Showing posts with label यवतमाळ. Show all posts
Showing posts with label यवतमाळ. Show all posts

Monday, December 24, 2018

नऊ जण जागीच ठार

नऊ जण जागीच ठार


 यवतमाळ-कळंब मार्गावरील चापर्डानजीक ट्रकने क्रुझरला दिलेल्या धडकेत नऊ जण जागीच ठार झाले. तर आठ जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.


कळंब तालुक्यातील पार्डी(सुकळी) येथील कांबळे व थूल परिवारातील सदस्य साक्षगंधासाठी यवतमाळ येथे गेले होते. साक्षगंध आटोपून क्रुझरने (एम.एच.२९/आर-७१५९) रात्री सर्व सदस्य कळंब मार्गे पार्डीला जात होते. याचवेळी चापर्डानजीक समोरून सिलिंडर भरून येणा-या ट्रकने (एम.एच.४०/३२८८) क्रुझरला जोरदार धडक दिली.
या अपघातात कांबळे व थूल परिवारातील सात सदस्य जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की क्रुझरचा पार चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती मिळताच गावक-यांसह कळंब पोलीस घटनास्थळी पोहोचले. सर्व मृतांना रुग्णवाहिकेतून येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. गंभीर जखमी आठ जणांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
मृतांमध्ये नियोजित वर नितीन रमेश थूल याची आई सुशीला रमेश थूल (५०) व वडील रमेश पुंडलिक थूल (५५) यांचा समावेश आहे. या दोघांशिवाय तानबा पुंडलिक थूल (६५), क्रुझर चालक सचिन बाबाराव पिसे (२२), सोनाली शैलेश बोदडे, सक्षम प्रशांत थूल (८ वर्षे) व अन्य तीन जण ठार झाल्याचे कळंबचे ठाणेदार नरेश रणधीर यांनी सांगितले. उर्वरित तिघांची नावे कळू शकली नाही. जखमींमध्ये वर नितीन रमेश थूल, अमोल नवघरे (२५) रा.नागझरी (ता.देवळी) आणि शैलेश शालिक बोंद्रे (४५) रा.पार्डी, शरद बाबाराव कांबळे यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

Sunday, September 23, 2018

पांढरकवङा वाघिण प्रश्नावर NGO ची वनमंत्र्याशी भेट

पांढरकवङा वाघिण प्रश्नावर NGO ची वनमंत्र्याशी भेट

चंद्रपूर - मागील दोन वर्षात 13 बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघिणीला जेरबंद करण्यासाठी पांढरकवडा येथे वनविभागाची चमू दाखल झाली आहे. शिकारीचे गुन्हे दाखल असलेल्या नवाब शूटरऐवजी वाघिणीला नागरिकांच्या हितासाठी बेशुद्ध करून पकडण्याच्या मागणीवर चंद्रपूर येथील इको प्रो संस्थेसह विविध स्वयंसेवी संस्थांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन चर्चा केली.
मागील दोन वर्षात 13 बळी घेणाऱ्या या वाघिणीला करण्याचे आदेश वन विभागाने दिले होते. त्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर  न्यायालयाने हल्लेखोर वाघीण धोकादायक असल्याने तिला योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता. त्याविरुद्ध काही संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणात ठार करण्याचे आदेश दिले. त्यामुळे संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहेत. दोन दिवसापूर्वीच नागपूर येथील काही संघटनांनी संविधान चौकात चेहऱ्यावर वाघाचे रेखाटने करून निदर्शने केली.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील वाघीण प्रकरणात मोठा गदारोळ झाल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे.  वनविभागाचे अख्ख्ये मुख्यालय पांढरकवडा येथे दाखल झाले असून,  त्यांच्या आदेशानुसार वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात येणार आहे.
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांचा हस्तक्षेप झाल्यावर हैदराबादचा शूटर नवाब अली खान व मध्य प्रदेशातून आली टिम परत गेल्याने सुरू असलेल्या या मोहिमेविषयी संभ्रम निर्माण झाला होता. प्रधान मुख्य वनसंरक्षक मिश्रा यांनी वन्यजीव विभागाचे अपर मुख्य संरक्षक सुनील लिमये सोबत पांढरकवडा येथे दौरा केला आहे.

Wednesday, May 23, 2018

नक्षलग्रस्‍त भागात मोबाईल टॉवरची क्षमतावाढ करा

नक्षलग्रस्‍त भागात मोबाईल टॉवरची क्षमतावाढ करा

  • विदर्भ-तेलंगणा सीमेवर होणारी पशुधन तस्‍करी रोखण्‍यासाठी 
  • केंद्रीय गृहराज्‍यमंत्री श्री. हंसराज अहीर यांची पोलिस विभागासोबत आढावा बैठक 



नागपूर, दिनांक 23 मे 2018
विदर्भामधील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्‍हयांना लागून असणा-या तेलंगाणा राज्‍याच्‍या सीमेमधून मोठया प्रमाणात गोवंशतस्‍करी होत असून, ती रोखण्‍यासाठी नागपूर व अमरावती विभागाच्‍या पोलिस महानिरिक्षक व संबंधित विभागातील पोलिस अधिक्षकांची बैठक घेऊन त्‍यांना कडक कार्यवाही करण्‍याचे निर्देश आपण दिले असल्‍याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. हंसराज अहीर यांनी आज नागपूर येथे सांगितले. स्‍थानिक रवी भवनमध्‍ये महाराष्‍ट्रातील पशुतस्‍करी रोखण्‍यासंदर्भात कार्यवाहीची आढावा बैठक व गडचिरोलीच्‍या नक्षलग्रस्‍त भागात मोबाईल नेटवर्कसंबंधीची आढावा बैठक घेतल्‍यानंतर प्रसारमाध्‍यमांच्‍या प्रतिनिधीशी संवाद साधतांना ते बोलत होते. या आढावा बैठकीदरम्‍यान गडचिरोलीचे खासदार श्री. अशोक नेते, नागपूरचे पोलिस आयुक्‍त डॉ. व्‍यंकटेशम्, नक्षलविरोधी अभियान विभागाचे पोलिस महानिरिक्षक श्री. शरद शेलार, सी.आर.पी.एफ. चे उप महानिरिक्षक श्री. शेखर, बी.एस.एन.एल. च्‍या मोबाईल नेटवर्किंग विभागाच्‍या महाव्‍यवस्‍थापिका श्रीमती नम्रता तिवारी, नागपूर सहपोलीस आयुक्त श्री. शिवाजी बोडखे, नागपूर ग्रामीण विभागाचे पोलिस अधिक्षक श्री. शैलेश बलकवडे तसेच नागपूर परिमंडळातील पोलिस उपआयुक्‍त व सबंधित जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक व आर्णीचे आमदार श्री. राजु तोडसाम उपस्थित होते.




तेलंगाणामध्‍ये विदर्भ, पश्चिम महाराष्‍ट्र, मध्‍यप्रदेश तसेच खान्देश मधून होणारी पशुधन तस्‍करी रोखण्‍यासाठी पोलिस विभागाला स्‍थानिक वाहतूक विभागाकडून मदत मिळावी, यासाठी आपण सूचना दिल्‍या आहेत. गडचिरोली मधील नक्षलग्रस्‍त भागात मोबाईल नेटवर्कच्‍या क्षमता वाढीसाठी त्‍याचे 4 जी तंत्रज्ञानामध्‍ये अद्यावतीकरण, टॉवर्सची उंची वाढवणे इत्‍यादी संदर्भात आपण बी.एस.एन.एल.च्‍या अधिका-यांना निर्देश दिले आहेत. गडचिरोलीच्या ज्‍या क्षेत्रामध्‍ये टॉवर्स लावण्‍यासाठी अडचणी येत होत्‍या त्‍यादेखील पोलिस यंत्रणेने दूर केल्‍या आहेत. त्यामुळे या परिसरात राहणा-या पोलिस जवान, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान यांना चांगली मोबाईल नेटवर्कची सुविधा यामुळे उपलब्‍ध होईल, अशी माहिती श्री. अहीर यांनी यावेळी दिली.




आढावा बैठकीमध्‍ये नागपूर- अमरावती विभागातील वरिष्‍ठ पोलिस अधिकारी, बी.एस.एन.एल.चे वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.

Sunday, April 15, 2018

अवकाळी पावसाचा तडाखा, यवतमाळमध्ये वीज कोसळून ४ ठार, ५ जखमी

अवकाळी पावसाचा तडाखा, यवतमाळमध्ये वीज कोसळून ४ ठार, ५ जखमी

यवतमाळ/प्रतिनिधी:
अवकाळी पावसाने यवतमाळमध्ये आज चौघांचा जीव घेतला आहे. पाऊस आल्यानंतर झाडाखाली थांबलेल्या चौघांचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत चार जण जखमीही झाले आहेत. स्थानिक महागाव तालुक्यातील वाकोडी शिवारातील ही घटना आहे. 
यवतमाळ जिल्ह्यातील या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं प्रभाकर जाधव, पंडित हरणे, अनिल सरगुळे आणि लक्ष्मण चोपडे अशी आहेत. तर जितेंद्र सुरदूसे, विशाल सुरकळे आणि कैलास सुरो यांच्यासह आणखी एक जण जखमी झाला आहे.
आमदार राजेंद्र नजरधने यांनी रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. तर, दुसरीकडे बोरी अरब गावात वीज पडून ७ शेळ्या ठार झाल्या आहेत.

Tuesday, February 06, 2018

आयटीआय विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार

आयटीआय विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार

ITI students boycott test | आयटीआय विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कारयवतमाळ/प्रतिनिधी: 

 ऐनवेळेवर आॅनलाईन पद्धतीने पेपर सोडविण्याचे आदेश धडकल्याने संतप्त झालेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) विद्यार्थ्यांनी सोमवारपासून सुरू झालेल्या परीक्षेवर बहिष्कार टाकला. तसेच जुन्या पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी करीत जिल्हा कचेरीवर धडक दिली.
आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले होते. ही परीक्षा दरवर्षी लेखी स्वरूपात घेतली जाते. परंतु रविवारी सायंकाळी आदेश धडकला. त्यात पहिला पेपर आॅनलाईन पद्धतीने घेण्याचे सांगितले. हा प्रकार विद्यार्थ्यांना माहीत होताच विद्यार्थी संतप्त झाले. आम्ही कोणतीही तयारी केली नाही, परीक्षा कशी द्यायची असा सवाल करीत शेकडो विद्यार्थी थेट जिल्हा कचेरीवर पोहोचले. जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन ही परीक्षा आॅफलाईन घेण्याची मागणी केली. यावेळी टर्नर, आरएसी, मोटर मेकॅनिकल, डिझेल मेकॅनिकल, पेंटर, ट्रॅक्टर मेकॅनिकल, कारपेंटर, ब्युटी पार्लर आदी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. आता १७ आणि १८ फेब्रुवारीला आॅनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. मात्र ही परीक्षा आॅफ लाईन पद्धतीने घेण्याची मागणी विद्यार्थी करीत आहे.

Thursday, December 07, 2017

मद्यमुक्त महाराष्ट्रासाठी नेतृत्व करा

मद्यमुक्त महाराष्ट्रासाठी नेतृत्व करा

श्रमिक एल्गारचे सुप्रिया सुळेना आवाहन
 

यवतमाळ- सर्वपक्षीय दारूबंदीचे समर्थकांना घेवून मद्यमुक्त महाराष्ट्रासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी नेतृत्व करावे असे आवाहन श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केले.
हल्लाबोल आंदोलनाचे दरम्यान यवतमाळ येथील महिलांना भेटून यवतमाळ जिल्हा दारूबंदीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी खंबीर पाठींबा जाहीर केला व राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष हे महिलांच्या मागणीला पूर्ण करतील असे आश्वासन दिले. या पाश्वभूमीवर श्रमिक एल्गारने मद्यमुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी पुढाकार घेण्याची मागणी केली.

Thursday, November 30, 2017

शुक्रवारपासून हल्लाबोल पदयात्रा

शुक्रवारपासून हल्लाबोल पदयात्रा

यवतमाळ - नाकर्त्या सरकारविरुद्ध जनतेचा रोष व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 1 डिसेंबर पासून सुरु होत असलेल्या यवतमाळ ते नागपूर हल्लाबोल पदयात्रेची माहिती देण्यासाठी आज यवतमाळ येथे आदरणीय खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्यासह पत्रकारांशी संवाद साधला. ही यात्रा विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर या 3 जिल्ह्यातून जाऊन 12 डिसेंबर रोजी नागपूरच्या विधानभवनावावर धडकणार आहे.
राज्याचे कृषी खाते झोपले आहे. बोंडअळीच्या संकटासंदर्भात सरकारला कळवूनही दखल घेतली नाही. या संकटास राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री हेच जबाबदार आहेत.

बोंडअळीच्या संकटामुळे मराठवाडा आणि विदर्भात कापूस उत्पादक शेतक-यांचे 25 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या भरपाई पोटी शेतक-यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे.

Saturday, November 18, 2017

विद्यार्थ्यानेच केला त्याचा खून

विद्यार्थ्यानेच केला त्याचा खून

यवतमाळ / प्रतिनिधी :-  उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील प्राथ.उच्च माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थी प्रदीप शेळके (७) रा.पार्डी याचा दिनांक १३ नोव्हेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केला व आश्रमशाळा परिसरात असलेल्या शेततळ्यात त्याचा मृतदेह फेकून दिला होता. प्रकरणी बिटगाव पोलीस ठाण्यात अप.क्र. १८४/२०१७ भादंवि ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रदीप चा खून करणा:या विधीसंघर्षग्रस्त बालकाला आज अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. मयत प्रदीप हा विधीसंर्घषग्रस्त बालकास वारंवार मुलींच्या नावाने चिडवत असे याचा राग मनात धरुन त्याने हे कृत्य केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
    प्रदीपच्या खूनामुळे ढाणकी शहरात व परिसरात तसेच आश्रम शाळेतील विद्याथ्र्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्वसामान्य जनतेतून व सोशल मिडीयामधून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसिध्द होत असल्यामुळे पोलीसांसमोर सदर गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राज कुमार यांनी सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्यासाठी अपर पोलीस अधिक्षक अमरसिंह जाधव यांचे नेतृत्वाखाली  युध्द पातळीवर तपास करण्याचे आदेश दिले होते.
    गुन्ह्याच्या तपासात पोलीस पथक गुन्हा घडले पासून आश्रम शाळा परिसरात तळ ठोकून होते. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आज सकाळी शाळेतील एका विद्याथ्र्यास शौचास गेल्यावर एक चिठ्ठी मिळून आली. सदर चिठ्ठी मध्ये चिठ्ठी लिहीणा:याने एका विद्याथ्र्यांचा फोटो चिटकवून हा गुन्हा मी केला आहे असा मजकूर लिहीला होता. त्यावरुन पोलीसांनी तपास केला असात सदर चिठ्ठी लिहीणा:या  मुलानेच मयत प्रदीप याचा रविारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन त्यास शेततळे परीसरात घेवून गेला व त्या ठिकाणी प्रथम त्यांचे डोक्यावर फरशीच्या दगडाने मारुन त्यानंतर स्वत:चे करदोळ्याने त्याचा गळा आवळून खून केला.
    सदर खूनाचा आळ हा दुस:यावर यावा या उद्देशाने त्याने चिठ्ठी लिहीली होती. यातच तो फसला. पोलीसांनी त्याला विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता त्याने रविारी केलेल्या कृत्याबाबत पोलीसांना सविस्तर सांगितले. मयत प्रदीप हा विधीसंर्घषग्रस्त बालकास वारंवार मुलींच्या नावाने चिडवत असे याचा राग मनात धरुन त्याने हे कृत्य केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Friday, November 17, 2017

नऊ मित्रांची 11 लाख 62 हजाराने फसवणूक

नऊ मित्रांची 11 लाख 62 हजाराने फसवणूक

  • चंद्रपूरच्या एसीसी कंपनीत नियुक्तीचे बनावट पत्र
    नऊ मित्रांची 11 लाख 62 हजाराने फसवणूक 
    सीताबर्डी पोलिसांनी वणी येथील आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल

Monday, November 13, 2017

अमृताताई, आमचे सौभाग्य वाचवा; चंद्रपूर पाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यात दारू बंदीची मागणी

अमृताताई, आमचे सौभाग्य वाचवा; चंद्रपूर पाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यात दारू बंदीची मागणी

 यवतमाळ प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्यापाठोपाठ गेल्या काही वर्पापासून यवतमाळ जिल्ह्यातदेखील दारू बंदीची मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली असतांनाच यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीचे अनेक आंदोलन होऊनही निर्णय घेण्यात आला नाही. म्हणून रविवारी यवतमाळ जिल्ह्यातील महिलांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्या नावे पत्र लिहून ‘दारूमुळे होणारे आमचे संसार वाचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालायला सांगा,’ असे आवाहन केले.

स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियान गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात दारूबंदीसाठी आंदोलन होत आहेत. मात्र त्याची दखल घेण्यात येत नाही. म्हणून एक महिलाच या महिलांचे दुःख समजतील म्हणून स्वामिनीच्या आंदोलक महिलांनी मुख्यमंत्री यांच्या पत्नीला पत्र लिहून आपल्या वेदना कळविल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातून सोळाही तालुक्यांतून दहा हजार महिलांनी हे पत्र लिहिले आहेत. अनेक महिलांनी या पत्रातून दारूमुळे आपल्या संसाराची होणारी वाताहत मांडली आहे. स्वामिनीचे मुख्य निमंत्रक महेश पवार म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून यवतमाळ जिल्हा दारूमुक्त होण्यासाठी आंदोलन सुरू आहे. तरुण पिढी दारूच्या विळख्यात सापडली आहे. महिला संसार चालविण्यासाठी दिवसभर शेतात मजुरी करून परत येतात. त्यावेळी तिचा पती मजुरीचे पैसे घेऊन तिला मारहाण करतो. इतके विदारक चित्र जिल्ह्यात आहे’ असेही त्यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातूनही दारूबंदीची मागणी जोर धरू लागली आहे
daru bandi साठी इमेज परिणाम

Wednesday, November 08, 2017

यवतमाळमध्ये ग्रामीण रुग्णालयातून दोन दिवसांचं बाळ चोरीला

यवतमाळमध्ये ग्रामीण रुग्णालयातून दोन दिवसांचं बाळ चोरीला


यवतमाळ : ग्रामीण रुग्णालयातून दोन दिवसांचं बाळ चोरीला गेल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी ग्रामीण रुग्णालयातून 6 नोव्हेंबर रोजी जन्मलेलं हे बाळ चोरीला गेलं.

नुसरत बानो असं मातेचं नाव असून तिने 6 नोव्हेंबर रोजी या रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला होता. पहाटे 4 ते 4.30 च्या दरम्यान हे बाळ चोरीला गेल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान रुग्णालयातील सीसीटीव्ही बंद आहेत. सुरक्षा रक्षकही जागेवर नसतात, अशी माहिती आहे. पोलीस या बाळाचा शोध घेत असून रुग्णालयात चौकशी केली जात आहे.

Tuesday, November 07, 2017

चंद्रपूर जाणारी दारू जप्त

चंद्रपूर जाणारी दारू जप्त

वणी/प्रतिनिधी

पांढरकवडा वरून करंजी, मारेगाव, वणी मार्गे चंद्रपूरला जाणारी अवैध दारू पकडली. यात देशी दारूच्या 700 पेट्या जप्त करण्यात आल्या. यात 70 हजार प्लास्टिक पव्वे आढळले. ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार ट्रक एम एच ४० एन ९६२१ या ट्रकमध्ये अवैधरित्या दारू चंद्रपूरला नेली जात असल्याची गोपनिय माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी केसुर्ली फाट्याजवळ सापळा रचला. नाकाबंदी करून सदर ट्रकची पाहणी केली असता यात देशी दारुच्या 700 पेट्या आढळून आल्या. त्याची किंमत 18 लाख 20 हजार रुपये इतकी आहे. ही दारू चंद्रपूरला घेऊन जात असल्याची माहिती ड्रायव्हरने दिली. 

याप्रकणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करून ट्रक चालक राजेंद्र सुरेश खारकर (28) विजय नामदेव येरेकर (27) दोन्ही रा.वांजरी ता.वणी यांना अटक करण्यात आली आहे. 18 लाख 20 हजारांची दारू तसेच 11 लाख रुपयांचा ट्रक असा एकूण 29 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अशोक काकडे पोना.दिलीप अडकीने, महेंद्र भुते ,रवींद्र इसनकर, आशिष टेकाडे, संतोष कालवेलवार ,सादिक शेख ,नफिस शेख ,सुनील खंडागळे, सुधीर पांडे रत्नपाल मोहाडे, दीपक वाद्रसवार,अमित पोयाम, विजय वानखडे यांनी ही कार्यवाही केली.

Saturday, November 04, 2017

ऑटो उलटून एक ठार एक जखमी

ऑटो उलटून एक ठार एक जखमी

मारेगाव, जि. यवतमाळ: - वणी वरुण मारेगाव कड़े येणाऱ्या ऑटो चालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑटो उलटून एक ठार तर एक महिला जखमी झाल्याची घटना ता 4 ला 5 वाजताचे दरम्यान गौराळा फाट्या नजिक घडली.
सुनील दयाराम खेवले 37 रा मांगरुळ असे अपघातात मृत्यु झालेल्या प्रवाशाचे नाव असून या अपघातात सारिका वराटे ही महिला जखमी झाली.तिच्यावर मारेगाव ग्रा रु उपचार सुरु आहे .