সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, November 30, 2012

एड्सबाधितांना मिळाला कौंटुंबीक जीवनाचा आधार

एड्सबाधितांना मिळाला कौंटुंबीक जीवनाचा आधार


वाहतूक शाखा आणि स्वयंसेवी संस्थाच्या पुढाकारातून यंदाही तिन जोडप्यांचा विवाह
 चंद्रपूरता. ३० : एड्स या महाभयंकर रोगाची लागण झाल्यानंतर रुग्ण मानसिक आजारानेच अर्धमेला होऊन जातो. घरातील लोकही त्याची उपेक्षा करतात. नातेवाईक भेटण्यास टाळतात. अशी अवहेलना सहन करावी लागते आणि मग सुरू  होतो एक जीवघेणा प्रवास. मात्रअशा रुग्णांच्या जीवनाला नवीन आकार देण्याचे काम एनएमपी पुणे आणि पृथ्वीआधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने एचआयव्हीबाधित मुला-मुलींचा विवाह सोहळ्यातून केला जात आहे. आजवर या संस्थांनी पाच जोडप्यांचे विवाह केले असूनयंदा तीन जोडप्यांचा विवाह होईल.
एक डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन आणि २६/११ या हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी वाहतूक शाखेच्या पुढाकारातून एनएमपी पुणे आणि पृथ्वीआधार बहुउद्देशीय संस्थेने उद्या ता. एक डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता या विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.
१९९२ च्या काळात चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून हेमंत करकरे होते. त्यावेळी वाहतूक पोलिस निरीक्षक पुंडलिक सपकाळे हे महाकाली पोलिस चौकीत पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी करकरे यांनी एड्स या रोगाबद्दल जागृती करण्याच्या दृष्टीने पावले उचलली होती. त्यानुसार सपकाळे यांनी महाकाली मंदिर परिसरात देहविक्रय करणाèया महिलांच्या पाल्यांसाठी शाळा सुरू केली.
एड्स रुग्णांच्या प्रवासात महत्वावाची गरज असते ती या रुग्णांना मानसिक आधार देण्याची. त्या दृष्टिकोनातून हेमंत करकरे आणि पुंडलिक सपकाळे यांनी पावले उचलली होती. एचआयव्हीबाधित रोगावर अद्यापही औषध अथवा लस निर्माण झालेली नाही. मोठ्या शहरातील या रोगाने ग्रामीण भागातही पाय पसरले आहेत. अशा एचआयव्हीबाधित रुग्णांसाठी स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहेत. दरम्यानज्यांच्या पुढाकारातून एड्स जनजागृती सुरू केली होतीते हेमंत करकरे २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी
एड्सने बाधित झालेल्या रुग्णांना कौटुंबिक जीवन जगता यावेयासाठी पुंडलिक सपकाळे यांनी विवाहाची कल्पना मांडली. त्यानुसार २००८ पासून एनएमपी पुणे आणि पृथ्वीआधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने एचआयव्हीबाधित मुला-मुलींचा विवाह सोहळा सुरू आहे. पहिल्या दोन वर्षांत प्रत्येकी एक आणि गतवर्षी दोन जोडप्यांचा विवाह करून देण्यात आला. यंदाही एक डिसेंबर रोजी हा सोहळा होत असूनतीन जोडप्यांचा विवाह होईल. याशिवाय वाहनचालकांमध्ये एड्सविषयी जागृती होण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यानआजवर विवाहित झालेल्या जोडप्यांचा लग्नाचा वाढदिवस देखील एक डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.

-- 
Devnath Gandate
Reporter Sakal Newspaper
chandrapur
9922120599

https://kavyashilp.wordpress.com

Thursday, November 29, 2012

ताडोबा वाचवायचे असेल,तर...

ताडोबा वाचवायचे असेल,तर...


उन्हाळ्यामध्ये ताडोबा अभयारण्याकडे पर्यटकांची रीघ लागते. येथील दाट झाडी असलेले जंगल, फुले व फळांचे विविध प्रकार, अनेक जातींचे पक्षी व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे येथील वाघ हे पर्यटकांचे आकर्षण. मात्र, ताडोबाचे जंगल, वाघ, तेथील आदिवासी व वनाधिकारी अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. अभयारण्यातील या प्रत्येक घटकाच्या आजच्या स्थितीचा व भवितव्याचा हा आढावा...
वनरक्षकांच्या समस्याही महत्त्वाच्या!वनरक्षकांच्या प्रयत्नांमुळे जंगलातील वाघ सुरक्षित.
जंगलामध्ये लागणाऱ्या वणव्यांवर नियंत्रणासाठी प्रयत्न.
शिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवल्याने वाघांचे संरक्षण.
आदिवासींना कायदा समजावून सांगत जंगलाचे रक्षण करण्याचा प्रयत्न.

साधनसामग्री अपुरीसंरक्षणास पुरेसे कर्मचारी नाहीत.
वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचा अनुशेष.
अंतर्गत भागात काम करण्यास चांगल्या अधिकाऱ्यांची तयारी नाही.
अभयारण्यात राहण्यास वन कर्मचारी धजावत नाहीत. या कर्मचाऱ्यांचा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न.
गस्ती पथके पुरेशी नाहीत.
ताडोबातील जखमी वन्य जीवांवर उपचारासाठी सोय नाही. पशुवैद्यकीय अधिकारी नाही.
वेळप्रसंगी हिंस्र जनावरांना बेशुद्ध करून ताब्यात घेण्यासाठी "टर्नाक्‍युलायझर' नाही.
ताडोबा व्यवस्थापनाकडे वणव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही.

काय करायला पाहिजे?वनरक्षकांना अधिक अधिकार.त्यांच्या कुटुंबीयांना सर्व सोयी.
वणव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठीची अद्ययावत यंत्रणा.
गस्ती पथकांच्या व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ.

वाघ वाचला, तरच...२००७च्या प्रगणनेनुसार ४३ पट्टेदार वाघ, २२ बिबटे.
वाघांच्या वाढीसाठी बांबूचे वन उपयुक्त. त्यामुळे त्यांची संख्या टिकून.
जंगलामध्ये मोठे चढ-उतार नसल्याने वाघ सहज दृष्टीस पडतात व हेच पर्यटकांचे आकर्षण.

... पण शिकार येते मुळावरवाघांच्या संख्येच्या मानाने खाद्याचे प्रमाण कमी.
शिकारीमुळे तृणभक्षक जनावरांची संख्या कमी होत आहे. याचा थेट परिणाम वाघांवर.
जंगलातील नैसर्गिक जलसाठे कोरडे पडल्यावर शिकार आणि पाण्यासाठी वाघ मानवी वस्तीकडे येतात.
पाणवठ्यांवर अधिकार गाजविण्याच्या प्रयत्नात मानव आणि वाघांचा संघर्ष.
अभयारण्यातील पाणवठे कोरडे पडतात, त्या काळात वाघ पाण्यासाठी कोठे येऊ शकतात, याचा शिकारी टोळ्यांना अंदाज. त्यामुळे शिकारींत वाढ.

काय करायला पाहिजे?शिकाऱ्यांपासून वाघांच्या संरक्षणासाठी प्रयत्न.
वर्षभर पाणी मिळण्यासाठी पाणवठे वाढविणे.
मनुष्याचा हस्तक्षेप होणार नाही यासाठी प्रयत्न.

जंगलाला दृष्ट लागतेय...प्राणी वैज्ञानिकांना, वन्य जीव अभ्यासकांना, तसेच हौशी पर्यटकांनादेखील ताडोबा अभयारण्याचे आकर्षण.
भारतीय वन कायदा ७ अन्वये, फेब्रुवारी १८७९पासून "संरक्षित वन'.
१९९५पासून ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता.
अभयारण्याची व्याप्ती ५७८.५१ चौरस किलोमीटर (११६.५५ वर्ग किलोमीटर ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि ४६१.९६ वर्ग किलोमीटर अंधारी वन्य जीव अभयारण्य)
वन्य प्राण्यांची तृष्णा भागविण्यासाठी कोलसा येथील तलावाखेरीज १० तलाव.
उच्च दर्जाच्या बांबूची पैदास.
स्थानिक आदिवासींच्या मते, "तारू' नावाचा त्यांचा पूर्वज येथे वाघाशी लढताना मारला गेला. त्याच्या स्मरणार्थ या भागाचे नाव ताडोबा.
अभयारण्यातील नैसर्गिक जलाशयाच्या काठावर "तारू'चे मंदिर.

कशामुळे?सध्या उपलब्ध क्षेत्र वन्य जीव व वाघांसाठी पुरेसे नाही.
मोठ्या प्रमाणात वनसंपदा आणि वन्य जीव असताना पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकलेले नाही.
बांबू तस्करीत वाढ. त्यामुळे वाघांचे अस्तित्व धोक्‍यात.
पर्यटकांसाठी सोयींचा अभाव.
तीव्र उन्हाळ्यामध्ये पाण्याची उपलब्धता मर्यादित.

काय करायला हवे?वन्य प्राण्यांच्या वावरासाठीची जागा वाढविणे.
जंगल वाढण्यासाठी प्रयत्न.
जंगलांना वणवे लागू नयेत यासाठी योजना.
बांबूची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न.
जलसाठा वाढविण्यासाठी योजना.

मूळ रहिवाशांवर अन्याय का?ताडोबातील मूळ रहिवासी असल्याने जंगलावर अधिकार.
पैसा ही गरज नाही, तर शिकार करून मांस खाणे ही नैसर्गिक गरज.
जंगलावर प्रेम असल्याने जंगल वाचविण्यासाठी प्रयत्न.
जंगलावर आयुष्य अवलंबून असल्याने त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न.

वन विभागाशीच वादाचे प्रसंग१९९६मध्ये संरक्षित क्षेत्र घोषित झाल्याने आदिवासींना जंगलापासून दूर व्हावे लागले.
काम मागण्यासाठी गेलेल्या आदिवासींचे व्यावसायिकांकडून शोषण.
शाळा, वीजपुरवठा, रस्ते व पाण्यापासून वंचित.
रानमेवा मिळविण्यासाठी आदिवासी जंगलाला आगी लावतात. त्यामुळे बांबू व तृणभक्षक जनावरांसाठी आवश्‍यक झाडांची राखरांगोळी.
जंगलाला लागलेल्या आगींचा परिणाम तृणभक्षकांच्या वाढीवर व वाघांच्या संख्येवर.
ताडोबा अभयारण्य झाल्यानंतर परिसरातील आदिवासी आणि वन विभागाचा संघर्षात वाढ.
रानडुकरे व नीलगाईंमुळे पिकांचे नुकसान.
वनहक्क कायद्यानुसार आदिवासी आपल्या अधिकारांचा वापर करतात, तर याच कायद्याचा आधार घेऊन त्यांच्या नावाने इतरांकडून वनांचे नुकसान.याचा त्रास आदिवासींना. त्यामुळे आदिवासींमध्ये वन विभागाप्रती नेहमीच असंतोष.
रानमेव्यातून मिळणारी खनिजे कमी झाल्याने आदिवासींचे कुपोषण.

काय करायला पाहिजे?आदिवासींच्या प्रगतीसाठी जंगलातील संपत्तीमध्ये त्यांना भागीदार करवून घेणे गरजेचे.
विस्थापित आदिवासींच्या प्राथमिक गरजा शासनाने पूर्ण कराव्यात.
जंगलातील संपत्तीवर आदिवासींचा हक्क हवा.
अभयारण्यासंदर्भातील कायद्यांची योग्य माहिती त्यांना द्यावी.
जनावरांमुळे पिकांची हानी झाल्यास त्वरित भरपाई मिळावी.
रानमेवा मिळणे अशक्‍य झाल्याने त्यांच्या पोषणासाठी सरकारने प्रयत्न करावेत.
पर्यटकांसाठी गाइड म्हणून काम करणे, वनातील फुले, फळे व मधासारख्या गोष्टी विकण्यासाठी सरकारने मदत करणे गरजेचे.

पर्यटक तर यायलाच हवेत..सोयी, गैरसोयी
अभयारण्यामध्ये चढ-उतार नसल्याने वाघांना पाहणे सोपे.
ताडोबाचा प्रमुख जलाशय पक्षिनिरीक्षकांचे आवडते ठिकाण. संपूर्ण जलाशयाला परिक्रमा करता येईल, असा जीपने प्रवासयोग्य मार्ग.
ताडोबापासून १८ किलोमीटरवर असलेल्या मोहर्ली येथे काही खासगी रिसॉर्ट आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राहण्याची व्यवस्था.
"मगर प्रजनन केंद्रा'तून सोडलेल्या मगरी काठावर पहुडलेल्या पाहायला मिळतात.
ताडोबाच्या आतील पर्यटकांसाठी असलेले रिसॉर्ट व्याघ्रसंरक्षणासाठी आता बाहेर.
खासगी रिसॉर्ट सामान्य पर्यटकांना परवडत नाही.
चंद्रपूर बस स्थानक आणि रेल्वे स्थानकापासून ताडोबाचे अंतर ४५ किलोमीटर. ताडोबाला जाण्यासाठी वन विभागातर्फे सोय नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बस. त्यांच्या वेळा सकाळी आणि सायंकाळी. (ताडोबामध्ये पर्यटकांना सकाळी ६ ते ९ आणि दुपारी ३ ते ५ या वेळात प्रवेश.)
खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट.
ताडोबाच्या पर्यटकांसाठी सुरू केलेली डेक्कन ओडीसी ही रेल्वेसुद्धा सेवाग्रामपर्यंतच.
ताडोबाच्या आत पर्यटकांना फिरविण्यासाठी खासगी वाहने आहेत; मात्र त्यांचेही दर ठरलेले नाहीत.
व्यवस्थापनाने सर्वसामान्य पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वाहतूक आणि राहण्याचा प्रश्‍न प्रथम सोडविण्याची गरज.
बस आणि रेल्वे स्थानकांवरून पर्यटकांना ताडोबाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोचविण्याची व्यवस्था नाही.

... पण, हे तारतम्यही हवेजंगलातील झाडे व फुलांना बाधा पोचवू नये.
वन्य प्राणी बिथरतील असे वर्तन करू नये.
मोठ्या हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा आदिवासींच्या सहवासात राहिल्यास त्यांना रोजगार मिळेल.
अभयारण्यामध्ये प्लास्टिकचा कचरा करू नये.

प्रश्‍न बफर झोनचा ताडोबा अभयारण्य वाचविण्यासाठी व्याघ्रप्रकल्पाच्या कोअर झोनभोवती बफर झोन प्रस्तावित. हे ११०१.७७ चौ.कि.मी क्षेत्र राखीव. यात ७९ गावांचा समावेश.
व्याघ्रप्रकल्पाच्या प्रस्तावित क्षेत्रात मोठी खनिजसंपत्ती. या खाणी झाल्यास त्याचा परिणाम सरळ व्याघ्रप्रकल्पावर.
बफर झोन झाल्यास वन्य जीव सुरक्षित.

संकलन : प्रमोद काकडे
प्रतिक्रिया
On 4/25/2010 10:48 AM Ashutosh Joshi said:
अतिशय उत्तम आणि मुद्देसीद लेख आहे. फक्त खाणकामाचा मुद्दा फारच गंभीर असल्याने तो अजून थोडा ठळक पाने मांडला गेला असता तर अधिक चांगले झाले असते असं मला वाटते. पण माझी सरकार आणि निधी देणाऱ्या कंपन्यांना आणि सर्वांनाच विनंती आहे कि अशी प्रक्टीकॅल संवर्धन करणाऱ्या लोकांना तुमचे निधी जाऊ द्यात. तरच वाघ वाचतील.
On 4/22/2010 10:36 AM Jitendra Kulkarni said:
धन्यवाद प्रमोद... अतिशय माहितीपूर्ण आणि मुद्देसूद लेख आहे. मी ताडोब्याला गेली २५ वर्षे जात आहे आणि लेखातील सगळेच मुद्दे तेव्हापासून पाहत आहे. कदाचित त्याच्या हि आधी पासून ते तसेच असतील. माझा इ मेल सोबत दिला आहे. जर काही योजना ताडोब्या साठी आखली जात असेल तर कृपया संपर्क करणे हि विनंती.
On 4/22/2010 9:54 AM Dr.Manoj Prabhavat said:
थान्क्स प्रमोद ! हा लेख वाचून ताडोबा प्रकल्पाची पूर्ण कल्पना आली ! खरच वाघांना वाचावाय्साठी खूप काही करायचं आहे आणि मला वाटत कि सरकार ने ह्या बाबत लवकरच काही तरी उपाय करायला पाहिजेत.
On 4/22/2010 9:15 AM Bhagyesh Jain said:
धन्यवाद ! प्रमोद, यासाठी काही योजना आखल्या गेल्यास, आमच्यासारखी सर्व तरुण मंडळी या कार्यात सहभागी होण्यास उत्सुक आहेत.
On 22/04/2010 08:57 प्रशांत said:
वरील सुचविलेल्या उपायांपैकी काही उपाय सोपे आहेत कमीतकमी ते तरी पूर्ण व्हावेत एवढी सरकार कडून अपेक्षा आहे. मागील अंकात जंगल तोडी बद्दल ऐकून फार वाईट वाटले होते. मिझी सरकारला विनंती आहे कि माणसांची नाही तर कमीतकमी जंगली प्राण्यांची तरी काळजी घ्या. काही तरी निर्णय (दिल्लीला विचारून नाही) घ्या.
On 4/22/2010 8:14 AM Rupesh Pansare said:
खूप छान प्रोजेक्ट. सरकारने याकडे लक्ष्य द्यायला हवे.... धन्यवाद प्रमोद.
On 4/22/2010 5:26 AM atul kumthekar said:
ताडोबा प्रकल्प पुण्यात आणावा ! मग बिल्डर्स हळू हळू त्याचे कोन्क्रेतिज़तिओन करतील आणि पर फमिली एक वाघ पाळलाच पाहिजे असा नियम राष्ट्रवादी सरकार करेल !
On 4/22/2010 4:50 AM sandeep said:
धन्यवाद ! मुद्देसूद लेख वाचून लवकर व प्रखरपणे समजले.
On 4/22/2010 1:34 AM satish patil said:
केंद्रीय पर्यावरण मंत्र्याच्या पासून , झाड तोडणार्या गुन्हेगारापर्यंत ची भ्रष्टाचाराची लिंक नष्ट केली तरच भारतातले झाड वने विसरा झाड वाचेल . व्याघ्रप्रकल्प वागिरे लांबच्या गप्पा आहेत .

Tuesday, November 27, 2012

आजही चुकतात काळजाचे ठोके

आजही चुकतात काळजाचे ठोके


चंद्रपूर- 26 नोव्हेंबर 2008. चार वर्षांपूर्वीचा तो दिवस. मुंबईतील कुलाबा पोलिस चौकीसमोर गोळीबार सुरू झाला. यात कुण्याचा पोटाला, कुणाच्या हातावर, तर कुणी पाठीवर जखम घेऊन जीव वाचविण्यासाठी धावत होते. अशातच एका तरुणाने आपल्या खिशातील रुमाल काढला. जखम झालेल्या तरुणाच्या हातावर बांधला. लगेच पोलिसांचे वाहन घेऊन रुग्णालयात नेले. मग, एकापाठोपाठ एक जखमी रुग्णालयात येऊ लागलीत. तेव्हा कळले दहशतवाद्यांनी केलेला हा हल्ला होता. जखमींना सर्वप्रथम रुग्णालयात दाखल करणारा आणि वृत्त वाहिन्यांना पहिली ब्रेकिंग सांगणारा हा तरुण चंद्रपूरकर आहे. 26/11 या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार नाट्य आणि सिनेसृष्टीतील कलावंत सुशील सहारे याला आजही या घटनेची आठवण झाली की त्याच्या काळजाचे ठोके चुकतात. 

सुशील सहारे हा मूळचा चंद्रपूरचा. तो गेल्या काही वर्षांपासून मुंबईत नाट्य आणि सिनेसृष्टीत नशीब आजमावीत आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी रात्री पावणे नऊची वेळ. एका मित्राचा मोबाईल चोरीला गेल्याने त्याची तक्रार नोंदविण्यासाठी तो कुलाबा पोलिस चौकीकडे निघाला होता. इतक्‍यात कुठूनतरी गोळीचा आवाज आला. क्रिकेट सामन्यांमुळे फटाके फुटत असावेत, असा समज करून पहिल्यांदा दुर्लक्ष केले. मात्र, हा आवाज काही वेगळाच होता. धड...धड करीत नॉनस्टॉप सुरू झालेली ही फायरिंग होती. इतक्‍यात एक तरुण वाचवा, वाचवा अशी विनंती करून धावत सुटला. काय झाले म्हणून सुशीलने विचारणा केली. 

खिशातील रुमाल काढून रक्तबंबाळ झालेल्या हाताला ती बांधली. त्यानंतर गुजराती भाषिक एक गृहस्थसुद्धा रक्ताने माखलेली पाठ घेऊन विव्हळत होता. या दोघांनाही त्याने पोलिसांच्या वाहनात बसवून रुग्णालयात नेले. मार्गावर वाहतूक विस्कळित झाली होती. मार्ग कसा काढायचा, हा प्रश्‍न होता. मात्र, पोलिसांच्या सायरनमुळे वाहन विरुद्ध दिशेने कसेबसे काढले. अवघ्या काही अंतरावर असलेल्या जिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास मोठी कसरत करावी लागली. रात्रीची वेळ असल्याने रुग्णालयातही धावपळ नव्हती. मात्र, गोळीबारामुळे जखमीसह सुशीलचीसुद्धा बोबडी वळली होती. डॉक्‍टरांना काय सांगावे, सुचेना. परिस्थितीचे भान ठेवून डॉक्‍टरांनीही भरती करून घेतले. मग, काय. तासाभरात 20 जखमी पुन्हा आलेत. नेमके काय झाले कुणालाही कळले नव्हते. ड्रियडेंट हॉटेलसमोर गोळीबार सुरूच होता. तेव्हा कळले की हा दहशतवादी हल्ला होता म्हणून. आकस्मित सूचना मिळाल्यानंतर रुग्णवाहिकाही सायरन वाजवत निघाल्या. 

कुणाच्या पाठीवर, कुणाच्या हातावर, तर कुणी पोटावर बंदुकीची गोळी झेलत विव्हळत होते. या तास-दोन तासांत घटनेची बातमी मुंबईत पसरली नव्हती. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीच्या ओळखीने सुशीलनेच पहिली ब्रेकिंग दिली. तेव्हापासून रात्रभर त्याने रुग्णसेवा आणि ब्रेकींगची जबाबदारी सांभाळली. डोळ्यासमोर बघितलेले दृश्‍य आजही त्याच्या मनाला ठेचून जातात. या घटनेला आज चार वर्षे लोटली. 164 जणांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांचा खातमा झाला. जिवंत सापडलेला कसाबही आता फासावर लटकला. मात्र, ज्या कुटुंबांचे कर्ते गेलेत. त्यांच्या घरी आजही प्रकाश उजाडलेला नाही, याची खंत सुशीलच्या मनात घर करून बसली आहे. 
--------------------
मदतगार, साक्षीदार अन्‌ न्यायदाता
26/11च्या घटनेतील पहिल्या जखमीला रुग्णालयात भरती करून मोलाचे योगदान देणारा सुशील सहारे, या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आणि कर्तव्य बजावणारा सीआरपीएफचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप खिरटकर आणि जिवंत सापडलेल्या अजमल कसाब याला फाशीची शिक्षा सुनावणारे न्यायमूर्ती मदनलाल टहलियानी हे तिघेही चंद्रपूर जिल्ह्याच्या मातीतले आहेत. 
सुशील सहारे हा चंद्रपूरचा. संदीप खिरटकर हे वरोरा, तर न्यायमूर्ती टहलियानी हे मूळचे मूल येथील रहिवासी आहेत.
--------------------
शहीद हेमंत करकरे
चंद्रपूर, गडचिरोलीच्या धोकादायक जंगलात नक्षलवाद्यांच्या पाठलाग करणारे एकमेव वाघ म्हणजे हेमंत करकरे. 1991 मध्ये चंद्रपूर या नक्षलवाद्यांचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यात ते पोलिस अधीक्षक म्हणून रुजू झाले. करकरेंमध्ये एक कलासक्त रसिकही होता. या काळात चंद्रपूरच्या जंगलात फिरताना त्यांना लाकडाचे वेगवेगळ्या आकाराचे अनेक तुकडे सापडले. त्यातले वैशिष्ट्यपूर्ण तुकडे त्यांनी गोळा केले होते. त्यात गणपती, देवी, आदिमाया, नाचणारे जोडपे, येशू ख्रिस्त या आकाराचे लाकडाचे तुकडेही होते. त्याचे प्रदर्शन 1994 मध्ये भिवंडीत भरविण्यात आले होते.

 दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे गेल्या काही दिवसांत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याच्या त्यांच्या कर्तृत्वामुळे प्रकाशात आले. लष्कराचा एक लेफ्टनंट कर्नल, एक साध्वी व साधू यांना अटक करून दहशतवादाचा हिंदू चेहराही त्यांनी प्रथमच समोर आणला होता. त्यांच्या या कृतीमुळे हिंदुत्ववादी पक्षांच्या टीकेचेही ते धनी ठरले होते. मोठा राजकीय दबाव त्यांच्यावर होता. पण दहशतवादाशीच लढत असलेला हा निधड्या छातीचा अधिकारी मुंबईत दहशतवाद्यांशीच झालेल्या चकमकीत अखेर शहीद झाला.
'घायाळ पाखरा' ने रेखाटले आदिवासींचे दु:ख

'घायाळ पाखरा' ने रेखाटले आदिवासींचे दु:ख

नाट्य समीक्षा
आदिवासी समाज म्हणजे दर्‍याखोर्‍यात,रानावनात राहत खर्‍या अर्थाने निसर्गाशी समरस झालेली रानपाखरेच.पण, प्रस्थापित व्यवस्थेत अनेक ठिकाणी या रानपाखरांचे शोषण होते. त्यांचे आदिम दु:ख लोकजागृती संस्था, चंद्रपूरच्या 'घायाळ पाखरा'च्या नाट्यप्रयोगातून सर्मथपणे रेखाटण्यात आले आहे. काल राज्य नाट्यस्पर्धेत सादर झालेल्या या नाटकाचा प्रयोग तंत्र, आंगिक, वाचिक अभिनयाच्या दृष्टीनेही उत्तम झाला.
गडचिरोलीतील एका दुर्गम खेड्यातील आदिवासी समाजातील एक बुद्धीमान तरूण विद्यापीठात प्रथम येतो. राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार पटकावतो.पण, त्याचे नाव व खोटे कागदपत्रे वापरून भलतीच व्यक्ती त्याची नोकरी हिसकावते. तो अन्यायाविरोधात दाद मागायला जातो. तेव्हा त्याला अपमानित करून पोलीसांकरवी मारहाण करण्यात येते. त्याचा इन्सपेक्टर मित्र त्याच्या आईचा खून करतो.पण, तो नक्षलवादाची वाट धरता भारतीय संविधानावर विश्‍वास ठेवत न्यायालयातून आपला हक्क मिळवतो,असे या नाटकाचे कथानक आहे. या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक असलेले अभिनेते अनिरूद्ध वनकर यांनी गौतमची भूमिका आपल्या खास शैलीत साकारली आहे. त्यांची संवादफेक, भावाभिव्यक्ती, मंचावरील वावर नव्या कलावंतांना अभ्यासण्यासारखेच आहे. यशोधरेच्या भूमीकेत तेजश्री बापट यांनीही आपल्या भूमिकेत प्राण ओतला आहे. भास्करची भूमीका रवींद्र धकाते यांनी उत्तम साकारली. पहिल्या अंकात विनोदी आणि दुसर्‍या अंकात गंभीर होणारी ही भूमिका प्रेक्षकांची दाद मिळवून गेली. मागील स्पर्धेतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. विजय कुळकर्णी हा खलनायक गौतम ढेंगरे यांनी आपल्या अभिनयातून जिवंत केला.
इन्स्पेक्टरची भूमिका परमेश्‍वर पवार यांनी कौशल्याने साकारली. त्यांची देहबोली व्यक्तीरेखेला अगदी साजेशी होती. संजीव रामटेके यांची रामदासची भूमिकाही विनोदी व लक्षवेधक झाली. नाटकात अधूनमधून प्रवेश करणारे अधिकारी , न्यायालयाचे जज , अधिवक्ता, तपास अधिकारी यांच्या भूमीकाही चांगल्या होत्या. केवींद्रनाथ बारसागडे यांनी प्रकाशयोजना कौशल्याने सांभाळली, आदेश राऊत यांचे संगीत श्रवणीय होते. संजय रामटेके यांनी एकाच झोपडीच्या आधारे संपूर्णगावाचे दृश्य उभे करून नेपथ्यात कल्पकता दाखवली. या नाटकाचा प्रयोग उत्तम असला तरी, काही उणीवा नक्कीच आहेत. नाटकात काही ठिकाणी झालेला शिवराळ भाषेचा उपयोग टाळता आला असतो. आदिवासी समाजातील परिवार दाखवताना मुख्य पात्रांची नावे महामाया, यशोधरा, शुद्धोधन, गौतम अशी दिली आहेत. अशी नावे आदिवासी समाजात सहसा दिसत नाहीत.न्यायालयाचा प्रसंग आणखी रंगवता आला असता. नायकाची हिरावण्यात आलेली नोकरी खासगी कंपनीची दाखवली आहे ती शासकीय दाखवली असती, तर अधिक प्रभाव पडला असता.या काही बाबी वगळल्या तर नाटकाचा प्रयोग अतिशय उत्कृष्ट झाला. नायकाची नोकरी जाते, आईचा खून होतो तेव्हा तो नक्षलवादाची भाषा बोलतो. यानंतर त्याला सहज नक्षलवादी दाखवता आले असते.पण, तसे न करता सकारात्मक संदेश दिला आहे. त्यामुळेच हे नाटक खास झाले आहे.
द रिअलहिरोत झाडीपट्टीचा अनिरुद्ध

द रिअलहिरोत झाडीपट्टीचा अनिरुद्ध


चंद्रपूर : देसाईगंज (वडसा) येथील लोकजागृती नाट्यरंगभूमीचा कलावंत अनिरुद्ध वनकर याला मद रिअल हिरोम चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटात तो डॉ. आमटेंचा सहकारी म्हणून भूमिका वठवेल.

रविवारपासून चित्रपटाच्या चित्रीकरणास हेमलकसा येथे प्रारंभ झाला. झाडीपट्टीतील हिरो असलेले अनिरुद्ध वनकर हे नाट्य निर्मातालेखकदिग्दर्शक व उत्कृष्ट कलावंत असल्याने त्यांच्या नाटकाला विदर्भातील रसिकांची पहिली पसंती असते. श्री. वनकर यांना सुप्रसिद्ध कलावंत नाना पाटेकर यांच्या समवेत काम करण्याची संधी आता स्वजिल्ह्यातच उपलब्ध झाली आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम अशा जिल्ह्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्त आता मागील दोन दिवसांपासून बॉलिवूडमधील मंडळींचे मुंबई महामायानगरीतून विशेष अशा हेलिकॉप्टरने आगमन होत असल्याने जिल्ह्यातील बालगोपालासंह आबालवृद्धांनाही आकाशाकडे बघण्याचा मोह राहवत नाही अशी स्थिती दिसत आहे.
जिल्ह्यात पहिल्यांदाच हा चित्रीकरणाचा उपक्रम होत असल्याने दक्षिण व पूर्व विदर्भातील कलावंत जगताचे लक्ष या ङ्कद रिअल हिरोङ्क या चित्रपटाकडे लागले आहे. भामरागडच्या शेजारीच हेमलकसा या अतिदुर्गम भागात जंगल परिसरात गेल्या जवळपास चाळीसेक वर्षांपासून आमटे परिवार लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींच्या आरोग्यासाठी झटत आहेत. डॉ. बाबा आमटेंपासून हे कार्य सुरूच आहे.
कधी काळी वीजशिक्षणासह आरोग्याच्या सुविधाही न पोहोचल्याने वानरांसारखे प्राणी मारून खाणाèया आदिवासींना या आमटे दाम्पत्याने माणसाप्रमाणे जगायला शिकविले. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. सारा परिसर बदलून टाकला.
जे आदिवासी कधीकाळी प्राणी मारून खाततेच आता बिबट्याअस्वलमगरीमोरहरणेसांबरशेकरूकासवविविध प्रकारचे साप उपचारासाठी इथे आणू लागले. हे छोटे मोठे प्राणी आता या ठिकाणी रमले आहेत. आमटे परिवाराचे जणू सदस्यच बनले आहेत. परिवारातही छोटी मुले सुद्धा त्यांची काळजी घेताहेत. ही मंडळी जवळपास येत असल्याचे जाणवताचभेटीसाठी उतावीळ बनल्याप्रमाणे धावतच येतात. आणि वातावरणात एक आगळेच चैतन्य निर्माण होते.
या अनुभवाने भारावलेल्या डॉ. समृद्धी पोरे यांनी डॉ. प्रकाश आमटे ङ्कद रिअल हिरोङ्क या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला. नाना पाटेकरसोनाली कुलकर्णीडॉ. मोहन आगाशेविक्रम गायकवाड यासारख्या कसलेल्या अभिनेत्यांबरोबरच अनिरुद्ध वनकर सारख्या झाडीपट्टीतील नावाजलेल्या कलावंतांसह अन्य शंभरावर कलावंतांना या चित्रपटात भूमिका करण्याची संधी लाभणार आहे.

Friday, November 23, 2012

आदिवासींच्या गप्पात रमला अभिनेता सयाजी

आदिवासींच्या गप्पात रमला अभिनेता सयाजी


देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर, ता. १८ : मराठी-हिदीसह दाक्षिणात्य चित्रपटात अभिनय करणा-या सयाजी qशदे या अभिनेत्याने ताडोबाची भ्रमंती करून कोलारा येथील आदिवासी नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. qहदी-मराठी चित्रपटसृष्टीतील झगमगाटात वावरूनही मराठी आणि आदिवासी कुटुंबासोबत चर्चा करून जमिनीवर पाय असलेला कलावंत असल्याचे त्याने दाखवून दिले.
सयाजी qशदे हा मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि qहदी भाषांतील चित्रपटांमध्येही अभिनय केलेला अभिनेता, चित्रपटनिर्माता आहे. बॉलिवूड-बॉलिवूड चित्रपटसृष्टीत याचे चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरले आहेत. मूळचा सातारा जिल्ह्यातील वेळे (कामथी) येथील असलेला सयाजी qशदे दिवाळीच्या सुट्या सुरू असल्याने शनिवारी (ता. १८) कुटुंबासह ताडोबा येथे आला होता. हमखास वाघाचे दर्शन मिळते, यासाठीच ताडोबा निवडले. पणत्याला वाघाचे दर्शन झाले. मात्र, ताडोबाची निसर्गसंपत्ती आणि अन्य वन्यप्राण्यांना बघून आपण खूष झाल्याचे त्याने सांगितले. नागपूरहून चिमूरमार्गे तो कोलारा गेटमधून ताडोबात गेला. तिथे जिप्सी मालक राजू ताजणे, प्रवीण जांभूळे, पर्यटक मार्गदर्शक बंटी डाहूले आणि कोलारा गेटवरील गाईड कर्मचारी, वनरक्षक यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते ताडोबाच्या दर्शनाला गेले. सङ्कारी करून झाल्यानंतर त्यांनी कोलारा गावात जाऊन आदिवासी नागरिकांची भेट घेतली.
सयाजीने मुंबईत मराठी चित्रपट-नाटके व qहदी चित्रपटांतून अभिनय केल्यानंतर बॉलिवूड व हॉलीवुडाची वाट धरली. याने आतापर्यंत सुमारे ३० तेलुगू, १२ तमिळ, ४० qहदी, ४ मराठी तसेच २ इंग्लिश, १ कन्नड व १ मल्याळम चित्रपटांमधून कामे केली आहेत. qशदे यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिका व त्यांची स्वत:ची व्यक्तिरेखा याबाबत विचारले असता त्यांनी कुठल्याही कलावंतांस त्याच्या योग्यतेनुसार पात्र करण्याची क्षमता असते. कलावंत हा चांगल्या दर्जाचाच असतो. त्याच्या व्यक्तीरेखेवर पात्राचा प्रभाव पडत नाही. ङ्कत्या रात्रीचा पाऊसङ्क या चित्रपटातील त्यांची खलनायकाची भूमिका qशदे यांना खूप पसंत असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी काळात बातमी व तेंडुलकर आउट हे वेगळ्या मांडणीचे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणणार असल्याचे सांगितले. या दरम्यान चिमूर येथे ठाणेदार पंजाबराव मडावी, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन बुटले, सचिन पचारे, सुधीर जुमडे, राष्ट्रवादीचे रमेश कराळे यांनी त्यांचे स्वागत करून ताडोबाच्या दर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.
रविवारपासून सुरू होणार द रिअल हिरोचे चित्रिकरण

रविवारपासून सुरू होणार द रिअल हिरोचे चित्रिकरण


नाना पाटेकरसह अन्य कलावंत शुक्रवारी हेमलकसात

देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर, ता. २१ : आदिवासींच्या आरोग्यासाठी गेल्या अनेक दशकपासून झटणा-या डॉ. प्रकाश आमटे यांचा जीवनपट डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर येत असून, येत्या २५ नोव्हेंबरपासून हेमलकसा येथे चित्रिकरणाला प्रारंभ होत आहे. या चित्रपटात डॉ. आमटेंच्या भूमिकेत नाना पाटेकर, तर डॉ. मंदा आमटेंची भूमिका सोनाली कुळकर्णी साकारणार आहे.
ममला आई व्हायचंय या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कार मिळविणा-या पहिल्या महिला चित्रपट दिग्दर्शिका डॉ. समृध्दी पोरे यांनी या चित्रपटनिर्मितीसाठी पुढाकार घेतलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसासारख्या अतिशय दुर्गम जंगलात गत ४० वर्षांपासून डॉ. प्रकाश आमटे आणि पत्नी डॉ. मंदा आमटे लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींच्या उत्थानाचे अविरत कार्य करीत आहेत. ज्यावेळी त्यांनी या कामाला सुरुवात केली होती तेव्हा आदिवासी जमातींपर्यंत वीज, शिक्षण, दवाखाना हया सारख्या मुलभूत सुविधाही पोहचल्या नव्हत्या. शिवाय त्यांची भाषाही आपल्यासारखी नव्हती. एवढी सारी आव्हाने असतानाही डॉ.प्रकाश आणि मंदा यांनी तिथे शून्यातून एक नवं विश्व निर्माण केले. केवळ आदिवासींसोबतच नाही तर तेथील पर्यावरण आणि पाण्यांशीही त्यांनी नवे नाते जोडले. आज तेथील स्थानिक आदिवासींसोबत तेथील बिबटे, qसह, साप या सारखे अनेक qहस्त्र पशु पक्षीही त्यांच्या परिवाराचेच सदस्य बनले आहेत. त्याचा हा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना कळावा, यासाठी डॉ. पोरे यांनी पुढाकार घेतलेला आहे.
चित्रपटासाठी प्रमुख भूमिकेत नाना पाटेकर, सोनाली कुळकर्णी, डॉ. मोहन आगासे, विक्रम गायकवाड या चित्रपट कलावंतांसह झाडीपट्टीतील कलांवत अनिरुद्ध वनकर दिसणार आहे.
चित्रिकरणासाठी तंत्रज्ञांची निवड करण्यात आली असून, संपूर्ण चमू हेमलकसा येथे पोचली आहे. २० ते २४ पर्यंत चित्रिकरणाचे सेट तयार केले जाणार आहे. चित्रपटात आदिवासी, रुग्ण आणि सहकारी म्हणून झाडीपट्टीतील सुमारे १०० कलावंतांना संधी मिळाली आहे. चित्रिकरणस्थळी डॉ. आमटेंचे रुग्णालय, आदिवासींच्या झोपड्या साकारण्यात आल्या आहेत.
अपंग प्रमाणपत्रासाठी रेशनकॉर्डचा तगादा

अपंग प्रमाणपत्रासाठी रेशनकॉर्डचा तगादा

शासन निर्णय डावलून अ‍ॅङ्किडेव्हिडची सक्ती, प्रमाणपत्रासाठी मोजावे लागतात पैसे
 देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर, ता. २२ : अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दर बुधवारी अंध व अपंग व्यक्तींच्या रांगा लागतात. मात्र, वैद्यकीय अधिकारी रेशनकॉर्डसाठी तगादा लावत आहे. शासन निर्देशानुसार ओळखपत्र म्हणून आधार कॉर्ड, मतदार कॉर्ड qकवा वीज बिलाची प्रत ग्राह्य धरण्याची सूचना आहे. त्याउपरही रेशनकार्ड नसल्यास अ‍ॅङ्किडेव्हिडची सक्ती केली जात असल्याने अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
अपंग प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात आठवड्यात दर बुधवार हा दिवस निश्चित केला. जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली मंडळ स्थापन करण्यात आले असून, त्याद्वारे अपंगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात येते. अपंगत्वाचे प्रमाणपत्र सहज उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यातील ग्रामीण भागात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व शहरी भागात शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक आणि अधीक्षकांनी अपंगांना प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याच्या सूचनावजा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शासन निर्णय आणि सूचनांची अंमलबजावणी जाणीवपूर्वक टाळली जात आहे. प्रमाणपत्र वितरित करताना जिल्हास्तरावर त्रिस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. यात जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित विषयातील तज्ज्ञाचा समावेश आहे. अपंग प्रमाणपत्र देताना मतदार ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, बँक पासबुक, पारपत्र, दूरध्वनी qकवा वीजबिल, ग्रामपंचायत, नगरपालिका qकवा महानगरपालिकेने दिलेले रहिवासी प्रमाणपत्र, निवासी अपंग विद्यालयातील विद्याथ्र्यांसाठी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र, आधार कॉर्ड ग्राह्य धरले जाते. या कागदपत्रांसह अर्ज वैद्यकीय मंडळाच्या सदस्य सचिवाकडे सादर करावा लागतो. अर्जासोबत छायाचित्रे आणि त्यावर स्वाक्षरी अपेक्षित असते. त्यानंतर अपंग व्यक्तीची तपासणी संबंधित तज्ज्ञाने करून त्याच्या तपासणीचे निष्कर्ष व अहवाल रुग्णपत्रिकेवर नोंदविण्यात येते. ही प्रक्रिया करताना रुग्णांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. शासन निर्देशानुसार सूचित केलेल्यापैकी कोणताही एक ओळखपत्र ग्राह्य धरण्याऐवजी रेशनकॉर्डची सक्ती केली जात आहे. जर रेशन कॉर्ड नसेल, qकवा त्यावर रुग्णाचे नाव नसेलतर सेतूमधून अ‍ॅङ्किडेव्हिडची अट घातली जात आहे. याशिवाय अपंगव्यक्तीकडून अधिकचे पैसे कमविण्यासाठी जिल्हा रुग्णालयात साखळीच तयार झालेली आहे. दर बुधवारी अडीचशेच्या आसपास रुग्ण येत असतात. त्यांच्याकडूनही बेकायदेशीररीत्या एक ते दीड हजार रुपये छुप्या मार्गाने वसूल केले जात आहे.
------------
रुग्णालयात बहिरेपणा तपासणी यंत्रच नाही
जिल्ह्यात पैसे मोजून केवळ संबंधित नागरिक, युवकच नव्हेत, तर अनेक शिक्षक, सरकारी कर्मचारीही बोगस मबहिरेङ्क बनले आहेत. त्यांनी नियमानुसार मङ्किटनेसङ्क प्रमाणपत्र सादर करायचे आणि नंतर सवलतीचा लाभ उपटण्यासाठी अपंगत्व दाखविण्याचा प्रकार सुरू झाला आहे. कर्णबधिरांना बहिरेपणा असलेला प्रमाणपत्र देताना तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र, येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी यंत्रच नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील रुग्णांची तपासणी नागपूर येथे करावी लागत आहे. येथील नागरिक संजय कन्नावार यांनी घेतलेल्या माहितीच्या अधिकारातील माहितीत जिल्हा सामान्य रुग्णालयाने आगामी काळात बहिरेपणा तपासणी यंत्र उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविली आहे. यावरून आजवर वितरित झालेले प्रमाणपत्र बोगस कर्णबधिरांना तर दिले नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे.