्यास जवळपास च्या गावातील उमेदवाराना शिक्षण  पात्रते नुसार तसेच शारीरिक चाचणी व्दारे भरती करण्यात
येणार आहे. होमगार्ड नोंदणी पात्रते करीता उमेदवार हा ईयत्ता 10 वी असावा तसेच पुरुषांकरिता  उंची 162 सेमी. तर महिलान करीता उंची 150 सेमी. आवष्यक आहे. तसेच उमेदावारांनी नोंदणीच्या वेळी शाळा सोडल्याचा दाखला मुळ प्रत, रहिवासी दाखला, तहसिलदार यांचे कडील राशन कार्ड, आधार कार्ड, 2 पासपोर्ट पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे. जिल्हयात पो.स्टे निहाय होमगार्ड भरती अनुशेष
खालील प्रमाणे आहे.