भाजप ओबीसी मोर्चाचे समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांना निवेदन
चंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती साठी गत शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती मिळाली नाही. अनेकदा महाविद्यालयात विचारणा केली असता उडवा उडवीचे उत्तर दिल्या जात आहे. हा प्रश्न तात्काळ निकाली कडून विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी भाजप ओबीसी मोर्चा चंद्रपूर यांनी समाजकल्याण विभागाकडे निवेदन दिले. शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या ओबीसी, एस. सी, एस. टी व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप केली जाते. मात्र, गत शैक्षणिक सत्र २०१६-१७ या वर्षातील शिष्यवृत्तीचे फार्म भरून सुद्धा चंद्रपूर जिल्यातील एकही विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने व महाविद्यालयाकडून प्रस्ताव सादर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आपला रोष व्यक्त केले आहे. समाज कल्याण अधिकारी यांनी तातडीने सर्व मागासवर्गीय ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे तात्काळ वाटप करावे अशी मागणी भाजप ओबीसी मोर्च्याचे महानगर जिल्हा उपाध्यक्ष मनोज पोतराजे यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग चंद्रपूर यांचे कडे केली आहे. यावेळी शिष्टमंडळ अभिषेक वाढरे, तुषार येरमे, शुभम गेडाम, प्रफुल नवघरे, प्रतीक नवघरे, आदिच्या समावेश होता.