সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, October 11, 2017

वीजनिर्मिती प्रकल्पा समोर 150 कामगारांचे बेमुदत ठिय्या आंदोलन

दिवाळीच्या  तोंडावर  कामगारांवर उपासमारीची पाळी
वरोरा/प्रतिनिधी:
वरोरा शहराजवळील मोहबाळा गावालगत असणाऱ्या औद्योगिक  विकास महामंडळ अंतर्गत साई वर्धा पॉवर जनरेशन कंपनी गेल्या आठ वर्षा पासून कोळश्या पासून 540 mw वीज निर्मितीचे काम करीत  आहे.
 सदर कंपनीत निरनिराळ्या तांत्रिक पदावर  कामगार कार्यरत असून कंपनीत अनेक सहकंपन्या कार्यरत आहेत. यातील चेन्नई राधा या कंपनीचा कंत्राट संपुष्ठात आल्यामुळे ३० जून २०१७ पासून इन्कॉटेक नावाची कंपनी त्या कंपनीच्या ठिकाणी काम करणार असून त्या साठी सर्वच कंत्राटी कामगारांच्या इन्कॉटेक कंपनी च्या माध्यमातून मुलाखती घेऊन कामगारांना कामावर घेण्यात येईल असा नोटीस कंपनीच्या नोटीस बोर्ड वर लावला  होता. त्या प्रमाणे इन्कॉटेक कंपनीने कामगारांच्या हुद्द्या प्रमाणे मुलाखती १५ व १६ जुलै ला ठेवण्यात आल्या पण कुठलीही मुलाखत न घेता २१ जुलै पासून कामगारांना प्रवेश बंद करण्यात आल्याने कामगारांनी २४ जुलै ला नेतृत्वात जिल्हाधीकारी व सहायक कामगार आयुक्त यांना निवेदन देण्यात आले होते. तेव्हा पासून आता पर्यंत अनेक निवेदने देवून हि कंपनी प्रशासन कामगारांना घेण्यास तयार नसल्याने गेल्या 3 महिन्यापासून कामगारांवर उपासमारीची पाळी आली असून बुधवारला कंपनी समोर कामगार आंदोलन पुकारले.
                                कुठलीही पूर्वसूचना न देता वर्धा पॉवर जनरेशन या वरोरा एम आय डी सी मधील कंपनीने  १५० स्थानिक कामगारांना कामावरून कमी केले असून या कामगारांनी संघटीत होवून कामगार आयुक्त तथा जिल्हा अधिकारी यांना समेटाची कारवाई करण्याबाबत २ महिन्यापासून निवेदन दिले होते. पण कामगार आयुक्त यांनी तारीख पे तारीख देत  समेटाची कारवाई  महिनाभर केलीच नाही. आणि कंपनी प्रशासन हे कामगारांना कामावर घेण्यास नकार देत असून कंपनीने  कामगारांना कुठलीही सूचना न देता कामावरून कमी करणे हे बेकायदेशीर असून त्यांना न्यायालयात न्याय मागण्याचा सल्ला दिला होता.  कामगार आयुक्त यांनी आपल्या जबाबदरी वरून हाथ झटकल्याने  कामगारांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले जिल्हाधिकारी (निवासी ) यांनी समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला व कामगारांना कामावर घेण्याबाबत २ दिवसात सुचविण्याचे आदेश दिले. मात्र कंपनी प्रशासनाने  कारण दाखवून निर्णय एक आठवड्यानंतर  देत कामगारांना आम्ही कामावर घेवू शकत नाही असा निर्णय दिला.

                               त्यांनी कंपनीने घेतलेला निर्णय हा कामगारविरोधी असून ३ महिन्यापासून १५० कामगारांना उपासमारीची पाळी आली असून परराज्यातील कंपन्या स्थानिक कामगारानाच्या भरोशावर पैसा कमवून स्थानिक कामगारांना रोजगारापासून वंचित  करत आहे .
४ सप्टेंबर ला कंपनी कडून पत्र मिळाले कि कंत्राटदार कंपनी मॅकलिक भारत यांनी १५० कामगारांना कामावर घेण्यासाठी ७ दिवसाचा वेळ मागितला होता .१४ सप्टेंबर २०१७ ला साई  वर्धा पॉवर जनरेशन कंपनी यांचे कडून आलेल्या पत्रात उपजिल्हाधिकारी यांनी कळविले कि नवीन कंत्राटदार कंपनीने १५० कामगारांना कामावर घेण्यास असमर्थ असल्याचे कळविले .

                     गेल्या तीन महिन्यापासून प्रशासनाकडे दाद मागून कुठलाही तोडगा न निघाल्याने बुधवारला कामगारांनी बेमुदत आंदोलन पुकारले सकाळी ८ वाजता  सुरु झालेल्या या आंदोलनात १५० हि कामगार सहभागी झाले होते.  कामगारांनी मुख्य प्रवेश द्वारावरच ठिय्या आंदोलन सुरु केल्याने सकाळ पाळीतील कामगार प्रकल्पात प्रवेश करू शकले नाही व रात्र पाळीला प्रकल्पात गेलेले कामगार अजूनही बाहेर निघले  नव्हते इतर कामगारांनी या आंदोलनाला पाठींबा देत ते आल्या पावली घरी परतले . जो पर्यंत कामगारांना न्याय मिळणार नाही तो पर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली  असून शांततेत आंदोलन सुरु आहे .

 
                 आंदोलन सुरु असतांना आंदोलकांनी काळ्या फिती बांधल्या होत्या .या बाबत आंदोलकांना विचारले असता गेल्या ३ महिन्यापासून जिल्हा प्रशासन आम्हाला तारीख पे तारीख देत आम्हा कामगारांना न्याय दिला नाही त्याचा निषेद आम्ही काळ्या फिती बांधल्या आहे असे आंदोलकयांनी सांगितले. आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले .




শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.