त्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई
चंद्रपूर/प्रतिनिधी: "पोलिसांकडूनच नियमांची ऐसीतैसी" या मथळ्याखाली शानिवारी काव्यशिल्प डिजिटल मिडियावर बातमी प्रकाशित करण्यात आली होती.
या बातमीची दखल घेत चंद्रपूर पोलीस विभागाने त्या महिला पोलिस कर्मचाऱ्यावर चंद्रपूर पोलीस विभागामार्फत कारवाई करण्यात आली. शानिवारी दिवसभर MH 34 BC 8660 ही शहरात गणवेशातील महिला पोलीस ट्रिपल सीट फिरत असताना आढळल्याने कोणीतरी पाठलाग करून ह्या वर्दीतल्या व नियम मोडणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा फोटो काढून तो व्हायरल केला होता.
या विषयाला अनुसरून बातमी प्रकाशित करताच पुलिस विभा विभागाकडून ऑनलाइन पोर्टलद्वारे माहिती घेण्यात आली. व पूर्ण माहिती मिळाल्यावर त्या महिलेला वाहतूक शाखेत बोलण्यात आले व शहानिशा करून पोलिस विभागाने मो.वा कायद्यातील कलम 128/177 प्रमाणे ट्रिपल शीटची कारवाई करत दोनशे रुपये दंड ठोठावला.
त्या पोलिस कर्मचारी यांना जाब विचारला गेला असता त्यांनी सांगितले की ते शहराच्या बाहेर राहायला असल्याने मुलीला ट्युशनला सोडायला गेले होते.
या संपूर्ण प्रकारावरून वरिष्ठ पोलिसांनी त्यांच्या पोलिसांनाच "कायदेमे रहेंगे तो फायदेमे रहेंगे" असा संदेश दिला आहे.