चंद्रपूर/प्रतिनिधी:
शुक्रवारी चंद्रपूर येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तथा नगराध्यक्ष बल्लारपूर नगर परिषद आदरणीय श्री. हरीश भैया शर्मा यांच्या अध्यक्षते खाली ऍग्रो व्हिजन, मन की बात व रन फॉर युनिटी या विषयाबाबद जिल्ह्याची बैठक पार पाडण्यात आली.
या बैठकीला श्री रमेश जी मानकर यांनी ऍग्रो व्हिजन ची माहिती दिली व जिल्हा अध्यक्ष श्री. हरीश भैया यांनी मन की बात सर्व तालुक्या मध्ये कार्यकर्यांना घेऊन ऐकण्याचा आव्हान केला तसेच एक भारत श्रेष्ठ भारत रन फॉर युनिटी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सर्व तालुक्या मध्ये नगरपंचायत व नगरपरिषदांच्या माध्यमातून घेण्यात यावा अश्या सूचना केल्या.
या बैठकीला प्रामुख्याने ऍग्रो व्हिजन चे आदरनीय श्री. रमेश जी मानकर, माजी आमदार तथा माजी जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री. अतुल भाऊ देशकर, भाजपा जेष्ठ नेते आदरणीय श्री. प्रमोद भाऊ कडू, भाजपा जिल्हा महामंत्री आदरणीय श्री. संजय भाऊ गजपुरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री. ब्रिजभूषण जी पाजारे व आदी पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष व महामंत्री उपस्थित होते.