সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, December 30, 2009

चुभन तुम्हारी भी कम होगी...

चुभन तुम्हारी भी कम होगी...

Wednesday, December 30, 2009

सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - दु:खांचे डोंगर झेलणाऱ्या अपंग सुनील जोशी यांच्या आयुष्यातील तीळभर वेदना कमी करण्याचा प्रयत्न ब्रह्मपुरीतील एका दात्याने केला. हे करताना मात्र ते प्रसिद्धीपासून अलिप्त राहिले. त्यामुळे या मदतीचे मोल वाढले आहे. "चुभन तुम्ही भी कुछ कम होगी... किसी के पाव का काटा निकालकर तो देखो' दुसऱ्यांचे दु:ख कमी करण्याच्या प्रयत्न केल्यास आपले दु:ख कमी होण्याचे समाधान मिळते, याची अनुभूती सध्या ते दानशूर व्यक्ती घेत असावे...

एकेकाळी भोजनालयात स्वादिष्ट भोजन देणारा संजय जोशी नशिबी आलेल्या अपंगत्वामुळे रस्त्यावरच आयुष्य जगतोय. काखेत दोन कुबड्यांचा आधार घेऊन भीक मागून जीवनाचे चक्र फिरविणाऱ्या सुनीलची व्यथा "सकाळ' चंद्रपूर टुडेच्या "रस्त्यावरच आयुष्य' या सदरातून 18 डिसेंबर 2009 च्या अंकात मांडण्यात आली. सुनील वामनराव जोशी 45 वर्षांचे आहे. अविवाहित. तरुणपणात कुटुंबाला आधार म्हणून तो जटपुरा गेट परिसरातील संजय भोजनालयात स्वयंपाकी म्हणून कामाला होता. त्याच्या शैलीने स्वादिष्टपूर्ण व चवदार पदार्थ तयार व्हायची. मात्र, नियतीने काही वेगळाच डाव खेळला. ग्राहकांच्या जिभेचे चव पुरविणाऱ्या त्या हातांना कुबड्यांचा आधार घ्यावा लागला. त्याच्या पायांना अपंगत्व आले. त्यामुळे रोजगार बुडाला आणि नशिबी भिक्षापात्र आले. आता वृद्ध वडील आणि आईसुद्धा जग सोडून गेली. हक्काचे घर नाही. जटपुरा गेटसमोरील वडाच्या झाडाखालीच तो राहतो.

ही व्यथा वाचून ब्रह्मपुरीच्या एका दानशूर कुटुंबाने मदतीचा हात दिला आहे. मात्र, आपले नाव "त्या' व्यक्तीला आणि कुणालाही माहीत करू नका, अशी विनंतीही या दात्यांनी केली. त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात येणाऱ्यासाठी "दान' करणाऱ्यांच्या मांदियाळीत या व्यक्तीचे महत्त्व आणखी वाढले आहे. वर्तमानपत्रात संजयची व्यथा प्रकाशित होताच ब्रह्मपुरी येथील "त्या' अज्ञातदात्याने "सकाळ' कार्यालयाशी संपर्क साधला.

त्यानुसार, आनंदवन येथून तीनचाकी सायकल मागविण्यात आली. आज सायंकाळी जटपुरा गेटसमोरील वाहनांच्या वर्दळीतच सुनीलचा भावपूर्ण सत्कार करीत सायकल भेट देण्यात आली. एका अज्ञात कुटुंबाने दिलेली ही मदत आणि सायकल पोहोचविण्यासाठी विकलांग सेवा संस्थेचे श्रीराम पान्हेरकर, खुशाल ठलाल, बंडू धोत्रे यांनी सहकार्य केले. संबंधित बातम्या
स्वतंत्र विदर्भावरून युतीत तणाव नाही - खडसे
'काळ्या जादू'ची गडेगावात 'दहशत'
तीन सभापतिपदे कॉंग्रेसकडे
विदर्भात पावणे दोन लाख बालके पोषण आहारापासून वंचित?
घरपोच योजने'ची सुरवातच नाही?

प्रतिक्रिया

On 12/30/2009 9:45 AM qsuman said:
वन ईदियत ची प्रतिक्रिया वाचण्यासारखी आहे. भारतीय मनोवृत्तीचा नमुनाच. एखाद्याने मदत केली त्याचे कौतुक नाही. ती कशी कमीच आहे, आणखी काय करायला हवे या बद्धल सल्ला मात्र सर्व देतात. यातून स्फूर्ती घेऊन, इतरांनीहि पुढे येऊन मदतीचा हात देण्यास काय हरकत आहे? सल्ला देणार्यांनी स्वतः काही करायचा विचार केला आहे काय?

On 12/30/2009 7:45 AM बाजीप्रभू said:
अशी लोक खरच कमी आहेत.....

On 12/30/2009 1:10 AM One Idiot from Three ... said:
सायकल देऊन काय उपयोग ? जर छान जेवण करतो तर स्वयंपाकी म्हणून कुठे तरी नोकरी दिली पाहिजे, सायकल बरोबर

Sunday, December 13, 2009

वर्षभरात वाघांनी घेतले 40 बळी

वर्षभरात वाघांनी घेतले 40 बळी

चंद्रपूर - दरवर्षी वाघांच्या हल्ल्यात जिल्ह्यात 40 जण मृत्युमुखी पडतात, अशी माहिती खुद्द वनाधिकाऱ्यांनीच वनमंत्री पतंगराव कदम यांना दिली. त्यामुळे या प्रश्‍नाचे गांभीर्य या जिल्ह्यात किती आहे, हे कदम यांना समजले. मात्र, त्यांनी यावर भाष्य करणे टाळले.

वनमंत्री डॉ. पतंगराव कदम आज (ता. 12) जिल्ह्यात आले होते. त्यांनी येथील वनराजिक महाविद्यालयाच्या सभागृहात वनाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी वनविभागाचा आढावा घेतला. या बैठकीला विधानपरिषद सदस्य जैनुद्दीन जव्हेरी, राजुराचे आमदार सुभाष धोटे, प्रधान मुख्य वनसंरक्षक जोशी उपस्थित होते. डॉ. पतंगराव कदम म्हणाले की, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक शस्त्रे देण्यात येत आहेत. तसेच त्यांना शस्त्र चालविण्यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

वनविभागाचे बी. डी. एम. रद्द करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. स्पेशल ड्युटीपोस्टची पदेसुद्धा भरण्यात येत आहेत. रेंज पातळीवर वाहनेही लवकरच देण्यात येत आहेत. लाकडाची चोरी थांबविण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यावेळी वनसंरक्षक आर. एस. यादव यांनी चंद्रपूर उत्तर व दक्षिण विभागाच्या कामांची माहिती सादर केली. या विभागात साग, बीजा हे अतिमहत्त्वाचे लाकूड असून, यापासून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. ताडोबा अभयारण्यात 198 वाघ व बिबट्या आहेत. या वाघांच्या हल्ल्यांमुळे दरवर्षी 40 लोक मृत्युमुखी पडतात. मृतांच्या नातेवाइकांना दोन लक्ष रुपये देण्यात येतात, असे सांगितले. वनविकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक एस. एच. पाटील यांनी वनविकास महामंडळाच्या विविध कामांची माहिती सादर केली. वनविकास महामंडळाला 10 कोटी रुपयांचा प्रकल्प मिळाला आहे. या विभागाला 24 कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत 12.89 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे. या चर्चासत्राला मुख्य वनसंरक्षण वन्यजीव नंदकिशोर, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक एस. पी. ठाकरे, विभागीय वनाधिकारी अनिल मोहन, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप मनकवडे, वनविभागातील इतर अधिकारी रेंज फॉरेस्टर्स व इतर अधिकारी उपस्थित होते

Tuesday, December 08, 2009

Monday, December 07, 2009

...अन्‌ वेदना, भूक, तिरस्कार दूर झाला!

...अन्‌ वेदना, भूक, तिरस्कार दूर झाला!

...अन्‌ वेदना, भूक, तिरस्कार दूर झाला!

Friday, November 20, 2009
देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - घर बांधणे, विहिरी खोदणे, दगड फोडणे आदी कष्टाळू कामे करीत गाढवांच्या पाठीवरून भटकंती करीत पालावरचं जिणं सुरू होतं. दोन पुस्तक शिकल्यानंतर अव्यक्त भावनांना "बिराड"च्या रूपाने शब्दबद्ध करता आले. या शब्दांना महाराष्ट्राने दाद दिली. पण, खऱ्या अर्थाने "बिराड' स्थिरावले ते चंद्रपुरात. 23 जून 2003 तो दिवस आजही आठवतो. या दिवसापासूनच वेदना, तिरस्कार, दुःख, मनःस्ताप, चिरंतन भूक, अंधश्रद्धा यांचा शाप हळूहळू दूर व्हायला लागला, अशा भावना "बिराड'कार अशोक पवार यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केल्या.

गेल्या सहा वर्षांपासून येथील रहिवासी झालेल्या पवार यांना उद्या (ता. 20) दिल्ली येथे "युवा संस्कृती राष्ट्रीय पुरस्कार' देऊन सन्मानित केले जाणार आहे. यानिमित्त भटकंती, पालावरचं जिणं आणि बॅंकेतील बचतगट असा प्रवास करणाऱ्या "बिराड'चा चंद्रपुरातील पहिल्या दिवसाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

23 जून 2003 चा दिवस. डोक्‍यावर उन्ह तापत होती. छातीत धकधक आणि धडधड करणाऱ्या रेल्वेने मी (अशोक पवार) चंद्रपूरला आलो. सोबत प्रकाश परांदे नावाचे मित्र होते. मळलेले कपडे आणि विखुरलेल्या केसांतून उष्णतेमुळे घामाच्या धारा वाहत होत्या. फाटक्‍या चप्पलमुळे रस्त्यावरची आग पायाला झोंबत होती. कुठेतरी रोजगार मिळेल, या आशेने वीटभट्टीवरील काम सोडून मित्र गजानन जानभोर यांच्या आग्रहाखातर इथे आलो होतो. बिराड वाचून जीवाभावाचा आणि मनापासून प्रेम करणारा मित्र भेटल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. फोनवरून नेहमीच बोलणे असायचे. चहापाणी घेतल्यानंतर त्यांनी सहकारी पत्रकार मित्रांची ओळख करून दिली. तिथे प्रमोद काकडे आणि नंदकिशोर परसावार नावाचे दोन मित्र भेटले. त्यांनीच जेवण आणि चप्पलची सोय करून पोट आणि पायाची आग विझविण्यास मदत केली.

अमरावती जिल्ह्यात वीटभट्टीवर काम करीत असताना कधी मातीमुळे कपडे भरायचे, तर भट्टीमुळे हात भाजायचे. या आगीतून बाहेर काढण्यासाठी जानभोर यांनी चंद्रपूरला बोलाविले होते. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत नेऊन अध्यक्ष बाबासाहेब वासाडे यांची भेट करून दिली. काहीतरी काम द्या, या विनंतीला बाबासाहेबांनी होकार दिला आणि आता नक्कीच बिराड स्थिरावेल, अशी आशा वाटली. लागलीच बॅंकेचे उपव्यवस्थापक रमेश लखमापुरे यांनी तोंडी मुलाखत घेतली. नव्यानेच सुरू झालेल्या बचतगट योजनेमध्ये महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्ती झाली. महिन्याला चार हजार रुपये मानधन ठरले. त्याच दिवशीपासून काम सुरू केले. पहिल्या दिवशी बचतगट म्हणजे काय, याची माहिती देणारी पत्रके वाचून काढली. ऑफीस, कर्मचारी हा प्रकार नवीनच वाटत होता. नोकरीचा पहिला दिवस अख्खा वर्षभरासारखा वाटू लागला. खुर्चीवर बसून टेबलवर पेनने कागदावर लिहिण्याचा अनुभव पहिल्यांदाच घेतला. सतत भटकंती आणि पालावरचं जिणं जगलेला बिराड खुर्चीवर बसल्याचे पाहून स्वत:लाच स्वप्नवत वाटत होते. चोर, बदमाश ठरलेला मी चंद्रपूरवासी झालो. अस्थिर जीवनाचा शाप घेऊन जन्मलेल्या बेलदार समाजातील माझ्यासारख्याला गाव मिळालं, घर मिळालं. दोनवेळच्या पोटाची सोयही झाली आणि आता सन्मानाने जगू लागलो आहे, असेही पवार यांनी मोठ्या आनंदाने सांगितले.
चंद्रपूरचा पारा 10 अंशाखाली

चंद्रपूरचा पारा 10 अंशाखाली

चंद्रपूरचा पारा 10 अंशाखाली
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, December 02, 2009 AT 11:30 PM (IST)
Tags: vidarbha, winter, cold

चंद्रपूर - उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कोसळत असताना अतिउष्ण चंद्रपूर शहराचाही पारा 10 अंशाखाली गेला आहे. पहाटेच्या वेळी कमाल तापमान 13, तर किमान 10 अंशावर आहे. पहाटेच्या वेळी धुके पडत असून, नागरिक गारठू लागले आहेत.

उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भातील जिल्ह्यांत पारा घसरू लागला आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला असून, पहाटेच्या वेळी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. यावर्षी ऑक्‍टोबर महिन्यात उष्णतेचा तडाखा बसला. ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या टप्प्यात तापमानात चांगलीच वाढ झाली होती. यावर्षी कमाल तापमानाचा उच्चांक याच महिन्यात गाठल्याने नागरिक हैराण झाले होते. ऑक्‍टोबर महिन्याचा प्रारंभ गरमा-गरम गेल्यानंतर दिवाळीचा जल्लोष जात नाही तोच गारव्याला सुरवात झाली आहे. मात्र, यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात तापमान सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशाने जास्त होते. त्यामुळे पाहिजे तशी थंडी जाणवली नाही. गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात घट होऊ लागली आहे. सध्या उत्तर भारतात किमान तापमानाचा पारा 12 ते 13 अंशाच्या आसपास घसरला आहे. उत्तर भारताकडून राज्याकडे येणारे वारे थंड असल्याने जिल्ह्यातील तापमान घटले आहे. या थंड वाऱ्याचे प्रमाण काही दिवसांत वाढण्याची शक्‍यता असल्याने थंडीचा कडाका वाढण्याची शक्‍यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात घट होण्यास सुरवात झाल्याने दिवसाही थंडी पडू लागली आहे. हवामान खात्याच्या संकेतस्थळानुसार चंद्रपूर शहरातील सरासरी तापमान कमाल तापमान 28 अंश, तर कमीत कमी 10 अंश आहे. पहाटे दोन ते सकाळी आठ वाजेपर्यंत थंडी कायम असते. सूर्य उगवल्यानंतर सकाळी नऊ वाजतापासून थंडीचा जोर कमी व्हायला लागतो. रात्री आठ ते मध्यरात्रीपर्यंत तापमान 15 ते 17 अंशापर्यंत असते. त्यामुळे सूर्य अस्ताला गेला की, रात्रीच्यावेळी कपाटात ठेवलेले शाल, स्वेटर्स बाहेर निघू लागले आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात जोरदार थंडी पडेल. साधारणत: जानेवारीपर्यंत थंडी राहील, असा अंदाज आहे.
अदानी कोळसा खाण रद्द

अदानी कोळसा खाण रद्द

अदानी कोळसा खाण रद्द
सकाळ वृत्तसेवा
Friday, December 04, 2009 AT 12:00 AM (IST)
Tags: vidarbha, coal
चंद्रपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या लोहारा राखीव जंगलात प्रस्तावित अदानी कोळसा खाणीच्या प्रस्तावाला केंद्र शासनाच्या पर्यावरणीय मूल्यमापन समितीने मंजुरी नाकारली आहे. जुलै महिन्यात या प्रस्तावाविरुद्ध इको-प्रो या पर्यावरणप्रेमी संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी 14 दिवस अन्नत्याग सत्याग्रह करून शासनाचे लक्ष वेधले होते.

गोंदिया येथील अदानी वीज प्रकल्पाला कोळसा पुरवठा करण्यासाठी ताडोबा अभयारण्यालगतच्या वनक्षेत्रातील जागेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. आजघडीला जिल्ह्यात 31 कोळसा खाणी आहेत. शिवाय 22 कोळसा खाणी प्रस्तावित आहेत. जिल्ह्यात छोटे-मोठे 70 उद्योग आहेत. त्यापैकी 150 च्यावर उद्योग धोक्‍याच्या पातळीबाहेर प्रदूषण करीत आहेत. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जिल्ह्यातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले असून, मानवी आरोग्य धोक्‍यात सापडले आहे. प्रस्तावित अदानी कोळसा खाण ताडोबाच्या अगदी जवळ असल्याने वन्यजीवांसह पर्यावरणाला धोका निर्माण होईल, अशी भीती पर्यावरण प्रेमी संघटनांनी व्यक्त केली. ताडोबातील बफर झोनचा महत्त्वाचा भाग लोहारा राखीव जंगलात आहे. वाघाच्या प्रजनानासाठी सर्वोत्कृष्ट कॉरिडॉर असलेल्या लोहारा राखीव जंगल परिसरात ही खाण होत असल्याने अस्तित्वच नष्ट होऊन, याचा परिणाम संपूर्ण ताडोबावर आणि आजूबाजूच्या परिसरावर पडेल. वाघाच्या प्रजननावर प्रभाव होईल. त्यामुळे भविष्यात जैव साखळीमधील एक अतिमहत्त्वाची प्रजात नष्ट होऊन, असंख्य वनस्पती व वन्यजीव प्रजाती धोक्‍यात येईल, अशी भीती व्यक्त करीत अदानी कोळसा खाणीला मंजुरी नाकारण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी संघटनांनी केली होती.

लोहारा राखीव जंगल हे 091 घनता असलेले अतिउच्च प्रतीचे आणि दाट जंगलाचा भाग म्हणून वनविभागात नोंद आहे. या राखीव जंगलातील वनसंपदा अत्यंत दुर्मिळ आहे. प्रकल्पामुळे दोन हजार 250 हेक्‍टर जंगल परिसरातील लहान-मोठी जवळपास 13 लाख 50 हजार झाडे तोडली जाणार होती. इको-प्रो आणि शहरातील इतर पर्यावरणप्रेमी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी 20 जुलैपासून आंदोलन सुरू करून शासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री जयराम रमेश यांनी लेखी पत्र देऊन अशाप्रकारचा कोणताही प्रस्ताव आल्यास प्रकल्पाला मंजुरी देणार नाही, असे आश्‍वासन दिले होते. 14 दिवसांनी हे अन्नत्याग सत्याग्रह मागे घेण्यात आले. त्यानंतर वन आणि पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनीही अहवाल पाठवून प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे सदस्य सचिव राजेश गोपाल यांनी 24, 25 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष पाहणी करून शासनाला अहवाल सादर केला. त्यानंतर पर्यावरणीय मूल्यमापन समितीने बैठक बोलावून या खाणपट्ट्यांच्या प्रस्तावावर चर्चा केली. या समितीत केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री जयराम रमेश, कोळसा मंत्रालय, खनिकर्म, जीवशास्त्रीय सर्वेक्षण विभागाचे प्रतिनिधी सदस्य आहेत. अदानी कोळसा खाणीला नामंजुरी देताना समितीने म्हटले आहे की, खाणीच्या प्रस्तावासंदर्भात प्राथमिक अटी देताना हा प्रकल्प ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असल्याची जाणीव शासनाला नव्हती. देशात कुठेही खाणपट्टे मंजूर करताना मानव, पर्यावरण आणि वन्यजीवांना बाधा पोहोचणार नाही, याची दक्षता घेतली जाते. अदानी प्रकल्पाचा प्रस्ताव लोहारा येथील जंगलात असून, तिथे मौल्यवान वनसंपदा आहे. खाण सुरू झाल्यास वाघाच्या सर्वोत्कृष्ट कॉरिडॉरवर परिणाम होईल. त्यामुळे हा प्रस्ताव नामंजूर करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

पर्यावरणप्रेमीत आनंद
लोहारा जंगलात प्रस्तावित अदानी आणि इतर कोळसा खाणींना परवानगी नाकारण्यात आल्याची बातमी कळताच जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला. गेल्या दोन वर्षांपासून येथील पर्यावरणप्रेमी संघटनांनी चंद्रपूरच्या प्रदूषणमुक्तीसाठी आणि प्रस्तावित खाणीविरुद्ध लढा पुकारला होता.
जनक्षोभामुळेच अदानीचे 'गो-बॅक' यशस्वी

जनक्षोभामुळेच अदानीचे 'गो-बॅक' यशस्वी

जनक्षोभामुळेच अदानीचे 'गो-बॅक' यशस्वी
सकाळ वृत्तसेवा
Friday, December 04, 2009
Tags: vidarbha, adani, coal

चंद्रपूर - अदानी उद्योग समुहाकडून आणण्यात येत असलेल्या राजकीय दबावाला झुगारत अधिकाऱ्यांनी दाखविलेली प्रामाणिकता आणि जनक्षोभामुळे प्रस्तावित लोहारा कोळसा खाणीस लाल बावटा मिळाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या घटनाक्रमात राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे सचिव राजेश गोपाल, राज्याचे तत्कालीन मुख्य वनसंरक्षक मुजूमदार आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी घेतलेली भूमिका निर्णायक स्वरुपाची ठरली.

देशातील बड्या उद्योग समुहापैकी एक असलेल्या गुजरात येथील अदानी उद्योग समुहातर्फे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे वीज प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेल्या कोळसा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला खेटून असलेल्या लोहारा जंगलातून काढण्याचे समुहाचे नियोजन होते. यासाठी जानेवारी 2008 मध्ये समुहाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे नाहरकतसाठी प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे 16 मे 2008 रोजी मंत्रालयाने तब्बल 32 अटी पूर्ण करण्याचे समुहाला रितसर पत्र दिले. याचाच एक भाग म्हणून 11 सप्टेंबर 2008 रोजी प्रदूषण नियंत्रण विभागाकडून जनसुनावणी घेण्यात आली आणि जिल्ह्यातील पर्यावरणवादी संस्था सावध झाल्या. सामाजिक कार्यकर्ते नितीन बनसोड यांची विधानभवनापर्यंत पदयात्रा, "इको-प्रो'या संस्थेने दिलेले धरणे, सृष्टी पर्यावरण या संस्थेने संकेतस्थळाच्या माध्यमातून देशभरातील पर्यावरणवाद्यांत केलेली जागृती, चंद्रपूर बंद, डॉक्‍टर, वकील, व्यापारी यांनी या खाणीच्या अनुषंगाने एकजुटीने या खाणीस राज्यभरातून विरोध सुरू झाला.

जनक्षोभ तीव्र होत आहे, हे लक्षात येताच प्रस्तावित खाणीच्या मंजूरीसाठी अदानी उद्योग समुहाने अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू केले. याचा पहिला बळी ठरले राज्याचे मुख्य वनसंरक्षक मुजूमदार. तत्कालीन मंत्रीमंडळातील एका जेष्ठ मंत्र्याने बजावल्यानंतरही मुजूमदार यांनी विविध निकषांच्या पातळीवर प्रस्तावित लोहारा खाण वन्यजीव आणि वनांस धोकादायक असल्याचा अहवाल दिल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आली. व्याघ्र संरक्षणासाठी देशभरात काम करणाऱ्या प्रमुख संस्थांनी तसेच विदर्भातील 11 खासदारांनी खाणीला परवानगी देवू नये, या आशयाचा पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याशी पत्रव्यवहार केला. पंतप्रधान हेच राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे अध्यक्ष असल्याने प्राधिकरणाचे सचिव राजेश गोपाल यांनी जिल्ह्यात दोन दिवस ठाण मांडून सर्व खाणीमुळे होणाऱ्या संभाव्य हानीचा अभ्यास केला आणि कुठल्याही परिस्थितीत प्राधीकरणाकडून परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. यादरम्यान इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी 14 दिवसांचे उपोषण केले. हे निमित्य साधून श्रमिक एल्गारच्या पारोमीता गोस्वामी, प्रा.दुधपचारे, डॉ.गुलवाडे, सुभाष शिंदे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांना या प्रस्तावित खाणीमुळे होणाऱ्या हाणीची प्रत्यक्ष भेटीत माहिती दिली.

दुसरीकडे अदानी उद्योग समुहाकडून राजकीय वजन वापरण्याचे प्रयत्न सुरूच होते. मात्र, लोकभावना संतप्त असल्याने या प्रयत्नांचा फारसा फायदा झाला नाही. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि राज्याच्या वनविभागाने प्रतिकुल अहवाल दिल्याने अदानी समुहाने सुधारीत प्रस्ताव सादर करण्याच्या हालचाली सुरु केला. मात्र, या हालचालींना वेग येण्यापूर्वीच प्राप्त अहवालाचा आधार घेत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अदानी समुहाच्या लोहारा कोळसा खाणीस लाल बावटा दाखविला. लोहारा खाणीस मंजुरी नाकारण्यात आल्याने व्याघ्र प्रकल्पानजीक असलेल्या इतर प्रस्तावित खाणींचाही डावही उधळला गेला आहे.

हानी टळली
वेकोलिच्या अख्यत्यारित येत असलेल्या खाणीतून एक टन कोळसा काढण्यासाठी चार टन मातीचे उत्खनन करावे लागते. रद्द करण्यात आलेल्या लोहारा खाणीत हेच प्रमाण एका टनास चौदा टन असते. खाणीची खोलीही निकषापेक्षा अधिक अर्थात 300 ऐवजी 350 मिटर असती. खाणीचे 93 टक्‍के क्षेत्र राखीव जंगलात मोडणारे असल्याने एक हजार 750 हेक्‍टर वनजमिनीसह अतिरिक्‍त 500 हेक्‍टरवरील जंगल नष्ट झाले असते.
तेलाची फोडणी डोळ्यांत आणणार पाणी

तेलाची फोडणी डोळ्यांत आणणार पाणी

तेलाची फोडणी डोळ्यांत आणणार पाणी
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 01, 2009 AT 10:08 PM (IST)
Tags: chandrapur, soyabin, agriculture
चंद्रपूर - खरीप हंगामातील सोयाबीन पूर्णतः हातून गेल्यानंतर रब्बीवरची आशाही दुरावल्याने मोठ्याप्रमाणात उत्पन्न घटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काळात सोयाबीन तेलाचे भाव भडकण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. आजच्या घडीला सोयाबीनचे खुले खाद्यतेल 50 रुपये किलो; तर पॅकेटबंद 56 रुपये प्रतिकिलो आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांच्या काळात नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळला. चांगले उत्पन्न मिळाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला होता. मात्र, गतवर्षी तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीने जिल्ह्यातील संपूर्ण सोयाबीन फस्त केले. त्यातून सावरत नाही तोच यंदा कोरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांना लाथ मारली. त्यामुळे शेतकरीवर्ग कर्जाच्या खाईत सापडला आहे. रब्बीतून काहीतरी फायदा होईल, अशी आशा होती. मात्र, अपेक्षाभंग झाला आहे. गेल्या सात-आठ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात जवस तेलाची मोठी मागणी होती. तेव्हा 30 ते 36 रुपये प्रतिकिलो दर होते. त्यात सोयाबीन तेलाची गोडी लागताच जवस तेलाची मागणी घटली. तेव्हा सोयाबीनचे तेल 40 रुपये किलोने मिळायचे. असे असतानादेखील पाच ते सहा रुपयांनी महाग असलेले सोयाबीन तेल प्रतिष्ठेचे समजून खायचे. आता भाजी किंवा पदार्थांमध्ये सोयाबीनशिवाय चालतच नाही. शिवाय जवसाचे उत्पन्नच बंद झाल्याने तेल शोधूनही सापडत नाही. आता दुर्मिळ झालेल्या जवसाचे दर 60 रुपये किलो, तर सोयाबीन तेल त्यापेक्षा पाच ते सहा रुपयांनी कमी दरात उपलब्ध होत आहे. सोयाबीनचे खुले खाद्यतेल 50 रुपये किलो, तर पॅकेटबंद तेल 56 रुपये किलो आहे. 15 लिटरच्या पिंपाचा दर 705 रुपये आहे. महागाईचा कळस असतानाच सोयाबीनचे उत्पन्न घटले आहे.
...अन्‌ आईचा आनंद गगनात मावेनासा झाला

...अन्‌ आईचा आनंद गगनात मावेनासा झाला

...अन्‌ आईचा आनंद गगनात मावेनासा झाला
Saturday, October 10, 2009
Tags: chandrapur, politics, election, rahul gandhi ...
चंद्रपूर - तब्बल 25 मिनिटांच्या संवादामध्ये जनता तल्लीन झाली होती. मधेच कुठून तरी "राहुल गांधी आगे बढो'चा नारा येत होता. सभा संपली. राहुल गांधी मंडपाच्या मागून परतीकडे निघाले. काही दूर जात नाही तोच "ते' पुन्हा नागरिकांच्या गराड्यात शिरले. कुणी हातात हात देत होते, कुणी हात हलवून नमस्कार करीत होते. सुरक्षा कवच तोडून अचानक गर्दीत आलेल्या राहुल गांधींनी एका लहान मुलास कडेवर घेतले आणि त्याचे भाग्यच उजळले. राहुल गांधींनी आपल्या मुलाला कडेवर घेतल्याचा आनंद आईला गगनात मावेनासा झाला होता.

स्थानिक चांदा क्‍लब मैदानावर कॉंग्रेस आणि मित्र पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेल्या राहुल गांधींनी आज (ता. नऊ) गांधी घराण्यावर प्रकाश टाकत "गरिबां'शी असलेल्या नात्यावर संवाद केला. दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास आकाशातून हेलिकॉप्टरचा आवाज आला. बघताक्षणी पोलिस मैदानावर हेलिकॉप्टर उतरले. पाच मिनिटांतच पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेले राहुल गांधी मंचावर दिसले आणि साऱ्या जनसमुदायाने "राहुल गांधी की जय हो', अशी एकच हाक दिली. स्वप्नातील शायनिंग इंडिया चंद्रपूरच्याही जनसागरात राहुल गांधींना कुठे दिसत नव्हता. यावेळी त्यांनी प्रामुख्याने गरिबांवरील प्रेम व्यक्त केले. सुमारे 25 मिनिटे भाषण दिल्यानंतर त्यांनी नागरिकांना अभिवादन केले. त्यानंतर ते मंचाच्या मागील दारातून बाहेर निघाले. सभोवताल सुरक्षारक्षकांचा कवच होता. परतीसाठी ते सरळ विश्रामभवनाकडे निघाले. पाठीमागे स्थानिक नेतेही होते. काही दूर जात नाही तोच राहुल गांधी मागे परतले आणि थेट गर्दीत घुसले. अचानक झालेल्या घडामोडीने सुरक्षारक्षकांपुढे पेच निर्माण झाला. यावेळी त्यांनी महिला-पुरुषांना अभिवादन करून, वयोवृद्धांचा आशीर्वाद घेतला. या गर्दीत त्यांनी एका छोट्याशा मुलाचे कौतुकही केले. तीन-चार मिनिटांच्या या गोड आणि विलक्षण क्षणात अनेकजण भारावून गेले होते. त्यानंतर रस्त्याने अभिवादन करीत असतानाच त्यांनी अचानक गाडीखाली उतरून पुन्हा गर्दीत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले.

Sunday, December 06, 2009

Devnath Gandate

Devnath Gandate

आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यावर गावकऱ्यांचा बहिष्कार!
Tuesday, June 16th, 2009 AT 12:06 AM Tags: vidarbha, chandrapur, bycott, rural, social Close... चंद्रपूर - सर्पदंशाने पतीचे निधन झाले. मुलांसह ती एकटीच होती. काळ गेला. जुन्या स्मृती धूसर झाल्या. एकाकी जीवनात कुणी एक आधार देणारा भेटला. दोघांनी लग्न केले, सुखाने संसार करण्यासाठी. पण, गावकऱ्यांच्या मनात वेगळेच होते. पहिल्याच दिवसापासून त्यांच्यावर बहिष्कार सुरू झाला, तो आजतागायत कायम आहे. तिचा आणि त्याचा दोष काय? तर जाती-धर्माच्या भिंती तोंडून ते एकमेकांना आधार देण्यासाठी एकत्र आले, विवाह केला एवढाच!गावात रस्ता नाही, मात्र कानाला मोबाईल आहे. आधुनिकतेशी नाळ जोडताना पिढ्यान्?पिढ्या जोपासलेली जाती-धर्माची जळमटे फेकून द्यायला कुणीच तयार नाही. 35 उंबरठ्याच्या नानकपठार या गावावजा तांड्यात तर परिस्थिती अत्यंत भयावह आहे. त्याच गावातील गुजाबाईची ही व्यथा...पहिल्या पतीच्या निधनानंतर दुसऱ्याशी आंतरजातीय विवाह केल्यामुळे गुजाबाई आणि तिचे कुटुंबीय 15 वर्षांपासून अस्पृश्?यतेचे जिणे जगत आहे. माणिकगड पहाडावरील नानकपठार या गावात बऱ्यापैकी प्रस्थ असलेल्या काही लोकांनी या कुटुंबीयांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणली आहे.1971 मध्ये आलेल्या दुष्काळामुळे नांदेड जिल्ह्यातील बंजारा समाज जिल्ह्यातील माणिकगड पहाडावर स्थलांतरित झाला. शासनाने त्यांना उपजीविकेसाठी शेतजमिनी दिल्या. तेव्हापासून पहाडावरील छोट्या-छोट्या गावात बंजारा समाज वास्तव्य करीत आहे. हिरामण आडे यांचे कुटुंब 1971-72 मध्ये नानकपठार येथे आले. त्यांची मुलगी गुजाबाई हिचा विवाह 1980 मध्ये आंध्रातील नारायण जाधव यांच्याशी झाला. या संसारात त्यांना दोन मुले झाली. काही वर्षांतच नारायण जाधव यांचे सर्पदंशाने निधन झाले. त्यामुळे ती वडील हिरामण आडे यांच्याकडे परत आली. त्यानंतर तिने बल्लारपूर येथील गोकुलनगरातील रहिवासी ब्रिजलाल शर्मा यांच्याशी आंतरजातीय विवाह केला. गावात प्रस्थ असलेल्या तीन कुटुंबांनी विरोध करीत त्यांना अमानुष वागणूक देणे सुरू केले. मागील 15 वर्षांपासून हे दोघेही नानकपठार येथे प्लास्टिक घातलेल्या कुडाच्या घरात राहून शेती करतात. त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे. गुजाबाई ही पहिल्या पतीची दोन्ही मुले सोबत घेऊन दुसऱ्या पतीसोबत जीवन जगत आहे. दरम्यान, गत 15 वर्षांपासून या कुटुंबाला अस्पृश्?यतेची वागणूक दिली जात आहे. नळ आणि विहिरीवर पिण्याचे पाणी भरू दिले जात नाही. त्यामुळे गुजाबाई दोन किलोमीटर अंतरावरील गावातून पिण्याचे पाणी आणते. कुटुंबीयांची मतदान यादीत नावे नसून, रेशनकार्डपासून वंचित ठेवण्यात आले आहे. शेतीतही बळजबरी करून पीक घेण्यापासून मज्जाव करीत आहेत. शेतात नांगरणी केल्यास बैलांना हाकलून लावण्यात येते. मोठा मुलगा राजेश (वय 25) याचा विवाह झाला. सत्यपाल (वय 22) याच्या विवाहासाठी मुलगी बघणे सुरू आहे. दोनदा जुळलेले लग्न गावावर वर्चस्व असलेल्या कुटुंबांनी धमकी देऊन मोडले. गावात राहायचे असेल, तर नवऱ्याला सोड, अशी धमकी देत असल्याचेही गुजाबाईने सांगितले. भीतीपोटी या प्रकाराची गुजाबाईने कुठे तक्रार केली नाही. ती व तिचे कुटुंबीय 15 वर्षांपासूनचा हा जातीभेदाचा अन्याय निमूटपणे सहन करीत आहे. dev

Wednesday, November 25, 2009

Sunday, October 11, 2009

नगरपालिका ते मनपा

नगरपालिका ते मनपा

Sanjay Tumram
संजय तुमराम, 
सरचिटणीस, 
चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघ, चंद्रपूर. 
९९२२९०३२९२

चंद्रपूर नगरीने कृत-त्रेता-द्वापार व काली अशी चारही युगे पाहिली आहेत. त्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या या नगरीचे वैभव आणि संपन्नता सहज लक्षात येते. प्रारंभी आर्यवंशीय राजा कृतध्वजाने ङङ्गलोकपूर' म्हणून हे शहर वसवले. पुढे कृत-त्रेता युगानंतर द्वापार युगाअंती चंद्रहास्य नावाच्या राजाने लोकपूरवर स्वारी करून ही नगरी पादाक्रांत केली. या नगरीतील झरपट आणि इरई नदीचा रणीय परिसर पाहून तो या नगरीच्या मोहात पडला आणि हीच राजधानी करण्याचे त्याने ठरवले. मात्र, राजधानी करतानाच त्याने लोकपूर' हे नाव बदलून, आपले नाव त्याला जोडले आणि चंद्रपूर' असे नाकरण केले. तेव्हापासून आजतागायत या नगरीचे चंद्रपूर हेच नाव काय आहे. १२ व्या शतकातील नागवंशीय राजसत्तेच्या विनाशानंतर पुढे गोंड राजवटीचा उदय झाला. तो इतिहास सर्वज्ञात आहेच. नगरपालिका ते महानगरपालिका ब्रिटिशांनी भारतावर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर १८४२ मध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाविषयक कायदा केला. देशात सर्व प्रमुख शहरांत या संस्था स्थापण करण्याचे ब्रिटिशांनी जाहीर केले. मात्र, या कायातील तरतुदी लोकविरोधी होत्या. लोकांकडून थेट कर वसुलीची तरतूद त्यात होती. त्यामुळे हा कायदा अलात न आणता जाणकार ब्रिटिशांनी तो गुंडाळला. पुढे त्यात सुधारणा करून नव्याने हा कायदा आणला गेला. या कायानुसार महाराष्ट्रात पहिली नगरपालिका सांगोला येथे स्थापण्यात आली. आणि नंतर अहदनगर, सोलापूर, पंढरपूर, कल्याण, पुणे, नागपूर, अरावती, वर्धा इत्यादी ठिकाणी झाली. मात्र, त्यातून चंद्रपूर सुटले. १८५५ ध्ये चंद्रपूर क्षेत्रातील भोसल्यांची सत्ता खालसा झाल्यानंतर ब्रिटिशांची सत्ता स्थिरावली. त्यानंतरच चंद्रपूरला प्रशासकीय पातळीवर हत्त्व आले. ब्रिटिशांनी चंद्रपूर या नावाचा इंग्रजी उधार चांदा' असा केला. त्यामुळे चंद्रपूरला आजही अनेक जण बोलीचालीत 'चांदा' असेच संबोधतात. ब्रिटिशांनी चांदा जिल्हा केला. चांदा जिल्हा अस्तित्वात आला, तरी त्याची तहसील मूल होती आणि तिथेच तहसील कार्यालय अस्तित्वात होते. ते नंतर चंद्रपूरला आणले गेले आणि चंद्रपूर हे शहर तहसील व जिल्ह्याचे ठिकाण झाले. १८६७ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी (त्यावेळी डेप्युटी कश्निर म्हणायचे) कॅप्टन एच. एम वॅडिन्टन यांनी चंद्रपूर शहरातील प्रतिष्ठितांची एक बैठक बोलावली. आणि त्यांच्यासोर नगरपालिकेचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा ब्रिटिशांना विरोध करणे शक्य नव्हते. त्यांनी सांगावे आणि आपण ऐकावे, अशीच परिस्थिती होती. या बैठकीतही तेच झाले. जिल्हाधिकार्‍यांनी प्रस्ताव ठेवताच त्याला सर्वांनी अपेक्षेप्राणे होकार दिला. आणि १७ मे १८६७ रोजी कॅप्टन वॅडिन्टन यांनी चंद्रपूर नगरपालिकेची अधिकृत घोषणा केली. यावेळी चंद्रपूरची लोकसंख्या केवळ १६ हजार एवढी होती. या लोकसंख्येनुसार १६ सदस्यांचे एक मंडळ स्थापन करण्यात आले. प्रति एक हजार व्यक्तिंमागे एक सदस्य, अशी संकल्पना त्यामागे होती. हे सारे सदस्य जिल्हाधिकार्‍यांनीच निवडले. त्यावेळी निवडणूक घेण्याची प्रथा नव्हती किंवा कुणाला सत्तेची लालसाही नव्हती. त्यामुळे जी नावे जिल्हाधिकारी ठरवतील, त्यावर एकत व्हायचे. याच १६ सदस्यांना नगराध्यक्षांची निवड करायची होती. अपेक्षेनुसार ही निवड करण्यात आली. त्यानुसार चंद्रपूरचे पहिले नगराध्यक्ष कॅप्टन. एल. बी. लुसीस्थि झाले. १८६७ ते १८८६ या १९ वर्षांच्या कालखंडात २५ पदसिद्ध डेप्युटी कश्निर नगराध्यक्ष झाले. नगराध्यक्षांचा कार्यकाळ किती कालावधीचा राहील, हे तेव्हा ठरले नव्हते. त्यामुळेच १९ वर्षांत २५ नगराध्यक्ष झाले. या १९ वर्षांच्या काळात ब्रिटिशांचा सत्ताकारभार स्थानिक सदस्यांनी चांगलाच अनुभवला होता. प्रशासकीय यंत्रणा काय असते, ती कशी हाताळायची, याचा अनुभव स्थानिकांना आला होता. हा अनुभव स्थानिकांना आल्याचे लक्षात आल्यावर तत्कालीन जिल्हाधिकारी एच. जे. मकजॉर्ज यांनी नवी निवडणूक १८८६ मध्ये जाहीर केली. त्यावेळी निर्वाचित आणि नानियुक्त सदस्यसुद्धा नियुक्तच केले जात होते. आताची निवडणूक पद्धती नव्हती. १८८६ मध्ये झालेल्या या निवडीत पुन्हा १६ सदस्य निवडण्यात आले आणि नगराध्यक्ष म्हणून एका प्रतिष्ठित व संपन्न नागरिकाची निवड करायची, असे ठरले. जिल्हाधिकार्‍यांनी चौकशीअंती एक नाव निश्चित केले, ते होते रावसाहेब चंदीप्रसाद दीक्षित यांचे. रावसाहेब त्यावेळी प्रतिष्ठित आणि श्रींत नागरिक म्हणून ओळखले जायचे. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि चंद्रपूर नगरपालिकेचे पहिले भारतीय नगराध्यक्ष म्हणून ते पदावर विराजान झाले. चंद्रपूर नगरपालिकेच्या स्थापनेचा हा इतिहास आहे. पुढे १९६५ ध्ये म्हणजे हाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र नगरपालिका कायदा-१९६५' अस्तित्वात आला. त्यानुसार चंद्रपूर नगरपालिकेला अ' दर्जा मीडाला. विकास चंद्रपूर नगरीचा किंवा जिल्ह्याचा आधुनिक विकास जो काही दिसतो, त्याची मुहूर्ते ही ब्रिटिशांनीच रोवली. ब्रिटिश राज्यकर्ते हे धोरणी व विकासवादी होते. ब्रिटिशांनी जेव्हापासून चंद्रपूर नगरीत पाय ठेवला, तेव्हापासून मुलभूत विकासाला मोठा वेग आला. रेल्वे, टपाल, रस्ते, सार्वजनिक शिक्षण, आरोग्यसेवा या सर्व सोयीसुविधा ब्रिटिशांनी दिल्या. ब्रिटिशांच्या या कार्यपद्धतीचा अवलंब नंतर अनेक भारतीय नगराध्यक्षांनी केला. आझाद बाग, सार्वजनिक वाचनालय, विविध चौकांची र्निमीती , नळयोजना, शाळा अशी हत्त्वाची विकासको त्यावेळी करण्यात आली. खुशालचंद खजांची यांनी १९२९ ते १९३४ या पाच वर्षांच्या कार्यकाळात मुलां-मुलींसाठी प्राथकि शिक्षण सक्तीचे केले. शिक्षणाप्रतीची ही आस्था आणि हत्त्व त्यांनी त्यावेळी ओळखले होते. अशा अनेक सुधारणा नंतर होत राहिल्या. अलीकडच्या २० वर्षातील नगरपालिकेचा कारभार हा परंपरेला शोभणार नसला, तरी काही मुलभूत गोष्टी निश्चित होत आहेत. गती भूमिगत गटार योजना असो, बाजार गाळे असो की दिवाबत्तीची सोय असो. आपापल्यापरीने म्हणा किंवा अपरिहार्यतेपोटी म्हणा थोडीफार को होऊ लागली. शहराची लोकसंख्या चार लाखांच्या घरात पोचली. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला नगरपालिका तोंड देऊ शकत नाही, हे खरे असले, तरी अनेकदा सोयीसुविधा पुरवण्यात पालिका प्रशासन वेळकाढूपणा आणि अनास्था दाखवित आली आहे. या पार्श्वभूमीवर आता हानगरपालिकेची स्थापना झाल्याने नागरिकांना पुन्हा एकदा चांगल्या प्रशासनाची प्रतीक्षा लागली आहे. महानगरपालिका व अपेक्षा चंद्रपूर नगरपालिकेची जेव्हा स्थापना झाली, तेव्हा या नगराची लोकसंख्या केवळ १६ हजार होती. आता ती अफट वाढली आहे. चार लाखांच्यावर ही लोकसंख्या गेली आहे. या शहराची ही वाढती लोकसंख्या आणि आकारान बघता शासनाने चंद्रपूर शहर महानगरपालिके'ची घोषणा केली. वर्गाच्या या महापालिकेची एक नोव्हेंबर २०११ रोजी अधिसूचना निघाली. चंद्रपूरकरांच्या दृष्टीने ही आनंददायी बाब आहे. एकीकडे या शहराची पंचशताब्दी साजरी होत असतानाच, त्यात अखिल भारतीय राठी साहित्य सेंलनाचे यजानपद शहराला आणि वरून पुन्हा महानगरपालिका हा खरे तर दुग्धशर्करा योगापेक्षाही मोठा योग म्हटला पाहिजे. १४४ वर्षांनंतर या शहराला महानगराचा दर्जा. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा शिगेला पोचल्या आहेत. अलीकडच्या काळात नगरपालिकेच्या कारभाराचा आलेख बघितला, तर तो सतत खाली घसरतानाच दिसतो. विकासकाच्या संदर्भातही ङ्खार काही उजेड पडलेला नाही. ठिकठिकाणी अतिक्रण, भूमाफियाचा धुमाकूळ, कंत्राटदारांची मुजोरी, राजकारण्यांच्या हातातले प्रशासन, विकासदृष्टीचा अभाव असलेले नगराध्यक्ष, असा सावळागोंधळ नागरिकांनी अनुभवल्या मुळे हापालिकेकडून फार अपेक्षा ठेवल्या जात आहेत. येत्या काही दिवसांत हापालिकेसाठी निवडणूक होईल. कुणाची तरी सत्ता बसेल. नगराध्यक्ष कालबाह्य ठरून महापौर विराजान होतील. मुख्याधिकार्‍यांच्या जागी आयुक्त येतील. हे सारे बदल होत असताना नागरिकांनाही बदल हवे आहेत. पाचविला पूजलेल्या समस्या कायच्या जरी सुटू शकल्या नाही, तरी त्या की करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. रस्ते मोठे व्हावे, वाहनतळासाठी जागा उपलब्ध व्हावी, पाणी नियमित रस्त्यावर खड्डे नसावे, पथदिवे सर्वत्र लागावे, पादचार्‍यांसाठी पदपाथ मोकळे व्हावे, अतिक्रणाचा विळखा दूर करावा, या अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांच्या आहेत. कोणत्याही शहराची ओळख ही सांस्कृतिक आणि शैक्षणिक वैभवामुळे होत असते. या शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. घनदाट अरण्याने वेढलेला हा परिसर आहे. पाणी, खनिजांनी सृद्ध आहे. पण तरीही मागासपणाचा शिक्का अजूनही काय आहे. औद्यागिक शहर म्हणून देशाच्या नकाशावर हे शहर चकत असताना सांस्कृतिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा काळोख आप टिकु शकलेला नाही. आजही आदिवासीबहुल भाग म्हणूनच आपण या जिल्ह्याचा उल्लेख करीत असतो. ही भूषणावह बाब नाही. तो दुबळेपणा आहे. आपल्या नगटातील ताकद न दाखवता दुबळेपण घेऊन आपण सदैव याचका'च्या भूमीकेत असतो. खेचून आणण्याची ताकद आपल्यात नाही, असे नाही. मात्र, त्याचा उपयोगही कधी केल्याचे दिसत नाही. ही ताकद करायची असेल, नवी ओळख प्रस्थापित करायची असेल, तर सांस्कृतिक-शैक्षणिक विकासासोबतच राजकीय दृष्टीकोनही बदलणे गरजेचे आहे, हे मुद्दा सांगावेसे वाटते.

 - साभार ८४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन स्मरणिका- २०११